Thursday 4 August 2011

राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण पशुपालन अनुदान योजनेसाठी शेतक-यांनी अर्ज सादर करावे


   महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.4आगस्ट 2011
------------------------------------------------------------------------
    वर्धा,दि.4-राज्य शासनाच्या  पशुसंवर्धन विभागामार्फत सन 2011-12 मध्ये राज्यात पशु आधारीत उत्पादनाला चालना देण्यासाठी दुधाळू संकरीत गायी व म्हशीचे गट वाटप करणे, राज्यामध्ये ठाणबंद पध्दतीने शेळी पालनाव्दारे शेतक-यांना पुरक उत्पन्न मिळवून देणे आणि राज्यामध्ये कंत्राटी पध्दतीने मांसल कुक्कुट पक्षी पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी नाविन्यपुर्ण राज्यस्तरीय योजना सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50 टक्के अनुदानावर आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती साठी 75 टक्के अनुदानावर राबविण्यात येणार आहे.
     दुधाळू संकरीत गायी व म्हशीचे गट वाटप या योजने अंतर्गत 6 गायी किंवा म्हशी, जनावरांचा गोठा, स्वयंचलीत चारा, कटाई यंत्र, खाद्य साठविण्यासाठी शेड आणि 3 वर्षाचा विमा या  बाबीचा समावेश आहे. याची प्रकल्प किंमत एकूण रु. 3,35,184 आहे. त्यात सर्व साधारण प्रवर्गातील लाभार्थींना रु. 1,67,592   (50 टक्के अनुदान) तर अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांना रु. 2,51,388 (75 टक्के अनुदान ) अनुज्ञेय राहील.
     अंशत: ठाणबंद पध्दतीने शेळ्यांचे संगोपन करणे या योजने अंतर्गत 10 शेळ्या व 1 बोकड या प्रमाणे 1 गट देण्याचे अभिप्रेत असून, त्यामध्ये शेळी व बोकड खरेदी आणि त्यांचा विमा, शेळ्यांचा वाडा, खाद्याची भांडी, आरोग्य सुविधा व औषधोपचार ईत्यादी बाबीसाठी उसमानाबादी व संगमनेरी शेळ्यांच्या जातीकरीता रु, 87,857 व स्थानिक जातीच्या शेळ्याकरीता रु. 64,884 प्रकल्प किंमत आकारण्यात आली आहे. यात सुध्दा सर्वसाधारण प्रवर्गाकरीता 50 टक्के अनुदान म्हणजेच रु. 43929 (उस्मानाबादी व संगमनेरी                  जातीसाठी) तर रु. 32443 ( अन्य स्थानिक जातीसाठी देयक आहे. यात अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांकरीता 75 टक्के अनुदान म्हणजेच रु. 65893  (उस्मानाबादी व संगमनेरी जातीसाठी तर रु. 48665 अनुदान ( अन्य स्थानिक जातीसाठी अनुज्ञेय आहे.
     राज्यामध्ये कंत्राटी पध्दतीने मांसल कुक्कुट पक्षी पालन व्यवसाय यामध्ये पक्षीगृह व उपकरणे ईत्यादी करीता रु 900000 चा प्रकलप आहे त्यात 50 टक्के म्हणजे रु. 4,50,000 हे सर्वसाधारण प्रवर्गाकरीता आणि 75 टक्के म्हणजे रु. 6,75,,000 मर्यादे पर्यंत अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थींना अनुदान देय राहील.
     या व्यतिरीक्त राष्ट्रीय कृषि आणि ग्रामीण विकास बँकेच्या माध्यमातून कॅपीटल वेचंर फंड योजने अंतर्गत डेअरी उद्योजकता विकास योजना, कुक्कुट पालन योजना व शेळी पालन योजना राबविण्यात येत आहे. सदर योजनेत सर्वसाधारण लाभार्थीकरीता प्रकल्प किंमतीच्या 25 टक्के अनुदान आणि अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थींना 33.33 टक्के अनुदानाची तरतुद करण्यात आली आहे. या योजनेमध्ये लाभार्थीने स्वत: 10 टक्के मार्जीन रक्कम उभारावयाची आहे व उर्वरीत बँकेच्या नियमा प्रमाणे कर्जाव्दारे रक्कम उभारावयाची आहे.
     उपरोक्त नाविन्यपुर्ण योजना आणि वेचंर कॅपिटल फंड अंतर्गत नाबार्डच्या दुग्ध, कुक्कुट आणि शेळी व मेंढी पालन व्यवसायाच्या योजनेचे अर्ज पशुधन विकास अधिकारी (वि.) पंचायत समिती यांचे मार्फतीने करावयाचे आहे.
     ईच्छूक लाभार्थींनी सदर व्यवसायाकरीता पशुधन विकास अधिकारी (वि.) पंचायत समिती, वर्धा यांचेशी संपर्क साधावे असे आवाहन डॉ. जी.के. उराडे, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, वर्धा यांनी केले आहे.
                        00000

No comments:

Post a Comment