Tuesday 12 July 2016

हिंगणघाटच्‍या हायब्रिड सिड्स व राजझींग कंपनीला
                 धान बियाणे विक्री बंद करण्‍याचे आदेश
            वर्धा,दि.8- यशोदा हायब्रिड सिड्स प्रा.लि. हिंगणघाट व राजझींग संन्‍स प्रा.लि. हिंगणघाट या कंपनीच्‍या धान बियाण्‍याची उगवन न झाल्‍यामुळे शेतक-यांच्‍या तक्रारीवरुन कंपनीला धान बियाण्‍याची विक्री बंद करण्‍याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत.
यशोदा हायब्रिड सिड्स प्रा.लि. हिंगणघाट व राजझींग संन्‍स प्रा.लि. हिंगणघाट या कंपनीचे खरीप हंगामामध्‍ये त्‍यांचे उत्‍पादित धान बियाण्‍याची  नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व इतर जिल्‍हयात मोठया प्रमाणात विक्री करण्‍यात आली. परंतु शेतक-यांने सदर बियाणे पेरणी केली असता नागपूर व चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये सदर बियाणयाची उगवण झाली नसल्‍याच्‍या तक्रारी मोठया प्रमाणात प्राप्‍त झाल्‍या. त्‍या अनुषंगाने सदर कंपनीला तात्‍काळ दि.7 जुलै रोजी जिल्‍हा परिषदचे कृषी विकास अधिकारी एस.एम खळीकर, जिल्‍हा कृषी अधिकारी एस.वाय. बमनोटे, हिंगणघाटचे कृषी अधिकारी एम.डेहनकर यांनी कंपनीच्‍या गोदामाला भेट देऊन तपासणी केली.
तपासणी मध्‍ये कंपनीच्‍या गोदामात एकुण 843.96 क्विंटल बियाणे असल्‍याचे दिसुन आले. त्‍यासंपूर्ण बियाण्‍याला विक्रीबंद आदेश देण्‍याची कार्यवाही करण्‍यात आली तसेच पुढील आदेशापर्यंत सदर साठा जप्‍त करण्‍यात आला. साठयामध्‍ये धान बियाणे वान श्रीराम 6170 बॅग, ओम 3 हजार 110 बॅग, एस.आर.के. 345 बॅग, अंबिका 75 बॅग, यशोदा 1011,615 बॅग, यशोदा बोल्‍ड 830 बॅग, यशोदा बोल्‍ड 416 बॅग असे एकुण 819 क्विंटल बियाणे यशोदा हायब्रिड कंपनीचे व राजझिंग सन्‍स प्रा.लि. या कंपनीचे वाण वाय.एस.आर. 45 बॅग असे एकुण 24.96 क्विंटल बियाणाचा समावेश आहे.
0000





अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सज्ज

वर्धा,  दि 9:-   हवामान विभागाने  विदर्भात 10  जुलै पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर  वर्धा जिल्ह्यात काल 24 तासात सेलू वगळता सर्वच तालुक्यात  अतिवृष्टी झाली आहे. निम्न वर्धा प्रकल्पाचे  31  गेट  आज सकाळी 9 वाजता 20 सेमी ने उघडले असून धरणातून 424 दश लक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग सुरु आहे. अतिवृष्टी च्या पार्श्वभीमिवर जिल्हा प्रशासन सज्ज असून  सर्व प्राशसकीय यंत्रनानी सतर्क रहावे  अशा सूचना जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्या आहेत. 
पावसामुळे अंशता वर्धा तालुका  पडलेली घरे 46, हिंगणघाट 23 हमदापुर येथे भिंत पडून 1 बकरी दगावली 2 जखमी झाली आहे.
काल 24 तासात झालेला जिल्हानिहाय पाऊस असा  वर्धा 83.06, सेलू 56.0,देवळी 78.0, कारंजा 82.06,आष्टी 76.04,आर्वी 105.0,हिंगणघाट 160.02,समुद्रपुर 100.02 एकूण 742.0 सरासरी 92.75 इतका पाऊस पडला आहे. जिल्‍ह्यात आतापर्यंत पडलेला एकुण पाऊस 3316.23 मी.मी असून त्‍याची सरासरी 414.53 मी.मी  एवढी आहे.
काल  संध्याकाळ पासून निम्न वर्धा धरणाचे 31 ही गेट उघडण्यात आले. धरणाची पातळी आज सकाळी 12 वाजेपर्यंत  279.94 मी   एवढी होती. धरणातून पाणी  सोडण्यात येत असल्यामुळे  नादिकाठावरील  गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.  नियंत्रण कक्ष 24 तास सुरु असून   नागरिकांनी  संकटकाळात   नियंत्रण कक्षाशी  243446 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. 

0000
तरुणांनी  सकारात्‍मक विचार
करुन अभ्‍यासाचे धोरण  ठरवावे
-         जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
वर्धा,दि 3-स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतांना तरुणांनी सकारात्‍मक विचार करुन अभ्‍यासाचे धोरण ठरवून  सलग मेहनत करणे गरजेचे आहे. त्‍यासोबतच स्‍पर्धा परिक्षेत पास होण्‍यासाठी एक ध्‍येय ठरवावे असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी यांनी केले.
दि.2 जुलै पासुन  दर महिन्‍याच्‍या पहिल्‍या शनिवारी ला सामाजिक न्‍याय भवन येथे जिल्‍हा प्रशासन व जिल्‍हा ग्रंथालयाच्‍या वतीने स्‍पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्ग सुरु करण्‍यात आले आहे. या स्‍पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्गाचे औपचारीक उद्दघाटन दि.2 जुलै रोजी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांचे हस्‍ते झाले. यावेळी  प्रमुख मार्गदर्शक म्‍हणुन नागपुरच्‍या सुजाता दामटे, निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावडकर, नागपूर येथील शासकीय ग्रंथालयाच्‍या सहाय्यक संचालक कविता महाजन, नियोजन विभागाचे वित्‍त व लेखा अधिकारी प्रतापराज म्‍हसाळ, जिल्‍हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे यांची उपस्थिती होती.  
           पुढे बोलतांना जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल म्‍हणाले ब-याच वेळा चांगली कामे कठिण असू शकते, वाईट कामे सोपे असते त्‍यामुळे वाईट सवई लागण्‍याची शक्‍यता असते. यासाठी दुस-याची तुलना न करता स्‍वतःचा   विचार करावा. प्रत्‍येक तरुणानी जिद्द, चिकाटी व आत्‍मविश्‍वास हे गुण अंगी बाळगून अभ्‍यास केल्‍या स्‍पर्धा परिक्षेत यश प्राप्‍त होऊ शकते. यासाठी विद्यार्थ्‍यांनी अभ्‍यास करतांना गट तयार करुन चालू घडामोडी, इतिहास, राज्‍यशास्‍त्र, मराठी यासारख्‍या पुस्‍तकांवर भर दयावा असेही ते म्‍हणाले. या प्रशिक्षणामधून एक विद्यार्थी निवडून त्‍या विद्यार्थ्‍याला जिल्‍हाधिकारी , जिल्‍हा पोलीस अधिक्ष , मुख्‍यकार्यकारी अधिकारी यासारख्‍या अधिका-यांसोबत घेऊन दिवसभर शासकिय यंत्रणांच्‍या कामाची माहिती दिली जाईल.
            यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी यांनीसुध्‍दा विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले.
            या प्रशिक्षण वर्गाला मोठया प्रमाणात विद्यार्थ्‍यानी सहभाग घेतला.
संचालन प्रविण वानखेडे यांनी तर आभार जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी अविनाश रामटेक यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्‍ह्यातील सामाजिक न्‍याय विभागाच्‍या अंतर्गत शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.


0000
स्‍टेट बँक येथे वृक्ष रोपण कार्यक्रम संपन्‍न

वर्धा,दि 2- राज्‍यात दि.1 जुलै रोजी  2 कोटी वृक्ष लागवड करण्‍यात आलेल्‍या अभियांनाअतंर्गत  जिल्‍हयातील बँकासह शैक्षणिक संस्‍था, सामाजिक संस्‍था, सेवा संस्‍था, पवनार आश्रम, सेवाग्राम आश्रम येथे हजारो वृक्षाची लागवड करुन अभियान उत्‍फुर्त सहभाग घेतला.
            भारतीय स्‍टेट बँक (कोषागार शाखा) येथे शाखा व्‍यवस्‍थापक सुभाषचंद्र मोहंती , व आर.सी.बोरकुटे, अनंत धारकर, प्रमोद देशपांडे, ज्‍योती गाठीबांधे , विजय पावडे व चर्तुसिंग गोकलानी सहभाग घेऊन बँक परिसरात वृक्षरोपन केले.
                                                                        0000
प.क्र.456
राज्‍यस्‍तरीय युवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

वर्धा,दि 2-राज्‍याचे युवा धोरण 2012 अतंर्गत सन 2016-17 या वर्षामध्‍ये श्री शिवछत्रपती क्रिडापीठ बालेवाडी म्‍हाळुंगे, पुणे येथे युवकांच्‍या समक्षमीकरणाकरिता विविध विषयावरील 10 दिवसाचे 6 निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन जुलै ते सप्‍टेंबर या कालावधीत करण्‍यात आले आहे.
            प्रशिक्षण शिबिरात युवक युवतींसाठी व्‍यक्‍तीमत्‍व विकासाच्‍या दृष्‍टीने विविध विषयात तंज्ञ मार्गदर्शकाव्‍दारे मार्गदर्शन करण्‍यात येणार आहे. शिबिरात सहभागी होणा-या प्रशिक्षणार्थीची निवास व भोजन व्‍यवस्‍था शासनामार्फत करण्‍यात येणार असुन शिबिर स्‍थळी जाण्‍यायेण्‍याचा प्रवास खर्च संबंधितांना करावा लागेल. या शिबिरात सहभागी होण्‍यासाठी जिल्‍हयातील 30 युवक व 30 युवतीची निवड करण्‍यात येणार आहे.
            निवासी प्रशिक्षण शिबिरासाठी 22 ते 29  या वयोगटातील नेहरु युवा केंद्राकडे युवा कर्मी, राष्‍ट्रीय सेवा योजनेचे 2 कॅम्‍प पुर्ण केलेले विद्यार्थी, एम.एस.डब्‍ल्‍यु, एम.ए. सोशियालॉजी इत्‍यादी शिक्षण घेत असलेल्‍या  युवक युवतींनी या शिबिरासाठी 11 जुलै पर्यंत आपल्‍या नावांची नोंद जिल्‍हा क्रिडा अधिकारी कार्यालय येथे करावी असे आवाहन जिल्‍हा क्रिडा अधिकारी यांनी केले आहे.

                                                                        0000
राजर्षी शाहू महाराजाचे विचार आजच्‍या पिढीनी अंगिकारावे
-         खासदार रामदास तडस
Ø  सामाजिक न्‍याय दिन संपन्‍न
वर्धा,दि.26-राजर्षी शाहू महाराजांनी  बहुजन समाजात शिक्षण व क्रिडा प्रसार करण्‍यावर विशेष भर दिला. कोल्‍हापुर संस्‍थानात प्राथमिक शिक्षण संक्‍‍तीचे व मोफत केले. स्‍त्री शिक्षणाचा प्रसार व्‍हावा म्‍हणुन त्‍यांनी राजाज्ञा काढली. अस्‍पृश्‍यता नष्‍ट करण्‍याच्‍या दृष्‍टीने वेगळया शाळा भरविण्‍याची पध्‍दत बंद केली. त्‍यांचे हेच विचार लोकप्रतिनिधीच्‍या माध्‍यमातून गावपातळीवर नेऊन आजच्‍या पिढीनी त्‍यांचे विचार अंगिकारावे असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले.
सामाजिक न्‍याय भवन येथे आयोजित राजर्षी शाहू महाराज यांच्‍या जयंती दिनानिमित्‍त सामाजिक न्‍याय दिन कार्यकामाचे आयोजन करण्‍यात आले. त्‍याप्रसंगी खासदार रामदास तडस प्रमुख अतिथी म्‍हणुन बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल होते. आमदार डॉ. पंकज भोयर, उपपोलिस अधिक्षक(गृह) आर. किल्‍लेकर, मधुकर कासारे, सहाय्यक आयुक्‍त समाज कल्‍याण बाबासाहेब देशमुख, जि.प. चे समाज कल्‍याण अधिकारी अविनाश रामटेके यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना रामदास तडस म्‍हणाले की, जो पर्यंत गाव सक्षम होत नाही तो पर्यंत शहर सक्षम होत नाही यासाठी गावाचा विकास करणे गरजेचे असून यासाठी शाहू महाराजाच्‍या विचाराची प्रेरणा घेऊन शासनाने मागासवर्गीयासाठी शिष्‍यवृत्‍ती , कौशल्‍य विकास , दादासाहेब सबळीकरण सारख्‍या योजना सुरु केल्‍या आहे. शाहू महाराजाचे विचार गावातील शेवटच्‍या माणसापर्यंत पोहोचविण्‍याची गरज असल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल म्‍हणले की, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर , महात्‍मा  ज्‍योतिबा फुले , महात्‍मा गांधी यारख्‍या थोर पुरुषाचे आचार, विचार समाजामध्‍ये रुजले पाहिजे. कोणताही समाज सामाजिक न्‍यायाशिवाय जास्‍त दिवस चालू शकत नाही. समाजातील सर्व घटक एकत्रित येत नाही तोपर्यंत समा‍जात सुधारणा होत नाही. व समाजाचा विकास होऊ शकत नाही नाही. यासाठी गावपातळीवरील विकास करण्‍यासाठी शासन प्रशासनासोबतच लोकसहभागाची गरज असल्‍याचे यावेळी जिल्‍हाधिकारी यांनी आपल्‍या अध्‍यक्षीय भाषाणात सांगितले .
यावेळी  आमदार डॉ. पंकज भोयर, श्री. किल्‍लेकर, मधुकर कासारे यांची समायोचित भाषणे झाली.


कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात बाबासाहेब देशमुख यांनी शाहू महाराज यांनी आपल्‍या राज्‍याच्‍या उत्‍पन्‍नाचा मोठा भाग शिक्षणावर करीत असत त्‍यांनी वसतीगृहाची मोठी चळवळ उभी करुन विद्यार्थ्‍यांच्‍या निवासी शिक्षणाची सोय केली त्‍यामुळे शासकीय स्‍तरावर मोठया प्रमाणावर शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्‍याय दिवस म्‍हणुन साजरी करण्‍यात येत आहे.
यावेळी दहावी व बारावी च्‍या विद्यार्थ्‍यांना शाहू महाराज गुणवत्‍ता पुरुस्‍कार तसेच सामाजिक न्‍याय विभागाअंतर्गत येणा-या महामंडळाव्‍दारे लाभार्थ्‍यांना कर्जाचे धनादेशाव्‍दारे मान्‍यवरांचे हस्‍ते वितरण करण्‍यात आले.
कार्यक्रमाचे संचालन प्रविण वानखेडे यांनी तर आभार जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी अविनाश रामटेक यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्‍ह्यातील सामाजिक न्‍याय विभागाच्‍या अंतर्गत शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

0000