Wednesday 3 August 2016

अण्‍णाभाऊ साठे महामंडळाच्‍या कर्ज वितरण
अपहाराबाबत तक्रार सादर करण्‍याचे आवाहन
          वर्धा,दि 2-साहित्‍यरत्‍न अणाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या.मुबंई व इतर जिल्‍हा कार्यालयात विविध कर्ज वाटप प्रकरणात अपहार झाल्‍याचे निर्दशनास आल्‍याने याचा तपास राज्‍य गुन्‍हे अन्‍वेशन विभाग कोकण भवन, मुबंई करत असून ज्‍या कोणाला महामंडळाच्‍या कर्ज वितरणाबाबत तक्रारी असल्‍यास गुन्‍हे अन्‍वेशन विभागाकडे तक्रार करण्‍याचे आवाहन महामंडळाचे जिल्‍हा व्‍यवस्‍थापक शरद गेडाम यांनी केले आहे.
            राज्‍य गुन्‍हे अन्‍वेशन विभाग मुंबई यांचे कडून साहित्‍यरत्‍न लोकशाहीर अणाभाऊ साठे विकास महामंडळ मर्या. मुबंई व इतर जिल्‍हा कार्यालयात सन 2012-13 ते 2014 -15 या कालावधीत विविध योजनेअंतर्गत वाटप करण्‍यात आलेल्‍या कर्ज वितरणात वित्‍तीय अनियमितता व अपहार झाल्‍याचे निदर्शनास आले असून त्‍याबाबत तपास सुरु आहे. सदर कालावधीत वर्धा जिल्‍हा कार्यालयाकडून  148 लाभार्थ्‍यांना कर्ज वाटप करण्‍यात आले असुन याबाबत काही तक्रारी असल्‍यास तपास अधिकारी राज्‍य गुन्‍हे विभाग कोकण भवन, मुबंई यांचे  022 22672585, 022 27571485 दुरध्‍वनी क्रमांकावर वhccidcrimekb@gmail.com या ई-मेल वर सुचित करावे असे लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे विकास महामंडळाव्‍दारे कळविण्‍यात आले आहे.
                                                    00000

कृषी यांत्रिकिकरण सेवेसाठी कृषी साहित्‍य
खरेदीसाठी अर्ज करण्‍याचे आवाहन
          वर्धा,दि 2-कृषी यांत्रिकीकरण उपविभाग अंतर्गत कृषी यांत्रिकिकरण सेवेसाठी कृषी यंत्र सामुग्री व उपकरणे खरेदीसाठी शेतक-यांना अर्थसहाय देण्‍यात येणार आहे. कृषी यंत्रसामुग्री जसे ट्रॅक्‍टर, पावर टिलर, ट्रॅक्‍टर चलीत औजारे, रोटाव्‍हेटर , नांगर, कल्‍टीव्‍हेटर, रिजर, पेरणी यंत्र, प्‍लँटर इत्‍यादी तसेच मनुष्‍य तथा प्राणी चलीत औजारे, पिक संरक्षण उपकरणे जसे पावर नॅपसॅक स्‍प्रेअर , ट्रॅक्‍टर माऊंटेड स्‍प्रेअर, युरीया ब्रिकेट इत्‍यादीसाठी अनुदान उपलब्‍ध आहे. या अनुदानांमधून अनुसुचित जाती वर्गातील जाती वर्गातील शेतक-यांना 16 टक्‍के, अनुसुचित जमातीसाठी 13 टक्‍के तर सर्वसाधारण वर्गातील शेतक-यांना 71 टक्‍के निधी वितरीत केला जाणार आहे.
            इच्‍छुक शेतक-यांनी त्‍यांचे अर्ज सं‍बंधित तालुका कृषी अधिकारी यांचेकडे औजारे मागणी अर्ज, औजाराचे नाव, मेक , 7/12 , 8 –अ , आधारकार्ड, फोटो आयडेन्‍टीची स्‍वस्‍वाक्षकिंत प्रत, रद्द केलेल्‍या चेकची प्रत, पासबुकच्‍या पहिल्‍या पृष्‍ठाची स्‍वस्‍वाक्षकिंत प्रत, महाराष्‍ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे कोठेशन इत्‍यादी कागदपत्रे जोडणे आवश्‍यक आहे.
            अनुसुचित जाती, अनु.जमाती, अल्‍प , अत्‍यल्‍प लाभधारक, महिला व इतर लाभार्थी शेतक-यांसाठी कमाल अनुदान मर्यादा निश्चित करण्‍यात आलेली आहे. कमाल अनुदान मर्यादेच्‍या अधिन राहून अनु.जाती , अनु.जमाती, अल्‍प, अत्‍यल्‍प व महिला लाभधारकांसाठी 50 टक्‍के यापैकी जे अनुदान कमी आहे ते लाभार्थीस देय राहील. निवड केलेल्‍या लाभधारकांनी पुर्वसंमती प्राप्‍त झाल्‍यानंतर खरेदी करावयाच्‍या यंत्र व औजाराची संपूर्ण रक्‍कम विभागीय व्‍यवस्‍थापक महाराष्‍ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाकडे जमा करुन यंत्र व औजाराची खरेदी त्‍यांच्‍या पसंतीनुसार करावयाची आहे. खरेदी केलेल्‍या औजाराची तपासणी संयुक्‍त तपासणी पथकाव्‍दारे करण्‍यात येईल. तपासणी नंतरच अनुदान लाभार्थीच्‍या बँक खात्‍यात जमा करण्‍यात येईल. अधिक माहितीसाठी संबंधित मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी यांचे संपर्क साधावा असे जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे.
                                                0000

                     व्‍यवसायकर नावनोंदणी अभय योजनेचा लाभ घ्‍यावा
          वर्धा, दि.2- राज्‍यात व्‍यवसायकर कायदयानुसार   प्रत्‍येकी व्‍यक्‍ती जी राज्‍यात व्‍यवसाय, व्‍यापार करणारी आहे जसे की, वकिल, नोटरी, वैद्यकिय व्‍यवसायिक, आर्किटिक्‍ट, इंजिनिअर्स, कर सल्‍लागार, सी.ए कमिशन एजंटस, दलाल, ब्रोकर्स,कत्राटदार,व्‍हॅट कायाद्याअंतर्गत नोंदणीकृत व्‍यापारी, फॅक्‍टरी कलमाखालील फॅक्‍टरीचे आक्‍युपायर्स मुंबई शॅाप अॅन्‍ड इस्‍टॉब्लिशमेंट कायाद्याखालील आस्‍थापनाचे मालक, केबल ऑपरेटर्स, लग्‍न सभागृह चालविणारे किंवा मालक, कॉन्‍फरन्‍स हॉल, ब्‍युटी पार्लर्स, हेल्‍थ सेंटर्स सर्व प्रकारचे कोचिंग क्‍लासेस चालविणारे संस्‍था व्‍यक्‍ती,  पेट्रोल, डिसेल, ऑईल पंप आणि सर्व्‍हीस स्‍टेशन, गॅरेज, ऑटोमोबाईल वर्कशॉपचे, हॉटेल्‍स व सिनेमागृह, मनीलेंडर्स,  चिट फंड चालविणारे संस्‍था किंवा व्‍यक्‍ती बॅकिंग व्‍यवहार करणा-या संस्‍था, सहकारी संस्‍था, कंपन्‍या,  इंडियन पार्टनरशिप अॅक्‍ट खालील भागीदारी संस्‍थेचा प्रत्‍येक भागीदार व हिंदू अविभक्‍त कुंटूबातील प्रत्‍येक प्रौढ घटना अशा सर्वाना व्‍यवसायकराखालील नावनोंदणी करुन प्रती वर्षी व्‍यवसायकर कायद्यातील सूची नुसार दिनांक 30 जून पुर्वी व्‍यवसायकर  भरणे कायद्यानुसार बंधनकारक आहे.
          पंरतु शासनाच्‍या  असे लक्षात आले आहे की, कित्‍येक व्‍यक्‍ती सोसायटया, संस्‍था ,कंपनी  यांनी पात्रता असूनही व्‍यवसायकराची नावनोंदणी केलली नसून व्‍यवसायकर भरलेली नाही, नागपूर विभागामध्‍ये वर उल्‍लेखीत स्‍वंयरोजगार करणा-या व्‍यक्‍ती व संस्‍थाची प्रचंड मोठी संख्‍या आहे.पंरतु व्‍यवसायकरअंतर्गत नांवनोदणी धारकांचे प्रमाण खुप कमी आहे.
      व्‍यवसायकर कायदयान्‍ये कर भरण्‍यास पात्र असणा-या वर उल्‍लेख असणा-या ज्‍या व्‍यक्‍तीने नांवनोंदणी करुन घेतली नसल्‍यास ज्‍या वर्षी नावनोंदणीसाठी अर्ज केलेला आहे. त्‍यावर्षी चे मागील  8 वर्षापर्यत त्‍याची करदेयता येते. सोबत अशा व्‍यक्‍तीस रु. 2 प्रति दिवसा प्रमाणे दंडभरावा लागतो.
     राज्‍यात अशा व्‍यक्‍ती ज्‍या नावनोंदणीस पात्र असून नाव नोंदणी धारक नसून व्‍यवसायकर भरत  नाहीत अशा व्‍यक्‍ती  व ज्‍यानी अजुनपर्यंत नावनोंदणी घेतलेली नाही अशा व्‍यक्‍तीसाठी शासनाने व्‍यवसायकर नावनोंदणी अभय योजना 2016 जाहीर केलेली आहे. नावनोंदणी धारकाने प्रमाण वाढविणे  व कायाद्यानुसार बंधंनकारक असणारे व्‍यवसायकर भरुन घेणे व त्‍याअंनुषगाने शासनाचा महसूल वाढविणे या हेतुने शासनाने ही योजना आणलेली आहे.
          या योजनाचा लाभ घेण्‍याकरीता नांवनोंदणी अर्ज 1 एप्रिल 2016 ते 30 संप्‍टेबर 2016 याकालावधीत करणे आवश्‍यक आहे तसेच मागील तीन वर्षाचा चालू  आर्थिक वर्ष 2016-17 या वर्षाचा व्‍यवसायकर भरणा करणे अनिवार्य आहे.
    योजनेचे फायदे –व्‍यवसायकर नांवनोदणी अभय योजनेखाली नांवनोंदणी घेणा-यास 1 एप्रिल 2013 पूर्वीचे व्‍यवसायकर व व्‍याज माफ होईल तसेच व्‍यवसायकर कायदा कलम 5(5)खाली भरावयाचा दंड सुध्‍दा होईल.
                  नावनोंदणी करण्‍याकरीता  www.mahavat.gov.in   या संकेत स्‍थळावर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.नावननोदणी क्रमांक मिळल्‍यानंतर कर भरणा करावा लागेल.अनोंदीत सदर व्‍यवसायकर नांवनोदणी अभय योजना 2016 चाआवश्‍यक लाभ घ्‍यावा.
          या योजनेच्‍या समाप्‍तीनंतर व्‍यवसायकर नावनोंदणी न घेणा-या व्‍यक्‍तीविरुध्‍दकडक कारवाई करण्‍यात येईल नावनोंदणी न घेतलेल्‍या व्‍यक्‍तीविरुध्‍द मोहिम राबविण्‍यात  येणार असून ते मागील आठ वर्षाचा कर भरण्‍यास जबाबदार राहतील तसेच संबंधितांना दंड आणि खटल्‍यासही समोरे जावे लागेल.
     नावनोंदणीसाठी कुठल्‍याही स्‍वरुपाची अडचण असल्‍यास जिल्‍हा स्‍तरावरील विक्रीकर कार्यालयातील मदत कक्षास संपर्क साधावा.
                                                000000         

                 डी.एल.एड.च्‍या प्रथम वर्षाच्‍या  प्रवेशासाठी मुदतवाढ
वर्धादि, 2- सन 2016-17 ची डी.एल.एड प्रथम  वर्षाच्‍या  प्रवेशासाठी  चालू वर्षापासून प्रवेश ऑनलाईन सुरु असून प्रवेश अर्ज भरण्‍याची अंतिम दि. 31 जुलै पर्यंत होती.  तथापि सदर डी.एल.एड. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्‍यास दिनांक 3 ऑगस्‍ट  पर्यंत प्रवेश अर्ज भरण्‍यासाठी मदतवाढ देण्‍यात आलेली आहे आणि पडताळणी  केंद्रावर जाऊन अर्जाची पडताळणी करुन घेण्‍यासाठी दिनांक 4 ऑगस्‍ट मुदतवाढ देण्‍यात आली असल्‍याचे प्राचार्य, जिल्‍हा शिक्षण व प्रशिक्षण संस्‍था यांनी कळविले आहे.
000000
  
                             वसंतराव नाईक विकास महामंडळाच्‍या
                        योजनाचा लाभ घेण्‍याचे आवाहन
            वर्धा,दि.2- वसंतराव नाईक विमुक्‍त  जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ जिल्‍हा कार्यालयाच्‍यावतीने विमुक्‍त जाती भटक्‍या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील बेरोजगार  युवकासाठी स्‍वयंरोजगारासाठी योजना राबविण्‍यात येते. त्‍यासाठी अर्ज करण्‍याचे आवाहन महामंडळाच्‍या वतीने करण्‍यात येत आहे.
महामंडळाच्‍यावतीने 25 टक्‍के बीज भांडवल कर्ज योजनेअंतर्गत 5 लाखापर्यंत व्‍यवसायाठी कर्ज दिले जाते. त्‍यात 75 टक्‍के बँक सहभाग 25 टक्‍के महामंडळाचा सहभाग आहे. महामंडाळाच्‍या रकमेवर 4 टक्‍के वार्षिक व्‍याज आकारले जाते. परतफेड कालावधी पाच वर्षाचा आहे. अर्जासोबत जात उत्‍पन्‍न रहिवासी दाखला रेशन व आधार,  फोटो, मतदान ओळखपत्र व्‍यवसायचे कोटेशन प्रकल्‍प अहवाल सोबत  जोडावा, असे महामंडळाचे जिल्‍हा व्‍यवस्‍थापक हेमंत लांबे यांनी कळविले आहे.
                                                     000000 


No comments:

Post a Comment