Sunday 27 January 2013

कतृत्‍व संपन्‍न पिढी निर्माण करण्‍याची जबाबदारी स्विकारा - शरद पवार



                  *मुलांना व मुलींना शिक्षणामध्‍ये समान संधी
                   *जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेचे प्रश्‍न सोडविण्‍याला प्राधान्‍य
                   *सहकार क्षेत्रात घटनेनुसार अमुलाग्र बदल
                   *शेतीमध्‍ये नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्‍साहन  
वर्धा दि.27- बदलत्‍या जागतीक आवाहनांना समर्थपणे व आत्‍मविश्‍वासाने सामना करणारी नविन पिठी घडविण्‍यासाठी शिक्षणाचा दर्जा व गुणवत्‍ता सांभाळण्‍याची आवशकता असून उच्‍च सुशिक्षित पिढी घडवित असतांना मुलांना व मुलींना समान संधी उपलब्‍ध करुण देण्‍याची आवश्‍यकता केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आज येथे व्‍यक्‍तकेली.
          यशवंत ग्रामीण  शिक्षण संस्‍थेच्‍या सुर्वर्ण महोत्‍सवी वर्ष सांगता  समारोह  केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र  पवार यांच्‍या प्रमुख उपस्थितीत संपन्‍न झाला त्‍याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना ते बोलतहोते.
          यशवंत महाविद्यालयाच्‍या प्रांगणात आयोजित सांगता समारोहाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी महाराष्‍ट्र विधान सभेचे अध्‍यक्ष दिलीप वळसे पाटील होते. तर प्रमुख पाहुने म्‍हणून ग्राम विकास मंत्री जयंत पाटील, अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, राष्‍ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष मधुकरराव पिचड, आमदार प्रकाश डहाके, माजी मंत्रीरमेश बंग, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष सुरेश देशमुख,उपाध्‍यक्ष सतिश राऊत आदि व्‍यासपिठावर उपस्थित होते.
          अन्‍न सुरक्षेचा महत्‍वाचा प्रश्‍न सोडवितांना शेतक-यांना दिलेल्‍या विविध प्रोत्‍साहानामुळे आज अन्‍यसुरक्षेच्‍या बाबतीत स्‍वयंपूर्ण झाल्‍याचे सांगतांना शरद पवार म्‍हणाले की, जगाच्‍या साडेतीन टक्‍के भू-भागावर सतरा टक्‍के लोकसंखेला पुरेल येवढे धान्‍य निर्माण करण्‍याचे महत्‍वपूर्ण कार्य देशातील शेतक-यांकडून होत असून कापूस,तांदूळ,साखर आदि कृषीमाल निर्यातही  एक लक्ष 87 हजार कोटी पर्यंत झाली आहे. शेतीवरील अवलंबून असलेली अतिरिक्‍त लोकसंख्‍या कमी करुण अन्‍यक्षेत्राकडे वळविण्‍याची आवश्‍यकताही त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केल.
          ज्ञानसंपन्‍न पिढी निर्माण करतांनाच शिक्षणाचेदालन सर्वांसाठी खुले असावे तसेच शेती ,सहकार,विज्ञान, क्रिडा, साहित्‍य,संगित या क्षेत्रातही नवीन कतृत्‍ववान पिठी निर्माण करण्‍यासाठी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्‍थेसारख्‍या  संस्‍थांने ही जबाबदारी स्विकारावी अशी अपेक्षा आहे असेही त्‍यांनी सांगितले.
          सहकार क्षेत्रातील अमुलाग्र बदला विषयी सांगतांना कृषीमंत्री म्‍हणाले की,सहकाराची शक्‍ती केंद्रे शासन न राहता सभासदांकडे जबाबदारी देवून संस्‍थेच्‍या विकासासाठी त्‍यांना सहभागी करुण घेण्‍यासाठी घटनेमध्‍यील तरतुदीनुसार नवीन बदल करण्‍यात आले असून त्‍यानुसार राज्‍य सरकारांनी 15 फेब्रुवारी पर्यंत स्विकारण्‍याच्‍या सूचनाही दिल्‍या असल्‍याचे सांगीतले.
          जिल्‍हा सहकारी बँकांच्‍या प्रश्‍नासंदर्भात बोलतांना ते पुढे म्‍हणाले की चार बँकांचे प्रश्‍न सोडविण्‍यासाठी राज्‍य शासनाचे प्रयत्‍न असून नाबाड आणि केंद्र शासनही त्‍याला संपूर्ण मदतकरणार आहे. यामध्‍ये वर्धा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेचाही समावेश असल्‍याचे कृषीमंत्र्यांनी सांगीतले.
          अध्‍यक्षीय भाषणात महाराष्‍ट्र विधानसभेचे अध्‍यक्ष दिलीप वळसे पाटील म्‍हणाले की, उच्‍च शिक्षण घेणा-या विद्यार्थ्‍यांचे प्रमाण केवळ 18 टक्‍के असून जागतीक स्‍तरावर ज्‍या संधी उपलब्‍ध होतआहे. त्‍याचा लाभ घेण्‍यासाठी ज्ञानसंपन्‍न पिठी घडवावी तसेच संशोधन व व्‍यवस्‍थापन या क्षेत्राकडे विशेष लक्ष द्यावे. शैक्षणिक क्षेत्रामध्‍ये तज्ञ व गुणवत्‍ताधारक शिक्षकांची आवश्‍यकता असून त्‍यादृष्‍टीने नवीन संधीचा लाभ विद्यार्थ्‍यांनी घ्‍यावा  असेही त्‍यांनी सांगीतले.
          यावेळी अन्‍न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, मधुकरराव पिचड, यांनीही मागदर्शन केले.
          केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी स्‍वर्गीय बापूराव देशमुख यांच्‍या जीवनपटावरील छायाचित्र प्रदर्शनाची पाहणी केल्‍यानंतर सुवर्ण महोत्‍सवी सांगता समारोह प्रसंगी दिप प्रज्‍वलीत केला.यावेळी माजी कुलगुरु गुलाबराव कदम,डॉ.दिलीप गोडे ब्रिग्रेडीयर ओम पवार, डॉ.मधुकरराव कासारे,बाबासाहेब वानखडेयांचा शाल श्रीफळ व स्‍मृती चिन्‍ह देवून त्‍यांच्‍या कार्याचा गौरव केला. समीर देशमुख यांनी संपादीत केलेल्‍या यशोशिखर या पाक्षिक अंकाचेही यावेळी प्रकाशन केले.
          प्रारंभी आमदार प्रा. सुरेश देशमुख यांनी प्रमुख पाहुण्‍यांचे शाल,श्रीफळ,स्‍मृतीचिन्‍ह देवून गौरव केला. व प्रास्‍ताविकातून यशवंत ग्रामीण शिक्षण संस्‍था वर्धा या संस्‍थेच्‍या प्रगतीची माहिती दिली.
          कार्यक्रमाचे संचलन प्रकाश बोकारे यांनी तर आभार प्रदर्शन सतीश राऊतयांनी मानले. यावेळी माजी आमदार वसंतराव कार्लेकर, दिलीप देशमुख, राजु तिमांडे,डॉ. धांदे, रविंद्र पाटील, मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने आदि सहकार क्षेत्रातील मान्‍यवर,निमंत्रीत मोठ्यासंखेने उपस्थितहोते.
0000

No comments:

Post a Comment