Thursday 10 November 2011

निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे- निवासी उपजिल्हाधिकारी

महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.9/11/2011
-----------------------------------------------------------------
           निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी
                प्रशासनाला सहकार्य करावे
-         निवासी उपजिल्हाधिकारी
वर्धा,दि.9-जिल्ह्यात होऊ घातलेल्या सहा नगर पालीका क्षेत्रातील निवडणूका येत्या डिसेंबर 2011 मधे होणार असून, त्यामध्ये वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगांव, देवळी व सिंदी (रे.) चा समावेश आहे. या निवडणूकीसाठी आदर्श आचार संहिता लागु करण्यात आली असून, आचार संहितेचे कोटेकोरपणे पालन राजकीय पक्षाने करुन मोलाचे सहकार्य प्रशासनाला करावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी केले.
नगर परिषदेच्या निवडणूकी संबंधी माहिती देण्यासाठी येथील प्रमुख राजकीय पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना तसेच पदाधिका-यांना  बोलाविण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाज पक्ष, मार्क्सवादी, कम्युनिष्ठ पक्ष व शिवसेना आदीचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
राज्य निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या कार्यक्रमाची माहिती सांगून निवासी उपजिल्हाधिकारी खवले म्हणाले राज्य निवडणूक आयोगाची सविस्तर माहिती संगणकाच्या संकेत स्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक www.maha.sec.com  असा आहे. या संकेत स्थळावर सुध्दा राजकीय पक्षांना त्यांचे शंकेचे समाधान करुन घेता येईल. यावेळी पक्षाच्या उमेदवारांनी न चुकता दैनंदिन होणारा निवडणूकीचा खर्च झाल्यास त्याची नोंद एका रजिष्टरमध्ये ठेवण्यात यावी. निवडणूक निर्णय अधिका-याची पूर्व परवानगी घेवून वाहनाची माहिती  दररोज उपलब्ध होईल यासाठी सहकार्य करावे. आदर्श आचार संहितेनुसार निवडणूकीचे संपूर्ण कार्य होणार असून, आचार संहिता भंग होणार नाही याची काळजी प्रत्येक राजकीय पक्षाच्या तसेच स्वतंत्र उमेदवारांनी घेण्यात यावी. असेही ते म्हणाले. याप्रसंगी अधिकारी उपस्थित होते.
                    000000

No comments:

Post a Comment