Thursday 26 April 2012

महाराष्‍ट्र राज्‍य 52 वा वर्धापन दिन पालकमंत्र्यांचे शुभ हस्‍ते ध्‍वजारोहन


   वर्धा, दि. 26- महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा 52 वा वर्धापन दिन 1 मे रोजी मोठ्या उत्‍साहात साजरा होणार असून, या निमित्‍ताने ध्‍वजारोहनाचा शासकिय कार्यक्रम सकाळी   8 वाजता येथील स्‍टेडीयमच्‍या प्रांगणात जिल्‍ह्याचे पालकमंत्री  राजेंद्र मुळक यांच्‍या शुभहस्‍ते संपन्‍न होणार आहे. अशी माहिती जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी दिली.
     काल जिल्‍हाधिकारी यांच्‍या सभागृहात महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेच्‍या  वर्धापन दिना निमित्‍ताने आढावा बैठक घेण्‍यात आली त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विशेष भुअर्जन अधिकारी आर.बी. खजांची, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता के.आर. बजाज, डॉ. प्रा. अजय येते तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.
      महाराष्‍ट्र राज्‍य स्‍थापनेचा वर्धापन उत्‍साहाने साजरा करण्‍याच्‍या सुचना देवून जिल्‍हाधिकारी जयश्री भोज यांनी ज्‍या विभागांना वर्धापन दिनाच्‍या निमित्‍ताने कामे सोपविण्‍यात आली आहेत त्‍यांनी तातडीने ते पूर्ण करावी. 1 मे रोजी सकाळी 7.15 ते 9 या दरम्‍यान कोणताही शासकिय व निमशासकीय कार्यक्रम होणार नाही . तथापि 7.15 पूर्वी व 9 वा. च्‍या नंतर ध्‍वजारोहणाचा कार्यक्रम घेण्‍यास हरकत राहणार नाही. या निमीत्‍तानेजनतेनी मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे, असे त्‍यांनी आवाहन केले.
       यावेळी संबधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
                                          00000
                         

जिल्ह्यात केरोसीनचे वितरण


                                               
                                                                           वर्धा दि.26 - जिवनावश्यक घटकात मोडत असलेल्या केरोसिचे वितरण  जिल्हाधिकारी, वर्धा यांनी एका पत्रानुसार जाहीर केले आहे.
माहे एप्रिल 2012 करीता  तालुकानिहाय परवाना धारकांना केरोसिचे आवंट पुढील प्रमाणे आहे.
जी.एम.राठी वर्धा यांना 180 किलो लिटर. आर्वीचे इब्राहीमखाँ नवरखॉन यांना 96 किलो लिटर, वर्धा येथील रतलाल केला  72 किलो लिटर, देवळी येथील वंदना सुनिल गावंडे यांना 36 किलो लिटर, समुद्रपूर येथील एस.आर.शेंडे यांना 60 किलो लिटर,वर्धा येथील कांतीलाल किशोरीलाल यांना 84 किलो लिटर, वर्धा येथील इब्राहीमजी आदमजी यांना 84 किलो लिटर, आर्वी येथील बी..लाठीवाला यांना 72 किलो लिटर, हिंगणघाट येथील एफ..रहेमतुल्ला यांना 72 किलो लिटर, पुलगाव येथील टि.के.ऍ़ड न्स यांना 60 किलो लिटर केरोसिचे वितरण केल्याचे पत्रकात मुद आहे.
                        0000000

जिल्‍हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाई कक्षाची स्‍थापना



      वर्धा,दि.26-जिल्‍ह्यात सद्यःस्थितीत पाणी टंचाईची तिव्रता लक्षात घेता पाणी टंचाई संदर्भात सर्व माहिती पत्रव्‍यवहार तसेच पाणी टंचाईचा अहवाल सादर करणे व वेळोवेळी आवश्‍यक असणारी माहिती तयार करुन सामान्‍य लोकांना माहिती देण्‍याकरीता जिल्‍हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे पुढील अधिकारी व कम्रचारी यांची पाणी टंचाई कक्ष निर्माण करुन नियुक्‍ती करण्‍यात येते आहे.
      या कक्षामध्‍ये अधिकारी म्‍हणून जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापक म्‍हणून किशोर सोनटक्‍के, त्‍यांचा भ्रमणध्‍वनि क्रमांक 9970730850 असा असून, अव्‍वल कारकून डी.सी.कुंभारे यांचा भ्रमणध्‍वनी क्रमांक 9423645431 असा राहील. कनिष्‍ठ लिपीक चेतन खंडारे यांचा भ्रमणध्‍वनी क्रमांक 9175144775 असा असून, जनतेनी या भ्रमण ध्‍वनीवर संपर्क साधून माहिती जाणून घ्‍यावी. असे जिल्‍हाधिकारी,वर्धा कळवितात.
                                000000
                         

क्रिडा अनुदानाच्‍या योजना


     वर्धा,दि.26-महाराष्‍ट्र शासनाच्‍या क्रीडा व युवक सेवा संचालनाव्‍दारे राबविण्‍यात येणा-या व्‍यायामशाळा विकास अनुदान येाजना, क्रीडांगण विकास अनुदान येाजना, गाव तेथे क्रीडांगण व व्‍यायामशाळा विकास अनुदान येाजना, ग्रामीण नागरी भागातील स्‍वयमं सेवी संस्‍थांना आर्थिक सहाय्य  व समाज सेवा शिबीर भरविणे या योजनांकरीता शैक्षणिक संस्‍था, मान्‍यताप्राप्‍त शाळा किंवा महाविद्यालये, पंजीबध्‍द व्‍यायाम संस्‍था, क्रीडा मंडळे, युवा मंडळे, महिला मंडळे,स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था यांचेकडून सन 2012-2013 या वर्षात जिल्‍हा वार्षिक योजने अंतर्गत मंजुर तरतुदीमधून अनुदान मंजूर करणेसाठी प्रस्‍ताव दिनांक 31 ऑक्‍टोंबर 2012 पर्यंत मागविण्‍यात येत आहे.
      ज्‍या संस्‍थांना अनुदानाचा प्रथम अथवा व्दितीय हप्‍ता मंजुर केलेला आहे अशा संस्‍थांनी उर्वरीत अनुदान मंजुरीकरीता विनियोग प्रमाणपत्र, आंकेक्षण अहवाल व कार्य पुर्णत्‍वाचा दाखला व फोटोसह प्रस्‍ताव सादर करावयाचे आहे.
      योजना राबविण्‍यासाठी संस्‍थेकडे क्रीडांगणा करीता किमान 200 मी. रनिंग ट्रॅक बसु शकेल इतक्‍या आकारमानाची व व्‍यायाम शाळा बांधकामारीता किमान 500 चौ. फुट चटई क्षेत्रफळाचा हॉल बसु शकेल अशी किमान जागा संस्‍थेच्‍या मालकीची अथवा शासनाकडून दिर्घ मुदतीच्‍या करारावर उपलबध असलेली जागा असणे आवश्‍यक आहे. ग्रामीण नागरी भागातील स्‍वंयसेवी संस्‍थांना आर्थिक सहाय्य  व समाज सेवा शिबर भरविणे या या योजने करीता जागेची अट नाही.
     योजनांची माहिती, विहित नमुन्‍यातील अर्ज, नियम , अटी व शर्ती प्राप्‍त  करुन घेण्‍यासाठी जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्‍हा क्रीडा संकुल, सेवाग्राम रोड, वर्धा येथे संपर्क साधावा. सोबत येतांना संस्‍थेची नोंदणी प्रमाणपत्र,घटनाप्रत व जागेच्‍या कागदपत्राची एक प्रत सोबत आणावी.
                              00000000

10 वी व 12 वी च्‍या खेळाडू विद्यार्थ्‍यांसाठी क्रीडा गुण सवलत


     वर्धा दि. 26- माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत अनुत्‍तीर्ण व उत्‍तीर्ण होणा-या खेळाडू विद्यार्थ्‍यांनी त्‍याच शैक्षणिक वर्षात अधिकृत राज्‍य, राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील क्रीडा स्‍पर्धेत जर प्राविण्‍य संपादन केलेले असेल अथवा सहभाग घेतलेला असेल तर अशा खेळाडु विद्यार्थ्‍यांना शिक्षण मंडळाच्‍या निकषानुसार 25 वाढीव क्रीडा गुण सवलत देण्‍याची तरतुद आहे.
     त्‍या अनुषंगाने दि. 30 नोव्‍हेंबर 2011 रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये पुढील कागदपत्रांची पुर्तता करणेबाबत जिल्‍ह्यातील विविध क्रीडा संघटनांना जिल्‍हा क्रिडा कार्यालयाच्‍या दि. 3 फेब्रुवारी 2012 च्‍या पत्राान्‍वये जिल्‍हास्‍तर क्रीडा स्‍पर्धाचा अहवाल  सादर करावा.
    ग्रेस गुणा करीता जिल्‍हा संघटनांकडून घ्‍यावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. जिल्‍हास्‍तर संघटना ही धर्मदाय आयुक्‍त यांचेकडे नोंदणी अधिनियम 1860 व मुंबई सार्वजनिक विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था अधिनियम 1950 अन्‍वये नोंदणीकृत असणे आवश्‍यक आहे. नोदणी प्रमाणपत्र व घटना जोडणे. जिल्‍हा संघटनेस राज्‍य संघटनेची मान्‍यता असल्‍याबाबतचे प्रमाणपत्र. जिल्‍हा संघटनेने जिल्‍हास्‍तरावर आयोजीत केलेल्‍या जिल्‍हास्‍तरीय स्‍पर्धामध्‍ये कमीत कमी 8 संघ सहभागी होणे आवश्‍यक आहे तसेच सहभागी झालेल्‍या  खेळाडूंची नोंदणी जिल्‍हास्‍तरावर होणे आवश्‍यक आहे.(संघाचे प्रवेश अर्ज, स्‍पर्धेचे फेरीपत्रक, स्‍पर्धेचे निकालपत्रक, खेळाडूंची नोंदणी, स्‍पर्धा स्‍थळ, दिनांक, पेपर कटींग व फोटो इ.) प्रत्‍येक  वयोगटाकरीता वेगवेगळा अहवाल जोडावा. खेळाडुला देण्‍यात आलेली मुख्‍याध्‍यापकांची परवानगी पत्र. जिल्‍हा  संघटनेमार्फत आयोजित करण्‍यात येणा-या जिल्‍हास्‍तरीय मुला मुलींच्‍या स्‍पर्धा ज्‍या वयोगटात आयोजीत करण्‍यात येतात त्‍या वयोगटाबाबतची माहिती जिल्‍हा क्रीडा अधिकारी यांना पाठविल्‍याबाबतचे पत्र. जिल्‍हास्‍तरीय स्‍पर्धेमध्‍ये जिल्‍हास्‍तरीय स्‍पर्धेचे आयेाजन केले असेल त्‍या स्‍पर्धासाठी संबंधित जिल्‍हा क्रीडा अधिकारी यांना निरिक्षक म्‍हणुन उपस्थित राहण्‍याबाबत कळविण्‍यता आल्‍या बाबतचे पत्र.
      जिल्‍ह्यातील सर्व संबंधित क्रीडा संघटनांनी उपरोक्‍त कागदपत्रांची पुर्तता करुन परीपुर्ण अहवाल या कार्यालयास दिनांक 27 एप्रिल 2012 पर्यंत सादर करुन शासकीय उपक्रमास सहकार्य करावे. तसेच अधिकचे माहिती करीता जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांचेशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी कळविले आहे.
                              0000000

पाणी टंचाई निवारणार्थ 71 लक्ष 46 हजार रुपयाचा कृती आराखडा- पालकमंत्री


       
                      

      वर्धा दि. 23- वर्धा जिल्‍ह्यातील पाणी टंचाई निवारणार्थ ऑक्‍टोंबर 2011 ते जून 2012 पर्यंतच्‍या कालावधीसाठी 85 टंचाईग्रस्‍त गावासाठी 100 उपाय योजना राबविण्‍यात येणार असून, त्‍यासाठी 71 लक्ष 46 हजार रुपयाचा कृती आराखडा मंजूर करण्‍यात आला असल्‍याची माहिती वित्‍त व नियेाजन, ऊर्जा व जलसंपदा राज्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.
      विकास भवन येथे आज वर्धा जिल्‍ह्यातील पाणी टंचाई परिस्थिती विषयावर आढावा बैठक संपन्‍न झाली त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, आमदार प्रा. सुरेश देशमुख, आमदार अशोक शिंदे, आमदार दादाराव केचे, उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे, जिल्‍हाधिकारी जयश्री भोज, जि.प.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
     ज्‍या हँडपंपामधून क्षारयुक्‍त पाणी पुरवठा होतो तसेच जे हँडपंप जिर्ण अवस्‍थेत आहे असे हँडपंप तातडीने बदलविण्‍यात यावे अशा सुचना संबधित यंत्रणेला देवून पालकमंत्री मुळक म्‍हणाले, ज्‍या गावामध्‍ये सातत्‍याने पाणी टंचाई उदभवत असते अशा गावांना कायम स्‍वरुपी उपाय योजना करण्‍यात यावी. त्‍यासाठी प्रशासनाकडे प्रस्‍ताव पाठविण्‍यात यावा, असे निर्देश देवून कारंजा तालुक्‍यातील नारा 22 या योजनेतील पाणी पुरवठ्या बाबत झालेल्‍या  अनियमीत पणाची चौकशी करुन तातडीने पाणी पुरवठ्याची कार्यवाही करण्‍यात येईल. टँकर लावण्‍याची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेवून वेळीच त्‍या गावामध्‍ये पुरक उपायोजना करण्‍यात यावी. आपतकालीन परिस्थितीमध्‍ये टँकर लावण्‍याची वेळ आल्‍यास त्‍याची माहिती      जिल्‍हाधिका-यांना देण्‍यात यावी तथापि तसे प्रस्‍ताव तातडीने सादर करुन प्रशासनाकडून मंजूर करण्‍यात यावी. तसेच ज्‍या नगरपालीकेने व मोठ्या गावानी एक्‍स्‍प्रेस फिडर बसविले नाही अश्‍या नगर पालीकेने व ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्याचा उगम स्‍थळाचा विचार करुन एक्‍स्‍प्रेस फिडर बसविण्‍यासाठी प्रस्‍ताव सादर करावा. आगामी काळामध्‍ये पाण्‍याची पातळी कमी होत असल्‍यामुळे टंचाई सदृष्‍य परिस्‍थती निर्माण होणार आहे. त्‍यामध्‍ये मे व जून मध्‍ये विहीरीतील पाण्‍याची पातळी कमी होत असल्‍यामुळे संबधितांनी अधिक दक्ष राहण्याची गरज असून, टंचाई परिस्थिती उदभवू नये यासाठी प्रस्‍ताव प्रशासनाकडे सादर करावा. या कालावधीमध्‍ये अधिका-यांच्‍या  सुट्या मंजूर करण्‍यात येणार नाही याची दक्षता घ्‍यावी असेही ते म्‍हणाले.
      यावेळी अस्‍तीत्‍वात असलेले 3 हजार 872 हातपंप व विद्युतपंपाच्‍या सध्‍या परिस्थिती आढावा घेतला तसेच अप्रचालित उपाय योजनेअंतर्गत तिन सार्वजनिक विहीरीचे खोलीकरण करणे, खाजगी विहीरीचे अधिग्रहण करणे, 10 ठिकाणी टॅक्‍टर/ बैलगाडी व्‍दारे पाणी पुरवठा करणे 22 ठिकाणी नागरी पाणी पुरवठयाची विशेष दरुस्‍ती, 7 विंधण विहीर घेणे, दोन विंधन विहरीची विशेष दुरुस्‍ती बाबत बैठकीत आढावा घेण्‍यांत आला. या बैठकीमध्‍ये आमदार महोदयांनी व लोक प्रतीनीधींनी उपयुक्‍त सुचना केल्‍या.
     यावेळी सर्व पंचायत समितीचे सभापती न.प.चे अध्‍यक्ष, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
                          00000