Friday 11 November 2011

प्रादेशिक असमतोल ; केळकर समितीच्या कामकाजाला वर्धेत सुरुवात

प्रसिध्दी पत्रक   महाराष्ट्र शासन  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.11/11/2011
------------------------------------------------------------------
           प्रादेशिक असमतोल ; केळकर समितीच्या
                कामकाजाला वर्धेत सुरुवात
      वर्धा, दि.11- प्रादेशिक असमतोल उपाय योजनेसाठीच्या डॉ.विजय केळकर समितीने वर्धा जिल्ह्यात आपल्या कामकाजास सुरुवात केली असून, आज एका उपसमितीने जिल्हाधिकारी जयश्री भोज यांच्याशी याबाबत चर्चा करुन माहिती घेतली.
     या उपसमितीची ही वर्धा जिल्ह्यात पहिली भेट होती. प्रादेशिक असमतोलाबाबत असणा-या कारणांचा अभ्यास ही समिती करणार असून, त्याबाबतच्या सूचनांचा अहवाल शासनास सादर करणार आहे.
     या उपसमितीत केळकर समितीचे विदर्भ समन्वयक डॉ.श्रीहरी चावा, हिस्लॉप महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. स्नेहा देशपांडे, बेंजामिन महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. ज्योत्स्ना देशपांडे तसेच जागतिक बँकेचे सल्लागार डॉ.श्रीकांत बारहाते यांचा समावेश होता.
     जिल्ह्यातील आर्थिक आणि भौतिक विकास कसा असावा आणि तो प्रत्यक्षात कसा होत आहे. जीवनमान उंचावण्यासाठी शासन यंत्रणेचा सहभाग तसेच निधीचा विनियोग या विषयावर जिल्हाधिकारी भोज यांनी यावेळी माहिती दिली.
     कृषी, उद्योग, आदिवासींचे जमिनीचे प्रश्न, सिंचन आणि वीज, आरोग्य सुविधा तसेच रस्तेविकास आदी विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाली.
     ही उपसमिती जिल्ह्यातील एक विकसनशील आणि एक मागास तालुका असणा-या समुद्रपूर आणि कारंजा या तालुक्याच्या ठिकाणी भेट देणार आहे. 22 नोव्हेंबर रोजी या ठिकाणांवर तालुका स्तरावरील अधिकारी आणि शेतकरी यांच्या भेटी घेऊन त्यांच्या कडून आलेल्या सूचनांचे संकलन समिती करेल.
     येणा-या काळात जिल्ह्यातील खासदार तसेच आमदार व इतर लोकप्रतिनिधी, शेतकरी नेते, शेतकरी तसेच पत्रकार यांच्यासोबत भेट घेऊन वर्धा जिल्ह्याच्या स्थितीत बदल घडविण्याबाबत सूचनांवर चर्चा करणार आहे. आजच्या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ब-हाटे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले आदींची उपस्थिती होती.
                                                            0000
    

जात पडताळणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ

                      महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.11/11/2011
---------------------------------------------------------------------
           जात पडताळणी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ
 वर्धा,दि.11-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे उपसचिव, मुंबई यांचे दि. 24 ऑक्टोंबर 2011 अन्वये जानेवारी  ते मार्च 2012 या कालावधीत होणा-या वर्धा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीकरीता (जिल्हा परिषद पंचायत समिती) राखीव प्रभागातुन निवडणूक लढवू ईच्छीणा-या अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती,इतर मागासवर्गीय तसेच विशेष मागासवर्ग  या प्रवर्गातील मागासवर्गीय उमेदवाराच्या जाती प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव विहित नमुन्यात आवश्यक त्या कागदपत्रासह पुराव्यासह जिल्हाधिकारी, कार्यालय, वर्धा येथे 15 नोव्हेंबर 2011 पर्यंत स्विकारण्यासाठी सादर करावेत अशी मुदतवाढ देण्यात आली आहे. संबंधीतांनी मुदतीच्या आत प्रस्ताव सादर करावेत. असे विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी,वर्धा यांनी कळविले आहे.
                        00000

प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची सभा

प्रसिध्दी पत्रक         जिल्हा माहिती कार्यालय, वर्धा   दि.11/11/11

                                       प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची सभा
     वर्धा,दि.11-जिल्ह्यातील सर्व खाजगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची सभा दि. 14 नोव्हेंबर2011 रोजी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था वर्धा येथे सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. सभेला येतांना मुख्याध्यापकांनी मागासवर्गीयांचा अनुशेष भरणे व बिंदुनामावली अद्ययावत ठेवण्याविषयीचे प्रपत्र गटशिक्षणाधिकारी यांचेकडे पाठविण्यात आलेले आहेत ते त्यांचे कडून प्राप्त करुन घ्यावे व सभेला येतांना ते भरुन आणावे.
     सदरहु माहिती शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांचेकडे लेखी स्वरुपात सादर करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथ.) यांनी केले आहे.

मुकबधीर व अस्थिव्यंग कर्मचा-यांना सुचना

                      महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.11/11/2011
---------------------------------------------------------------------
            मुकबधीर व अस्थिव्यंग कर्मचा-यांना सुचना
     वर्धा, दि.11- वित्त विभागचे शासन निर्णय दि. 15 मे 2009 मधील तरतूदी प्रमाणे प्रत्येक आस्थापनेवरील कार्यरत कर्मचारी मुकबधीर, अस्थिव्यंग, अंध/क्षीणदृष्टी अधिकारी किंवा कर्मचारी यांना 50,000 रुपये पर्यंत कमाल दोन उपकरणांची निवड करुन संबधित कर्मचा-यांनी निश्चित केलेल्या पुरवठा धारकाकडून स्वत: खरेदी करुन त्याबाबत येणा-या खर्चाची देयके आपल्या कार्यालयाकडून अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.
     शासकीय, निमशासकीय विभाग प्रमुख , महामंडळे, नगरपालिका, महानगरपालिका,जिल्हा परिषद, मंडळे, सार्वजनिक उपक्रमे, अनुदान प्राप्त संस्था यांनी तातडीने कार्यवाही करावी. याबाबतचे शासन निर्णय व अधिक माहितीसाठी  समाज कल्याण अधिकारी, जिल्हा,परिषद,वर्धा यांचेकडे संपर्क साधावे. असे समाज कल्याण अधिकारी ,जिल्हा परिषद वर्धा यांनी कळविले आहे.
                     0000000

शिबीराचे आयोजन

प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि.11/11/2011
                                शिबीराचे आयोजन
वर्धा, दि.11- जिल्ह्यातील विविध आस्थापनेवरील सेवेत नियुक्त झालेल्या मुकबधिर, अस्थिव्यंग, अंध/क्षीणदृष्टी अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी नागपूर विभागीय आयुक्तालय स्तरावर सहाय्यक तंत्रज्ञान व उपकरणाच्या वापराबाबत माहिती व प्रचार शिबीराचे आयोजन सोमवार दि. 14 नोव्हेंबर 2011 रोजी सकाळी 11 वाजता वानकर सभागृह दिक्षाभूमीलक्ष्मीनगर , नागपूर येथे आयोजित केले आहे.
     अधिक माहितीसाठी  समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, वर्धा यांचेशी अथवा दूरध्वनी क्रमांक 07152-242783 वर संपर्क साधावा.
                   000000

Thursday 10 November 2011

निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे- निवासी उपजिल्हाधिकारी

महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.9/11/2011
-----------------------------------------------------------------
           निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी
                प्रशासनाला सहकार्य करावे
-         निवासी उपजिल्हाधिकारी
वर्धा,दि.9-जिल्ह्यात होऊ घातलेल्या सहा नगर पालीका क्षेत्रातील निवडणूका येत्या डिसेंबर 2011 मधे होणार असून, त्यामध्ये वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगांव, देवळी व सिंदी (रे.) चा समावेश आहे. या निवडणूकीसाठी आदर्श आचार संहिता लागु करण्यात आली असून, आचार संहितेचे कोटेकोरपणे पालन राजकीय पक्षाने करुन मोलाचे सहकार्य प्रशासनाला करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले.
नगर परिषदेच्या निवडणूकी संबंधी माहिती देण्यासाठी येथील प्रमुख राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना तसेच पदाधिका-यांना  बोलाविण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष, मार्क्सवादी, कम्युनिष्ठ पक्ष व शिवसेना आदीचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमाची माहिती सांगून निवासी उपजिल्हाधिकारी खवले म्हणाले राज्य निवडणूक आयोगाची सविस्तर माहिती संगणकाच्या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक www.maha.sec.com  असा आहे. या संकेत स्थळावर सुध्दा राजकीय पक्षांना त्यांचे शंकेचे समाधान करुन घेता येईल. यावेळी पक्षाच्या उमेदवारांनी न चुकता दैनंदिन होणारा निवडणूकीचा खर्च झाल्यास त्याची नोंद एका रजिष्टरमध्ये ठेवण्यात यावी. निवडणूक निर्णय अधिका-याची पूर्व परवानगी घेवून वाहनाची माहिती  दररोज उपलब्ध होईल यासाठी सहकार्य करावे. आदर्श आचार संहितेनुसार निवडणूकीचे संपूर्ण कार्य होणार असून, आचार संहिता भंग होणार नाही याची काळजी प्रत्येक राजकीय पक्षाच्या तसेच स्वतंत्र उमेदवारांनी घेण्यात यावी. असेही ते म्हणाले. याप्रसंगी अधिकारी उपस्थित होते.
                    000000

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निवडणूकीच्या काळात पुरेसा पोलीस दल आवश्यक - जिल्हाधिकारी

                      महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.9/11/2011
---------------------------------------------------------------------
       कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निवडणूकीच्या काळात
             पुरेसा पोलीस दल आवश्यक 
-          जिल्हाधिकारी 
    वर्धा, दि.9- जिल्ह्यात होणा-या सहा नगर परिषदेच्या  निवडणूका शांततेच्या वातावरणात व निर्भयपणे होण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसा पोलीस दल आवश्यक असल्याचे मत जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी व्यक्त केले.
     काल सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवउणूकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेची आढावा बेठक त्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रंसगी जिल्हा पोलीस अधिक्षक अविनाशकुमार,अप्पर जिल्हाधिकारी एस.एम.भागवत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, वर्धाचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय देने, हिंगणघाटचे निवडणूक निर्णय अधिकारी उमेश काळे, आर्वीचे निवडणूक निर्णय अधिकारी सुनिल करोडे, पुलगावचे निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश मेश्राम, देवळीचे निवडणूक निर्णय अधिकारी हरिश धार्मिक व सिंदी(रे) चे निवडणूक निर्णय अधिकारी रमन जैन, उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज पाटील, देवळीचे ठाणेदार पुंडलिक सपकाळ व इतर अधिकारी उपस्थित होते.
     जिल्ह्यात प्राथमिकदृष्टया संवेदनशिल मतदान केंद्रामध्ये नगर परिषद हिंगणघाट क्षेत्रामध्ये दहा , आर्वी येथे सहा मतदान केंद्र असून त्यामध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता असल्याचे सांगून जिल्हाधिकारी भोज म्हणाल्या की नगर परिषद क्षेत्रातील ज्या व्यक्तींना शस्त्र परवाने दिले आहेत किंवा ज्या पक्ष प्रमुखाकडे असे परवानेअसतील त्यांचे शस्त्र निवडणूकीच्या कालावधीमध्ये सुरक्षिततेच्या दृष्टीने ते परत घेण्याची कार्यवाही करावी. नगर परिषदेची निवडणूक असल्यामुळे अनेक मतदान केंद्रावर मतदारांची प्रचंड गर्दी गृहीत धरता पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यासाठी वेळीच नियेाजन करण्याची गरज आहे. मतदानाच्या दिवशी ज्या ठिकाणी आठवडी बाजार असतील त्या ठिकाणी आठवडी बाजार भरणार नाही याची दक्षता घेवून इतरत्र कोणत्याही दिवशी आठवडी बाजार भरविण्यात यावे.
     जिल्ह्यात 37 प्रभाग असून त्यामध्ये वर्धेत दहा, हिंगणघाट येथे आठ, आर्वी येथे सहा, पुलगाव येथे 5, देवळी व सिंदी (रे) येथे प्रत्येकी चार प्रभाग आहे. वर्धा येथे 88 हजार 567 , हिंगणघाट येथे 76 हजार 671, आर्वी 32 हजार 323, पुलगांव 25 हजार 759 , देवळी 12 हजार 543 व सिंदी (रे) येथे      9 हजार 939 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
     निवडणूकीच्या कालावधीमध्ये कोणताही अनुचीत प्रकार घडणार नाही यासाठी प्रशासन आवश्यक त्या उपाय योजना करीत असून, निवडणूकीसाठी मतदारांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करुन राजकीय पक्षांनी तसेच निवडणूक लढविण्या-या उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे असेही त्यांनी स्पष्ट केले.
     याप्रसंगी अधिकारी वर्ग उपस्थित होते.
                           00000