Thursday 26 April 2012

10 वी व 12 वी च्‍या खेळाडू विद्यार्थ्‍यांसाठी क्रीडा गुण सवलत


     वर्धा दि. 26- माध्‍यमिक व उच्‍च माध्‍यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षेत अनुत्‍तीर्ण व उत्‍तीर्ण होणा-या खेळाडू विद्यार्थ्‍यांनी त्‍याच शैक्षणिक वर्षात अधिकृत राज्‍य, राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावरील क्रीडा स्‍पर्धेत जर प्राविण्‍य संपादन केलेले असेल अथवा सहभाग घेतलेला असेल तर अशा खेळाडु विद्यार्थ्‍यांना शिक्षण मंडळाच्‍या निकषानुसार 25 वाढीव क्रीडा गुण सवलत देण्‍याची तरतुद आहे.
     त्‍या अनुषंगाने दि. 30 नोव्‍हेंबर 2011 रोजीच्‍या शासन निर्णयान्‍वये पुढील कागदपत्रांची पुर्तता करणेबाबत जिल्‍ह्यातील विविध क्रीडा संघटनांना जिल्‍हा क्रिडा कार्यालयाच्‍या दि. 3 फेब्रुवारी 2012 च्‍या पत्राान्‍वये जिल्‍हास्‍तर क्रीडा स्‍पर्धाचा अहवाल  सादर करावा.
    ग्रेस गुणा करीता जिल्‍हा संघटनांकडून घ्‍यावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. जिल्‍हास्‍तर संघटना ही धर्मदाय आयुक्‍त यांचेकडे नोंदणी अधिनियम 1860 व मुंबई सार्वजनिक विश्‍वस्‍त व्‍यवस्‍था अधिनियम 1950 अन्‍वये नोंदणीकृत असणे आवश्‍यक आहे. नोदणी प्रमाणपत्र व घटना जोडणे. जिल्‍हा संघटनेस राज्‍य संघटनेची मान्‍यता असल्‍याबाबतचे प्रमाणपत्र. जिल्‍हा संघटनेने जिल्‍हास्‍तरावर आयोजीत केलेल्‍या जिल्‍हास्‍तरीय स्‍पर्धामध्‍ये कमीत कमी 8 संघ सहभागी होणे आवश्‍यक आहे तसेच सहभागी झालेल्‍या  खेळाडूंची नोंदणी जिल्‍हास्‍तरावर होणे आवश्‍यक आहे.(संघाचे प्रवेश अर्ज, स्‍पर्धेचे फेरीपत्रक, स्‍पर्धेचे निकालपत्रक, खेळाडूंची नोंदणी, स्‍पर्धा स्‍थळ, दिनांक, पेपर कटींग व फोटो इ.) प्रत्‍येक  वयोगटाकरीता वेगवेगळा अहवाल जोडावा. खेळाडुला देण्‍यात आलेली मुख्‍याध्‍यापकांची परवानगी पत्र. जिल्‍हा  संघटनेमार्फत आयोजित करण्‍यात येणा-या जिल्‍हास्‍तरीय मुला मुलींच्‍या स्‍पर्धा ज्‍या वयोगटात आयोजीत करण्‍यात येतात त्‍या वयोगटाबाबतची माहिती जिल्‍हा क्रीडा अधिकारी यांना पाठविल्‍याबाबतचे पत्र. जिल्‍हास्‍तरीय स्‍पर्धेमध्‍ये जिल्‍हास्‍तरीय स्‍पर्धेचे आयेाजन केले असेल त्‍या स्‍पर्धासाठी संबंधित जिल्‍हा क्रीडा अधिकारी यांना निरिक्षक म्‍हणुन उपस्थित राहण्‍याबाबत कळविण्‍यता आल्‍या बाबतचे पत्र.
      जिल्‍ह्यातील सर्व संबंधित क्रीडा संघटनांनी उपरोक्‍त कागदपत्रांची पुर्तता करुन परीपुर्ण अहवाल या कार्यालयास दिनांक 27 एप्रिल 2012 पर्यंत सादर करुन शासकीय उपक्रमास सहकार्य करावे. तसेच अधिकचे माहिती करीता जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांचेशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे जिल्‍हा क्रीडा अधिकारी प्रदिप शेटीये यांनी कळविले आहे.
                              0000000

No comments:

Post a Comment