Saturday 2 February 2013

यशवंतरावांनी दिलेला सहकाराचा मुलमंत्र महाराष्‍ट्राला नवी दिशा देणारा - उल्‍हास पवार



·        यशवंत दाते स्‍मृती रोप्‍यमहोत्‍सवी व्‍याख्‍यानमाला
वर्धा दि.2-  महाराष्‍ट्र मराठ्यांचे नव्‍हेतर मराठी माणसाचे राज्‍य  व्‍हावे तसेच सहकाराच्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्राची सर्वांगिण प्रगती व्‍हावी यासाठी यशवंतराव चव्‍हाण यांनी  महाराष्‍ट्राला सहकाराचा मूलमंत्र दिला. त्‍यांनी विकासाची जी दिशा दिली त्‍यानुसार महाराष्‍ट्राची सर्वांगिण प्रगती शक्‍य असल्‍याचे प्रतिपादन यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त आयोजित बदलता महाराष्‍ट्र  आणि आपण या विषयावर सामाजिक विचारवंत उल्‍हास पवार यांनी केले.
            यशवंतराव दाते स्‍मृती रोप्‍यमहोत्‍सवी व्‍याख्‍यानमालेत पहिले पुष्‍प गुफतांना ते बोलत होते. सार्वजनिक जिल्‍हा ग्रंथालयाच्‍या सभागृहात दाते स्‍मृती संस्‍थेचे पुरस्‍कार वितरणाचे आयोजनही करण्‍यात आले. यावेळी  आद्य कादंबरीकार बाबा पद्मंजी साहित्‍य पुरस्‍कार सोलापूरच्‍या टेंभुर्णे येथील प्राचार्य महिंद्र कदम, संत भगवान बाबा,काव्‍यसंग्रह पुरस्‍कार लातुरचे रमेश चिल्‍ले , अंजनाबाई इंगळे, स्‍मृती  स्त्रिवादी साहित्‍य पुरस्‍कार मुंबईच्‍या श्रीमती संध्‍या नरे पवार,62 व्‍या विदर्भ साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष डॉ. किशोर सानत यांचाही यावेळी स्‍मृती चिन्‍ह देवून गौरव करण्‍यात आला.
            महाराष्‍ट्राचे पहिले मुख्‍यमंत्री यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षात आयोजित व्‍याख्‍यानात सामाजिक,राजकीय, सांस्‍कृतीक, महाराष्‍ट्रातील स्थित्‍यंतरे मांडतांना उल्‍हास पवार म्‍हणाले की, संत परंपरा लाभलेल्‍या महाराष्‍ट्राला फुले,शाहू,आंबेडकर यांच्‍या विचाराने सत्‍य शोधतीय चळवळीचा वारसा लाभला आहे. यशवंतराव चव्‍हाण यांच्‍यावर सत्‍यशोधक चळवळीचा प्रभाव असला तरी महाराष्‍ट्राच्‍या सर्वांगिण विकासासाठी त्‍यांनी केलेले कार्य कदापिही विसरता येणार नाही. पुरोगाती चळवळीला नवी दिशा देण्‍यासोबतच सार्वभैमत्‍व  स्विकारणारा विचार रुजवून अधिक चांगले वातावरण करण्‍याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.
            यावेळी यशवंत दाते स्‍मृती संस्‍थेच्‍या साहित्‍य पुरस्‍काराचे मानकरी श्रीमती संध्‍या नरे पवार, महेन्‍द्र कदम,रमेश चिल्‍ले, डॉ. किशोर सानप यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
            प्रारंभी उल्‍हास पवार यांनी दिप प्रज्‍वलित करुण व्‍याख्‍यानमालेचे उद्घाटन केले. प्रास्‍ताविकात संस्‍थेचे अध्‍यक्ष प्रदीप दाते यांनी व्‍याख्‍यानमालेच्‍या पंचवीस वर्षाचा आढावा मांडला. कार्यक्रमाचे संचालन डॉ.स्मिता वानखडे यांनी तर आभार संजय इंगळे तिगावकर यांनी मानले. मानपत्राचे वाचन प्रा. राजेंद्र मुंडे व रंजना दाते यांनी केले. यावेळी मोठ्या संखेने साहित्‍यप्रेमी उपस्थित होते.  
000000

सात फेब्रुवारी रोजी माजी सैनिकांची आरोग्‍य तपासणी



वर्धा दि. 2 – ग्रामिण रुग्‍णालय पुलगांव येथे गुरुवार दि. 7 फेब्रु. रोजी सकाळी 11 वाजेपासून लायंन्‍स क्‍लब वर्धा व्‍दारा मोफत वैद्यकिय तपासणी व एक रँक एक पेंशन योजने अंतर्गत सूधारीत वेतन वाढ मिळण्‍यासंबधी फॉर्म्‍स  भरुन घेण्‍यात येणार आहे.
 सर्व माजी सैनिकांनी व विधवांनी त्‍यांचे सर्व पीपीओ, सेवापुस्‍तक, ओळखपत्र, अद्यावत केलेले बँकेचे पासबुक व ई. सी. एच. एस. कार्ड व विधवा असल्‍यास जन्‍म तारखेचा व पतीचे मृत्‍यु प्रमाणपत्र या सर्व कागदपत्राची झेरॉक्‍स घेवून ग्रामिण रुग्‍णालय, पुलगांव येथे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी, वर्धा यांनी केले आहे.
                                                          000000

Friday 1 February 2013

बीबीएफ पध्‍दतीमुळे एक हजार हेक्‍टर क्षेत्रातील कापसाच्‍या उत्‍पादनात भरीव वाढ



                  * विदर्भ प्रवाही सिंचन विकास कार्यक्रम
            * 54 गावातील 1 हजार 150 हेक्‍टरवर यशस्‍वी प्रयोग  
            * जिल्‍ह्यात पंन्‍नास हजार हेक्‍टर पर्यंत क्षेत्रात वापर
            * शेतकरी समुहाला 48 बेडमेकरचे वाटप
वर्धा दि.1-  विदर्भ प्रवाही सिंचन विकास कार्यक्रमा अंतर्गत रुंद सरी वरंभा पध्‍दत (बीबीएफ) तंत्रज्ञानाव्‍दारे जिल्‍ह्यात प्रायोगिक तत्‍वावर 54 गावातील 1 हजार 150 हेक्‍टर क्षेत्रावर कापसाचे उत्‍पादन घेण्‍यात आले असून परंपरागत पध्‍दतीमध्‍ये बदल केल्‍यामुळे कापसाच्‍या उत्‍पादनात एकरी 3 ते 5 क्विंटलपेक्षा जास्‍त वाढ झाली आहे.
बीबीएफ हे तंत्रज्ञान उत्‍पादन वाढीसाठी अत्‍यंत उपयुक्‍त ठरत असल्‍यामुळे शेतक-यांना प्रशिक्षण देवून सुमारे 50 हजार हेक्‍टरपेक्षा जास्‍त क्षेत्रात पुढील हंगामात वापर करण्‍याच्‍या दृष्‍टीने नियोजन करण्‍यात येत असल्‍याची माहिती जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी दिली. तूर पिकासाठीही हे तंत्रज्ञान उपयुक्‍त ठरले आहे.
          केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार वर्धा येथील कार्यक्रमासाठी आले असता वर्धा जिल्‍ह्यातील बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करुन कापूस उत्‍पादन वाढीच्‍या उपक्रमाची माहिती घेतली. उत्‍पादन वाढीसाठी व कापसाला आवश्‍यक पाणी उपलब्‍ध करुण देणा-या उपक्रमाची माहिती सर्व शेतक-यांना देवून या उपक्रमामध्‍ये सहभागी करुन घेण्‍याची सूचनाही त्‍यांनी यावेळी दिली.
          वर्धा जिल्‍ह्यात सुमारे 1 लाख 65 हजार हेक्‍टर क्षेत्रात कापसाची पेरणी केल्‍या जाते निर्सगाच्‍या अनियमिततेमुळे उत्‍पादनावरही त्‍याचा विपरीत परिणाम होतो परंतु बीबीएफ तंत्रज्ञानाव्‍दारे पडलेल्‍या पावसामुळे बेडमेकर यंत्राव्‍दारे तयार केलेला बेड ओला झाल्‍यानंतर पेरणी केल्‍या जाते. दोन बेडमध्‍ये अंतर असल्‍यामुळे अतिपाऊस झाल्‍यास पाणी साचत नाही तसेच कमी पाऊस झाल्‍यास बेडमध्‍ये पाणी शोसून ठेवता येते त्‍यामुळे पिकाच्‍या वाढीलाही मदत होते.
            जिल्‍ह्यात शेतकरी समुहाला 48 बेडमेकर कृषी विभगातर्फे उपलब्‍ध करुण देण्‍यात आले असून टॅक्‍टरला हे यंत्र जोडून शेतामध्‍ये बेड सहजपणे तयार करता येतात या यंत्रामध्‍ये बदल करण्‍यात आला असून सरीच्‍या माथ्‍यावर पाणी अडविण्‍यासाठी तसेच खत पेरणीही सुविधा उपलब्‍ध झाली आहे. बेडमेकरच्‍या माध्‍यमातून माती व शेणखत एकत्र करुण बेड तयार करणे सहज सुलभ झाले आहे. बेडमेकरची किंमत 23 हजार 800 रुपये असल्‍यामुळे शेतकरी समुह वैयक्तिकरित्‍यासुध्‍दा खरेदी करु शकतो.
                         50 हजार हेक्‍टर वर बीबीएफ
        बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करुण कापूस उत्‍पादन वाढीला प्रोत्‍साहन मिळावे यासाठी जिल्‍ह्यातील एक हजार हेक्‍टरवर उत्‍पादन घेणा-या शेतक-यांचे अनुभव इतर शेतक-यापर्यंत पोहचविण्‍यासाठी तसेच या तंत्राचा प्रसार व्‍हावा म्‍हणून शेतकरी प्रशिक्षणाचे कार्यक्रम 15 मे पासून सुरु करण्‍यात येत आहे.
          बीबीएफ तंत्रज्ञान अभियाना अंतर्गत शंभर शेतक-यांचा गट करुण प्रत्‍येक तालुक्‍यात या उपक्रमाची माहिती प्रत्‍यक्ष शेतक-यांना देण्‍यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे हेक्‍टरी 20 हजार रुपयापेक्षा जास्‍त उत्‍पादन घेणे सुलभ असल्‍याचे जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी सांगीतले.
          विदर्भ प्रवाही सिंचन कार्यक्रमा अंतर्गत शेतीला विशेषतः कापूस उत्‍पादनासाठी सरासरी 750 ते 800 मि.मिटरी पावसाची गरज आहे. जिलह्यात प्रत्‍यक्ष सरासरी एक हजार मि.मिटर पाऊस पडतो परंतु पाऊस कधी जास्‍त तर कधी कमी पडत असल्‍यामुळे पावसाने विश्रांती दिली तर येणारे पीकही घेणे शक्‍य होत नाही. परंतु रुंद सरी वरंभा पध्‍दतीमुळे शेतातील पाणी शेतातच साठवून ठेवणे शक्‍य होते. त्‍यामुळे पिकानाही आवश्‍यकतेनुसार ओलावा मिळतो. असेही जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे यांनी यावेळी सांगीतले.
0000

Tuesday 29 January 2013

विद्यार्थ्‍यांच्‍या सुरक्षित वाहतुकीसाठी शालेय परिवहन समितीचे गठण करणार - विजय चव्‍हाण



          वर्धा दि.29- शालेय विद्यार्थी  ये-जा करण्‍यासाठी आटो किंवा स्‍कुल बसने वापर करतात विद्यार्थ्‍यांना अपघात होवू नये यासाठी शासनाने आटो व स्‍कूल बससाठी एका परिपत्रकाव्‍दारे निर्देश जारी केलेले असून या निर्देशानुसार विद्यार्थ्‍यांच्‍या  सुरक्षित वाहतूकीसाठी जिल्‍हास्‍तरावर शालेय परिवहन समितीचे गठण करण्‍यात येणार असल्‍याची माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्‍हाण यांनी आज दिली.
          पोलीस मुख्‍यालयाच्‍या आशिर्वाद सभागृहात आज शाळेचे मुख्‍याध्‍यापक/प्राचार्य, वाहतूक निरिक्षक, शिक्षण निरिक्षक, बसचे कत्राटदार व प्राधिकरणाचा प्रतिनिधी यांची आढावा सभा संपन्‍न झाली त्‍यावेळी ते बोलत होत. यावेळी उपशिक्षणाधिकारी संजय यादजिरे,वाहतुक निरिक्षक शशिकांत भंडारे मंचावर उपस्थित होते.
         स्‍कूल बस व अॅटोच्‍या अपघातामध्‍ये शालेय विद्यार्थी जखमी किंवा प्रसंगी प्राण त्‍यागू नये यासाठी शासनाने गांभिर्यपूर्वक विचार केला असल्‍याचे नमूद करुन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चव्‍हाण म्‍हणाले की 3 फेब्रुवारी,2013 पासून अवैधरित्‍या चालविण्‍यात येत असलेल्‍या स्‍कूलबस अथवा अॅटोमध्‍ये क्षमतेनुसार वाहतूक होते अथवा नाही याची शहानिशा करण्‍यात येईल. तसेच ज्‍या  स्‍कूलबस व ऑटो नियमानुसार वाहतूक करणार नाही त्‍यांचेवर कडक कारवाई करण्‍यात येईल.प्रसंगी वाहतूकीच्‍या परवान्‍याचे निलंबनसुध्‍दा करण्‍यात येईल.विद्यार्थ्‍यांची सुरक्षित वाहतूक करण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांचे  पालक, शाळेचे मुख्‍याध्‍यापक किंवा प्राचार्य , बसचालक,अॅटोचालक यांनी समन्‍वय ठेवण्‍याची गरज आहे. क्षमतेच्‍या अधिक शालेय विद्यार्थी बसणार नाही यासाठी वाहतूक विभागाकडून लक्षठेवण्‍यात येणार आहे.
          वाहतूक विभागाचे निरिक्षक प्रत्‍येक शाळेसमोर आकस्मिकरित्‍या उभे राहून विद्यार्थ्‍यांची सुरक्षित वाहतूकीबाबत खात्री करण्‍यात येईल. शासनाच्‍या निर्देशानुसार शालेय परिवहन समितीचे गठण करण्‍यात येणार असून त्‍या समितीचे अध्‍यक्ष, मुख्‍याध्‍यापक किंवा प्राचार्य सदस्‍य म्‍हणून पालक व शिक्षक संघटनेचा एक प्रतिनिधी, ज्‍या परिसरात शाळा असेल  त्‍या भागातील वाहतूक निरिक्षक,शिक्षण निरिक्षक, बस कंत्राटदार, किंवा त्‍यांचा प्रतिनिधी, स्‍थानिक प्राधिकरणाचा प्रतिनिधी व सहाय्यक मोटर वाहन निरिक्षक यांचा समावेश असेल. या समितीची बैठक तीन महिन्‍यातून एकदा घेण्‍यात येणार असून शाळेचे सत्र सुरु होण्‍यापूर्वी बैठकीचे आयोजन करण्‍यात येणार आहे.
          या समितीचे कर्तव्‍यामध्‍ये शालेय विद्यार्थ्‍यांची सुरक्षितता, ने-आण यावर देखरेख ठेवणे, परिवहन शुल्‍क आकारणेबाबत धोरण निश्चित करणे,स्‍कूलबस करीता भाडे निश्चित करणे, वाहनाच्‍या कागदपत्राची पडताळणी करणे अग्‍नीक्षमण  यंत्रणा वाहनामध्‍ये बसविल्‍याची खात्री करणे, वाहनामध्‍ये प्रथोमपचार आहे किंवा नाही याची खात्री करणे, आदि बाबींचा समावेश आहे. या निर्देशामुळे शालेय विद्यार्थ्‍यांच्‍या वाहतूकीवर सकारात्‍मक परिणाम दिसून येवून भविष्‍यातील घडणा-या अपघाताला निश्चितच आळा बसेल असे त्‍यांनी सांगितले.
          यावेळी वाहतूक पोलीस निरिक्षक शशिकांत  भंडारे व उपशिक्षणाधिकारी  यादगीरे यांनीही मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित संघटनेच्‍या  पदाधिका-यांनी शंकेचे निरासरन करुन घेतले.
          कार्यक्रमाचे संचालन व आभार वाहतू‍क निरिक्षक संजय पाटील यांनी केले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, प्राचार्य, मुख्‍याध्‍यापक व पालक उपस्थित होते.
000000

Sunday 27 January 2013

समुद्रपुर येथील न्‍यायालयीन इमारतीचे उदृघाटन न्‍या. वासंती नाईक यांच्‍या हस्‍ते संपन्‍न न्‍याय व्‍यवस्‍थेची विश्‍वासर्हता जोपासावी न्‍याय व्‍यवस्‍थेची विश्‍वासर्हता जोपासावी



-          न्‍या. वासंती  नाईक
          वर्धा, दिनांक 27 –भारताच्‍या प्रजासत्‍ताक दिनाच्‍या वर्धापन दिनी समुद्रपूर येथे नव्‍याने बांधण्‍यात आलेल्‍या न्‍यायालयीन इमारतीचे उदघाटन मोठया थाटात काल मुंबई उच्‍च न्‍यालायाच्‍या नागपूर खंडपीढाच्‍या न्‍यायमुर्ती वासंती  नाईक यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले.
           या कार्यक्रमाला प्रमुख जिल्‍हा व संत्र न्‍यायाधिश अशोक शिवनकर दिवानी न्‍यायाधीश कनिष्‍ठस्‍तर तथा दंडाधिकारी एस.पी.सैय्यद, तालूका अधिवक्‍ता संघाचे अध्‍यक्ष ए.एस.ढेकरे आदी  मान्‍यवर मंचावर उपस्थितीत होते.
            या प्रसंगी बोलतांना न्‍या. वासंती नाईक म्‍हणाल्‍या की भारतीय संविधानामध्‍ये दिलेले ब्रिद वाक्‍यानूसार सामाजिक समता , आर्थिक व राजनैनिक न्‍याय, तसेच विचार व अभिवेक्‍ती स्‍वांतत्र्याचा अवलंब आजही नयायालय करीत आहे. गरीब असो वा श्रीमंत प्रत्‍येकांना प्रामाणिकपणे न्‍याय देण्‍याची भुमिका न्‍यायालय  घेत असते. त्‍यामुळेच आजही सामान्‍य मानसाच्‍या मनामध्‍ये  न्‍याय व्‍यवस्‍थेवर आदर आणि विश्‍वास  आहे. न्‍याय मिळणे हा सर्वसामान्‍याचा हक्‍क असून न्‍यायाची प्रक्रीया गतीमान करण्‍याची गरज आहे. न्‍यालयात प्रकरणाचा निवाडा लवकर लागल्‍यास सामान्‍य लोकामध्‍ये न्‍याय  व्‍यवस्‍थेवरील विशवास अधिक दृढ होईल असेही  त्‍या म्‍हणाल्‍या.
कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक करताना प्रमुख जिल्‍हा व संत्र न्‍यायाधिश अशोक शिवणकर म्‍हणाले की, समुद्रपूर तालुका निर्माण झाल्‍यानंतरही या तालुक्‍याचे कामकाज हिंगणघाट न्‍यायालयातून पाहण्‍यात येत होते. कालातराने समुद्रपूर न्‍यायालयाचे कामकाज समुद्रपूर येथून खाजगी इमारती मधुन चालत होते त्‍या  इमारतीमध्‍ये न्‍यायाधिश, अधिवक्‍ते,पक्षकार यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. आता मात्रसुसज्‍ज अशी  नविन इमारत झाल्‍यामूळे येथील येणा-या अडचणी दूर झाल्‍या आहे.   दोन हेक्‍टर क्षेत्रात या नविन वास्‍तू इमारतीच्‍या बांधकामासाठी  4 कोटी 94 लक्षरुपये खर्च झालेला असून ही वास्‍तू न समजता न्‍याय मंदीर समजून याचे पावित्र्य कायम ठेवावे असे आवाहन त्‍यांनी केले.
            तत्‍तपुर्वी न्‍यायमुर्ती नाईक यांनी दिपप्रज्‍वलीत करुन तसेच फित कापुन नविन नायालयीन इमारतीचे उदघाटन केले. तसेच त्‍यांच्‍या हस्‍ते न्‍यायालयातील परीसरात निसर्ग सेवा समितीच्‍या वतीने वृक्ष लावण्‍यात आले. यावेळी त्‍यांच्‍या शाल श्रीफळव पुष्‍प गुच्‍छ देवुन प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश शिवणकर यांनी सत्‍कार केला.
कार्यक्रमाचे संचलन अॅन्‍ड अर्चना वानखेडे व आभार अॅन्‍ड ए.एस.ढेकरे यांनी मानले यावेळी आमदार अशोक शिंदे ,तालुकास्‍तरावरील जिल्‍हयातील सर्व   न्‍यायाधिश अभियोक्‍ता, पक्षकार, सामान्‍य नागरीक  मोठया संख्‍येने उपस्थित होते.
000

माहिती तंत्रज्ञान उद्योगांच्‍या विकासाला चालना देणार -राजेंद्र मुळक


                    *वर्धा आयटी पार्कचे भूमिपूजन
                   *37 ऐकरमध्‍येअत्‍याधुनिक सुविधेसह आयटी पार्क
                   * विमाणतळ उभारण्‍याची मागणी
वर्धा दि.27- माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्‍या विकासाला चालणा देण्‍याचे धोरण राज्‍यशासनाने नवीन औद्योगिक धोरणानुसार स्विकारले असून वर्धा आयटी पार्कच्‍या विकासासाठी संपूर्ण सहकार्य करण्‍यातयेईल अशी ग्‍वाही पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.
          सी.दास ग्रुपतर्फे महाराष्‍ट्र औद्योगिक विकास क्षेत्रात 37 एकर जागेवर उभारण्‍यातयेणा-या वर्धा आयटी पार्कचे भुमिपुजन पालकमंत्री राजेंद्र मुळक यांचेहस्‍तेझाले त्‍याप्रसंगी आयोजितकार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलतहोते.कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी खासदार दत्‍ता मेघे होते तर प्रमुख पाहुने म्‍हणून नगराध्‍यक्षआकाश शेंडे,जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना,एम.आय.डी.सी. असोशिएशनचे प्रविण हिवरे,सेवाग्राम आश्रम प्रतिष्‍ठानचे अध्‍यक्षमा.म.गडकरी ,सी.दास. उद्योगसमुहाचे बी.आर.भाटीया, बिपीन भाटीया व कुणाल भाटीया तसेच आकाश शेंडेव्‍यासपिठावर होते.
          वर्धा जिल्‍ह्यामध्‍ये माहिती तंत्रज्ञान उद्योगाच्‍या उभारणीमुळे विकासाचे नवे दालन सुरु होतअसल्‍याचे सांगतांना पालकमंत्री राजेंद्र मुळक म्‍हणाले की, मिहान प्रकल्‍पाच्‍या उभारणीला गती देण्‍यातआली असून आय.टी. क्षेत्रातील मान्‍यवर कंपन्‍या येथेउद्योग सुरु करीत असून याचा लाभ वर्धा आयटी पार्कलाही होणार आहे. या परिसरातील उच्‍च शिक्षीत युवकांना या पार्कमुळे रोजगाराच्‍या मोठ्या संधी उपलब्‍ध होणार आहे.
          जीटीएस सारखी नवीन कर प्रणाली देशात लागूहोत असून उद्योजक व या क्षेत्रातील घटकांना आता दळण-वळणाच्‍या सुविधा असलेल्‍या केंद्रामध्‍येउद्योग उभारणे सुलभ होणार आहे.याचा लाभ देशाच्‍या मध्‍यवर्ती असलेल्‍या वर्धा वनागपूर शहरास निश्चितच होणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.
          अध्‍यक्षीय भाषणात खासदार दत्‍ता मेघे यांनी वर्धा जिल्‍ह्यातऔद्योगिक विकास होत असतांनाच विमानतळ निर्माण करण्‍यासाठी तात्‍काळ निर्णय घ्‍यावा व येथे हेलिकॅप्‍टरसह इतर छोटी विमाने उद्योजकांच्‍या सुवेधेसाठी उतरण्‍याची सुविधा असावी अशी मागणी यावेळी केली. वर्धा आयटी पार्कमध्‍ये देशातील महत्‍वपूर्ण उद्योजक गुंतवणूक करतील असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.
          यावेळी जिल्‍हाधिकारी एन.नवीन सोना,एमआयडीसी असोसिएशनचे अध्‍यक्ष प्रविण हिवरे यांनीही मार्गदर्शन केले.
          प्रारंभी सी.दास ग्रुपचे प्रमुख बी.आर.भाटीया यांनी स्‍वागत करुण प्रास्‍ताविकात वर्धा आयटी पार्कमधील सुविधाबाबत माहिती दिली. कुणाल भाटीया यांनी वर्धा जिल्‍ह्यातउपलब्‍ध असलेल्‍या तांत्रिक तसेच बौधीक संपदेची माहिती दिली. शेवटी बिपीन  भाटीया यांनी आभार प्रदर्शन केले.
00000

कतृत्‍व संपन्‍न पिढी निर्माण करण्‍याची जबाबदारी स्विकारा - शरद पवार



                  *मुलांना व मुलींना शिक्षणामध्‍ये समान संधी
                   *जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेचे प्रश्‍न सोडविण्‍याला प्राधान्‍य
                   *सहकार क्षेत्रात घटनेनुसार अमुलाग्र बदल
                   *शेतीमध्‍ये नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्‍साहन  
वर्धा दि.27- बदलत्‍या जागतीक आवाहनांना समर्थपणे व आत्‍मविश्‍वासाने सामना करणारी नविन पिठी घडविण्‍यासाठी शिक्षणाचा दर्जा व गुणवत्‍ता सांभाळण्‍याची आवशकता असून उच्‍च सुशिक्षित पिढी घडवित असतांना मुलांना व मुलींना समान संधी उपलब्‍ध करुण देण्‍याची आवश्‍यकता केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज येथे व्‍यक्‍तकेली.
          यशवंत ग्रामीण  शिक्षण संस्‍थेच्‍या सुर्वर्ण महोत्‍सवी वर्ष सांगता  समारोह  केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र  पवार यांच्‍या प्रमुख उपस्थितीत संपन्‍न झाला त्‍याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलतहोते.
          यशवंत महाविद्यालयाच्‍या प्रांगणात आयोजित सांगता समारोहाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाराष्‍ट्र विधान सभेचे अध्‍यक्ष दिलीप वळसे पाटील होते. तर प्रमुख पाहुने म्‍हणून ग्राम विकास मंत्री जयंत पाटील, अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, राष्‍ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष मधुकरराव पिचड, आमदार प्रकाश डहाके, माजी मंत्रीरमेश बंग, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष सुरेश देशमुख,उपाध्‍यक्ष सतिश राऊत आदि व्‍यासपिठावर उपस्थित होते.
          अन्‍न सुरक्षेचा महत्‍वाचा प्रश्‍न सोडवितांना शेतक-यांना दिलेल्‍या विविध प्रोत्‍साहानामुळे आज अन्‍यसुरक्षेच्‍या बाबतीत स्‍वयंपूर्ण झाल्‍याचे सांगतांना शरद पवार म्‍हणाले की, जगाच्‍या साडेतीन टक्‍के भू-भागावर सतरा टक्‍के लोकसंखेला पुरेल येवढे धान्‍य निर्माण करण्‍याचे महत्‍वपूर्ण कार्य देशातील शेतक-यांकडून होत असून कापूस,तांदूळ,साखर आदि कृषीमाल निर्यातही  एक लक्ष 87 हजार कोटी पर्यंत झाली आहे. शेतीवरील अवलंबून असलेली अतिरिक्‍त लोकसंख्‍या कमी करुण अन्‍यक्षेत्राकडे वळविण्‍याची आवश्‍यकताही त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केल.
          ज्ञानसंपन्‍न पिढी निर्माण करतांनाच शिक्षणाचेदालन सर्वांसाठी खुले असावे तसेच शेती ,सहकार,विज्ञान, क्रिडा, साहित्‍य,संगित या क्षेत्रातही नवीन कतृत्‍ववान पिठी निर्माण करण्‍यासाठी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्‍थेसारख्‍या  संस्‍थांने ही जबाबदारी स्विकारावी अशी अपेक्षा आहे असेही त्‍यांनी सांगितले.
          सहकार क्षेत्रातील अमुलाग्र बदला विषयी सांगतांना कृषीमंत्री म्‍हणाले की,सहकाराची शक्‍ती केंद्रे शासन न राहता सभासदांकडे जबाबदारी देवून संस्‍थेच्‍या विकासासाठी त्‍यांना सहभागी करुण घेण्‍यासाठी घटनेमध्‍यील तरतुदीनुसार नवीन बदल करण्‍यात आले असून त्‍यानुसार राज्‍य सरकारांनी 15 फेब्रुवारी पर्यंत स्विकारण्‍याच्‍या सूचनाही दिल्‍या असल्‍याचे सांगीतले.
          जिल्‍हा सहकारी बँकांच्‍या प्रश्‍नासंदर्भात बोलतांना ते पुढे म्‍हणाले की चार बँकांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी राज्‍य शासनाचे प्रयत्‍न असून नाबाड आणि केंद्र शासनही त्‍याला संपूर्ण मदतकरणार आहे. यामध्‍ये वर्धा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेचाही समावेश असल्‍याचे कृषीमंत्र्यांनी सांगीतले.
          अध्‍यक्षीय भाषणात महाराष्‍ट्र विधानसभेचे अध्‍यक्ष दिलीप वळसे पाटील म्‍हणाले की, उच्‍च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्‍यांचे प्रमाण केवळ 18 टक्‍के असून जागतीक स्‍तरावर ज्‍या संधी उपलब्‍ध होतआहे. त्‍याचा लाभ घेण्‍यासाठी ज्ञानसंपन्‍न पिठी घडवावी तसेच संशोधन व व्‍यवस्‍थापन या क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे. शैक्षणिक क्षेत्रामध्‍ये तज्ञ व गुणवत्‍ताधारक शिक्षकांची आवश्‍यकता असून त्‍यादृष्‍टीने नवीन संधीचा लाभ विद्यार्थ्‍यांनी घ्‍यावा  असेही त्‍यांनी सांगीतले.
          यावेळी अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, मधुकरराव पिचड, यांनीही मागदर्शन केले.
          केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्‍वर्गीय बापूराव देशमुख यांच्‍या जीवनपटावरील छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी केल्‍यानंतर सुवर्ण महोत्‍सवी सांगता समारोह प्रसंगी दिप प्रज्‍वलीत केला.यावेळी माजी कुलगुरु गुलाबराव कदम,डॉ.दिलीप गोडे ब्रिग्रेडीयर ओम पवार, डॉ.मधुकरराव कासारे,बाबासाहेब वानखडेयांचा शाल श्रीफळ व स्‍मृती चिन्‍ह देवून त्‍यांच्‍या कार्याचा गौरव केला. समीर देशमुख यांनी संपादीत केलेल्‍या यशोशिखर या पाक्षिक अंकाचेही यावेळी प्रकाशन केले.
          प्रारंभी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांनी प्रमुख पाहुण्‍यांचे शाल,श्रीफळ,स्‍मृतीचिन्‍ह देवून गौरव केला. व प्रास्‍ताविकातून यशवंत ग्रामीण शिक्षण संस्‍था वर्धा या संस्‍थेच्‍या प्रगतीची माहिती दिली.
          कार्यक्रमाचे संचलन प्रकाश बोकारे यांनी तर आभार प्रदर्शन सतीश राऊतयांनी मानले. यावेळी माजी आमदार वसंतराव कार्लेकर, दिलीप देशमुख, राजु तिमांडे,डॉ. धांदे, रविंद्र पाटील, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने आदि सहकार क्षेत्रातील मान्‍यवर,निमंत्रीत मोठ्यासंखेने उपस्थितहोते.
0000