Saturday 2 February 2013

यशवंतरावांनी दिलेला सहकाराचा मुलमंत्र महाराष्‍ट्राला नवी दिशा देणारा - उल्‍हास पवार



·        यशवंत दाते स्‍मृती रोप्‍यमहोत्‍सवी व्‍याख्‍यानमाला
वर्धा दि.2-  महाराष्‍ट्र मराठ्यांचे नव्‍हेतर मराठी माणसाचे राज्‍य  व्‍हावे तसेच सहकाराच्‍या माध्‍यमातून महाराष्‍ट्राची सर्वांगिण प्रगती व्‍हावी यासाठी यशवंतराव चव्‍हाण यांनी  महाराष्‍ट्राला सहकाराचा मूलमंत्र दिला. त्‍यांनी विकासाची जी दिशा दिली त्‍यानुसार महाराष्‍ट्राची सर्वांगिण प्रगती शक्‍य असल्‍याचे प्रतिपादन यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षानिमित्‍त आयोजित बदलता महाराष्‍ट्र  आणि आपण या विषयावर सामाजिक विचारवंत उल्‍हास पवार यांनी केले.
            यशवंतराव दाते स्‍मृती रोप्‍यमहोत्‍सवी व्‍याख्‍यानमालेत पहिले पुष्‍प गुफतांना ते बोलत होते. सार्वजनिक जिल्‍हा ग्रंथालयाच्‍या सभागृहात दाते स्‍मृती संस्‍थेचे पुरस्‍कार वितरणाचे आयोजनही करण्‍यात आले. यावेळी  आद्य कादंबरीकार बाबा पद्मंजी साहित्‍य पुरस्‍कार सोलापूरच्‍या टेंभुर्णे येथील प्राचार्य महिंद्र कदम, संत भगवान बाबा,काव्‍यसंग्रह पुरस्‍कार लातुरचे रमेश चिल्‍ले , अंजनाबाई इंगळे, स्‍मृती  स्त्रिवादी साहित्‍य पुरस्‍कार मुंबईच्‍या श्रीमती संध्‍या नरे पवार,62 व्‍या विदर्भ साहित्‍य संमेलनाचे अध्‍यक्ष डॉ. किशोर सानत यांचाही यावेळी स्‍मृती चिन्‍ह देवून गौरव करण्‍यात आला.
            महाराष्‍ट्राचे पहिले मुख्‍यमंत्री यशवंतराव चव्‍हाण यांच्‍या जन्‍मशताब्‍दी वर्षात आयोजित व्‍याख्‍यानात सामाजिक,राजकीय, सांस्‍कृतीक, महाराष्‍ट्रातील स्थित्‍यंतरे मांडतांना उल्‍हास पवार म्‍हणाले की, संत परंपरा लाभलेल्‍या महाराष्‍ट्राला फुले,शाहू,आंबेडकर यांच्‍या विचाराने सत्‍य शोधतीय चळवळीचा वारसा लाभला आहे. यशवंतराव चव्‍हाण यांच्‍यावर सत्‍यशोधक चळवळीचा प्रभाव असला तरी महाराष्‍ट्राच्‍या सर्वांगिण विकासासाठी त्‍यांनी केलेले कार्य कदापिही विसरता येणार नाही. पुरोगाती चळवळीला नवी दिशा देण्‍यासोबतच सार्वभैमत्‍व  स्विकारणारा विचार रुजवून अधिक चांगले वातावरण करण्‍याची जबाबदारी आपली सर्वांची आहे असे आवाहनही त्‍यांनी यावेळी केले.
            यावेळी यशवंत दाते स्‍मृती संस्‍थेच्‍या साहित्‍य पुरस्‍काराचे मानकरी श्रीमती संध्‍या नरे पवार, महेन्‍द्र कदम,रमेश चिल्‍ले, डॉ. किशोर सानप यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
            प्रारंभी उल्‍हास पवार यांनी दिप प्रज्‍वलित करुण व्‍याख्‍यानमालेचे उद्घाटन केले. प्रास्‍ताविकात संस्‍थेचे अध्‍यक्ष प्रदीप दाते यांनी व्‍याख्‍यानमालेच्‍या पंचवीस वर्षाचा आढावा मांडला. कार्यक्रमाचे संचालन डॉ.स्मिता वानखडे यांनी तर आभार संजय इंगळे तिगावकर यांनी मानले. मानपत्राचे वाचन प्रा. राजेंद्र मुंडे व रंजना दाते यांनी केले. यावेळी मोठ्या संखेने साहित्‍यप्रेमी उपस्थित होते.  
000000

No comments:

Post a Comment