Friday 5 August 2011

घनकचरा व सांडपाणी वयवस्थापनेसाठी जिल्ह्यात 40 ग्रामपंचायतीची निवड



                                                  महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि.5 आगस्ट 2011
---------------------------------------------------------------------------
      वर्धा,दि.5- संपूर्ण स्वच्छता कार्यक्रमा अंतर्गत ग्रामीण भागात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन उपक्रम राबविण्याकरीता जिल्ह्यातील 40 ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली असून, निवडलेल्या  ग्रामपंचायतीमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनेचे आराखडे बनविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
सूपर्ण सच्छता अभियान अंतर्गत निर्मल ग्राम पुरस्कार योजनेमुळे गावे हागणदारीमुक्त होत आहे आणि शौचालय व्याप्तीचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील लोकांचा आरोग्याचा दर्जा उंचावने तसेच राहणीमान उंचावणे याकडे दृष्टी ठेवून पर्यावरण स्वच्छतेचे फायदे विचारात घेवून एकात्मिक स्वच्छतेच्या बाबी अंतर्गत सार्वजनिक आरोग्य व पर्यावरण संतुलन यासाठी घनकचरा व सांउपाणी व्यवस्थापनाच्या बाबीकडे लक्ष देणे तेवढेच अत्यावश्यक असल्याने केंद्र शासनाने संपूर्ण स्वच्छता अभियानाच्या मार्गदर्शक सुचनामध्ये सुधारणा करुन त्यामध्ये घनकचरा व सांडपाणी व्यस्थापन या घटकाचा समावेश केलेला आहे.
संपूर्ण स्वच्छता अभियानासाठी अनुज्ञेय असलेल्या निधीतुन 10 टक्के रक्कम हे घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनावर खर्च करण्यात येणार आहे. यासाठी 60 टक्के केंद्र शासन, 20 टक्के राज्य शासन व 20 टक्के लाभार्थी हिस्सा राहणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामपंचायत निवडी संदर्भात शासनाने निकष ठरवून दिलेले असून, यामध्ये लोकसंख्या, करवसुली, नदी काठच्या ग्रामपंचायती, वैयक्तीक शौचालयाची व्याप्ती या चार बाबीवर 100 गुणानुसार ग्रापंचायत निवडावयाच्या असून, जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या 368 प्रस्तावामधून गुणानुक्रमे 40 ग्रामपंचायतीची निवड सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन हे उपक्रम राबविण्यासाठी करण्यात आलेली आहे. यामध्ये वर्धा पंचायत समिती मधील म्हसाळा, पवनूर, उमरी मेघे, भिवापूर व जऊळगांव, देवळी पंचायत समितीमधील गुंजखेडा, सोनेगांव बाई, वाबगाव, दहेगांव धांदे व नाचणगांव, सेलू पंचायत समिती मधील बोरी कोकाटे, टाकळी किटे, जामणी, आमगांव मदनी व जुवाडी, आर्वी पंचायत समिती मधील कोपरा पु., वडगांव, सालफळ, बाजारवाडा व पिंपळगांव, आष्टी पंचायत समिती मधील बेलोरा खु, , आनंदवाडी, सिरसोली, माणिकनगर व सुजातपूर, कारंजा पंचायत समिती मधील काकडा, बोरगांव गोंडी, वाघोडा, चिंचोली व कारंजा, हिंगणघाट पंचायत समिती मधील गाडेगांव, कोसुला बा, आंजनगांव,वेळा व घाटसावली. पंचायत समिती समुद्रपूर मधील हळदगांव, उंदिरगांव, बोथुडा, पिंपळगांव व उबदा या ग्रामपंचायतीचा समावेश आहे. निवड झालेलया ग्रामपंचायतीमध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन संदर्भात आराखडा बनविण्याच्या सुचना ग्रामपंचायतींना़ देण्यात आलेल्या आहे.
                          0000

No comments:

Post a Comment