Thursday 26 April 2012

क्रिडा अनुदानाच्‍या योजना


     वर्धा,दि.26-महाराष्‍ट्र शासनाच्‍या क्रीडा व युवक सेवा संचालनाव्‍दारे राबविण्‍यात येणा-या व्‍यायामशाळा विकास अनुदान येाजना, क्रीडांगण विकास अनुदान येाजना, गाव तेथे क्रीडांगण व व्‍यायामशाळा विकास अनुदान येाजना, ग्रामीण नागरी भागातील स्‍वयमं सेवी संस्‍थांना आर्थिक सहाय्य  व समाज सेवा शिबीर भरविणे या योजनांकरीता शैक्षणिक संस्‍था, मान्‍यताप्राप्‍त शाळा किंवा महाविद्यालये, पंजीबध्‍द व्‍यायाम संस्‍था, क्रीडा मंडळे, युवा मंडळे, महिला मंडळे,स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था यांचेकडून सन 2012-2013 या वर्षात जिल्‍हा वार्षिक योजने अंतर्गत मंजुर तरतुदीमधून अनुदान मंजूर करणेसाठी प्रस्‍ताव दिनांक 31 ऑक्‍टोंबर 2012 पर्यंत मागविण्‍यात येत आहे.
      ज्‍या संस्‍थांना अनुदानाचा प्रथम अथवा व्दितीय हप्‍ता मंजुर केलेला आहे अशा संस्‍थांनी उर्वरीत अनुदान मंजुरीकरीता विनियोग प्रमाणपत्र, आंकेक्षण अहवाल व कार्य पुर्णत्‍वाचा दाखला व फोटोसह प्रस्‍ताव सादर करावयाचे आहे.
      योजना राबविण्‍यासाठी संस्‍थेकडे क्रीडांगणा करीता किमान 200 मी. रनिंग ट्रॅक बसु शकेल इतक्‍या आकारमानाची व व्‍यायाम शाळा बांधकामारीता किमान 500 चौ. फुट चटई क्षेत्रफळाचा हॉल बसु शकेल अशी किमान जागा संस्‍थेच्‍या मालकीची अथवा शासनाकडून दिर्घ मुदतीच्‍या करारावर उपलबध असलेली जागा असणे आवश्‍यक आहे. ग्रामीण नागरी भागातील स्‍वंयसेवी संस्‍थांना आर्थिक सहाय्य  व समाज सेवा शिबर भरविणे या या योजने करीता जागेची अट नाही.
     योजनांची माहिती, विहित नमुन्‍यातील अर्ज, नियम , अटी व शर्ती प्राप्‍त  करुन घेण्‍यासाठी जिल्‍हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्‍हा क्रीडा संकुल, सेवाग्राम रोड, वर्धा येथे संपर्क साधावा. सोबत येतांना संस्‍थेची नोंदणी प्रमाणपत्र,घटनाप्रत व जागेच्‍या कागदपत्राची एक प्रत सोबत आणावी.
                              00000000

No comments:

Post a Comment