Friday 1 July 2011

                 महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.300       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.1 जुलै 2011 
---------------------------------------------------------------------------------------------------------
        कोतवाल पुस्तकाचे स्केनींग करण्यासाठी निविदा आमंत्रित
वर्धा,दि.1- वर्धा जिल्ह्यातील कोतवाल बुकाची माहिती संगणीकरण (स्कॅनिंग) करावयाची आहे. या कामाकरिता एक खाजगी एजंसीची नेमणूक करावयाची आहे. संबंधित एजंसीने वर्धा जिल्ह्यातील असलेले सर्व कोतवाल बुकाची स्कॅनिंग (संगणीकृत) स्वत:चे खर्चाने करावयाची आहे. संपूर्ण स्कॅनिंग झाल्यानंतर संबंधित एजंसी कडूनच अर्जदाराला कोतवाल बुकाची झेरॉक्स पुरविण्यात येईल. कोतवाल बुकाची प्रती कॉपी 20 रु. दर निश्चित करण्यात आलेला आहे. ज्या निविदा धारकाचे दरामध्ये जि.से.सो.चा वाटा जास्त राहील त्या निविदा धारकाचा निविदा मंजूर करण्यात येइल.
को-या निविदेची किंमत रु. 100/- असून निविदेच्या अटी व शर्तीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेत कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत दि. 15 जूलै 2011 पर्यंत मिळतील.
निविदा स्वीकारण्याची अंतीम मुदत दि. 16 जूलै 2011 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत असून प्राप्त निविदा त्याच दिवशी दु. 4 वाजता उपस्थित निविदा धारका समक्ष निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कक्षात उघडण्यात येईल. कोणतीही निविदा कोणतेही कारन न देता पूर्णत: किंवा अंशत: नामंजूर करण्याचा अधिकार तसेच संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी वर्धा यांचेकडे राखून ठेवलेला आहे. याची नोंद घ्यावी. निविदा http//wardha.nic.in या वेब साईटवर उपलब्ध आहे. असे जिल्हाधिकारी, वर्धा कळवितात.
                    00000










                     महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.301      जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि.1 जुलै 2011 
---------------------------------------------------------------------------
         पंचायत युवा क्रीडा व खेल अभियान अंतर्गत
      निवडप्राप्त ग्रामपंचायतींना क्रीडा साहित्याचे पुरवठा
वर्धा,दि.1- क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांचे तर्फे सन 2008-09 या सत्रामध्ये निवड करण्यात आलेल्या वर्धा जिल्ह्यातील एकुण 52 ग्रामपंचायतींमध्ये क्रीडा विकासाची कामे सुरु आहेत. याकरीता शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतींना 1 (एक)लक्ष रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे. प्रथम टप्यात प्रत्येक ग्रामपंचायतींना प्रथम हप्ता म्हणून 48948 रुपयांचे बिज भांडवल प्राप्त झालेले आहे. प्रथम टप्प्यातील निधी क्रीडांगण विकासावर खर्च केल्या नंतर उर्वरीत निधी शासनाकडून प्राप्त होणार आहे.
त्याच प्रमाणे सन 2008-09 मधील निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना क्रीडा साहीत्य (जसे व्हालीबॉल,फूटबॉल,गोळा, थाळी,भाला,नेट इ.) ची स्पोर्टस कीट संचालनालयाकडून प्राप्त झालेली आहे. हे साहीत्य संबंधीत ग्रामपंचायतींना वाटप करावयाचे आहे. तरी सन 2008-09 मधील निवडप्राप्त ग्रामपंचायतींनी आपले ग्रामपंचायतींचे साहीत्य जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वर्धा यांचे कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावे तसेच या करीता कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधकारी,वर्धा यांनी कळविले आहे.
                    000000
















महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.302          जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.1 जुलै 2011 
---------------------------------------------------------------------------
          वाहतूक करताना गौण खनिज परवाना आवश्यक
वर्धा, दि. 1- वर्धा जिल्ह्यातील सर्व खानपट्टे धारकांनी धारकास उत्खननानुसार रॉयल्टी रक्कमेचा नियमीतपणे भरणा केल्यास गौण खनिज वाहतूकीच्या वेळीच तपासणी अधिका-याकडून गौण खनिज वाहतूक परवाना उपलब्ध करुन घ्यावा. तो वाहतूकीच्या वेळेला दाखविण्यात यावा.
     तसेच नुतणीकरण न केलेल्या खानपट्टा धारकांनी           1(एक) महिन्याच्या आत नुतणीकरणाकरीता आवश्यक अभिलेख/अहवाल सादर करुन खानपट्टयाचे नुतणीकरण करुन घ्यावे. अन्यथा खानपट्टे रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. शासनाव्दारे जिल्ह्याला गौण खनिजचे प्राप्त झालेले उद्दिष्ट पुर्ततेसाठी खानपट्टे धारकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी केलेले आहे.
                        000
जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा                                           दि.1 /7/ 2011
विशेष लेख क्र 61/36
कुटुंब व्यवस्थाच संकटात... !
      व्यसनाधिन कुटुंब प्रमुखामुळे सारं कुटुंब विस्कळीत होतं सहज म्हणुन एकच प्याला म्हणत सुरुवात होते मात्र नंतर ही दारु माणसाला आणि  पर्यायाने कुटुंबालाच संपविते. मुलांच्या सामान्य विकासावर परिणाम करणारी ही व्यसनाधिनता आता कुटुंब संकल्पनेलाच संपवत आहे. कुटुंब संस्कृतीचा देश अशी भारताची असणारी ओळख संकटात आली आहे, त्याबाबत थोडसं.
                                                               -प्रशांत दैठणकर
      व्यसनांमुळे आपल्या आयुष्यात खूप मोठं नुकसान होत आहे. याची जाणीव नसल्याने बहुतांश जण व्यसन करीत राहतात त्यात त्या व्यक्तीचं कुटुंबातील स्थान कुटुंबप्रमुखाचं असेल तर सारं कुटुंब विस्कळीत होवून जातं. तणाव हे व्यसनाधिनतेचं कारण आहे असं सांगितलं जातं मात्र त्याच्या व्यसनाने सारं कुटुंब तणावाखाली येतं याची त्याला जाणीव नसते.
      स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांमध्ये तंबाखूचं व्यसन लागण्याचं प्रमाण खूप अधिक आहे. गुटखा, खर्रा या स्वरुपात तंबाखू खाण्यास मुले सुरुवात करतात. प्रारंभी हे धाडसातून केलं असलं तरी नंतर याची सवय कधी लागते याची जाणिव त्यांना राहत नाही.
      तंबाखूमुळे कर्करोग होवू शकतो अशी सूचना छापणं शासनानं गुटखा उत्पादक आणि सिगारेट उत्पादक कंपन्यांवर सक्तीचं केल आहे. या सूचना बघूनही सर्रास डोळेझाक केली जाते, इतकच नव्हे तर टंचाई झाल्याच्या काळात एक गुटखा पुडी 25 रुपयांना घेतली असं सांगणारे आहेत.
      व्यसन जडल्यावर ते लवकर सुटत नाही. पहिले माणुस दारुला पितो आणि नंतर दारु माणसाला... असं म्हटलं जातं ते काही खोटं नाही. दारुच्या अंमलाखाली तणावापासून काही काळ सुटका होत असली तरी तणावाचं मुळ कारण संपत नसतं आर्थिक संकटाच्या स्थितीत मेहनत आणि समस्येचा मुकाबला हे दोनच पर्याय असतात. त्यावेळी दारुचा हा एकच प्याला कामाला येत नाही हे आपण गांभीर्याने समजून घ्यावं लागेल.
      दारु मानवी मेंदूत संवेदना बोथट करते त्यामुळे हा एकच प्याला घरादाराला उध्वस्त करीत असतो. दारुच्या नशेत बायका-मुलांना मारहाण होते त्यामुळे सारं कुटुंब तणावाखाली येतं अशा घरात नवरा म्हणजे संकट असतं. मुलांना दारुडा बाप म्हणजे असून नसल्यासारखा असतो. ज्या वयात मुलांना आई-बाप आदर्श असतात त्या वयात हा बेवडा आदर्श मुलांच्या व्यक्तिमत्वावर विपरीत परिणाम होतो. त्यांचं व्यक्तीमत्व सक्षमपणे उभं राहत नाही.
      घरात एकच प्याला शिरल्यानंतर कुटुंबात आवश्यक असणारे सहाजिक सौहार्दाचे वातावरण राहत नाही. कुटुंबात राहणं आगळा आनंद असतो मात्र हा आनंद कुटुंबातील एकाही व्यक्तीला मिळत नाही. मुलांना हवा असणारा जिव्हाळा आणि प्रेमाचा ओलावा कुटुंबातून मिळत नाही. यातून कुटुंब म्हणून असणारी मुलांची भावनिक नाळ तुटते व हा आनंद इतर मार्गातून प्राप्त करण्याचा प्रयत्न मुलं करतात आणि मुलं त्या कुटुंबापासून दूर जायला लागतात.
      आपला भारत देश कुटुंब व्यवस्था जपणारा आणि जगणारा देश अशी ओळख आहे. सध्या चित्र बदलत असल्याचे दिसत आहे. दारुचे व्यसन असल्याने वैतागून आणि मारहाणीला, छळाला कंटाळून स्त्री घर सोडण्याचे प्रमाण वाढत आहे. यातून मुलांची कुचंबणा होते आई-वडील हे नातं या एकाच प्यालाने दुरावल्याने मुलांचा विकास व्यवस्थित होत नाही.
      या व्यसनाधितेतून विवाहबाह्य संबंध निर्माण होणे, त्यातून गुन्हेगारी असाही प्रकार घडतो. दारुच्या नशेत भांडणे, मारामारी करणे यातून अनेकदा खूनासारखे गंभीर गुन्हे देखील घडतात. कुटुंब वाचवायचं असेल तर या विषयाबाबत गांभीर्याने विचार करुन व्यसनांचा नाद सोडणं आणि कुटुंब जवळ आणणं गरजेचं आहे त्यासाठी हा 'एकच प्याला' सोडावाच लागेल
                                                                        -प्रशांत दैठणकर
0000000

Thursday 30 June 2011

दुग्ध व्यवसायामुळे बचत गटाची आर्थिक समृध्दी च्या दिशेने वाटचाल


ग्रामीण क्षेत्रातील महिलांची प्रगती बचत गटाच्या माध्यमातून होत आहे. वर्धा जिल्यातील हिंगणघाट तालुक्यात येणार येथील जिजामाता महिला बचत गटाने दुग्ध व्यवसायाला श्रमाची जोड दिल्याने त्यांची वाटचाल आर्थिक समृध्दीच्या दिशेने सुरु असून या दुग्ध व्यवसायातून प्रत्येक सदस्याला ३ हजार पर्यंत आर्थिक लाभ मिळत आहे.

जिजामाता महिला बचत गट हा दा‍रिद्रय रेषेखालील आहे. या गटाच्या अध्यक्षा गिरजा मसराम असून सचिव पदी सुनंदा गोतमारे या आहेत. बचत गटाच्या संकल्पनेबाबत माहिती सांगताना गिरजा मसराम म्हणाल्या की, ग्रामीण क्षेत्रामध्ये बचत गट स्थापन करण्याची चळवळ २००६ च्या दरम्यान मोठया प्रमाणावर जिल्ह्यात सुरु होती गावात दवंडी देवून व वृत्तपत्रातील बातम्यांमुळे आम्ही सुध्दा या चळवळीत सहभागी होणाचा निश्चय केला सुरवातीला सचिव सुनंदा गोतमारे यांच्या घरी बैठक झाली पहिल्यांदा या बैठकीला कमी प्रतिसाद मिळाल्याने दुस-या आठवडयात दिनांक २२ जानेवारी २००६ रोजी बैठक घेण्यात आली यात बचत गटातील १२ सदस्य सहभागी झाले लगेच बचत गटाची स्थापना करण्यात आली. या बचत गटाला जिजामाता बचत गट असे नाव देण्यात आले या बचत गटाचे अध्यक्ष म्हणून गिरजा मसराम व सचिव म्हणून सुनंदा गोतमारे यांची निवड करण्यात आली या बैठकीला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी श्री.मुरार यांनाही पाचारण करण्यात आले होते त्यांनी आमच्या बचत गटाला उत्तम असे मार्गदर्शन केले.
श्रीमती मसराम म्हणाल्या की, जानेवारी २००६ पासून बचत गटाच्या सदस्यांनी ५० रुपये दर महिन्याला बँक ऑफ इंडियाचे पासबुक काढून जमा करणे सुरु केले डिसेंबर २००६ मध्ये रु.७ हजार २०० व डिसेंबर २००७ मध्ये ७ हजार २०० असे एकुण १४ हजार ४०० रुपये जमा झाले. प्रत्येक सदस्याला या रकमेतून दोन टक्के व्याजाच्या मासिक कर्ज दिल्यामुळे व्याजाची रक्कम व मासिक वर्गणीमुळे एकुण भांडवलात रकमेत वाढ होत गेली आहे. सदस्यांनी मागणी केलेल्या कर्जाची रक्कम एक तर त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींच्या आजारपणासाठी व शिक्षणाच्या कामासाठी खर्च करण्यात येत असे. बचत गटातील सदस्यांच्या कौटुंबिक गरजा पूर्ण होत असल्यामुळे ज्यांना सावकाराकडे हात पसरावे लागले नाही. सावकारी पाशा पासून आज आम्ही दूर झालो आहोत. बचत गटाच्या कार्यामुळे आता आम्हाला सुखासमाधानाने जीवन जगता येत आहे अशी त्यांनी यावेळी मनातील व्यथा बोलून दाखविली.

पंचायत समिती हिंगणघाटच्या कार्यालयाशी आम्ही सतत संपर्कात राहत होतो व मासिक बैठकीत पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मुरार यांना पाचरण करुन त्यांच्या कडून व्यवसायांबाबत मार्गदर्शक सुचना घेण्यात आल्यामुळे बचत गटातील सदस्यांनी सर्वानुमते दुग्ध व्यवसाय करण्यासाठी आपली मते नोंदविली दरम्यान या बचत गटाची पहिली प्रतवारी १० जानेवारी २००८ रोजी झाली. आमच्या बचत गटाला २५ हजाराचे खेळते भांडवल मिळाले बचत गटातील सदस्यांना गरजेनुसार कर्ज देण्यात आले.

बचत गटाची दुसरी प्रतवारी ६ नोव्हेंबर २००९ रोजी झाली बचत गटाच्या प्रामाणिकपणामुळे व कर्जाची वेळेवर परतफेड करीत असल्यामुळे बँकेत सुध्दा बचत गटाची एकुणच पत वाढली त्यामुळे जिजामाता महिला बचत गटाने १ जानेवारी २०१० रोजी सादर केलेल्या म्हैस खरेदीचा प्रस्ताव मंजूर केला. २२ नोव्हेंबर २०१० रोजी प्रत्यक्षात जिजामाता महिला बचत गटाला ३ लाख ३० हजाराचे कर्ज मंजूर झाले. या कर्जमंजुरीतून ३ लाखाच्या दुभत्या म्हशी घेण्यात आल्या. एका सदस्याला २५ हजाराची एक अशा एकुण १२ सदस्यांना म्हशी खरेदी करुन दिल्या. 
श्रीमती गोतमारे म्हणाल्या की, बचत गटाला म्हशी खरेदी करुन दिल्यामुळे भविष्यातील येणा-या संकटापासून सुटका झाली आहे.आमची एक म्हैस दिवसातून ८ लिटर दूध देत आहे आमच्या गावाच्या दूरवर अंतरावर हिंगणघाट हे शहर व्यापारी पेठ म्हणून गणल्या जाते त्यामुळे दूधाला चांगली मागणी आहे. दूधात पाणी मिसळवित नसल्यामुळे दूधाचा उच्चतम दर ३० रुपये होता. साधारणत: २४० रुपये एका दिवसाचे तर ३० दिवसाची एकुण उत्पन्न ७ हजार २०० रुपये होते यातून म्हशीला लागणारा पौष्टीक आहाराचा खर्च रु १८०० व राखणदारी कर्मचा-यांचे वेतन एकून ८० रुपये प्रमाणे ३० दिवसाचे २४०० असे एकुण ४२०० खर्च झाल्यानंतर शिल्लक ३ हजार रुपये निव्वळ दुग्धव्यवसायापासून प्रत्येक सदस्याला मिळत आहे. १ जानेवारी २०११ पासुन ३७५० रुपये बँक ऑफ इंडीया मध्ये नियमीतपणे परतफेड करणे सुरु असून गटातील सदस्यांना व्याजाने रक्कम देणे सुरु आहे. बचत गटातील एका सदस्याला दुग्ध व्यवसायापासुन महिन्याला ३ हजार रुपये मिळत असून १२ सदस्यांची एकत्रीत रक्कम ३६ हजार रुपये ही रक्कम ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारी आहे.

जिजामाता बचत गटाला बँक ऑफ इंडिया शाखा हिंगणघाट यांनी प्रामाणिकपणाची पोच पावती दिली असून या बचत गटाची उत्कर्षासाठी वाटचाल अशीच सुरु राहावी अशी अपेक्षा अध्यक्षांनी बोलून दाखविली.

  • मिलींद आवळे



  • साभार महान्यूज..... दि. २८ जून २०११

  • Wednesday 29 June 2011

    मत्स्य अभियांत्रिकीची पदविका.. !

    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा                         दि. 30 जून 2011
    विशेष लेख क्र 57/32
    मत्स्य अभियांत्रिकीची पदविका.. !
          भारतात प्रथमच सुरु झालेला अभ्यासक्रम म्हणजे मत्स्य अभियांत्रिकी पदविका. कोकणातील दापोलीच्या डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात यावर्षी हा अभ्यासक्रम सुरु होत आहे. वेगळं व्यावसायिक शिक्षण घेण्याची संधी यामुळे प्राप्त होत आहे. या अभ्यासक्रमाची ही  माहिती.                -प्रशांत दैठणकर

         दहावी उत्तीर्ण झाल्यावर करिअरच्या संधी खुल्या होतात. यावेळी नेमकेपणाने कोणता अभ्यासक्रम निवडायचा आणि त्याचा फायदा काय होईल याचं मार्गदर्शन करणारे अनेकजण असतात. आपल्याला काही वेगळं क्षेत्र निवडावं असं वाटत असेल तर नव्याने सुरु झालेलया मत्स्य अभियांत्रिकी अर्थात डिप्लोमा इन फिशरीज इंजिनिअरिंग या अीयासक्रमाकडे जाता येईल.
         राज्य शासनाने या वर्षीपासूनच हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. तीन वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ इथं उपलब्ध आहे.
         भारताला खारे, निम-खारे व गोडया पाण्यातील मत्स्यत्पादनाच्या अमर्यादीत नैसर्गिक साठयांची देणगी लाभली आहे. या मत्स्य साठयांचा वापर देशातील जनतेला या मत्स्य क्षेत्रातील रोजगार व यावर आधारीत विविध उद्योगधंदे सुरु करण्याच्या अनमोल संधी उपलब्ध झाल्या आहेत. भविष्यात विविध प्रकारचे प्रगत तंत्रज्ञान व अत्याधुनिक यंत्रसामुग्री यांचा वापर करुन स्थानिक तसेच आंतरराष्ट्रिय बाजारपेठेतील मत्स्योत्पादनात वाढ करण्यास मोठा वाव आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य प्रशिक्षण घेऊन या सर्व तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास केलेले मनुष्यबळ या तीन वर्षाचा मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाव्दारे त्वरीत उपलब्ध होणार आहे.
         हा तीन वर्षाचा मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम अभ्यासीत असताना विद्यार्थी नाविण्यपूर्ण प्रशिक्षणाबरोबरच आपल्या आवडीच्या मासेमारी नौका बांधणी व मरीन इंजिन, मासेमारी  तंत्रज्ञान,  मत्स्य प्रक्रिया आणि शीतकीकरण यंत्रसामुग्री,  मत्स्य संवर्धन अभियांत्रिकी या चार विषयांपैकी विशीष्ट अशा एका विषयाचे सम्यक ज्ञान व प्रत्यक्ष क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव आत्मसात करुन आपला पदविका अभ्यासक्रम पूर्ण करतील. मत्स्य विद्याशाखा अंतर्गत 2011-12 या शैक्षणिक वर्षात सुरु होणा-या तीन वर्षाच्या मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून विहित नमून्यातील प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमता 20 असून अभ्यासक्रमाचे माध्यम इंग्रजी आहे तसेच हा अभ्यासक्रम तीन वर्षातील सहा सत्रांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.
    प्रवेश कसा घ्याल ?
         या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रमाचे शुल्क, अभ्यासक्रमाचे स्वरुप इ. बद्दलची इत्यंभूत माहिती, या अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील कुलसचिवांचे कार्यालय आणि मत्स्य महाविद्यालय,शिरगाव, रत्नागिरी येथे रु 25 एवढे शुल्क भरुन कार्यालयीन वेळेत कामकाजाचे दिवशी दि. 12 जुलै 2011 पर्यंतच उपलब्ध होतील. अभ्यासक्रामची माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या http://www.dbskkv.org/ या संकेत स्थळावरुन अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज प्राप्त केला असेल तर रु 25 एवढया रकमेचा Demand Draft डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यपीठ, दापोली यांचे नावे काढून विहीत नमून्यातील भरलेल्या प्रवेश अर्जासोबतच जोडावा.
        
           अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज टपालाव्दारे पाठविण्यात येणार नाही विहीत नमून्यातील भरलेला प्रवेश अर्ज, प्रवेश प्रक्रिया शुल्क आणि अर्जाचे शुल्क (जर संकेत स्थळावरुन अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज प्राप्त केला असेल तर) माहिती पुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे कुलसचिव, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली जिल्हा रत्नागीरी-415712, महाराष्ट्र राज्य, यांचे कार्यालयात दिनांक 12 जुलै 2011 पर्यंतच जमा करावेत. या तारखेनंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार केला जाणार नाही दपाल विलंबास विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहणार नाही.
    पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर काय ?
         हा तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांला/ विद्यार्थीनीला जर यापुढेही जाऊन या मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील पुढचे शिक्षण घ्यावयाचे असल्यास यशस्वी विद्यार्थ्यी/ विद्यार्थीनी बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स (बी.एफ.एस.स्सी.) या पदवी अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेनुसार थेट व्दितीय वर्षात मर्यादीत प्रवेश मिळवू शकेल. तसेच मासेमारी नौका बांधणी व मरीन इंजिन, मासेमारी तंत्रज्ञान मत्स्य प्रक्रिया आणि शितकीकरण यंत्रसामुग्री, मत्स्य संवर्धन अभियांत्रिकी या क्षेत्रात स्वत:चा व्यवसाय अथवा काम करण्याची उपलब्ध होईल.
    संपर्क: प्रकल्प अधिकारी आणि सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी
    दुरध्वनी: 02352-232678, 232125, फॅक्स: 02352-232987
                                         प्रशांत दैठणकर                                         
    0000000


    दैनिक पत्रकारांची यादी वर्धा


                                                        
              जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा पत्रकारांची यादी


    वृत्तपत्राचे नांव
    नाव/पत्ता
    मोबाईल क्रमांक
     कार्यालय
    Fax
    दै.तरुण भारत ,नागपूर
    प्रफुल्ल व्यास
    9881717856
    244463
    254463
    दै.लोकमत,नागपूर
    श्री.विनोदकुमार चोरडिया आर्वी रोड,वर्धा
    9422141312
      243322
    240318
    दै.हितवाद
    श्री.नरेद्र देशमुख,गोड प्लॉट,वर्धा.
    9011058372
      252385
    ---
    दै.लोकमत समाचार
    निरज दुबे,राजकला टॉकीज,वर्धा
    9420682108
    251900
    फॅ.246856
    दै.लोकसत्ता
    श्री.प्रशांत देशमुख,धंतोली चौक,वर्धा
    9890926200
    245945
    फॅ.245945
    दै.लोकमत टाईम्स
    श्री.पी.व्ही.शास्त्री,ठाकरे मार्कट,वर्धा
    942284047
    243322
    240582
    दै.महाराष्ट्र टाईम्स,मुंब
    श्री.राजेंद्र मुंडे,ज्ञानेश्वर नगर,वर्धा
    9422140049
    242148
    240955
    दै. सकाळ
    श्री.प्रकाश कथले,गोड प्लॉट,वर्धा
    9922447981
    242302
    फॅ.230696
    दै.नवभारत
    श्री.आनंद शुक्ला,वर्धा
    9923435362
    245062
    फॅ.245062
    दै.भास्कर,वर्धा
    श्री.संजयकुमार झा,विठ्ठलमंदीर ,वर्धा
    9823369133
    230440
    फॅ.254950
    दै. देशोन्नती.
    श्री.संजय तिगावकर,धंतोली चोक,वर्धा
    9850388631
    251564
    98905
    66175
    दै.पुण्यनगरी
    श्री.रमेश निमजे,वर्धा
    9922901273
    240698
    243440
    दै.टाईम्स ऑफ इंडिया
    श्री.संजिव चंदन
    9850738513
    ---
    --
    दै.जनसंग्राम
    श्री.गिरज त्रिपाठी,गोड प्लॉट,वर्धा
    9822367686
    242803
    243823
    दै. प्रतापगडचे वारे
    श्री.अनिल मेघे,सुदामपूरी ,वर्धा
    9890710849
    243817
    243817
    दै.श्रमिक संघर्ष
    श्री.दिनेश पाटील,मगनवाडी चोक,वर्धा
    9372912107
    232973
    243476
    दै.युवा समूह,वर्धा
    श्री.ओमप्रकाश अग्रवाल,वर्धा
    9822697330
    ---
    243444
    दै.ध्वनी लहरी,वर्धा
    श्री.सुनिल मेघे,सुदामपुरी,वर्धा
    9890710849
    243444
    243817
    दै.पुलगांव टाईम्स
    श्रीमती अनिता अनुपकुमार भार्गव,वर्धा
    9372910109
       --
    94221
    41185   
    दै.आर्वी टाईम्स,आर्वी
    श्री.प्रकाश राठी,आर्वी,जि.वर्धा
    9422143177
    222047
    222383
    दै.वर्धा दर्शन
    श्री.दिलीप जैन,शिवाजी चौक,वर्धा
    9765305025
    243440
    फॅ.245798
    दै.विदर्भ नरेश ,वर्धा
    श्री.अरविंद पवार,गोपरी,वर्धा
    9422844403
    242803
    243261
    दै.विदर्भ की बात
    श्री.चेतन कोवळे,वर्धा
    9011058372
       --
        --
    दै. साहसिक
    श्री.रविंद्र कोटबकार
    9096968340
    242498
    फॅ.242498
    दै. विधाता
    श्री.प्रदिप जैन,पत्रकार कॉलनी,वर्धा
    9921551355
    244151
        --
    दे.युगधर्म
    श्री.मुन्ना शुक्ला,वंजारी चौक,वर्धा
    9372910744
       -
         --
    दै.महाविदर्भ
    श्री.संजय  बोंडे,वर्धा
    9822726063
         --
         --
    दै.प्रतिदिन
    श्री.रविद्र लाखे,बजाज चौक,वर्धा
    9021250735
          --
         --
    दै. अकोला दर्शन
    श्री.आशिष पावडे,वर्धा
    9860838711
         --
           --
    दै.युवाराष्ट्र दर्शन
    श्री.चोधरी ,गोड प्लॉट,वर्धा
    9011097708
        --
        --
    दै.राष्ट्रोन्नती
     श्री.प्रकाश मोतीलाल राठी,आर्वी जि.वर्धा
    9422143177
    222047
    222173
    दै.लोेकशाही वार्ता
    श्री.राजेश मडावी
    9875755462
    242803
        ---
    दै. जनमाध्यम
    श्री.राजु गोरडे,वंजारी चौक,वर्धा
    9422144643
    244668
    253957
                                     


      इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या प्रतिनिधीची यादी
    1
      छायाचित्रकार
    श्री. प्रदिप सावरकर,इंदिरा .मार्केट,वर्धा
    9890919025
    9975217764
    249564
    2.
     पी.टी.पाटील
    श्री.मोहन मसराम,लोकमत कार्यालय,वर्धा
    9422144903
         --
    3
    ई.टी.व्च्ही.(मराठी )
    श्री.विशाल देवरे,वर्धा
    9822608760
          --
    4.
    युसीएन न्यूज
    श्री.राहूल पडोळे
    9326806688
    5.
    आय.बी.एन.लोकमत
    श्री.नरेद्र मते,हवालदारपूरा वर्धा
    9850107162
          --
    6.
    मी मराठी
    श्री.मनोज मुते,हवालदारपूरा,वर्धा
    9423620559
          --
    7.
    जी.न्युज.
    श्री.अजिज शेख,इतवारा चौक,वर्धा
    9923167231
      240441
    8.
    स्टार माझा
    श्री.महेश मुंजेवार,हवालदारपूरा,वर्धा
    9764948099
           --
    9.
    आकाशवाणी तथा अध्यक्ष श्रमिक पत्रकार संघटना
    श्री.प्रविण धोपटे
    9922441063
             --
    10.
    यु.एन.आय.
    श्री.संतोष मिश्रा
    9049672611
             ---
    11.
    24 तास चॅनल
    श्री.नितीन राऊत
    9767777917
            ---



































     दिनांक ३० जून २०११ पर्यंत अद्ययावत....