Thursday 26 April 2012

पाणी टंचाई निवारणार्थ 71 लक्ष 46 हजार रुपयाचा कृती आराखडा- पालकमंत्री


       
                      

      वर्धा दि. 23- वर्धा जिल्‍ह्यातील पाणी टंचाई निवारणार्थ ऑक्‍टोंबर 2011 ते जून 2012 पर्यंतच्‍या कालावधीसाठी 85 टंचाईग्रस्‍त गावासाठी 100 उपाय योजना राबविण्‍यात येणार असून, त्‍यासाठी 71 लक्ष 46 हजार रुपयाचा कृती आराखडा मंजूर करण्‍यात आला असल्‍याची माहिती वित्‍त व नियेाजन, ऊर्जा व जलसंपदा राज्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री राजेंद्र मुळक यांनी दिली.
      विकास भवन येथे आज वर्धा जिल्‍ह्यातील पाणी टंचाई परिस्थिती विषयावर आढावा बैठक संपन्‍न झाली त्‍याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि.प.अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे, आमदार प्रा. सुरेश देशमुख, आमदार अशोक शिंदे, आमदार दादाराव केचे, उपाध्‍यक्ष संजय कामनापुरे, जिल्‍हाधिकारी जयश्री भोज, जि.प.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी शेखर चन्‍ने आदि मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
     ज्‍या हँडपंपामधून क्षारयुक्‍त पाणी पुरवठा होतो तसेच जे हँडपंप जिर्ण अवस्‍थेत आहे असे हँडपंप तातडीने बदलविण्‍यात यावे अशा सुचना संबधित यंत्रणेला देवून पालकमंत्री मुळक म्‍हणाले, ज्‍या गावामध्‍ये सातत्‍याने पाणी टंचाई उदभवत असते अशा गावांना कायम स्‍वरुपी उपाय योजना करण्‍यात यावी. त्‍यासाठी प्रशासनाकडे प्रस्‍ताव पाठविण्‍यात यावा, असे निर्देश देवून कारंजा तालुक्‍यातील नारा 22 या योजनेतील पाणी पुरवठ्या बाबत झालेल्‍या  अनियमीत पणाची चौकशी करुन तातडीने पाणी पुरवठ्याची कार्यवाही करण्‍यात येईल. टँकर लावण्‍याची परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घेवून वेळीच त्‍या गावामध्‍ये पुरक उपायोजना करण्‍यात यावी. आपतकालीन परिस्थितीमध्‍ये टँकर लावण्‍याची वेळ आल्‍यास त्‍याची माहिती      जिल्‍हाधिका-यांना देण्‍यात यावी तथापि तसे प्रस्‍ताव तातडीने सादर करुन प्रशासनाकडून मंजूर करण्‍यात यावी. तसेच ज्‍या नगरपालीकेने व मोठ्या गावानी एक्‍स्‍प्रेस फिडर बसविले नाही अश्‍या नगर पालीकेने व ग्रामपंचायतीने पाणी पुरवठ्याचा उगम स्‍थळाचा विचार करुन एक्‍स्‍प्रेस फिडर बसविण्‍यासाठी प्रस्‍ताव सादर करावा. आगामी काळामध्‍ये पाण्‍याची पातळी कमी होत असल्‍यामुळे टंचाई सदृष्‍य परिस्‍थती निर्माण होणार आहे. त्‍यामध्‍ये मे व जून मध्‍ये विहीरीतील पाण्‍याची पातळी कमी होत असल्‍यामुळे संबधितांनी अधिक दक्ष राहण्याची गरज असून, टंचाई परिस्थिती उदभवू नये यासाठी प्रस्‍ताव प्रशासनाकडे सादर करावा. या कालावधीमध्‍ये अधिका-यांच्‍या  सुट्या मंजूर करण्‍यात येणार नाही याची दक्षता घ्‍यावी असेही ते म्‍हणाले.
      यावेळी अस्‍तीत्‍वात असलेले 3 हजार 872 हातपंप व विद्युतपंपाच्‍या सध्‍या परिस्थिती आढावा घेतला तसेच अप्रचालित उपाय योजनेअंतर्गत तिन सार्वजनिक विहीरीचे खोलीकरण करणे, खाजगी विहीरीचे अधिग्रहण करणे, 10 ठिकाणी टॅक्‍टर/ बैलगाडी व्‍दारे पाणी पुरवठा करणे 22 ठिकाणी नागरी पाणी पुरवठयाची विशेष दरुस्‍ती, 7 विंधण विहीर घेणे, दोन विंधन विहरीची विशेष दुरुस्‍ती बाबत बैठकीत आढावा घेण्‍यांत आला. या बैठकीमध्‍ये आमदार महोदयांनी व लोक प्रतीनीधींनी उपयुक्‍त सुचना केल्‍या.
     यावेळी सर्व पंचायत समितीचे सभापती न.प.चे अध्‍यक्ष, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
                          00000


No comments:

Post a Comment