Saturday 6 August 2011

वर्धेत 55 मी.मी. पाऊस


महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र. 382        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा  दि.6 ऑगस्ट 2011
-------------------------------------------------------------------------------------------------------

वर्धा, दि.6- वर्धा जिल्ह्यात आतापावेतो 426.44 मि.मी. सरासरी एवढ्या पावसाची नोंद करण्यात आली असून, गेल्या चोविस तासास वर्धा तालुक्यात 55.60 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. तालुकानिहाय कंसातील आकडे हे एकूण पावसाचे असून, कंसाबाहेरील आकडे हे आज पडलेल्या पावसाचे आहे.
     वर्धा 55.60 (394.42) मि.मी., सेलू 15 (451.0) मि.मी., देवळी 18.04 (438.98) मि.मी., हिंगणघाट 30.04 (461.10) मि.मी., समुद्रपूर 30.00 (505.0) मि.मी., आर्वी 4.0 (450.0) मि.मी., आष्टी 1.60 (336.0) मि.मी., कारंजा 21.04 (383.14) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
     आज जिल्ह्यात एकूण 175.32 मि.मी. पाऊस पडला असून आतापावेता एकूण 3419.58 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज सरासरी पडलेला पाऊस 21.91 मि.मी. असून, आतापर्यंत 426.44 मि.मी. एकूण सरासरी एवढा पाऊस पडला आहे.

डी.टी.एड्. प्रथम वर्ष प्रवेशाची चेकलिस्ट 8 ऑगष्ट रोजी प्रसिध्द


महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र. 381        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.6 ऑगस्ट 2011
--------------------------------------------------------------------------------------------------------

वर्धा,दि.6- सन 2011-12 डी.टी.एड् प्रथम वर्ष प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची चेक लिस्ट जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,वर्धा या ठिकाणी दि.8 ऑगष्ट 2011 रोजी प्रसिध्द करण्यात येत आहे.तसेच परिषदेच्या www.mscert.org.in  या संकेत स्थळावरही उपलब्ध होणार आहे.
डी.टी.एड् प्रथम वर्ष प्रवेशासाठी (सन 2011-12) ज्या उमेदवारांनी या जिल्ह्यात अर्ज भरला आहे त्यांनी सदरची चेकलिस्ट पाहून त्यांच्या नोंदविलेल्या माहितीमध्ये काही आक्षेप अथवा दुरुस्ती असल्यास जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या कार्यालयात आपले योग्य ते आक्षेप लेखी स्वरुपातच दिनांक 10 ऑगष्ट 2011 पर्यंत नोंदवावेत. चेकलिस्ट मधील आक्षेप उमेदवारांनी नोंदविले नाही तर त्यांची चेकलिस्टमधील माहिती बरोबर असल्याचे गृहीत धरुन प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. अंतिम गुणवत्ता यादी तयार झाल्यानंतर उमेदवारांच्या आक्षेपांबाबत विचार केला जाणार नाही, याची सर्व उमेदवारांनी व त्यांच्या पालकांनी नोंद घ्यावी असे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, वर्धा कळवितात.

आमदार सुरेश देशमुख यांच्या हस्ते 2 लक्ष 40 हजाराचे धनादेश लाभार्थ्यांना वितरीत


महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र. 380        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.6 ऑगस्ट 2011
--------------------------------------------------------------------------------------------------------
वर्धा,दि.6- येथील तहसिल कार्यालयाच्या सभागृहांत आज वर्धेचे आमदार सुरेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय कुंटुंब अर्थसहाय्य योजना, इंदिरा गांधी वृध्दापकाळ योजना, श्रावण बाळ योजना व संजय गांधी निराधार योजना आदी योजनेच्या दक्षता समितीचे आढावा बैठक संपन्न झाली यावेळी आमदार देशमुख यांच्या हस्ते 2 लक्ष 40 हजाराचे धनादेश योजनेच्या लाभार्थ्यांना वितरीत करण्यांत आले.
या प्रसंगी जि.प.उपध्यक्ष सुनिल राऊत उपविभागीय अधिकरी हरीष धार्मिक, तहसिलदार शुशांत बन्सोडे, नायब तहसिलदार नारायण ठाकरे पं.स.सदस्य पवन गोडे आदीमान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना आमदार देशमुख म्हणाले की धान्य घरपोच योजना ही शासनाची महत्वांची योजना असल्यामुळे ती तातडीने गावांपर्यंत राबविण्यांत यावी या योजनेमुळे अल्प उत्पन्न गटांतील व अंत्योदय योजनेतील कुंटुंबाना फार मोठा दिलासा मिळतो. ही योजना अधिक गतीमान करण्यांसाठी ग्रामीण भागांमध्ये ग्राम सभे मधून गांवक-यांना प्रबोधन करुन अधिकधिक या योजनेचा लाभ लाभार्थ्या पर्यंत पोहचविण्याचे आवाहन केले सिधापत्रिका जिर्ण किंवा खराब झाल्या असतील अश्या सिधापत्रिका धारकांना त्या तातडीने बदलून देवून नविन सिधा पत्रिकेचे वितरण करण्यांत यावे. तसेच शासकीय योजनेचा लाभ गरीब जनतेला वेळेवर मिळावा यासाठी प्रयत्न करावा बचत गटांना स्वस्त धान्य दूकान देण्याबाबत शासनाने धोरण जाहीर केले असून ज्या बचत गटांना स्वस्त धान्य दुकान देण्यांत येतील अश्या बचत गटांना एकाच वेळी स्वस्थ  धान्य दुकानाचे असे    परिपूर्ण असे प्रशिक्षण देण्यात यावे असेही ते म्हणाले. प्रस्थावित करतांना तहसिलदार बन्सोडे म्हणाले की शासनाने राष्ट्रीय कुंटुंब अर्थसहाय्य योजना, इंदिरा गांधी, वृध्दपकाळ योजना, श्रावणबाळ योजना व संजय गांधी निराधार योजनेसाठी पूरेसा निधी दिला असून त्यातून 24 लाभार्थ्यांना 2 लाख 40 हजाराचे धनादेश वितरीत करण्यांत आले आहे. अजून 16 लाभार्थ्यांना लाभ देण्यांत येणार आहे. वर्धा तालूक्यांत 5 गावांना घरपोच धान्य वितरण योजनेचा लाभ देण्यांत असून येत्या महिण्यांत 20 गावांमध्ये धान्य घरपोच वितरण योजनेचे उदिष्ट ठरविण्यांत आले आहे.घरपोच धान्य योजने अंतर्गत अंत्यदोय कार्ड धारकांच्या लाभार्थ्यांना तिन महिण्याचे धान्‍य उचल करावे लागणार असून लाभार्थ्याना प्रत्येक महिण्यात 44 किलो धान्य देण्यांत येणार आहे यात 35 किलो धान्य अंतोदय योजनेच्या दराने व 9 किलो धान्य दारीद्र रेषेखालील योजनेच्या दराने देण्यांत येणार आहे घरपोच योजने बाबत ग्रामीण स्तरावर प्रबोधनात्मक जाणीव जागृती महसूल विभागाच्या मार्फत करण्यांत येत असून या योजना गतीमान करण्यांचा प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी इतिवृत्तांताचे वाचन नायब तहसिलदार ठाकरे यानी केले या प्रसंगी मोठया संख्येने समंधीत योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.

सोयाबिन पिकावरील तबाखूची पाने खाणारी अळीचे एकात्मिक किड व्यावस्थापन


महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र. 379        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.6 ऑगस्ट 2011
------------------------------------------------------------------------------------------------------
वर्धा,दि.6- वर्धा/सेलू/देवळी या तालुक्यातील सोयाबिन पिकाचे सर्व्हेक्षन केले असता सोयाबिन पिकावर तंबाखुची पाने खाणारी अळीचा (स्पोडोप्टेरा) प्रार्दुभाव दिसून येत आहे. सदर किडीस हवामान पोषक असल्यामुळे प्रार्दुभाव वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बंधुनी किडीच्या व्यवस्थापनेसाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करावी.
या किडीला शास्त्रीय भाषेत स्पोडोप्टेरा लिटुरा, या नावाने ओळखतात. किडीचा पतंग मजबुत बांध्याचा 22 कि.मी.लांब असून त्याचा पंख विस्तार 40 मि.मि.लांब असतो. पुढील पंख सोनेरी करडया तांबडया रंगाचा असून त्यावर नागमोडी पांढ-या खुणा असतात. मागील पंख पांढरे असून कडेला तांबडी झालर असते.
लहान अळी पाढुरकी हिरवी व थोडीशी पारदर्शक दिसते. पूर्ण वाढलेली अळी 50 मि.मि. लांब आणि वेगवेगळया रंगाची असते. त्यामध्ये जास्तीत जास्त पिकावर ती काळपट रंगाची ते पांढ-या रंगाची असून तिच्या पाठीवर काळे ठिपके व रेषा तर शरीराचे बाजूवर पांढरे पटर्टे दिसून येतात. पूर्ण वाढ झालेली अळी जमिनित कोषा  अवस्थेत जाते. कोष काळपट लाल रंगाचा दिसतो. तर अंडी पानाच्या खालच्या बाजूना पुंजक्याने आढळून येतात व ती शरीराच्या केसांनी आच्छादलेली असतात.
या किडीचा जिवन क्रमानुसार मादी पतंग सोयाबिन पिकावर पानाच्या खालच्या बाजूने पुजक्याने अंडी घालते.एक अंडी पुजामध्ये सहसा 50 ते 100 अंडी असतात. एक मादी तिच्या संपूर्ण आयुष्यात अनुकुल वातावरण असल्यास 2000 चे वर तर सरासरी 300 ते 400 अंडी घातले. अळीची अंडी अवस्था तीन ते चार दिसव तर अळी अवस्था 21 ते 22 दिवस असते. पूर्ण वढ झालेली अळी जमिनित कोषा अवस्थेत जाते. कोषा अवस्था 9 ते 10 दिवस असते. हवामान व खाद्य यांचे उपलबधते नुसार ती वाढू शकते. प्रौढवस्था जवळजवळ 6 ते 7 दिवसाचे असते. मादी प्रौढ कोषातून बाहेर येताच पानाच्या खाली अंडी घालणे सुरु करुन एक पिढी पूर्ण होण्यास साधारणपणे 32 ते 60 दिवस लागतात. पिकावर असतांना ही पिढी साधारणपणे 35 ते 40 दिवसांत पूर्ण होते. कोषा अवस्था जमिनिमध्ये 3 ते 10 सें.मि.खोलीवर असते. 4 ते 7 दिवसाच्या उघाडीनंतर चांगला पाऊस झाल्यास या किडीचे वाढीसाठी चांगले पोषक वातावरण तयार होवून तिची संख्या वाढते.
या किडीने पुजक्यात घातलेलया अंडीमधून लहान लहान अळया समुहात बाहेर पडतात. व प्रथमत: त्याच पानातील हरीतद्रव्यात मागील बाजूने राहून खातात. त्यामुळे पाने जाळीदार व कागदी होवून पांढरी होतात. त्यावर किडीचे विष्ठीचे कण सुध्दा दिसतात. अशा प्रकारचे नुकसान इतरत्र आढळते. हयाच अळया नंतर मोठया हावून स्वतंत्रपणे पाने तसेच कोवळी शेंडे, फुले व कोवळया शेंगा खतात व पिकाचे नुकसान करतात. ही अत्यंत खादाड किड असल्यामुळे संख्या वढताच अतोनात नुकसान करतांना दिसून येते ही वहुभक्षी किड असल्यामुळे ती सोयाबिन सोबतच कापूस, तंबाखू, डाळी वर्गीय पिके, सुर्यफुल आणि कोबी वर्गीय पिकावरील सुध्दा महत्वाची किड आहे. शिवाय ती एरंडी, मका, टोमॅटो, उडीद,मिरची कांदा इ. पिकाकरीता नुकसानकारक असल्याचे नमूद केले आहे.
शेतातील पिकाची पाहणी करुन प्रादुर्भाव व नुकसान यांचा अंदाज घेवून त्यानुसार शेतक-यांनी उपाययोजना करावी. उपद्रवग्रस्त पाने तोडून अळी सहीत नष्ट करावीत. झाडावर घातलेली अंडीपुंज व लहान अळयांचा समूह यांचे निरिक्षण करुन ते नष्ट करावेत. मोठया अळया हाताने गोळा करुन नष्ट कराव्यांत. प्राकश सापळयाचा उपयोग करुन किडीचे पतंग पकडून नष्ट करावेत. या किडीकरीता तयार करण्यांत आलेले कामगंध सापळे प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रांत (हे 10 प्रामणे लावावेत) त्यामध्ये पतंग आकर्षित होतील ते काढून नष्ट करावेत. या
किडीने आर्थिक नुकसानाची पातळी, 10 अळया प्रती मीटर ओळीत, पिक फुलावर येण्यापुर्वी ओलांडल्यास पुढील पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी यामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 टक्के, 20 मि.ली.किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के, 20 मि.ली.किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 एस.सी.-4 मीली किंवा थायोडीकार्ब 75 टक्के-15 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के, 25 मि.ली.किंवा लांबडा साहेलोथ्रीन 5 टक्के-6 मिली 10 लिटर पाण्यांत मिसळून फवारणी करावी.
उपलब्धतेनुसार बव्हेरीया बॅसियाना किंवा नोमुरीया रीली या किडभक्षक बुरशीची 5 ग्रॅम प्रती लिटर पाणी किंवा एस.एल.एन.पी.व्ही 1 मीली प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी सदर उपाययोजना सामुहिक रित्या केल्यास व्यवस्थापन अधिक प्रभावी करु शकते. जेव्हा खरीप पिकावर या किंडीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर असेल त्यावर्षी रब्बीमध्ये सोयाबिन निघाल्यानंतर त्वरीत नांगरटी करुन जमिनितील किडीच्या सुप्ताबस्थांचा नाश करावा. तसेच रब्बीमध्ये सुर्यफुल, एरंडी, तिळ, भुईमूंग ही किडीला पोषक असणारी पिके घेवू नयेत, तर हरभरा, जवस, करडई, गहू, रब्बी ज्वारी यासारखी पिके घ्यावीत. असे उप विभागीय कृषि अधिकारी, वर्धा संतोष डाबरे यांनी कळविलेले आहे.
  

अमरावती आयुक्तांकडून पिक परिस्थितीची पाहणी


महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र. 378    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि.6 ऑगस्ट 2011
--------------------------------------------------------------------------------------------------------
वर्धा,दि.6- अमरावती विभागीय आयुक्त गणेश ठाकूर नुकतेच  (1 ऑगष्ट रोजी) जिल्ह्याच्या दौ-यावर आले असता त्यांनी शेतामध्ये राबविल्या जाणा-या कृषि विभागाच्या योजना सोबतच पिक परिस्थितीची पाहणी केली.
यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी जयश्री भोज, कृषि अधिक्षक भाऊसाहेब ब-हाडे, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे, तालुका कृषी अधिकारी राष्ट्रपाल मेश्राम व किड नियंत्रक आर.टी.राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.
विभागीय आयुक्त ठाकुर यांनी सेलू तालुक्यातील पंतप्रधान पॅकेज अंतर्गत सेलडोह येथील चेकडॅम, कोटंबा येथील विदर्भ पाणलोट विकास कार्यक्रमा अंतर्गत बांधण्यात आलेल्या सिंमेट नाला बांधाची पाहणी केली.
क्रॉपसॅफ 2011 अंतर्गत सोयाबिन पिकांची पाहणी करुन ऑन लाईन राबविण्यांत येत असलेल्या प्रकल्पाबद्दल शेतक-यांना भ्रमणध्वनीवर संदेश पाठवून किडीच्या नियंत्रणासाठी करावयाची उपाययोजना संदर्भात शेतक-यांन कडूण माहिती जाणून घेतली मौजा. रिधोरा येथील शेती शाळेला भेट देवून एकात्मीक किड व्यवस्थापणे बाबत शेतक-यांकडून माहिती जाणून घेवून    शेतक-यांशी चर्चा केली
या प्रसंगी मोठया संख्येने अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

Friday 5 August 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती दि.6/8/2011



क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
427.44 मि.मी.

21.91 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
निरंक
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान(सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा  -394.42 (55.60) मि.मी.
2)सेलू - 451(15) मि.मी.
3)देवळी -438.98 (18.4) मि.मी.
4)हिंगणघा -461.10(30.4)मि.मी.
5)आर्वी -450 (4) मि.मी.
6)आष्टी -336 (1.60) मि.मी. 7)समुद्रपूर -505.08(30) मि.मी
8)कारंजा- 383.14 (21.04)मि.मी.

घनकचरा व सांडपाणी वयवस्थापनेसाठी जिल्ह्यात 40 ग्रामपंचायतीची निवड



                                                  महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि.5 आगस्ट 2011
---------------------------------------------------------------------------
      वर्धा,दि.5- संपूर्ण स्वच्छता कार्यक्रमा अंतर्गत ग्रामीण भागात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम राबविण्याकरीता जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली असून, निवडलेल्या  ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनेचे आराखडे बनविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
सूपर्ण सच्छता अभियान अंतर्गत निर्मल ग्राम पुरस्कार योजनेमुळे गावे हागणदारीमुक्त होत आहे आणि शौचालय व्याप्तीचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांचा आरोग्याचा दर्जा उंचावने तसेच राहणीमान उंचावणे याकडे दृष्टी ठेवून पर्यावरण स्वच्छतेचे फायदे विचारात घेवून एकात्मिक स्वच्छतेच्या बाबी अंतर्गत सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण संतुलन यासाठी घनकचरा व सांउपाणी व्यवस्थापनाच्या बाबीकडे लक्ष देणे तेवढेच अत्यावश्यक असल्याने केंद्र शासनाने संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या मार्गदर्शक सुचनामध्ये सुधारणा करुन त्यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यस्थापन या घटकाचा समावेश केलेला आहे.
संपूर्ण स्वच्छता अभियानासाठी अनुज्ञेय असलेल्या निधीतुन 10 टक्के रक्कम हे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर खर्च करण्यात येणार आहे. यासाठी 60 टक्के केंद्र शासन, 20 टक्के राज्य शासन व 20 टक्के लाभार्थी हिस्सा राहणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत निवडी संदर्भात शासनाने निकष ठरवून दिलेले असून, यामध्ये लोकसंख्या, करवसुली, नदी काठच्या ग्रामपंचायती, वैयक्तीक शौचालयाची व्याप्ती या चार बाबीवर 100 गुणानुसार ग्रापंचायत निवडावयाच्या असून, जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या 368 प्रस्तावामधून गुणानुक्रमे 40 ग्रामपंचायतीची निवड सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन हे उपक्रम राबविण्यासाठी करण्यात आलेली आहे. यामध्ये वर्धा पंचायत समिती मधील म्हसाळा, पवनूर, उमरी मेघे, भिवापूर व जऊळगांव, देवळी पंचायत समितीमधील गुंजखेडा, सोनेगांव बाई, वाबगाव, दहेगांव धांदे व नाचणगांव, सेलू पंचायत समिती मधील बोरी कोकाटे, टाकळी किटे, जामणी, आमगांव मदनी व जुवाडी, आर्वी पंचायत समिती मधील कोपरा पु., वडगांव, सालफळ, बाजारवाडा व पिंपळगांव, आष्टी पंचायत समिती मधील बेलोरा खु, , आनंदवाडी, सिरसोली, माणिकनगर व सुजातपूर, कारंजा पंचायत समिती मधील काकडा, बोरगांव गोंडी, वाघोडा, चिंचोली व कारंजा, हिंगणघाट पंचायत समिती मधील गाडेगांव, कोसुला बा, आंजनगांव,वेळा व घाटसावली. पंचायत समिती समुद्रपूर मधील हळदगांव, उंदिरगांव, बोथुडा, पिंपळगांव व उबदा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. निवड झालेलया ग्रामपंचायतीमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन संदर्भात आराखडा बनविण्याच्या सुचना ग्रामपंचायतींना़ देण्यात आलेल्या आहे.
                          0000

Thursday 4 August 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती दि.5/8/2011


  
क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
405.53 मि.मी.

8.57 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
निरंक
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान(सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा  -338.68 (0.60) मि.मी.
2)सेलू - 436(7.0) मि.मी.
3)देवळी -420.94 (3.0) मि.मी.
4)हिंगणघा-431.06(निरंक)मि.मी.
5)आर्वी -446 (2) मि.मी.
6)आष्टी -334.40(10.80) मि.मी. 7)समुद्रपूर -475.08(25) मि.मी
8)कारंजा- 362.10 (20.20) मि.मी.