Thursday 4 August 2011

अनुसूचीत जाती व जमातीच्या शेतक-यांना अर्थसहाय्य देण्याची योजना


                    महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि.4आगस्ट 2011
---------------------------------------------------------------------------
      वर्धा,दि.4-जिल्हा परिषद,वर्धा यांचे मार्फत अनु. जाती व नवबौध्द तसेच अनु. जमातीच्या शेतक-यांना दारिद्र्य रेषेच्या वर आणणेकरीता अर्थसहाय्य देण्याची योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेच्या लाभाचे स्वरुपामध्ये निविष्ठा(एक हेक्टर मर्यादेत) रु. 5,000/- चे मर्यादेत 100 टक्के अनुदानावर, सुधारीत कृषि औजारे रु. 10,000 चे मर्यादते 100 टक्के अनुदानावर, बैलजोडी रु. 30,000 चे मर्यादेत 100 टक्के अनुदानावर, बैलगाडी 15000 रु. मर्यादेत 100 टक्के अनुदानावर , जुनी विहिर रु. 70,000 ते रु. 1,00,000 चे मर्यादेत ( रोहयो अंतर्गत योजनेनुसार ) 100 टक्के अनुदानावर, तुषार किंवा ठिंबक सिंचन संच रु.25,000 च्या प्रती हेक्टर मर्यादेत 100 टक्के अनुदानावर व शेततळे रु. 35,000 मृदसंधारण निकशानुसार 100 टक्के अनुदानावर तसेच जे लाभार्थी नविन विहिर घटकाचा लाभ घेणार नाही त्यांचेसाठी अनुदानाची मर्यादा रु. 50,000 इतकी राहील.
लाभार्थी निवडीच्या  निकषानुसार विशेष घटक व ओटिएसपी योजने अंतर्गत लाभार्थीचे नावे 6 हेक्टर किंवा यापेक्षा कमी जमीन असणे आवश्यक आहे. जमिन धारणेबाबतचा 7/12 व 8 अ मध्ये दाखला आवश्यक व सोबत शेतीचा  नकाशा जोडणे आवश्यक आहे.तसेच जातीचा दाखला (तहसिलदार यांचा), उत्पन्नाचा दाखला रु. 25000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.1 मे 2011 नंतर तिसरे अपत्य असलेला शेतकरी लाभास पात्र नाही. ओटिएसपी योजने अंतर्गत शेतक-यांचे नाव बिपीएल यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे.                                     
          लाभार्थी निवडीची कार्यपध्दती मधे लाभार्थीची निवड करण्यासाठी तालुक्यातील गट विकास अधिका-याने कृषि अधिकारी (विघयो) यांचे मार्फत केलेल्या नमुन्यात पात्र लाभार्थी कडून अर्ज मागवून सदर यादी जिल्हा स्तरावर कृषि विभागाकडे पाठवून नमुद केलेल्या जिल्हा निवड समिती समोर ठेवून पात्र लाभार्थ्यांची निवड केली जाईल. या योजने अंतर्गत निवड करण्यात येणा-या प्रत्येक लाभार्थीसाठी योजना राबविण्याचा कालावधी दोन वर्षाचा राहील.
लाभार्थीने स्वत:चे अर्जामध्ये संपुर्ण नांव, गांव, संपुर्ण पत्ता, जात,जमिन सर्व्हे नं. व आराजी तसेच उत्पन्न अर्जामध्ये नमूद करुन लाभार्थीने स्वत:च्या सहीनिशी आवश्यक कागदपत्रे जोडून पंचायत समिती स्तरावर अर्ज  सादर करावा. यासाठी या आर्थिक वर्षात योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतक-यांनी पंचायत समिती स्तरावरील गट विकास अधिकारी किंवा कृषि अधिकारी (विघयो) यांचेशी संपर्क साधावा. दि. 10 ऑगस्ट 2011 अखेर पर्यंत प्रस्ताव पंचायत समिती येथे सादर करावेत. असे आर.के.गायकवाड, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा यांनी कळविले आहे.
                   0000

No comments:

Post a Comment