Tuesday 2 August 2011

27 गावातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरणार


  महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक     जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.2 ऑगस्ट 2011 
-----------------------------------------------------------------------
           वर्धा,दि.2-शासनाने दिलेल्या निर्देशानुसार हिंगणघाट उपविभागातील 27 गावातील पोलीस पाटलांची रिक्त असलेली पदे लेखी परिक्षेव्दारा भरण्यात येणार आहे. याबाबत 29 जुलै 2011 रोजी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला असून, अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 16 आगस्ट 2011 आहे.
      पोलीस पाटलांच्या 27 जागापैकी अनुसूचित जातीसाठी 17 पदे भरण्यात येणार असून पाच पदे अनुसूचित जमातीसाठी, दोन पदे विमुक्त जाती क व एक पद ड वर्गासाठी आहे. विशेष मागासवर्ग घटकासाठी दोन पदे राखीव ठेवण्यात आले आहे.
      अनुसूचित जातीच्या संवर्गासाठी समुद्रपूर पोलीस स्टेशन अंतर्गत वाघेडा, लाहोरी, सावरखेडा, खंडाळा, हिंगणघाट पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या गावामध्ये नुरापूर, कुंड, येणोरा, मानकापूर, किनगांव, कोपरा, कवडघाट, चिचघाट, अल्लीपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या गावामध्ये रोहनखेडा, टाकळी, शिरुड, गिरड पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या गावामध्ये झुनका व वडनेर पोलीस स्टेशन अंतर्गत येणा-या गावामध्ये पवनी या गावाचा समावेश असून या गावातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्यात येतील.
    अनुसूचित जमाती संवर्गाअंतर्गत पोलीस स्टेशन गिरड अंतर्गत तावी, शिरपूर व गंगापूर, चापापूर, समुद्रपूर पोलीस स्टेशन अंतर्गत हरणखुरी, विमुक्त जाती क संवर्गाअंतर्गत वडनेर पोलीस स्टेशन अंतर्गत सेलू (मु) व समुद्रपूर पोलीस स्टेशन अंतर्गत मुरादपूर या गावाचा समावेश असून विमुक्त जाती ड संवर्गातील हिंगणघाट पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वणी गावाचा समावेश आहे.
विशेष मागास प्रवर्ग संवर्गात पोलीस स्टेशन हिंगणघाट अंतर्गत वालधूर व धामनगावाचा समावेश आहे.
      पोलीस पाटील पदासाठी अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख 16 आगस्ट 2011 रोजी सायंकाळी 5.30 वाजता असून, प्राप्त अर्जाची छाननी करुन 20 आगस्ट रोजी ऊमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येईल. प्रसिध्द केलेल्या यादीवर दिनांक   26 आगस्ट 2011 रोजी सायंकाळी 5.30 वाजता पावेतो आक्षेप नोंदविण्याची मुदत असून, अंतिम यादी दिनांक 30 आगस्ट 2011 रोजी प्रसिध्द करण्यात येईल. लेखी परिक्षा 10 सप्टेंबर 2011 रोजी होणार असून, अंतिम निवड यादी लेखी परिक्षेनंतर त्याच दिवशी लावण्यात येईल. असे उपविभागीय दंडाधिकारी, हिंगणघाट कळवितात.
                            00000

No comments:

Post a Comment