Thursday 18 May 2017



प्र..क्र- 291                                                                      18 मे 2017
राज्‍य युवा पुरस्‍कारासाठी 17 मे पर्यंत अर्ज करण्‍याचे आवाहन 
 वर्धा,दि 18- जिल्‍हा, राज्‍य व राष्‍ट्रीय पातळीवर युवकांच्‍या विकासासाठी राष्‍ट्रीय व सामाजिक क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य करणा-या 13 ते 35 वयोगटातील युवक, युवती व स्‍वयंसेवी संस्‍थांना शासनामार्फत राज्‍य युवा पुरस्‍कार प्रदान करण्‍यात येतो. सन 2016-17 या वर्षाकरिता राज्‍य युवा पुरस्‍कारासाठी इच्‍छुक व्‍यक्‍तींनी दि.20 मे 2017पर्यंत विहित नमुन्‍यात अर्ज सादर करण्‍याचे  आवाहन जिल्‍हा  क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.
                                                0000
प्र.प.क्र- 292                                                     18 मे 2017
जिल्‍ह्यात कलम 36 जारी
        वर्धा, दि. 18 – जिल्‍हयात शेतकरी 1 जुन पासुन पेरणी बंद आंदोलन तसेच सावंगी पोळ येथील शेतकरी जलसमाधी आंदोलन करणार आहे.  यासाठी जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था कायम राहण्‍यासाठी जिल्‍हा पोलिस अधिक्षक  निर्मलादेवी एस.   यांनी जिल्ह्यात दिनांक 30 मे 2017 पर्यंत कलम 36 जारी केली  आहे. आदेशान्वये मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 36 पोटकलम अ ते फ पर्यंतचे कलम जारी करण्‍यात आले आहे. या आदेशाचा भंग करणा-या व्‍यक्‍तीविरुद्ध मुंबई पोलिस अधिनियम 1951 कलम 134 अन्‍ये कार्यवाहीस पात्र राहील, असेही आदेशात नमूद करण्‍यात आलेले आहे. 
                                                                        0000












प्र..क्र- 293                                                                      18 मे 2017
बेशिस्‍त वाहन चालविणा-यावर  सीसीटीवी कॅमे-याची नजर
 
 वर्धा,दि 18-वाहन चालक वाहतुकीच्‍या नियमाचे उल्‍लघन करणा-या तसेच बेधडकपणे वाहन चालविणाचा बेशिस्‍त वाहन चालकांविरुध्‍द कारवाई करण्‍यासाठी शहरात सीसीटीवी कॅमेरे लावण्‍यात आले आहे. या कॅमे-याच्‍या माध्‍यमाने वाहतुक शाखेने तसेच उपप्रादेशिक परिवहन विभागाने बेशिस्‍त वाहन चालविणा-यांवर कारवाई करण्‍याचे निर्देश जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहे.
शहरातील प्रत्‍येक चौकामध्‍ये सुरक्षेच्‍या दृष्‍टीने सीसीटीवी कॅमेरे लावण्‍यात आलेले आहे. या सीसीटीवी कॅमे-याच्‍या माध्‍यमाने वाहतुकीवर सुध्‍दा नजर ठेवण्‍यात येणार आहे. वाहतुक व्‍यवस्‍था  सुरळीतपणे व नियमांचे पालन करुनच व्‍हावी व कुठेही अवैध वाहतुक, बेशिस्‍तपणे वाहन चालवणा-यांची नोंद सीसीटीवी कॅमेरामध्‍ये होणार आहे. याबाबतची माहिती वाहतुक विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागास नियमित उपलब्‍ध होणार आहे. या उपलब्‍ध झालेल्‍या माहितीवरुन संबंधित विभाग कॅमे-यातून घेतलेल्‍या सीसीटीवी फुटेजच्‍या आधारे वाहन चालकावर दंडात्‍मक करवाई करण्‍याच्‍या सुचना जिल्‍हाधिकारी यांनी दिल्‍यात. वाहन चालकांनी नियमाचे पालन करुनच वाहन चालवावे असे आवाहनही जिल्‍हाधिकारी यांनी केले आहे.
                                                       0000

Wednesday 17 May 2017

अवैध जाहिरात फलक तक्रारीसाठी नोडल अधिका-यांची नेमणूक



अवैध जाहिरात फलक तक्रारीसाठी नोडल
अधिका-यांची नेमणूक
वर्धा, दि.16 (जिमाका) – महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील सार्वजनिक अथवा खाजगी जागेवर अवैधरिता लावण्‍यात आलेले जाहिरात फलक तात्‍काळ काढण्‍यासाठी मुंबई उच्‍च न्‍यायालयाने आदेश दिले होते. तसेच नागरिकांना अवैध जाहिरात फलकाबाबत तक्रार करण्‍यासाठी नोडल अधिकारी यांची नेमणूक करण्‍याचेही निर्देश दिले होते. या आदेशाचे पालन करीत वर्धा जिल्‍ह्यात नागरिकांना तक्रार करण्‍यासाठी नोडल अधिका-यांची नेमणूक करण्‍यात आली असुन त्‍यांचे नाव आणि संपर्क क्रमांक जाहिर करण्‍यात आले आहेत.
जिल्‍ह्यातील नगरपरिषद, नगरपंचायत मध्‍ये अवैध जाहिरात फलक, बॅनर, पोस्‍टर आढळून आल्‍यास नागरिकांनी संबंधित नोडल अधिका-यांकडे तक्रार करावी.
अ.क्र
कार्यालयाचे नांव
नोडल अधिका-याचे नांवे व हुदा
कार्यालयीन फोन नंबर
मोबाईल क्रमांक
1
पोलीस अधिक्षक कार्यालय, वर्धा
श्री. आर. जि. किल्‍लेकर पो. उप. अधिक्षक (गृह)
07152/232503           
9370195145           
2
नगर परीषद, वर्धा
श्री. निखील लोहे
07152/231710
8788841854
3
नगर प‍रीषद पुलगांव
श्री. सुभाष भाउराव श्रीपतवार, सहा. कार्यालय निरीक्षक
07158/283388
9822275155           
4
नगर परीषद आर्वी
श्री. संकेत जनार्धन राउत कनिष्‍ट अभियंता (बांधकाम विभाग)
07157/224251
9960047605           
5
नगर परीषद सिंदी
श्री. रविंद्र काशीनाथ गडडमवार कर निरीक्षक
-
7385448797           
6
नगर परीषद देवळी
श्री. सुनील कृष्‍णराव ताकसांडे
07158/254127
9860465466
7
नगर परीषद सेलु
श्री. बी. एन. तीनघसे नायब तहसिलदार, सेलू
07155/220211
9422842082           
8
नगर पंचायत आष्‍टी
श्री. पंकज दिलीपराव गोबाडे
-          
7709757001           
9
नगर पंचायत कारंजा
-          
07156/245010
-          
10
नगर पंचायत समुद्रपूर
श्री. विश्‍वनाथ गोपीनाथ माळवे कनिष्‍ठ अभियंता
-          
9960044427

0000000

मागासवर्गीय विद्यार्थ्‍याचे वसतिगृहात प्रवेश देणे सुरु



मागासवर्गीय विद्यार्थ्‍याचे वसतिगृहात प्रवेश देणे सुरु
वर्धा, दि.16 (जिमाका) –इयत्‍ता आठवी ते पदवी पर्यंत तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्‍यांसाठी निशुल्‍क निवास व भोजनाची व्‍यवस्‍था असलेल्‍या आर्थिकदृष्‍टया मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांचे वसतिगृहात प्रवेश देणे सुरु झाले आहेत.  विद्यार्थ्‍यांनी वसतिगृहात प्रवेश घेण्‍यासाठी अर्ज सादर करण्‍याचे आवाहन वसतिगृह प्रमुख यांनी केले आहे.
इयत्‍ता 8 वी ते 12 पर्यंत प्रवेश अर्जाचे वाटप करणे व प्रवेश अर्ज स्विकारणे दिनांक 1 जून, ते 20 जून पर्यंत राहिल तर पदवी पर्यंत अर्जाचे वाटप दिनांक 21 जून ते 10 जुलै पर्यंत स्विकारण्‍यात येतील. औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेकरिता प्रवेश अर्जाचे वाटप दिनांक 15 जुलै ते 30 जुलै पर्यंत राहील.
प्रवेश अर्ज सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत उपलब्‍ध आहेत. माजी विद्यार्थ्‍यांना 60 टक्‍के गुण संपादन करण्‍याची अट कायम राहील. विद्यार्थ्‍यांचे प्रवेशाबाबतचे सर्व अंतिम अधिकार निवड समितीस राहील. अपूर्ण अर्ज स्विकारले जाणार नाही. या वसतिगृहात अनुसूचित जमातीसाठी  5 टक्‍के, अनुसूचित जाती तथा विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती करीता 15 टक्‍के जागा राखीव आहे. सर्व विद्यार्थ्‍यांना वसतीगृहात प्रवेशाकरीता 60 टक्‍के गुण आवश्‍यक आहे. वार्षिक उत्‍पन्‍नाची मर्यादा प्रमाणपत्र प्राथमिक ते उच्‍च माध्‍यमिक तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था पदवी व पदव्‍युत्‍तर तसेच पॉलीटेकनिक विद्यार्थ्‍यास शासन निर्णय दिनांक 30 मे, 2014 अन्‍वये 1 लक्ष पर्यंत आहे. त्‍याकरिता तहसिलदाराचे उत्‍पन्‍नाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, असे मागासवर्गीय विद्यार्थ्‍याचे वसतीगृह प्रमुख, वर्धा यांनी कळविले आहे.
000000