Saturday 30 June 2012

आज कृषी दिन विविध कार्यक्रमाचे आयोजन


 वर्धा दि.30 – माजी मुख्‍यमंत्री स्‍वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती रविवार दिनांक 1 जुलै रोजी कृषी दिन म्‍हणून साजरा करण्‍यात येत आहे.
            कृषी विभाग तसेच जिल्‍हा परिषदेच्‍या कृषी विभागाच्‍या संयुक्‍त विद्यमाने सकाळी 11 वाजता विकास भवन येथे राज्‍याचे पाणी पुरवठा,स्‍वच्‍छता व सार्वजनिक बांधकाम मंत्री रणजित कांबळे यांच्‍या प्रमुख उपस्थितीत कृषी दिनाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
            राष्‍ट्रीय फलोत्‍पादन वर्षानिमित्‍त कृषी मेळावा तसेच कृषी दिन कार्यक्रमास जिल्‍हा परिषदेचे अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, विदर्भ पाटबंधारे महामंडळाचे उपाध्‍यक्ष आमदार सुरेश देशमुख,आमदार सर्वश्री अशोक शिंदे,दादाराव केचे,ना.गो.गाणार, मितेश भांगडीया ,जिल्‍हा परिषदेचे उपाध्‍यक्ष संजय मानकापूरे,महिला व बालकल्‍याण सभापती श्रीमती निर्मलताई बिजवे, शिक्षण सभापती प्रा. उषाकिरण थुटे,अर्थ व बांधकाम सभापती गोपालराव कालोरकर, समाजकल्‍याण सभापती नंदकिशोर कंगाले,पंचायत समिती सभापती धैर्यशिल जगताप ,उपसभापती संदेश किटे आदी उपस्थित राहणार आहेत.
            विशेष उपस्थिती म्‍हणून जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यपालन अधिकारी शेखर चन्‍ने उपस्थित राहणार आहेत. यावेळी लोकप्रतिनिधी तसेच कृषीतज्ञासमवेत शेतीविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले आहे.
            कृषी दिन कार्यक्रमात शेतकरी बांधव व जनतेनी उपस्थित राहण्‍याचे आवाहन जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे व जिल्‍हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी आर.के. गायकवाड यांनी केले आहे.
0000

पुरस्‍कारासाठी प्रस्‍ताव पाठवा



राजीव गांधी मानव सेवा पुरस्‍कार 2012
शारिरीक व मानसिकदृष्‍ट्या अपंगत्‍व असलेल्‍या मुलांच्‍या कल्‍याणासाठी कोणतेही वेतन अथवा मानधन न घेता मानवी सेवा या उदात्‍त हेतूने सलग 10 वर्षे वैशिष्‍टपूर्ण व अव्दितिय असे काम करणा-या व्‍यक्‍तीस केंद्र शासनामार्फत रु. 1 लाख रोख व स्‍मृतीचिन्‍ह असा पुरस्‍कार देण्‍यात येतो.
राष्‍ट्रीय बाल कल्‍याण पुरस्‍कार 2012
बाल कल्‍याणाचे क्षेत्रात उत्‍कृष्‍ट कार्य करणा-या व्‍यक्‍ती व संस्‍थांना त्‍यांच्‍या कार्याचा गौरव म्‍हणून केंद्र शासनातर्फे राष्‍ट्रीय बाल कल्‍याण पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येतो.व्‍यक्‍तीगत रु. 1 लाख रोख व स्‍मृतीचिन्‍ह असा पुरस्‍कार व संस्‍थासाठी रु. 3 लाख व स्‍मृतीचिन्‍ह
विशेष नैपुण्‍य पुरस्‍कार 2012
4 ते 15 वयोगटातील मुलांने शिक्षण,कला कार्य किंवा खेळामध्‍ये विशेष नैपुण्‍य दाखविणा-यास  केंद्र शासनामार्फत पुरस्‍कार देण्‍यात येतो.प्रथम पुरस्‍कारासाठी 20 हजार रोख व स्‍मृतीचिन्‍ह, प्रमाणपत्र आणि सुवर्णपदक व इतर 35 पुरस्‍कारासाठी चांदीचे पदक,स्‍मृतीचिन्‍ह, प्रमाणपत्र आणि रु. 10 हजार रोख देण्‍यात येते.
राष्‍ट्रीय बाल शौर्य पुरस्‍कार 2012
अपघातग्रस्‍त,संकटात सापडलेल्‍या व्‍यक्‍तीचा स्‍वतःच्‍या जिवाची पर्वा न करता धाडसाने,शौर्याने जीव वाचविणा-या मुलांचा गौरव करण्‍याच्‍या दृष्‍टीने केंद्र शासनामार्फत पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येतो. पहिला क्रमांक सुवर्ण पदक,स्‍मृतीचिन्‍ह व रोख रक्‍कम ,दुसरा क्रमांक चांदीचे पदक,प्रमाणपत्र व रोख रक्‍कम व तिसरा क्रमांकास मुलामुलींचे शिक्षण पूर्ण होईपर्यन्‍त आर्थिक मदत असे या पुरस्‍काराचे स्‍वरुप आहे. मुलांचे वय 6 ते 18 वर्ष या दरम्‍यानचे असावे. घटनेचा कालावधी 1 जुलै,2011 ते 30 जून,2012 हा असावा.
पुरस्‍काराकरीता प्रस्‍ताव मागविण्‍यात येत आहे. सदर पुरस्‍काराची नियमावली व निकष केंद्र शासनाच्‍या वेबसाईट www.wcd.nic.in वर उपलब्‍ध आहे. तसेच राष्‍ट्रीय बाल शौर्य पुरस्‍कार 2012 या पुरस्‍काराकरीता सुध्‍दा प्रस्‍ताव मागविण्‍यात येत आहे. पुरस्‍काराची नियमावली व विहीत अर्जाचा नमुना तसेच योजनेची माहिती शासनाचे वेबसाईट www.iccw.org वर उपलब्‍ध आहे.
वर्धा जिल्‍ह्यातील इच्‍दुक पात्र व्‍यक्‍ती,महिला, स्‍वयंसेवी संस्‍थांनी त्‍यांचे प्रस्‍ताव 7 जुलै,2012 पर्यन्‍त जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,आरती टॉकीज चौक, विद्यानगर,नागपूर रोड,वर्धा येथे सादर करावेत.अधिक माहितीसाठी जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्‍याशी संपर्क साधावा.
00000

शासकीय तंत्र माध्‍यमिक शाळेत एच.एस.सी.व्‍होकेशनल साठी प्रवेश


         वर्धा दि.30- शासकीय तंत्र माध्‍यमिक शाळेत वर्ग 11 वी एच.एस.सी.व्‍होकेशनल अभ्‍यास क्रमाकरीता प्रवेश सुरु झाले आहेत.
            संस्‍थेमध्‍ये मेक्‍यानिकल टेक्‍नॉलॉजी 30 जागा,ऑटो इंजिनिअरींग टेक्‍नीशियन 30 व मेन्‍टेनंन्‍स अॅण्‍ड रिपेअर्स ऑफ इलेक्‍ट्रीकल डोमेस्‍टीक अप्‍लायसेंस 30 अशा एकूण 90 जागेकरीता प्रवेश देण्‍यात येणार आहे. स्‍वतंत्र वर्कशॉप व प्रयोगशाळा, विद्यार्थ्‍यांना प्रात्‍यक्षिक व थिअरीचे मागदर्शन,  तसेच ऑन दी जॉब ट्रेनिंग,इंडस्‍ट्रीयल व्‍हीजीट, रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन शिबीर, व्‍यवसाय तंत्र प्रदर्शनी आयोजित केली जाते.
            जिल्‍हा उद्योग केंद्र,एम.सी.ई.डी. विविध विकास महामंडळे,बँका यांचे मार्फत विद्यार्थ्‍यांना स्‍वयंरोजगारा बाबत मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्‍यात येणार असून एच.एस.सी. व्‍होकेशनल पास झालेल्‍या विद्यार्थ्‍यांना शिकाऊ उमेदवारी तसेच कारखाण्‍यामध्‍ये नोकरी मिळू शकते, हा अभ्‍यासक्रम पूर्ण करणा-या विद्यार्थ्‍यांना उच्‍च शिक्षण बी.ए.,बी.कॉम,प्रवेश मिळतो तसेच इतरही विविध पदवी अभ्‍यासक्रमाला प्रवेश मिळतो.हा अभ्‍यासक्रम रोजगार व स्‍वयंरोजगार मिळवून देणारा आहे.
            विद्यार्थ्‍यांनी एच.एस.सी. व्‍होकेशनल या अभ्‍यासक्रमाला प्रवेश ध्‍यावा असे आवाहन मुख्‍याध्‍यापक तसेच जिल्‍हा व्‍यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, आर.डी.भोयर यांनी केले आहे. प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी टी.एस.भोयर यांचेशी 9850677906 संपर्क साधावा.
00000

संजय गांधी योजनेअंतर्गत अर्ज मंजुरीसाठी 6 जुलै रोजी बैठक


          वर्धा दि.30- तहसिल कार्यालय वर्धा येथील संजय गांधी (शहर)  विभागामध्‍ये सादर केलेल्‍या अर्जासंबंधी दिनांक 6 जुलै,2012 रोजी सकाळी 11.00 वाजता संजय गांधी (शहर) विभागामध्‍ये अर्जाचे मंजुरीबाबत समितीची सभा आयोजित करण्‍यात आली आहे.
           अर्जदारांनी सादर केलेल्‍या कागदपत्राच्‍या मुळप्रती घेऊन तहसिल कार्यालय,वर्धा येथे प्रत्‍यक्ष्‍  मुलाखतीकरीता हजर रहावे असे नायब तहसिलदार  यांनी कळविले आहे.
            नगरसेवक व समाजसेवक यांनी आपल्‍या प्रभागातील लाभार्थ्‍यांना संजय गांधी योजनेसंबंधी माहिती देवून बैठकीस उपस्थित राहाण्‍याबाबत सूचना देण्‍यात याव्‍या  असे आवाहन  संजय गांधी शहर विभाग समितीचे अध्‍यक्ष सुधीर पांगुळ व समितीच्‍या सदस्‍यांनी केले आहे.
0000

सुरक्षा रक्षकांची भरती 6 जुलै पर्यन्‍त अर्ज स्‍वीकारणार


           वर्धा दि.30 – पुलगांव येथील हरदयाल औद्योगीक प्रशिक्षण संस्‍था,यांना काम वाटप समिती मार्फत बेरोजगार उमेदवारांच्‍या सेवा सहकारी संस्‍थेमार्फत कंत्राटी पध्‍दतीने सुरक्षा रक्षकाची सेवा पुरवावयाची आहे. जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे नोंद असलेल्‍या आणि सुरक्षा रक्षक पुरविण्‍याबाबतचा परवाना (लायसेन्‍स) असलेल्‍या स्‍वयंरोजगार सेवा संस्‍थांनी दिनांक 6 जुलै पर्यन्‍त जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र,वर्धा यांच्‍याकडे अर्ज करावेत,असे आवाहन सहाय्यक संचालक, जिल्‍हा रोजगार व स्‍वयंरोजगार मार्गदर्शन केंद्र,वर्धा यांनी केलेले आहे.
00000

आर्थिकदृष्‍ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्‍यासाठी वसतिगृह 17 जुलै पर्यन्‍त अर्ज स्‍वीकारणार


             वर्धा दि.30-शासकीय आर्थिकदृष्‍ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांना वसतीगृह प्रवेशासाठी दिनांक 15 जुलै पर्यन्‍त अर्ज स्विकारण्‍यात येणार आहेत.प्रवेशासाठी शैक्षणिक सत्रात मान्‍यताप्राप्‍त संस्‍थेत 8 वी ते पदवीपर्यन्‍त तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत प्रवेश घेणे आवश्‍यक आहे.वसतीगृहात निवास व भोजनाची निशुल्‍क व्‍यवस्‍था आहे.
          आर्थिकदृष्‍ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांचे वसतीगृह,इतवारा वर्धा येथे वसतीगृहात प्रवेश अर्ज सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यन्‍त कार्यालयीन वेळेत मिळतील तथा स्विकारले जातील. माजी विद्यार्थ्‍यांना 60 टक्‍के गुण संपादन करण्‍याची अट कायम आहे. विद्यार्थ्‍यांच्‍या प्रवेशाबाबतचे सर्व अंतिम अधिकार निवड समितीस राहील. अपूर्ण अर्ज स्विकारले जाणार नाही. या वसतीगृहात अनुसूचित  जमातीसाठी 5 टक्‍के अनुसूचित जाती तथा विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती करीता 15 टक्‍के जागा राखीव आहेत. विद्यार्थ्‍यांना 60 टक्‍के गुण आवश्‍यक आहे,वार्षिक उत्‍पन्‍न 15 हजार पर्यन्‍त असणे आवश्‍यक आहे. असे वसतीगृह प्रमुख,आर्थीकदृष्‍ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांचे शासकीय वसतीगृह,वर्धा यांनी कळविले आहे. 
0000

पालकमंत्री राजेन्द्र मुळक यांचे सोमवारी आगमण जिल्‍हा नियोजन समितीची बैठक


       वर्धा दि.30- राज्‍याचे वित्‍त व नियोजन मंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री राजेंद्र  मुळक यांचे सोमवार दिनांक 2 जुलै रोजी दूपारी 2 वाजता नागपूर येथून मोटारीने आगमण होत आहे.
            पालकमंत्री राजेन्‍द्र मुळक यांच्‍या अध्‍यक्षतेखाली दुपारी 2.30 वाजता विकास भवन येथे जिल्‍हा नियोजन समितीची बैठक होईल. दुपारी 4.00 वाजता राजमाता जिजाऊ कृपोषण मुक्‍त ग्राम अभियाना अंतर्गत गावांना पुरस्‍काराचे वितरण पालकमंत्र्याच्‍या  हस्‍ते होईल.व सायंकाळी 6.20 वाजता येथून विदर्भ एक्‍सप्रेसने मुंबईसाठी रवाना होतील. 
00000

Friday 29 June 2012

नैसर्गिक आपत्‍ती ः तात्‍काळ संपर्कासाठी नियंत्रण कक्ष 07152-243446


              वर्धा, दि.29- नैसर्गिक आपत्‍तीचा सामना करण्‍यासाठी तसेच जिल्‍ह्यात आपत्‍ती व्‍यवस्‍थापना अंतर्गत तात्‍काळ संपर्क सुलभ होण्‍यासाठी जिल्‍हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष सुरु करण्‍यात आला आहे. नैसर्गिक आपत्‍ती संदर्भात 07152- 243446 या दूरध्‍वनीवर संपूर्ण माहिती उपलब्‍ध राहणार असल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
            जिल्‍हा स्‍तरावरील नैसर्गिक आपत्‍ती व्‍यवस्‍थापनासाठी वेगळा सेल तयार करण्‍यात आला असून, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी किशोर सोनटक्‍के हे या विभागाचे प्रमुख आहेत. त्‍यांचा भ्रमण दूरध्‍वनी 09970730850 आहे. या कक्षावर नियंत्रण अधिकारी म्‍हणून निवासी उपजिल्‍हाधिकारी हे राहणार असून, त्‍यांचा दूरध्‍वनी क्र. 07152-240872 आहे.
              जिल्‍हा स्‍तरावर नैसर्गिक आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कक्ष स्‍थापन करण्‍यात आला असून,तालुका स्‍तरावरही स्‍वतंत्र  नियंत्रण कक्ष राहणार आहेत. या कक्षाची संपूर्ण जबाबदारी संबंधित तहसिलदार यांची राहणार आहे. उपविभागीय अधिकारी हे या नियंत्राण कक्षाचे नियंत्रण अधिकारी राहतील.
             जिल्‍हा नियंत्रण कक्षामध्‍ये नैसर्गिक आपत्‍तीचा सामना करण्‍यासाठी  जिल्‍ह्यातील प्रमुख अधिका-यांच्‍या संपर्कासाठी दूरध्‍वनीची यादी अद्यावत ठेवण्‍यात आली आहे. जनतेमध्‍ये नैसर्गिक आपत्‍तीचा सामना करताना घ्‍यावयाची दक्षता, उपाययोजना व सुरक्षितता या संदर्भात प्रत्‍येक गावात आपत्‍ती व्‍यवस्‍थापन जागृती कार्यक्रम पथनाट्याचे सादरिकरण सुरु आहे. यासाठी 250 युवक युवतींना प्रशिक्षीत करण्‍यात आल्‍याची माहिती जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
             तालुका स्‍तरावर पडणारा पाऊस, पावसामुळे झालेले नुकसान, आपत्‍ती  व्‍यवस्‍थापनासाठीची सज्‍जता आदी बाबतची संपूर्ण माहिती उपलब्‍ध  राहणार आहे.
महत्‍वाचे दूरध्‍वनी
कार्या.नांव
अधिकारी
 दूरध्‍वनी क्र. /  निवास
भ्रमणध्‍वनी क्रमांक
उ.वि.अ.वर्धा
श्री.हरिष धार्मिक
07152-242561/240242
8149871980 
उ.वि.अ. आर्वी
श्री.सुनिल कोरडे
07157-22028/222056
9764344999
उ.वि.अ. हिंगणघाट
श्री.उमेश काळे
07153-244080/244036
9822640196
तहसिल, आर्वी
श्री.बन्‍सोडे
07152-240748/240741
9850133799
तहसिल सेलू
श्री.गावीत
07155-220259/220269
9923758004
तहसिल देवळी
श्री. गोसावी
07158-254457/254458
9765862655
तहसिल हिंगणघाट
श्री.पुरके
07153-244022/244284
9730689146
तहसिल समुद्रपुर
श्री.तोडसाम
07151-225443/225444
9823304441
तहसिल आर्वी
श्री.करलुके
07157-222022/222179
9421727984
तहसिल आष्‍टी
श्री.महाजन
07156-225648/225637
9881819778
तहसिल कारंजा
श्री.मडावी
07156-245844/245843
9271385356
9921995992  
जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी
श्री.सोनटक्‍के
07152-243446
9970730850
आयुक्‍त, नागपूर
-----
0712-2532045/2542518
---       
मोसमकार्यालय,नागपूर
-----
0712-2282157/2288556
-----
अग्निशमन यंत्रणा
वर्धा नगर परिषद
07152-101-243278/242646
9922345789
हिंगणघाट नगर परिषद
07153-246190
9766110750
आर्वी नगरपरिषद
07157-224251/225100
9921289533
कॅड पुलगाव
07158-282171/282172
------  
क्रेन धारक
----------------
7798351973
पुरप्रवण गावे
अ.क्र.
तहसिल
नदी काठावरील गावे
पुराचा धोका
1
वर्धा
31
-          
2
सेलू
39
15
3
देवळी
25
16
4
हिंगणघाट
24
07
5
समुद्रपूर
35
15
6
आर्वी
22
-          
7
आष्‍टी
14
10
8
कारंजा
11
02

एकूण
201
65

          जिल्‍ह्यात नैसर्गिक आपत्‍तीचा सामना करण्‍यासाठी जिल्‍हा स्‍तरावर यंत्रणा सज्‍ज  ठेवण्‍यात आली असून, नैसर्गिक आपत्‍ती  उदभवल्‍यास त्‍वरित जिल्‍हा व तालुका स्‍तरावरील नियंत्राण कक्षास संपर्क साधा असे आवाहनही जिल्‍हाधिकारी श्रीमती जयश्री भोज यांनी केले आहे.
                                                            00000

जात वैधता प्रमाणपत्रा सादर करण्‍यासाठी तीन महिन्‍याची मुदतवाढ


वर्धा दि.29- शैक्षणिक सत्रा मध्‍ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र, वास्‍तुशास्‍त्र, हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्‍नॉलॉजी पदवी अीयासक्रमासाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्‍यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्‍याकरीता 3 महिन्‍याची मुदत वाढ देण्‍यात आलेली आहे.
            प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्‍यांना शंभर  रुपयाच्‍या स्‍टँपपेपरवर जात वैधता प्रमाणपत्र  तीन महिन्‍यात सादर करेल याबाबत हमीपत्र लिहून द्यायचे आहे. हमिपत्राचा नमूना  तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई यांची वेबसाईट  www.dte.org.in/fe 2012 वर उपलब्‍ध आहे.
मागासवर्गीय उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीचे वेळी उपलबध नसेल अशा विद्यार्थ्‍यांनी जात वैधता प्रमाणपत्र तीन महिन्‍यात सादर करण्‍याबाबतचे रुपये 100 च्‍या स्‍टँपपेपरवर हमीपत्र कागदपत्र पडताळणीवेळी अर्ज स्‍वीकृती केंद्रावर सादर करावे. असे आवाहन तंत्र शिक्षण संचालनालयाकडे करण्‍यात आले आहे.
शैक्षणिक सत्र 2011-12 विज्ञान शाखेतील इयत्‍ता 12 मधील 5 हजार 892 विद्याथ्‍या्रंचे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रसतावा सोबत खालीलप्रमाणे आवश्‍यक कागदपत्रे न जोडल्‍यामुळे आक्षेप लावण्‍यता आलेला आहेत. या आक्षेपाधीन बाबीमध्‍ये प्रामुख्‍याने अर्जदाराचाप्राथमिक शाळा सोडल्‍याचा दाखला  जोडले नाह, वडील, आत्‍या, आजोबा यांचा प्राथमिक शाळा सोडलयाचा दाखला जोडले नाही. अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र जोडलेला नाही, महाराष्‍ट्र राज्‍यातील अनुसूचित जाती 1950 , विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती 1961, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग 1967 पासूनचे कायम वास्‍तव्‍य विषयीचे पुरावे नाही, कागदपत्राच्‍या साक्षांकीत प्रती जोडलेला नाही, अर्जदाराचे कायम वास्‍तव्‍य महाराष्‍ट्र राज्‍यातील नाही.  (शा.नि. दि. 10 मार्च 2005  अनुषंगाने ) , अर्जदाराचा जातीचा दाखला स्‍थलांतरीत नमुन्‍यात आहे. अर्जदाराचा जातीचा दावा अनुसूचित जमातीचा असल्‍यामुहे प्रस्‍ताव सदस्‍य सचिव, अनुसूचित जमाती जात पउताळणी समिती, गिरीपेठ, नागपूर यांचेकडे पाठवावा. अर्जदाराच्‍या जातीच्‍या दाखल्‍यात शासन निर्णय चुकीचा नमूद करण्‍यात आलेला आहे. अर्जदाराच्‍या जातीच्‍या दाखल्‍यात शासन निर्णय चुकीचा नमूद करण्‍यात आलेला आहे. अर्जदाराच्‍या जातीच्‍या दाखल्‍यात रेव्‍हेन्‍यु क्रमांक जातीचा अनुक्रमांक, दाखला दिल्‍याचा दिनांक नमूद नाही. मागासवर्गात जात दाखल केलयाचा शासन निर्णय क्रमांक व दिनांक चुकीचा आहे. आदी बाबींचा समावेश आहे.
     शैक्षणिक सत्र 2011-2012 विज्ञान शाखेतील इयत्‍ता 12 मधील विद्यार्थ्‍यांनी  जाती प्रमाणपत्र पउताळणी प्रकरणासोबत विहीत कागदपत्रे जोडलेली नसल्‍यास तातडीने समिती कार्यालयास संपर्क साधुन आक्षेप पूर्तता करावे, असे आवाहन विभागीय जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती क्र. 1  चे उपायुक्‍त माधव झोड यांनी केले आहे.
                                                0000000000

Thursday 28 June 2012

जिल्‍हा नियोजन मंडळाची सोमवारी बैठक पालकमंत्री आढावा घेणार


वर्धा दि.28-  जिल्‍हा नियोजन मंडळाची बैठक सोमवार दि. 2 जुलै रोजी दुपारी  2.30 वाजता पालकमंत्री  राजेंद्र मुळक यांचे अध्‍यक्षतेखाली आयोजित करण्‍यात आली आहे.
विकास भवन येथे आयेाजित  या बैठकीस जिल्‍ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी , जिल्‍हा नियेाजन मंडळाचे सदस्‍य  तसेच निमंत्रित उपस्थित राहणार असून, या बैठकीस वर्धा जिल्‍ह्यासाठी तयार करण्‍यात आलेल्‍या  विकास आराखड्यानुसार  विभाग निहाय आढावा पालकमंत्री घेणार आहेत. जिल्‍हा  नियोजन सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी  उपयोजने अंतर्गत  विभागनिहाय मंजूर झालेला निधी  व  विभागाने  सुचविलेल्‍या  कामांचा  आढावा यावेळी घेण्‍यात येणार आहे.
जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री भोज, जि.प.चे मुख्‍य कार्यपालन अधिकारी  शेखर चन्‍ने  तसेच जिल्‍ह्यातील वरिष्‍ठ अधिकारी  या बैठकीस उपस्थित राहणार  असल्‍याची माहिती  जिल्‍हा नियोजन अधिकारी  प्रकाश डायरे यांनी दिली.
                                                00000

Wednesday 27 June 2012

जिल्‍ह्यात बियाणांचा मुबलक पुरवठा - श्रीमती जयश्री भोज


  

  शेतक-यांनी  अधिकृत  विक्रेत्‍याकडूनच  बियाणे खरेदी करावे
                                               
वर्धा, दि. 27-  खरिप हंगामासाठी  जिल्‍ह्यात  4 लक्ष 10 हजार 500 हेक्‍टर क्षेत्रात  नियोजन  करण्‍यात आले असून   त्‍यानुसार   कापूस , सोयाबीन ,तूर , ज्‍वारी  आदी  बियाणांचा आवश्‍यकतेनुसार  पुरवठा उपलब्‍ध  करुन देण्‍यात आला आहे.  शेतक-यांनी  अधिकृत विक्रेत्‍याकडून  व  निर्धारीत दरानेच बियाणांची  खरेदी करावी  असे आवाहन जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री भोज यांनी केले आहे.
खरीप हंगामासाठी   1 लक्ष 22 हजार 943 क्विंटल बियाणांचे नियोजन करण्‍यता आले होते त्‍यानुसार  90 हजार क्विंटलपेक्षा जास्‍त बियाणांचा  पुरवठा  झालेला असून  सोयाबिन पिकांचे
बियाणे बदल कार्यक्रमा अंतर्गत  85 टक्‍के प्रमाणे बियाणांची  मागणी  नोंदविण्‍यात आली असून शेतक-याला आवश्‍यकतेनुसार  सर्व बियाणे उपलब्‍ध  असल्‍याची माहिती  जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री भोज यांनी दिली.
            जिल्‍ह्यात  बियाणांच्‍या  मागणीनुसार पुरवठा व विक्री  सुरु असून 25 जून पर्यंत 59 हजार 310  क्विंटल बियाणांची  विक्री  पूर्ण झाली आहे. यामध्‍ये 20 हजार 410 सार्वजनिक  तर 38 हजार 900 क्विंटल  बियाणे खाजगी विक्रेत्‍याकडून झाले आहे. संकरीत कापसाची  2 हजार 239 क्विंटल  तर सायोबीनची  56 हजार 200 क्विंटल बियाणांची विक्री झाली आहे.
            जिल्‍ह्यासाठी  90 हजार  055 क्विंटल बियाणांचा पुरवठा  करण्‍यात आला असून महाबीजसह सार्वजनिक  वितरकांकडे  32 हजार 343 क्विंटल तर खाजगी विक्रेत्‍यांकडे 57 हजार 712 क्विंटल बियाणांचा साठा उपलब्‍ध्‍ा आहे.  ज्‍वारी 51  क्विंटल, संकरीत कापूस 4 हजार 250 क्विंटल, सोयाबिन 82 हजार 980 क्विंटल , तूर 2 हजार 746 क्विंटल , मूंग 16 क्विंटल , उउीद 9 क्विंटल, तिळ  3 क्विंटल चा पुरवठा उपलबध करुन देण्‍यात आलयाची माहितीही  जिल्‍हाधिकारी  श्रीमती जयश्री भोज यांनी  यावेळी दिली.
                                                                        000000



                            जिल्‍ह्यात  सरासरी 102 मि.मी. पावसाची नोंद
            जिल्‍हयात  पावसाने  हजेरी लावल्‍यानंतर  26 जून पर्यंत 102 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, यामध्‍ये  सर्वाधिक 175.03 मि.मी. पाऊस हिंगणघाट तालुक्‍यात पडला आहे.
आर्वी 173.05 मि.मी., आष्‍टी  55.08 मि.मी., कारंजा 87.06 मि.मी., वर्धा 58.02 मि.मी., देवळी 66.04 मि.मी., सेलू 44 मि.मी. , समुद्रपूर 156.05 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील  चार पाच दिवसापासून पावसाने  खंड दिल्‍यामुळे  पाणी उपलब्‍ध असल्‍यास शेतक-याने ज्‍या  क्षेत्रात पेरणी  केली आहे त्‍या क्षेत्रात स्‍‍प्रींकल पध्‍दतीने संरक्षीत पाणी द्यावे. असे आवाहन   जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी  श्री. बि.एम. ब-हाटे यांनी केले आहे.
                                                              0000000

                             पाऊस आल्‍यानंतरच पेरणीला सुरुवात करा

           *    जिल्‍ह्यात सरासरी 16 टक्‍के पेरण्‍या
          *   23 हजार हेक्‍टरमध्‍ये सोयाबीन
           *   28 हजार हेक्‍टरमध्‍ये कापूसाची पेरणी
    वर्धा दि.27 -आर्वी, हिंगणघाट, समुद्रपूर आदी तालुक्‍यात  पाऊस पडल्‍यानंतर पेरणीला सुरुवात झाली असली तरी  पेरणीसाठी पुरेसा  पाऊस पडेपर्यंत शेतकरी बांधवांनी  पेरणीला  सुरुवात करु नये असा सल्‍ला  जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी  बी.एस.ब-हाटे  यांनी  दिला.
पुरेसा पाऊस पडल्‍यानंतर 15 जुलैपर्यंत कापूस व सोयाबीन या प्रमुख पिकांची  पेरणी  करणे शक्‍य असून  उत्‍पादनामध्‍येही  फारसा फरक पडणार नाही  यासाठी  शेतीची मशागत व जमीनीची पोत व इतर बाबीही  महत्‍वाच्‍या असल्‍याचे  त्‍यांनी सांगितले.
 जिल्‍ह्यात सरासरी 16 टक्‍के पेक्षा पेरण्‍या पूर्ण झाल्‍या असून काही तालुक्‍यात पिकांच्‍या  उगवणूकीला  सुरुवात झाली आहे. अशा क्षेत्रामध्‍ये  तुषार संच असल्‍यास व पाणी उपलब्‍ध असल्‍यास संरक्षीत पाणी  द्यावेत तसेच पेरणी करताना रुंद सरीवरंभा पध्‍दतीचा अवलंब करावा. त्‍यामुळे पिकांना जास्‍त दिवस ओल उपलब्‍ध होऊ शकते असेही श्री. ब-हाटे यांनी सांगितले.
 जिल्‍ह्यात  दरवर्षी जून अखेर पर्यंत  सरासरी  148 मि.मी. पाऊस पडत असून यावर्षी 102 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षी  याचकाळात 111 मि.मी. पावसाची नोंद झाली होती.  त्‍यामुळे  शेतक-यांनी  पेरण्‍यांची घाई न करता पिकांसाठी  आवश्‍यक  पाऊस पडल्‍यावरच पेरणीला सुरुवात करावी अशी सुचना त्‍यांनी दिली.
                          23 हजार हेक्‍टरमध्‍ये सोयाबिनचा पेरा 
सोयाबिन व कापूस या दोन प्रमुख पिकाखाली  जिल्‍ह्यात मोठ्या प्रमाणात क्षेत्र असून शेतक-यांनी
23 हजार 030 हेक्‍टरमध्‍ये  सोयाबिनची पेरणी  पूर्ण केली आहे. यामध्‍ये  सर्वाधिक कारंजा तालुक्‍यात 13 हजार 152 हेक्‍टर , देवळी  1 हजार 200 हेक्‍टर, आर्वी 1 हजार 700 हेक्‍टर, आष्‍टी  3 हजार हेक्‍टर  तर हिंगणघाट तालुक्‍यात 2 हजार 500 हेक्‍टर सोयाबिनची पेरणी पूर्ण झाली आहे.
       कापूस पिकाखाली जिल्‍ह्यात 28 हजार 131 हेक्‍टरमध्‍ये पेरणी  पूर्ण झाली असून सर्वाधिक हिंगणघाट तालुक्‍यात 6 हजार 715 हेक्‍टरमध्‍ये  पेरणी   झाली आहे. वर्धा  4 हजार 160 हेकटर, देवळी 3 हजार 800 हेक्‍टर, आर्वी 3 हजार 88 हेक्‍टर , आष्‍टी 5 हजार हेक्‍टर , कारंजा 3 हजार 439 हेक्‍टर व समुद्रपूर तालुक्‍यात 933 हेक्‍टरमध्‍ये कापसाची पेरणी झाली आहे.
                            जिल्‍ह्यात  सरासरी 102 मि.मी. पावसाची नोंद
            जिल्‍हयात  पावसाने  हजेरी लावल्‍यानंतर  26 जून पर्यंत 102 मि.मी. पावसाची नोंद झाली असून, यामध्‍ये  सर्वाधिक 175.03 मि.मी. पाऊस हिंगणघाट तालुक्‍यात पडला आहे.
आर्वी 173.05 मि.मी., आष्‍टी  55.08 मि.मी., कारंजा 87.06 मि.मी., वर्धा 58.02 मि.मी., देवळी 66.04 मि.मी., सेलू 44 मि.मी. , समुद्रपूर 156.05 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मागील  चार पाच दिवसापासून पावसाने  खंड दिल्‍यामुळे  पाणी उपलब्‍ध असल्‍यास शेतक-याने ज्‍या  क्षेत्रात पेरणी  केली आहे त्‍या क्षेत्रात स्‍‍प्रींकल पध्‍दतीने संरक्षीत पाणी द्यावे. असे आवाहन   जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी  श्री. बि.एम. ब-हाटे यांनी केले आहे.
                                                              0000000