Wednesday 3 August 2011

संपूर्ण स्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा


                      महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि.3आगस्ट 2011
---------------------------------------------------------------------------
        वर्धा,दि.3- महाविद्यालयीन युवा शक्तीला पाणी पुरवठा व स्वच्छता या विषयामध्ये सहभागी करुन घेण्याकरीता  तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
वर्धा जिल्ह्यामध्ये तालुकास्तरीय स्पर्धा दिनांक 8 व 9 आगस्ट 2011 रोजी घेण्यात येणार आहे. यामध्ये 8 आगस्टला पंचायत समिती वर्धा, देवळी, आष्टी व हिंगणघाट तसेच 9 आगस्टला पंचायत समिती सेलू, आर्वी, कारंजा व समुद्रपूर या तालुक्यामध्ये सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जिल्हास्तरीय स्पर्धा 12 ऑगस्ट रोजी यशवंत महाविद्यालय,वर्धा येथे घेण्यात येणार आहे.
     महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये पाणी पुरवठा, पाणी गुणवत्ता व स्वच्छता या बाबींची जागृती करणे. पाणी व स्वच्छतेबाबत प्रत्येक महाविद्यालयातून संदेश वाहक व अभ्यासू वक्ते तयार करुन जागृती करणे हा शासनाचा  उद्देश आहे. स्पर्धेसाठी कनिष्ट महाविद्यालयीन व वरिष्ठ महाविद्यालयीन असे दोन गट तयार करण्यात आले आहे. कनिष्ट महाविद्यालयीन युवकासाठी पाणी पट्टी नळ योजनेची जाणीव जबाबदारी , जोश तरुणायीचा जागर स्वच्छतेचा, शुध्द पाणी पिण्याचे आरोग्य सांभाळी गावाचे, माझ्या स्वप्नातील स्वच्छ निर्मल गाव, आलं पाणी आपली योजना हे विषय ठेवण्यात आलेले आहेत. वरिष्ठ महाविद्यालयीन युवकासाठी राखु पाण्याची गुणवत्ता मिळेल. आरोग्याची सुबत्ता, लोकसहभाग गावाचा पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेचा , तरुणाईच्या हाती स्वच्छतेची ज्योती, मी निर्मल गावचा सरपंच बोलतोय, स्वच्छतेतून समृध्दीकडे हे विषय ठेवण्यात आलेले आहेत. दोन्ही गटातून प्रथम, व्दितीय आणि तृतीय विजेत्यांना रोख स्वरुपात बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तालुकास्तरीय दोन्ही गटातील प्रथम आणि व्दितीय क्रमांकांचे विजते जिल्हास्तरासाठी पात्र ठरणार आहे. तर जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेतून दोन्ही गटातून प्रथम येणा-या विजेत्यास राज्यस्तरीय वकृत्व सपर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
     तालुकास्तरीय विजेत्या प्रथम क्रमांकासाठी रु. 5000, व्दितीय क्रमांकासाठी रु. 3000 तर तृतीय क्रमांकासाठी रु. 2000 अशी रोख स्वरुपातील बक्षिसे दोन्ही गटामधून देण्यात येणार आहे. तर जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकाला रु. 11,000 , व्दितीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकाला रु. 7,000 तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्या स्पर्धकाला रु. 5,000 मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
     जिल्ह्यामध्ये आयोजित तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी महाविद्यालयीन युवकांनी आपआपल्या महाविद्यालयामध्ये किंवा संपूर्ण स्वच्छता अभियान कक्षाशी संपर्क साधावा व मोठ्या संख्येने भाग घ्यावा. असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजयभाऊ जयस्वाल व मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांनी केले आहे.
                    000000

No comments:

Post a Comment