Monday 10 April 2017



आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्‍यास पक्षकाराच्‍या
वेळ व पैश्‍याची बचत होते   
-         संध्‍या रायकर
           


196 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली                                     
वर्धा दि.10-राष्‍ट्रीय लोक अदालतीमार्फत आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढल्‍यास पक्षकारांचा वेळ व पैसा यांची बचत होऊन मानसिक समाधान मिळते असे प्रतिपादन जिल्‍हा व सत्र न्‍यायाधिश तथा जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरण अध्‍यक्ष संध्‍या रायकर यांनी राष्‍ट्रीय लोक अदालत उद्घाटन प्रसंगी केले.
याप्रसंगी सर्व जिल्‍हा न्‍यायाधिश, सर्व दिवाणी नयायाधिश, शासकिय अधियोक्‍ता जी.व्‍ही. तकवाले, अधियोक्‍ता संघाचे अध्‍यक्ष अमोल कोटंबकर व सदस्‍य , न्‍यायालय व्‍यवस्‍थापक सुनिल पिंपळे, विधी व सेवा प्राधिकरणचे सदस्‍य सचिव सु.ना. राजुरकर उपस्थित होते.
पुढे बोलतांना श्रीमती रायकर  म्‍हणाल्‍या, राष्‍ट्रीय लोक अदालतीचा मुख्‍य उद्देश म्‍हणजे न्‍यायालयात प्रलंबित प्रकरणांचा आणि वाद दाखलपुर्व प्रकरणांचा जास्‍तीत जास्‍त प्रमाणात निपटारा करणे हा आहे. लोक न्‍यायालयाच्‍या निवाडया विरुध्‍द अपील नाही. खटल्‍यामध्‍ये साक्षी पुरावा, उलटतपाणी, दिर्घ युक्‍तीवाद टाळला जातो. लोकन्‍यायालयामध्‍ये निकाली निघणा-या प्रकरणामध्‍ये कायदयानुसार कोर्ट फी ची रक्‍कम परत मिळते. आपसी समझोत्‍यामुळे तडा गेलेल्‍या मनांना जोडण्‍याचा प्रयत्‍न लोक अदालतच्‍या माध्‍यमातून केला जातो.  त्‍यामुळे दोन्‍ही कुंटूंबामध्‍ये पारिवारीक व सामाजिक स्‍नेह वाढतो.
या राष्‍ट्रीय लोक अदालत मध्‍ये जिल्‍हयात प्रलंबित प्रकरणापैकी 99  प्रकरणे तर वाद दाखलपूर्व प्रकरणापैकी 97 प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्‍यात आले. विशेष म्‍हणजे या लोक अदालतीमध्‍ये निकाली काढण्‍यात आलेल्‍या प्रकरणामध्‍ये तडजोडीच्‍या रकमेचे मुल्‍य 92 लाख 14 हजार 813 इतके होते.
यावेळी जी.व्‍ही. तकवाले, यांनीसुध्‍दा विचार व्‍यक्‍त केले. कार्यक्रमाचे संचालन सु.ना. राजुरकर यांनी केले. कार्यक्रमाला अधिवक्‍ता समाजसेवक आणि न्‍यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment