Thursday 4 August 2016

नाल्‍याकाठी बहरले खरीपाचे पिक
Ø मलकापूर झाले जलयुक्‍त
Ø 537 द.ल.घ.मी. पाणी साठा
Ø शेतक-यांनी केली डाळिंब लागवड
Ø पिण्‍याच्‍या पाण्‍याची काळजी मिटली
   वर्धा, दि.4- पावसाळयात नाल्‍याचे पाणी शेतात शिरुन खरीप पिक नष्‍ट होत होते. एखादया वर्षी चांगला पाऊस झाला तरच रबी पिकाची शाश्‍वती  मलकापूर गावातील नाल्‍याकाठच्‍या शेतक-याची अनेक वर्षापासुनची ही वेदना ! पण जलयुक्‍त शिवार अभियानांत झालेल्‍या नाला खालीकरणाचे कामामुळे शेतात पाणी शिरण्‍यास पायबंद बसला आाणि नाल्‍याकाठच्‍या अनेक शेतक-यांच्‍या चेह-यावर समाधानाचे भाव दिसू लागले. कित्‍येक वर्षात ज्‍या शेतात खरीपाचे पिकच आले  नाही, त्‍या शेतात सोयाबिन, कापूस व तूरीचे पिक आज डौलाने उभे आहे.
          देवळी तालुक्‍यातील मलकापुर हे गाव कायम टंचाई ग्रस्‍त  गाव.  मागील वर्षी या गावाची आणेवारी 50 टक्‍केच्‍या आत होती.  2015-16 मध्‍ये या गावाची निवड जलयुक्‍त शिवार अभियानात करण्‍यात आली आणि गावाचे चित्रच पालटले गावाच्‍या एकुण पाण्‍याच्‍या गरजेनुसार पाण्‍याचे नियोजन करण्‍यात आले. यामध्‍ये सिमेंट नाला बांधासह नाला खोलीकरणाची सहा कामे, दोन साठवण बंधारे, आणि पाणी पुरवठा योजनेच्‍या स्‍त्रोत बळकटीकरणासाठी भूमिगत रिचार्ज शाप्‍ट 5 अशी एकुन 13 कामे घेण्‍यात आली.  त्‍यापैकी 8 कामे पूर्ण झाली असून 5 कामे प्रगतीपथावर आहे.  गावाच्‍या एकुण वाटर बजेटींग नुसार 91 टक्‍के पाण्‍याचे बजेटींग पूर्ण झाले आहे. सध्‍या गावात 537. 64 द.ल.घ.मी. पाणीसाठा निर्माण झाला असून  या पाण्‍याचा उपयोग सुमारे 537 हेक्‍टर संरक्षित सिंचनासाठी होणार आहे.या संपूर्ण कामासाठी 1 कोटी 46 लक्ष रुपयाचा आराखडा तयार करण्‍यात आला असून  त्‍यापैकी पूर्ण झालेल्‍या कामावर 70 लक्ष 67 हजार रुपये खर्च झाले आहे..
जलयुक्‍त शिवारमधील  झालेल्‍या कामामुळे विशेषतः नाल्‍याकाठच्‍या शेतक-यांना मोठया प्रमाणावर फायदा होतांना दिसत आहे. पदमाकर बाजारे यांची नाल्‍याकाठी 5 एकर शेती आहे. मात्र काही वर्षापासुन त्‍यांनी या शेतात खरीपाचे पीक घेतले नव्‍हते नाल्‍याचे पाणी शेतात शिरुन पीक जळायचे, मात्र यावर्षी शेतात पाणी शिरलेच नाही. शिवाय पावसाचे अतिरिक्‍त पाणी नाल्‍यात सोडता आले त्‍यामुळे यावर्षी    खरीपाचे पीक चांगले होण्‍याची अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली.
डाळिंब लागवड
नाल्‍यालगत माझी 5 एकर शेती असून शेतात विहिर आहे. मात्र रब्‍बी पिकाला विहिरीचे पाणी पुरत नव्‍हते. पण नाला खोलीकरणाचे कामामुळे यावर्षी विहिरीच्‍या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. त्‍यामुळे दोन एकरात मी डाळिंबाची लागवड केली आहे. पावसाळयानंतर विहिरीच्‍या पाण्‍यावर डाळिंब शेती जगवता येईल.
                                                                              प्रशांत निवल
                                                                                 शेतकरी
पिण्‍याच्‍या पाण्‍याची काळजी मिटली  हे गाव कायम पाणी टंचाईग्रस्‍त मध्‍ये असते. गावात ग्रामीण पाणी पुरवठा योजना आहे. मात्र या योजनेसाठी वापरण्‍यात येणारी विहिर उन्‍हाळयात कोरडी होते त्‍यामुळे गावात पाणी पुरवठा होत नव्‍हता. जलयुक्‍त शिवार मध्‍ये पाणी पुरवठा योजनेच्‍या स्‍त्रोत विहिरीजवळ रिचार्ज शाप्‍टची कामे करण्‍यात आली. यामुळे यावर्षी विहिरीची पाणी पातळी वाढली आहे. पुढील उन्‍हाळयात पिण्‍याच्‍या पाण्‍याची टंचाई जाणवणार नाही अशी आशा आहे.
                                                                                       साधना नेहारे
                                                                                   सरपंच ,मलकापूर



Wednesday 3 August 2016

महसूल प्रशासन अधिक तिमान करण्यासाठी पुढाकार घ्या
                                                       - अन कुमार  
                                    उत्कृष्ट अधिकारी म्हणून
                        वैभव नावडकर, मनोहर चव्हाण यांचा गौरव
                        एस. व्ही. हाडके यांच्या उत्कृष्ट कामाचा गौरव
                        महसूल दिनानिमित्त अधिकारी, कर्मचा-यांचा सन्मान

        वर्धा, दि. 2: महसूल विभाग हा जिल्हा प्रशासनाचा महत्वाचा भाग असल्यामुळेच विविध योजनांच्या मलबजावणीच्या समन्वयाची जबाबदारी या विभागाकडे सोपविण्यात आली आहे. महसूल प्रशासन अधिक तिमान करुन जनतेला अधिक जलद सुविधा उपलब्ध करुन द्या असे प्रतिपादन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले.
            महसूल दिनानिमित्त नागपूर विभागात उत्कृष्ट काम करणा-या अधिकारी कर्मचा-यांचा गौरव विभागीय आयुक्त अनुपकुमार यांच्या हस्ते नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात करण्यात आला . त्याप्रसंगी मागदर्शन करतांना ते बोलत होते.
            यावेळी सामाजिक कार्यकर्त्या प्रा. रुपा कुळकर्णी , नागपूरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे , अपर विभागीय आयुक्त संजिव उन्हाळे, महसूल उपायुक्त जितेंद्र पापकर तसेच वरिष्ठ महसूल अधिकारी उपस्थित होते.
            वर्धा येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असतांना वैभव नावडकर यांनी विद्यार्थ्यांना विविध दाखले देण्यासाठी शाळेमध्ये विशेष शिबिराचे आयोजन करुन वेळेत दाखले मिळवून दिले होते. नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकरी घरांच्या नुकसानी  संदर्भात मदतीचे वाटप करतांना सुसत्रता आणने महसूल वसुली करण्याबाबत विशेष परिश्रम घेवून दिलेले द्दिष्ट पूर्ण करणे, न्यायालयीन दंडाधिकारी कामे वेळेत विहित कार्यपद्धतीने हाताळतांनाच जनतेची कामे करण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल उपविभागीय महसूल अधिकारी वैभव नावडकर यांचा उत्कृष्ट अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त अन कुमार यांनी प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देवून गौरव केला आहे.
            आर्वी येथील तहसिलदार मनोहर चव्हाण यांना तहसिलदार संवर्गात 15.16 या वर्षात संपूर्ण विभागात स्वयंस्पूर्तीने पुढाकार घेवून महसूल सेवांचा लाभ जनतेला दिल्या बद्दल तसेच महसूली वसुली करण्याबाबत केलेल्या विशेष परिश्रमाबद्दल विभागीय आयुक्तांनी चव्हाण यांचा प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देवून गौरव केला आहे. प्रशासनामध्ये तंत्रानाचा वापर तसेच टंचाई नैसर्गिक आपत्ती काळात केलेल्या कार्याची दखल घेवून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील एस. व्ही. हाडके, यांना लघुलेखक संवर्गात त्यांनी केलेल्या उत्कृष् कार्याबद्दल उत्कृष् कर्मचारी म्हणून गौरविण्यात आले आहे. तलाठी संवर्गात देवळी तहस कार्यालयाने एस. एम. पवार, शिपाई संवर्गात जिल्हाधिकारी कार्यालयातील सलिम शेख , वसंता पिसे, या कर्मचा-यांचा विभागीय आयुक्त अन कुमार यांनी गौरव केला आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी महसूल प्रशासनामध्ये कार्यरत असतांना केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाची माहिती दिली.
प्रारंभी महसूल उपआयुक्त जितेद्र पाळकर यांनी स्वागत करुन प्रास्ताविक भाषणात महसूल दिन महिलांच्या सबळीकरणासाठी विभागात महिनाभर राबविण्यात येणा-या उपक्रमांची माहिती दिली.
                                                            *****
                                   

                
अण्‍णाभाऊ साठे महामंडळाच्‍या कर्ज वितरण
अपहाराबाबत तक्रार सादर करण्‍याचे आवाहन
          वर्धा,दि 2-साहित्‍यरत्‍न अणाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या.मुबंई व इतर जिल्‍हा कार्यालयात विविध कर्ज वाटप प्रकरणात अपहार झाल्‍याचे निर्दशनास आल्‍याने याचा तपास राज्‍य गुन्‍हे अन्‍वेशन विभाग कोकण भवन, मुबंई करत असून ज्‍या कोणाला महामंडळाच्‍या कर्ज वितरणाबाबत तक्रारी असल्‍यास गुन्‍हे अन्‍वेशन विभागाकडे तक्रार करण्‍याचे आवाहन महामंडळाचे जिल्‍हा व्‍यवस्‍थापक शरद गेडाम यांनी केले आहे.
            राज्‍य गुन्‍हे अन्‍वेशन विभाग मुंबई यांचे कडून साहित्‍यरत्‍न लोकशाहीर अणाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. मुबंई व इतर जिल्‍हा कार्यालयात सन 2012-13 ते 2014 -15 या कालावधीत विविध योजनेअंतर्गत वाटप करण्‍यात आलेल्‍या कर्ज वितरणात वित्‍तीय अनियमितता व अपहार झाल्‍याचे निदर्शनास आले असून त्‍याबाबत तपास सुरु आहे. सदर कालावधीत वर्धा जिल्‍हा कार्यालयाकडून  148 लाभार्थ्‍यांना कर्ज वाटप करण्‍यात आले असुन याबाबत काही तक्रारी असल्‍यास तपास अधिकारी राज्‍य गुन्‍हे विभाग कोकण भवन, मुबंई यांचे  022 22672585, 022 27571485 दुरध्‍वनी क्रमांकावर वhccidcrimekb@gmail.com या ई-मेल वर सुचित करावे असे लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे विकास महामंडळाव्‍दारे कळविण्‍यात आले आहे.
                                                    00000

कृषी यांत्रिकिकरण सेवेसाठी कृषी साहित्‍य
खरेदीसाठी अर्ज करण्‍याचे आवाहन
          वर्धा,दि 2-कृषी यांत्रिकीकरण उपविभाग अंतर्गत कृषी यांत्रिकिकरण सेवेसाठी कृषी यंत्र सामुग्री व उपकरणे खरेदीसाठी शेतक-यांना अर्थसहाय देण्‍यात येणार आहे. कृषी यंत्रसामुग्री जसे ट्रॅक्‍टर, पावर टिलर, ट्रॅक्‍टर चलीत औजारे, रोटाव्‍हेटर , नांगर, कल्‍टीव्‍हेटर, रिजर, पेरणी यंत्र, प्‍लँटर इत्‍यादी तसेच मनुष्‍य तथा प्राणी चलीत औजारे, पिक संरक्षण उपकरणे जसे पावर नॅपसॅक स्‍प्रेअर , ट्रॅक्‍टर माऊंटेड स्‍प्रेअर, युरीया ब्रिकेट इत्‍यादीसाठी अनुदान उपलब्‍ध आहे. या अनुदानांमधून अनुसुचित जाती वर्गातील जाती वर्गातील शेतक-यांना 16 टक्‍के, अनुसुचित जमातीसाठी 13 टक्‍के तर सर्वसाधारण वर्गातील शेतक-यांना 71 टक्‍के निधी वितरीत केला जाणार आहे.
            इच्‍छुक शेतक-यांनी त्‍यांचे अर्ज सं‍बंधित तालुका कृषी अधिकारी यांचेकडे औजारे मागणी अर्ज, औजाराचे नाव, मेक , 7/12 , 8 –अ , आधारकार्ड, फोटो आयडेन्‍टीची स्‍वस्‍वाक्षकिंत प्रत, रद्द केलेल्‍या चेकची प्रत, पासबुकच्‍या पहिल्‍या पृष्‍ठाची स्‍वस्‍वाक्षकिंत प्रत, महाराष्‍ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे कोठेशन इत्‍यादी कागदपत्रे जोडणे आवश्‍यक आहे.
            अनुसुचित जाती, अनु.जमाती, अल्‍प , अत्‍यल्‍प लाभधारक, महिला व इतर लाभार्थी शेतक-यांसाठी कमाल अनुदान मर्यादा निश्चित करण्‍यात आलेली आहे. कमाल अनुदान मर्यादेच्‍या अधिन राहून अनु.जाती , अनु.जमाती, अल्‍प, अत्‍यल्‍प व महिला लाभधारकांसाठी 50 टक्‍के यापैकी जे अनुदान कमी आहे ते लाभार्थीस देय राहील. निवड केलेल्‍या लाभधारकांनी पुर्वसंमती प्राप्‍त झाल्‍यानंतर खरेदी करावयाच्‍या यंत्र व औजाराची संपूर्ण रक्‍कम विभागीय व्‍यवस्‍थापक महाराष्‍ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडे जमा करुन यंत्र व औजाराची खरेदी त्‍यांच्‍या पसंतीनुसार करावयाची आहे. खरेदी केलेल्‍या औजाराची तपासणी संयुक्‍त तपासणी पथकाव्‍दारे करण्‍यात येईल. तपासणी नंतरच अनुदान लाभार्थीच्‍या बँक खात्‍यात जमा करण्‍यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांचे संपर्क साधावा असे जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.
                                                0000

                     व्‍यवसायकर नावनोंदणी अभय योजनेचा लाभ घ्‍यावा
          वर्धा, दि.2- राज्‍यात व्‍यवसायकर कायदयानुसार   प्रत्‍येकी व्‍यक्‍ती जी राज्‍यात व्‍यवसाय, व्‍यापार करणारी आहे जसे की, वकिल, नोटरी, वैद्यकिय व्‍यवसायिक, आर्किटिक्‍ट, इंजिनिअर्स, कर सल्‍लागार, सी.ए कमिशन एजंटस, दलाल, ब्रोकर्स,कत्राटदार,व्‍हॅट कायाद्याअंतर्गत नोंदणीकृत व्‍यापारी, फॅक्‍टरी कलमाखालील फॅक्‍टरीचे आक्‍युपायर्स मुंबई शॅाप अॅन्‍ड इस्‍टॉब्लिशमेंट कायाद्याखालील आस्‍थापनाचे मालक, केबल ऑपरेटर्स, लग्‍न सभागृह चालविणारे किंवा मालक, कॉन्‍फरन्‍स हॉल, ब्‍युटी पार्लर्स, हेल्‍थ सेंटर्स सर्व प्रकारचे कोचिंग क्‍लासेस चालविणारे संस्‍था व्‍यक्‍ती,  पेट्रोल, डिसेल, ऑईल पंप आणि सर्व्‍हीस स्‍टेशन, गॅरेज, ऑटोमोबाईल वर्कशॉपचे, हॉटेल्‍स व सिनेमागृह, मनीलेंडर्स,  चिट फंड चालविणारे संस्‍था किंवा व्‍यक्‍ती बॅकिंग व्‍यवहार करणा-या संस्‍था, सहकारी संस्‍था, कंपन्‍या,  इंडियन पार्टनरशिप अॅक्‍ट खालील भागीदारी संस्‍थेचा प्रत्‍येक भागीदार व हिंदू अविभक्‍त कुंटूबातील प्रत्‍येक प्रौढ घटना अशा सर्वाना व्‍यवसायकराखालील नावनोंदणी करुन प्रती वर्षी व्‍यवसायकर कायद्यातील सूची नुसार दिनांक 30 जून पुर्वी व्‍यवसायकर  भरणे कायद्यानुसार बंधनकारक आहे.
          पंरतु शासनाच्‍या  असे लक्षात आले आहे की, कित्‍येक व्‍यक्‍ती सोसायटया, संस्‍था ,कंपनी  यांनी पात्रता असूनही व्‍यवसायकराची नावनोंदणी केलली नसून व्‍यवसायकर भरलेली नाही, नागपूर विभागामध्‍ये वर उल्‍लेखीत स्‍वंयरोजगार करणा-या व्‍यक्‍ती व संस्‍थाची प्रचंड मोठी संख्‍या आहे.पंरतु व्‍यवसायकरअंतर्गत नांवनोदणी धारकांचे प्रमाण खुप कमी आहे.
      व्‍यवसायकर कायदयान्‍ये कर भरण्‍यास पात्र असणा-या वर उल्‍लेख असणा-या ज्‍या व्‍यक्‍तीने नांवनोंदणी करुन घेतली नसल्‍यास ज्‍या वर्षी नावनोंदणीसाठी अर्ज केलेला आहे. त्‍यावर्षी चे मागील  8 वर्षापर्यत त्‍याची करदेयता येते. सोबत अशा व्‍यक्‍तीस रु. 2 प्रति दिवसा प्रमाणे दंडभरावा लागतो.
     राज्‍यात अशा व्‍यक्‍ती ज्‍या नावनोंदणीस पात्र असून नाव नोंदणी धारक नसून व्‍यवसायकर भरत  नाहीत अशा व्‍यक्‍ती  व ज्‍यानी अजुनपर्यंत नावनोंदणी घेतलेली नाही अशा व्‍यक्‍तीसाठी शासनाने व्‍यवसायकर नावनोंदणी अभय योजना 2016 जाहीर केलेली आहे. नावनोंदणी धारकाने प्रमाण वाढविणे  व कायाद्यानुसार बंधंनकारक असणारे व्‍यवसायकर भरुन घेणे व त्‍याअंनुषगाने शासनाचा महसूल वाढविणे या हेतुने शासनाने ही योजना आणलेली आहे.
          या योजनाचा लाभ घेण्‍याकरीता नांवनोंदणी अर्ज 1 एप्रिल 2016 ते 30 संप्‍टेबर 2016 याकालावधीत करणे आवश्‍यक आहे तसेच मागील तीन वर्षाचा चालू  आर्थिक वर्ष 2016-17 या वर्षाचा व्‍यवसायकर भरणा करणे अनिवार्य आहे.
    योजनेचे फायदे –व्‍यवसायकर नांवनोदणी अभय योजनेखाली नांवनोंदणी घेणा-यास 1 एप्रिल 2013 पूर्वीचे व्‍यवसायकर व व्‍याज माफ होईल तसेच व्‍यवसायकर कायदा कलम 5(5)खाली भरावयाचा दंड सुध्‍दा होईल.
                  नावनोंदणी करण्‍याकरीता  www.mahavat.gov.in   या संकेत स्‍थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.नावननोदणी क्रमांक मिळल्‍यानंतर कर भरणा करावा लागेल.अनोंदीत सदर व्‍यवसायकर नांवनोदणी अभय योजना 2016 चाआवश्‍यक लाभ घ्‍यावा.
          या योजनेच्‍या समाप्‍तीनंतर व्‍यवसायकर नावनोंदणी न घेणा-या व्‍यक्‍तीविरुध्‍दकडक कारवाई करण्‍यात येईल नावनोंदणी न घेतलेल्‍या व्‍यक्‍तीविरुध्‍द मोहिम राबविण्‍यात  येणार असून ते मागील आठ वर्षाचा कर भरण्‍यास जबाबदार राहतील तसेच संबंधितांना दंड आणि खटल्‍यासही समोरे जावे लागेल.
     नावनोंदणीसाठी कुठल्‍याही स्‍वरुपाची अडचण असल्‍यास जिल्‍हा स्‍तरावरील विक्रीकर कार्यालयातील मदत कक्षास संपर्क साधावा.
                                                000000         

                 डी.एल.एड.च्‍या प्रथम वर्षाच्‍या  प्रवेशासाठी मुदतवाढ
वर्धादि, 2- सन 2016-17 ची डी.एल.एड प्रथम  वर्षाच्‍या  प्रवेशासाठी  चालू वर्षापासून प्रवेश ऑनलाईन सुरु असून प्रवेश अर्ज भरण्‍याची अंतिम दि. 31 जुलै पर्यंत होती.  तथापि सदर डी.एल.एड. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्‍यास दिनांक 3 ऑगस्‍ट  पर्यंत प्रवेश अर्ज भरण्‍यासाठी मदतवाढ देण्‍यात आलेली आहे आणि पडताळणी  केंद्रावर जाऊन अर्जाची पडताळणी करुन घेण्‍यासाठी दिनांक 4 ऑगस्‍ट मुदतवाढ देण्‍यात आली असल्‍याचे प्राचार्य, जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍था यांनी कळविले आहे.
000000
  
                             वसंतराव नाईक विकास महामंडळाच्‍या
                        योजनाचा लाभ घेण्‍याचे आवाहन
            वर्धा,दि.2- वसंतराव नाईक विमुक्‍त  जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ जिल्‍हा कार्यालयाच्‍यावतीने विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील बेरोजगार  युवकासाठी स्‍वयंरोजगारासाठी योजना राबविण्‍यात येते. त्‍यासाठी अर्ज करण्‍याचे आवाहन महामंडळाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.
महामंडळाच्‍यावतीने 25 टक्‍के बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंत व्‍यवसायाठी कर्ज दिले जाते. त्‍यात 75 टक्‍के बँक सहभाग 25 टक्‍के महामंडळाचा सहभाग आहे. महामंडाळाच्‍या रकमेवर 4 टक्‍के वार्षिक व्‍याज आकारले जाते. परतफेड कालावधी पाच वर्षाचा आहे. अर्जासोबत जात उत्‍पन्‍न रहिवासी दाखला रेशन व आधार,  फोटो, मतदान ओळखपत्र व्‍यवसायचे कोटेशन प्रकल्‍प अहवाल सोबत  जोडावा, असे महामंडळाचे जिल्‍हा व्‍यवस्‍थापक हेमंत लांबे यांनी कळविले आहे.
                                                     000000 


महिला सबलीकरण माहिमेचा शुभारंभ
                             महसूल सप्‍ताह महिलांसाठी समर्पित  
                                                  -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
Ø  7 ऑगस्ट पर्यंत व्‍यापक  जनसंपर्क मोहिम

            वर्धा, दि.-1 – स्त्री ही घराची लक्ष्मी आहे. शेतीच्या सातबा-यावर लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत महिलाच्‍या नावाची नोंद होऊन जमिनीचा फायदा महिलांना झाला पाहिजे, महिलांचे सक्षमिकरण होणे गरजेचे असून हा महसूल सप्‍ताह महिलांसाठी समर्पित आहे. शासनाच्या विविध योजनेतंर्गत महिलांचे अर्ज निकाली काढण्यास या सप्‍ताहात  प्राधान्य दिल्या जाईल. त्‍यामुळे जास्‍तीत जास्‍त महिलांनी या सप्‍ताहाचा लाभ घेऊन आपल्‍या समस्‍याचे निराकरण करुन घ्‍यावे असे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज केले.  
महसूल सप्‍ताहानिमित्‍त महसूल विभागाच्या वतीने  महाराजस्व अभियान अंतर्गत महिला सबळीकरण योजना मोहिमेचा शुभारंभ विकास भवन येथे आयोजित  कार्यक्रमात करण्यात आला. कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानावरुन  जिल्हाधिकारी  बोलत होते. यावेळी   उपविभागीय  अधिकारी  स्मिता पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक  पुरुषोत्‍तम मडावी व्यासपिठावर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
महिला सबळीकरण योजने अंतर्गत  महिलांसाठी  एक दिवसीय आरोग्य  शिबीराचे आयोजन सामान्य रुग्णालयाच्या वतीने विकास भवन येथे करण्यात आले होते. यावेळी   महिलांची मेमोग्राफी, रक्तदाब, मधुमेहाची तपासणी करुन  महिलांना आरोग्याविषयी  माहिती  देण्‍यात आली. त्‍याचबरोबर महिलांची  शेतीच्या सातबा-यावर लक्ष्मी मुक्ती योजनेतंर्गत पतीच्या विनंतीवरुन पत्नीचे सहधारक म्हणून नाव नोंद घेणे , ग्रामपंचायत येथील  नमूना 8-अ मध्ये पतीच्या नावासमोर पत्नीच्या नावाची नोंद घेणे,  आदिवासी व समाजकल्याण विभागामार्फत शालेय विद्यार्थींनीना  ‍ शिष्यवृत्ती तसेच शालेय गणवेशाचे वाटप करण्‍यात आले.
          यावेळी जिल्हाधिकारी  शैलेश नवाल  यांचे हस्ते  अर्थसहाय्य धनादेश, उत्पन्न प्रमाणपत्र, संजयगांधी निराधार योजना प्रमाणपत्र,श्रावणबाळ योजना प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, अनिवासी प्रमाणपत्र, असे विविध प्रमाणपत्राचे  वाटप महिलांना करण्यात आले.
नगर परिषद व ग्रामपंचायत क्षेत्रातील वैयक्तीक  स्वच्छता गृहाची उभारणी, इंदिरा आवास घरकुल योजनेतंर्गत महिलांना घरकुलाचे वाटप, राशन कार्डवर महिलांना कुटूंब प्रमुख म्हणून नाव नोंदविणे, दुय्यम नविन राशन कार्ड वितरण,  महिलांना वाहन चालविण्याचा परवाना देणे, अहिल्याबाई होळकर शालेय विद्यार्थ्यीनींना मोफत एस.टी. ची पास वितरीत करणे,  महिलांची आधार कार्ड तसेच  मनरेगा मध्‍ये  जॉब  कार्ड नोंदणी आणि आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिलांना  शिलाई  मशिन वाटपा करीता अर्ज  स्विकारण्‍यात आले. याशिवाय  जात प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, व सेतू मार्फत होणा-या इतर प्रमाणपत्राचे वाटप  , ग्रामपंचायती अंतर्गत घरबांधकाम आराखडा मंजुरी व परवानगी संबंधी जनजागृती करणे,  महिला बचत गटांना प्रशिक्षण, कर्ज मेळावे, पीक कर्ज इत्यादी  माहिती संबंधित  येत्रणेमार्फत  या कार्यशाळेत देण्यात आली.  
            यावेळी  उपविभागीय अधिकारी   स्मिता पाटील ,जिल्हा शल्यकित्सक पुरुषोत्‍तम  मडावी  उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविकात  तहसिलदार एस.आर.पाराजे यांनी  आयोजित कार्यशाळेविषयी  माहिती दिली.  कार्यक्रमाला जिल्ह्यातील महिला, महिला बचत गटातील  महिला प्रतिनिधी मोठ्या संखेने  उपस्थित होते.
            अशाच प्रकारचे शिबिर  आज सर्व तालुका स्‍तरावर आयोजित करण्‍यात आले होते. यामध्‍ये वर्धा तालुक्‍यात 417 अर्जापैकी सर्व अर्ज निकाली काढण्‍यात आले. हिंगणघाट तालुक्‍यात 801 अर्ज प्राप्‍त झाले असून यापैकी 599 अर्ज निकाली काढण्‍यात आले तसेच सेलू तालुक्‍यात 1155 अर्जापैकी 343 अर्ज तात्‍काळ निकाली काढण्‍यात आले. या सप्‍ताहात प्रत्‍येक मंडळस्‍तरावर शिबिर आयोजित करण्‍यात येणार असून यामध्‍ये महिलांपर्यंत विविध योजनांचा लाभ पोहोचविण्‍यात येणार आहे.
                                                            0000