Saturday 6 August 2011

सोयाबिन पिकावरील तबाखूची पाने खाणारी अळीचे एकात्मिक किड व्यावस्थापन


महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र. 379        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.6 ऑगस्ट 2011
------------------------------------------------------------------------------------------------------
वर्धा,दि.6- वर्धा/सेलू/देवळी या तालुक्यातील सोयाबिन पिकाचे सर्व्हेक्षन केले असता सोयाबिन पिकावर तंबाखुची पाने खाणारी अळीचा (स्पोडोप्टेरा) प्रार्दुभाव दिसून येत आहे. सदर किडीस हवामान पोषक असल्यामुळे प्रार्दुभाव वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी बंधुनी किडीच्या व्यवस्थापनेसाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करावी.
या किडीला शास्त्रीय भाषेत स्पोडोप्टेरा लिटुरा, या नावाने ओळखतात. किडीचा पतंग मजबुत बांध्याचा 22 कि.मी.लांब असून त्याचा पंख विस्तार 40 मि.मि.लांब असतो. पुढील पंख सोनेरी करडया तांबडया रंगाचा असून त्यावर नागमोडी पांढ-या खुणा असतात. मागील पंख पांढरे असून कडेला तांबडी झालर असते.
लहान अळी पाढुरकी हिरवी व थोडीशी पारदर्शक दिसते. पूर्ण वाढलेली अळी 50 मि.मि. लांब आणि वेगवेगळया रंगाची असते. त्यामध्ये जास्तीत जास्त पिकावर ती काळपट रंगाची ते पांढ-या रंगाची असून तिच्या पाठीवर काळे ठिपके व रेषा तर शरीराचे बाजूवर पांढरे पटर्टे दिसून येतात. पूर्ण वाढ झालेली अळी जमिनित कोषा  अवस्थेत जाते. कोष काळपट लाल रंगाचा दिसतो. तर अंडी पानाच्या खालच्या बाजूना पुंजक्याने आढळून येतात व ती शरीराच्या केसांनी आच्छादलेली असतात.
या किडीचा जिवन क्रमानुसार मादी पतंग सोयाबिन पिकावर पानाच्या खालच्या बाजूने पुजक्याने अंडी घालते.एक अंडी पुजामध्ये सहसा 50 ते 100 अंडी असतात. एक मादी तिच्या संपूर्ण आयुष्यात अनुकुल वातावरण असल्यास 2000 चे वर तर सरासरी 300 ते 400 अंडी घातले. अळीची अंडी अवस्था तीन ते चार दिसव तर अळी अवस्था 21 ते 22 दिवस असते. पूर्ण वढ झालेली अळी जमिनित कोषा अवस्थेत जाते. कोषा अवस्था 9 ते 10 दिवस असते. हवामान व खाद्य यांचे उपलबधते नुसार ती वाढू शकते. प्रौढवस्था जवळजवळ 6 ते 7 दिवसाचे असते. मादी प्रौढ कोषातून बाहेर येताच पानाच्या खाली अंडी घालणे सुरु करुन एक पिढी पूर्ण होण्यास साधारणपणे 32 ते 60 दिवस लागतात. पिकावर असतांना ही पिढी साधारणपणे 35 ते 40 दिवसांत पूर्ण होते. कोषा अवस्था जमिनिमध्ये 3 ते 10 सें.मि.खोलीवर असते. 4 ते 7 दिवसाच्या उघाडीनंतर चांगला पाऊस झाल्यास या किडीचे वाढीसाठी चांगले पोषक वातावरण तयार होवून तिची संख्या वाढते.
या किडीने पुजक्यात घातलेलया अंडीमधून लहान लहान अळया समुहात बाहेर पडतात. व प्रथमत: त्याच पानातील हरीतद्रव्यात मागील बाजूने राहून खातात. त्यामुळे पाने जाळीदार व कागदी होवून पांढरी होतात. त्यावर किडीचे विष्ठीचे कण सुध्दा दिसतात. अशा प्रकारचे नुकसान इतरत्र आढळते. हयाच अळया नंतर मोठया हावून स्वतंत्रपणे पाने तसेच कोवळी शेंडे, फुले व कोवळया शेंगा खतात व पिकाचे नुकसान करतात. ही अत्यंत खादाड किड असल्यामुळे संख्या वढताच अतोनात नुकसान करतांना दिसून येते ही वहुभक्षी किड असल्यामुळे ती सोयाबिन सोबतच कापूस, तंबाखू, डाळी वर्गीय पिके, सुर्यफुल आणि कोबी वर्गीय पिकावरील सुध्दा महत्वाची किड आहे. शिवाय ती एरंडी, मका, टोमॅटो, उडीद,मिरची कांदा इ. पिकाकरीता नुकसानकारक असल्याचे नमूद केले आहे.
शेतातील पिकाची पाहणी करुन प्रादुर्भाव व नुकसान यांचा अंदाज घेवून त्यानुसार शेतक-यांनी उपाययोजना करावी. उपद्रवग्रस्त पाने तोडून अळी सहीत नष्ट करावीत. झाडावर घातलेली अंडीपुंज व लहान अळयांचा समूह यांचे निरिक्षण करुन ते नष्ट करावेत. मोठया अळया हाताने गोळा करुन नष्ट कराव्यांत. प्राकश सापळयाचा उपयोग करुन किडीचे पतंग पकडून नष्ट करावेत. या किडीकरीता तयार करण्यांत आलेले कामगंध सापळे प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रांत (हे 10 प्रामणे लावावेत) त्यामध्ये पतंग आकर्षित होतील ते काढून नष्ट करावेत. या
किडीने आर्थिक नुकसानाची पातळी, 10 अळया प्रती मीटर ओळीत, पिक फुलावर येण्यापुर्वी ओलांडल्यास पुढील पैकी कोणत्याही एका किटकनाशकाची फवारणी करावी यामध्ये क्लोरोपायरीफॉस 20 टक्के, 20 मि.ली.किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के, 20 मि.ली.किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 एस.सी.-4 मीली किंवा थायोडीकार्ब 75 टक्के-15 ग्रॅम किंवा प्रोफेनोफॉस 50 टक्के, 25 मि.ली.किंवा लांबडा साहेलोथ्रीन 5 टक्के-6 मिली 10 लिटर पाण्यांत मिसळून फवारणी करावी.
उपलब्धतेनुसार बव्हेरीया बॅसियाना किंवा नोमुरीया रीली या किडभक्षक बुरशीची 5 ग्रॅम प्रती लिटर पाणी किंवा एस.एल.एन.पी.व्ही 1 मीली प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी सदर उपाययोजना सामुहिक रित्या केल्यास व्यवस्थापन अधिक प्रभावी करु शकते. जेव्हा खरीप पिकावर या किंडीचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर असेल त्यावर्षी रब्बीमध्ये सोयाबिन निघाल्यानंतर त्वरीत नांगरटी करुन जमिनितील किडीच्या सुप्ताबस्थांचा नाश करावा. तसेच रब्बीमध्ये सुर्यफुल, एरंडी, तिळ, भुईमूंग ही किडीला पोषक असणारी पिके घेवू नयेत, तर हरभरा, जवस, करडई, गहू, रब्बी ज्वारी यासारखी पिके घ्यावीत. असे उप विभागीय कृषि अधिकारी, वर्धा संतोष डाबरे यांनी कळविलेले आहे.
  

No comments:

Post a Comment