Tuesday 12 July 2016

तरुणांनी  सकारात्‍मक विचार
करुन अभ्‍यासाचे धोरण  ठरवावे
-         जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
वर्धा,दि 3-स्‍पर्धा परिक्षेची तयारी करतांना तरुणांनी सकारात्‍मक विचार करुन अभ्‍यासाचे धोरण ठरवून  सलग मेहनत करणे गरजेचे आहे. त्‍यासोबतच स्‍पर्धा परिक्षेत पास होण्‍यासाठी एक ध्‍येय ठरवावे असे प्रतिपादन जिल्‍हाधिकारी यांनी केले.
दि.2 जुलै पासुन  दर महिन्‍याच्‍या पहिल्‍या शनिवारी ला सामाजिक न्‍याय भवन येथे जिल्‍हा प्रशासन व जिल्‍हा ग्रंथालयाच्‍या वतीने स्‍पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्ग सुरु करण्‍यात आले आहे. या स्‍पर्धा परिक्षा मार्गदर्शन वर्गाचे औपचारीक उद्दघाटन दि.2 जुलै रोजी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांचे हस्‍ते झाले. यावेळी  प्रमुख मार्गदर्शक म्‍हणुन नागपुरच्‍या सुजाता दामटे, निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नावडकर, नागपूर येथील शासकीय ग्रंथालयाच्‍या सहाय्यक संचालक कविता महाजन, नियोजन विभागाचे वित्‍त व लेखा अधिकारी प्रतापराज म्‍हसाळ, जिल्‍हा ग्रंथालय अधिकारी अस्मिता मंडपे यांची उपस्थिती होती.  
           पुढे बोलतांना जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल म्‍हणाले ब-याच वेळा चांगली कामे कठिण असू शकते, वाईट कामे सोपे असते त्‍यामुळे वाईट सवई लागण्‍याची शक्‍यता असते. यासाठी दुस-याची तुलना न करता स्‍वतःचा   विचार करावा. प्रत्‍येक तरुणानी जिद्द, चिकाटी व आत्‍मविश्‍वास हे गुण अंगी बाळगून अभ्‍यास केल्‍या स्‍पर्धा परिक्षेत यश प्राप्‍त होऊ शकते. यासाठी विद्यार्थ्‍यांनी अभ्‍यास करतांना गट तयार करुन चालू घडामोडी, इतिहास, राज्‍यशास्‍त्र, मराठी यासारख्‍या पुस्‍तकांवर भर दयावा असेही ते म्‍हणाले. या प्रशिक्षणामधून एक विद्यार्थी निवडून त्‍या विद्यार्थ्‍याला जिल्‍हाधिकारी , जिल्‍हा पोलीस अधिक्ष , मुख्‍यकार्यकारी अधिकारी यासारख्‍या अधिका-यांसोबत घेऊन दिवसभर शासकिय यंत्रणांच्‍या कामाची माहिती दिली जाईल.
            यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी यांनीसुध्‍दा विद्यार्थ्‍यांना मार्गदर्शन केले.
            या प्रशिक्षण वर्गाला मोठया प्रमाणात विद्यार्थ्‍यानी सहभाग घेतला.
संचालन प्रविण वानखेडे यांनी तर आभार जिल्‍हा समाज कल्‍याण अधिकारी अविनाश रामटेक यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्‍ह्यातील सामाजिक न्‍याय विभागाच्‍या अंतर्गत शाळेचे विद्यार्थी, विद्यार्थीनी, नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.


0000

No comments:

Post a Comment