Wednesday 17 May 2017

मागासवर्गीय विद्यार्थ्‍याचे वसतिगृहात प्रवेश देणे सुरु



मागासवर्गीय विद्यार्थ्‍याचे वसतिगृहात प्रवेश देणे सुरु
वर्धा, दि.16 (जिमाका) –इयत्‍ता आठवी ते पदवी पर्यंत तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेत प्रवेश घेतलेल्‍या विद्यार्थ्‍यांसाठी निशुल्‍क निवास व भोजनाची व्‍यवस्‍था असलेल्‍या आर्थिकदृष्‍टया मागासवर्गीय विद्यार्थ्‍यांचे वसतिगृहात प्रवेश देणे सुरु झाले आहेत.  विद्यार्थ्‍यांनी वसतिगृहात प्रवेश घेण्‍यासाठी अर्ज सादर करण्‍याचे आवाहन वसतिगृह प्रमुख यांनी केले आहे.
इयत्‍ता 8 वी ते 12 पर्यंत प्रवेश अर्जाचे वाटप करणे व प्रवेश अर्ज स्विकारणे दिनांक 1 जून, ते 20 जून पर्यंत राहिल तर पदवी पर्यंत अर्जाचे वाटप दिनांक 21 जून ते 10 जुलै पर्यंत स्विकारण्‍यात येतील. औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेकरिता प्रवेश अर्जाचे वाटप दिनांक 15 जुलै ते 30 जुलै पर्यंत राहील.
प्रवेश अर्ज सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत उपलब्‍ध आहेत. माजी विद्यार्थ्‍यांना 60 टक्‍के गुण संपादन करण्‍याची अट कायम राहील. विद्यार्थ्‍यांचे प्रवेशाबाबतचे सर्व अंतिम अधिकार निवड समितीस राहील. अपूर्ण अर्ज स्विकारले जाणार नाही. या वसतिगृहात अनुसूचित जमातीसाठी  5 टक्‍के, अनुसूचित जाती तथा विमुक्‍त जाती व भटक्‍या जमाती करीता 15 टक्‍के जागा राखीव आहे. सर्व विद्यार्थ्‍यांना वसतीगृहात प्रवेशाकरीता 60 टक्‍के गुण आवश्‍यक आहे. वार्षिक उत्‍पन्‍नाची मर्यादा प्रमाणपत्र प्राथमिक ते उच्‍च माध्‍यमिक तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था पदवी व पदव्‍युत्‍तर तसेच पॉलीटेकनिक विद्यार्थ्‍यास शासन निर्णय दिनांक 30 मे, 2014 अन्‍वये 1 लक्ष पर्यंत आहे. त्‍याकरिता तहसिलदाराचे उत्‍पन्‍नाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, असे मागासवर्गीय विद्यार्थ्‍याचे वसतीगृह प्रमुख, वर्धा यांनी कळविले आहे.
000000

No comments:

Post a Comment