Tuesday 11 April 2017

मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

प्र.प.क्र- 215                                                             11 एप्रिल 2017
                         मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर
वर्धा, दि.11 (जि.मा. का)– जून 2017 ते सप्‍टेंबर, 2017 या कालावधीत मुदत संपणा-या तसेच नव्‍याने अस्तित्‍वात आलेल्‍या व विघटीत ग्रामपंचायतींच्‍या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ऑनलाईन पध्‍दतीने व रिक्‍त पदांच्‍या पोट निवडणुकांसाठी पारंपरिक पध्‍दतीने राबविण्‍यात येणा-या मतदार यादीचा कार्यक्रम जाहिर करण्‍यात आला आहे.  
मतदार यादी 5 जानेवारी 2015 दिनांकनुसार ग्राह्य धरण्‍यात येईल. ग्रामपंचायतीच्‍या निवडणुकीकरिता प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी 10 एप्रिल 2017 रोजी प्रसिध्‍द करण्‍यात येईल.. 19 एप्रिल रोजी प्रसिध्‍द यादीवर हरकती व सुचना विचारात घेवून मतदार यादी अंतीम करण्‍यात येईल. 24 एप्रिल 2017 रोजी मतदार यादीची जाहिर नोटीस व अंतीम यादी प्रसिध्‍द करण्‍यात येईल.
00000
प्र.प.क्र- 216                                                             11 एप्रिल 2017
कबीर पुरस्‍कारासाठी अर्ज आमंत्रित
वर्धा, दि.11 (जि.मा. का)– धार्मिक, जातीय आणि वंशिक सलोखा वृद्विंगत  करण्‍याच्‍या उद्देशाने धार्मिक तेढ, जातीय दंगली अथवा वंशिक विव्‍देश  प्रसंगी स्‍वतांच्‍या जिव धोकात घालून धाडसी आणि नैतिक धैर्य दाखविण्‍याचे लक्षणिय कार्य करणा-या व्‍यक्‍तीला केंद्र शासनाच्‍या वतीने कबीर पुरस्‍कार देण्‍यात येतील. ग्रेड- 1, ग्रेड- 2, ग्रेड-3 अशा तिन प्रकारात अनुक्रमे 2 लाख, 1 लाख व 50 हजार रोख व सन्‍मानपत्र अशा स्‍वरुपात दिला जाणार आहे. या पुरस्‍कारासाठी अर्ज मागविण्‍यात येत आहे.
या पुरस्‍काराची अधिक माहिती www.maharashtra.gov.in या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करुन देण्‍यात आली आहे. सदर अर्ज जिल्‍हाधिकारी कार्यालयात सादर करावा.
प्र.प.क्र- 217                                                             11 एप्रिल 2017
शेतक-यांसाठी स्‍पायरल सेपरेटर सवलतीच्‍या दरात उपलब्‍ध
वर्धा, दि.11 (जि.मा. का)– महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळातर्फे राज्‍यातील शेतक-यांसाठी विजे शिवाय चालणारे यंत्र ‘स्‍पायरल सेपरेटर’ सवलतीच्‍या दरात म्‍हणजे केवल 2700 रुपयामध्‍ये (बाजार           भावानुसार किंमत 1200 हजार रुपये) उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहे. वर्धा जिल्‍ह्यातील शेतक-यांनी या यंत्रासाठी राज्‍य बियाणे महामंडळाचे जिल्‍हा कार्यालय येथे अर्ज सादर करावा.
स्‍पायरल सेपरेटर यंत्राद्वारे सोयाबीन, तूर, मुग, उडीद तसेच इतर धान्‍य साफ करता येते. यामुळे     शेतक-यांना साफ केलेल्‍या धान्‍यावर चांगले दर प्राप्‍त होऊ शकतात. केवळ एका मजुराद्वारे चालणारे हे यंत्र शेतक-यांना सहज उपलब्‍ध व्‍हावे म्‍हणून महाराष्‍ट्र राज्‍य बियाणे महामंडळातर्फे पुरठा करण्‍यात येत आहे. गरजु शेतक-यांनी या संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन व्‍यवस्‍थापीक संचालक राधाकृष्‍ण गमे यांनी केले आहे.
0000000

Monday 10 April 2017



नागपूर येथे 15 एप्रिल पर्यंत सैन्‍य भरती                                      
वर्धा दि.10- सिताबर्डी किल्‍ला रेल्‍वे स्‍टेशन समोर नागपूर येथे 118 इन्‍फेंटी बटालीयन, प्रादेशिक सेना(TA) मध्‍ये सोल्‍जर जी डी-, सोल्‍जर टेलर, सोल्‍जर ब्‍लॅकस्मिथ या पदासाठी 15 एप्रिल पर्यंत भरती प्रक्रीया सुरु आहे. या भरतीचा इच्‍छुक तसेच पात्र युवकांनी लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी  माजी फ्ला.ले.ध.य. सदाफळ यांनी केले आहे.
  तसेच आर्टरली रेजीमेंट सेंटर, हैद्राबाद येथे आर्टरली रेजीर्मेट मधील सेवारत/ निवृत्‍त सैनिकांचे पाल्‍य व भाऊ / युध्‍द विधवा पाल्‍य करीता युनिट हेडक्‍वॉर्टर कोटयाअंतर्गत विविध ट्रेड्स करीता 1 ते 6 जुन कालावधीत भर्ती आयोजित करण्‍यात आली आहे. अधिक माहितीसाठी  Army Recruiting Office नागपूर येथील 0712 -258020 दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे, जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी यांनी कळविले आहे.


अनुसुचित जमाती आयोगाच्‍या सदस्‍या माया इवनाते बुधवारी वर्धेत
वर्धा, दि.10-राष्‍ट्रीय अनुसुचित जमाती आयोगाच्‍या सदस्‍या माया चिंतामन र्इवनाते  12 एप्रिल रोजी जिल्‍हयाच्‍या दौ-यावर येत आहे. त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
          12 एप्रिल रोजी केंद्र व राज्‍य संस्‍थाकडुन राबविल्‍या जात असलेल्‍या जिल्‍हयातील आदिवासी विकास कार्यक्रमाचे पुनरावलोकनाबाबत जिल्‍हाधिकारी यांचे समवेत बैठकीस उपस्थिती, दुपारी 3 वाजता आदिवासी विभागातील अधिका-यासह जिल्‍हयातील आदिवासी वस्‍तीगृहांना भेटी देणार आहे. सोईनुसार रामटेकडे प्रयाण करतील.


आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्‍यास पक्षकाराच्‍या
वेळ व पैश्‍याची बचत होते   
-         संध्‍या रायकर
           


196 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली                                     
वर्धा दि.10-राष्‍ट्रीय लोक अदालतीमार्फत आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्‍यास पक्षकारांचा वेळ व पैसा यांची बचत होऊन मानसिक समाधान मिळते असे प्रतिपादन जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरण अध्‍यक्ष संध्‍या रायकर यांनी राष्‍ट्रीय लोक अदालत उद्घाटन प्रसंगी केले.
याप्रसंगी सर्व जिल्‍हा न्‍यायाधिश, सर्व दिवाणी नयायाधिश, शासकिय अधियोक्‍ता जी.व्‍ही. तकवाले, अधियोक्‍ता संघाचे अध्‍यक्ष अमोल कोटंबकर व सदस्‍य , न्‍यायालय व्‍यवस्‍थापक सुनिल पिंपळे, विधी व सेवा प्राधिकरणचे सदस्‍य सचिव सु.ना. राजुरकर उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्रीमती रायकर  म्‍हणाल्‍या, राष्‍ट्रीय लोक अदालतीचा मुख्‍य उद्देश म्‍हणजे न्‍यायालयात प्रलंबित प्रकरणांचा आणि वाद दाखलपुर्व प्रकरणांचा जास्‍तीत जास्‍त प्रमाणात निपटारा करणे हा आहे. लोक न्‍यायालयाच्‍या निवाडया विरुध्‍द अपील नाही. खटल्‍यामध्‍ये साक्षी पुरावा, उलटतपाणी, दिर्घ युक्‍तीवाद टाळला जातो. लोकन्‍यायालयामध्‍ये निकाली निघणा-या प्रकरणामध्‍ये कायदयानुसार कोर्ट फी ची रक्‍कम परत मिळते. आपसी समझोत्‍यामुळे तडा गेलेल्‍या मनांना जोडण्‍याचा प्रयत्‍न लोक अदालतच्‍या माध्‍यमातून केला जातो.  त्‍यामुळे दोन्‍ही कुंटूंबामध्‍ये पारिवारीक व सामाजिक स्‍नेह वाढतो.
या राष्‍ट्रीय लोक अदालत मध्‍ये जिल्‍हयात प्रलंबित प्रकरणापैकी 99  प्रकरणे तर वाद दाखलपूर्व प्रकरणापैकी 97 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्‍यात आले. विशेष म्‍हणजे या लोक अदालतीमध्‍ये निकाली काढण्‍यात आलेल्‍या प्रकरणामध्‍ये तडजोडीच्‍या रकमेचे मुल्‍य 92 लाख 14 हजार 813 इतके होते.
यावेळी जी.व्‍ही. तकवाले, यांनीसुध्‍दा विचार व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे संचालन सु.ना. राजुरकर यांनी केले. कार्यक्रमाला अधिवक्‍ता समाजसेवक आणि न्‍यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.