Wednesday 29 June 2011

मत्स्य अभियांत्रिकीची पदविका.. !

जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा                         दि. 30 जून 2011
विशेष लेख क्र 57/32
मत्स्य अभियांत्रिकीची पदविका.. !
      भारतात प्रथमच सुरु झालेला अभ्यासक्रम म्हणजे मत्स्य अभियांत्रिकी पदविका. कोकणातील दापोलीच्या डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात यावर्षी हा अभ्यासक्रम सुरु होत आहे. वेगळं व्यावसायिक शिक्षण घेण्याची संधी यामुळे प्राप्त होत आहे. या अभ्यासक्रमाची ही  माहिती.                -प्रशांत दैठणकर

     दहावी उत्तीर्ण झाल्यावर करिअरच्या संधी खुल्या होतात. यावेळी नेमकेपणाने कोणता अभ्यासक्रम निवडायचा आणि त्याचा फायदा काय होईल याचं मार्गदर्शन करणारे अनेकजण असतात. आपल्याला काही वेगळं क्षेत्र निवडावं असं वाटत असेल तर नव्याने सुरु झालेलया मत्स्य अभियांत्रिकी अर्थात डिप्लोमा इन फिशरीज इंजिनिअरिंग या अीयासक्रमाकडे जाता येईल.
     राज्य शासनाने या वर्षीपासूनच हा अभ्यासक्रम सुरु केला आहे. तीन वर्षे कालावधीचा हा अभ्यासक्रम दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ इथं उपलब्ध आहे.
     भारताला खारे, निम-खारे व गोडया पाण्यातील मत्स्यत्पादनाच्या अमर्यादीत नैसर्गिक साठयांची देणगी लाभली आहे. या मत्स्य साठयांचा वापर देशातील जनतेला या मत्स्य क्षेत्रातील रोजगार व यावर आधारीत विविध उद्योगधंदे सुरु करण्याच्या अनमोल संधी उपलब्ध झाल्या आहेत. भविष्यात विविध प्रकारचे प्रगत तंत्रज्ञान व अत्याधुनिक यंत्रसामुग्री यांचा वापर करुन स्थानिक तसेच आंतरराष्ट्रिय बाजारपेठेतील मत्स्योत्पादनात वाढ करण्यास मोठा वाव आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन योग्य प्रशिक्षण घेऊन या सर्व तांत्रिक बाबींचा सखोल अभ्यास केलेले मनुष्यबळ या तीन वर्षाचा मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाव्दारे त्वरीत उपलब्ध होणार आहे.
     हा तीन वर्षाचा मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम अभ्यासीत असताना विद्यार्थी नाविण्यपूर्ण प्रशिक्षणाबरोबरच आपल्या आवडीच्या मासेमारी नौका बांधणी व मरीन इंजिन, मासेमारी  तंत्रज्ञान,  मत्स्य प्रक्रिया आणि शीतकीकरण यंत्रसामुग्री,  मत्स्य संवर्धन अभियांत्रिकी या चार विषयांपैकी विशीष्ट अशा एका विषयाचे सम्यक ज्ञान व प्रत्यक्ष क्षेत्रातील एक वर्षाचा अनुभव आत्मसात करुन आपला पदविका अभ्यासक्रम पूर्ण करतील. मत्स्य विद्याशाखा अंतर्गत 2011-12 या शैक्षणिक वर्षात सुरु होणा-या तीन वर्षाच्या मत्स्य अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमासाठी दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडून विहित नमून्यातील प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमता 20 असून अभ्यासक्रमाचे माध्यम इंग्रजी आहे तसेच हा अभ्यासक्रम तीन वर्षातील सहा सत्रांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे.
प्रवेश कसा घ्याल ?
     या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रमाचे शुल्क, अभ्यासक्रमाचे स्वरुप इ. बद्दलची इत्यंभूत माहिती, या अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली येथील कुलसचिवांचे कार्यालय आणि मत्स्य महाविद्यालय,शिरगाव, रत्नागिरी येथे रु 25 एवढे शुल्क भरुन कार्यालयीन वेळेत कामकाजाचे दिवशी दि. 12 जुलै 2011 पर्यंतच उपलब्ध होतील. अभ्यासक्रामची माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज विद्यापीठाच्या http://www.dbskkv.org/ या संकेत स्थळावरुन अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज प्राप्त केला असेल तर रु 25 एवढया रकमेचा Demand Draft डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यपीठ, दापोली यांचे नावे काढून विहीत नमून्यातील भरलेल्या प्रवेश अर्जासोबतच जोडावा.
    
       अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज टपालाव्दारे पाठविण्यात येणार नाही विहीत नमून्यातील भरलेला प्रवेश अर्ज, प्रवेश प्रक्रिया शुल्क आणि अर्जाचे शुल्क (जर संकेत स्थळावरुन अभ्यासक्रमाची माहिती पुस्तिका व प्रवेश अर्ज प्राप्त केला असेल तर) माहिती पुस्तिकेत नमूद केल्याप्रमाणे कुलसचिव, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली जिल्हा रत्नागीरी-415712, महाराष्ट्र राज्य, यांचे कार्यालयात दिनांक 12 जुलै 2011 पर्यंतच जमा करावेत. या तारखेनंतर आलेल्या प्रवेश अर्जाचा विचार केला जाणार नाही दपाल विलंबास विद्यापीठ प्रशासन जबाबदार राहणार नाही.
पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर काय ?
     हा तीन वर्षाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या यशस्वी विद्यार्थ्यांला/ विद्यार्थीनीला जर यापुढेही जाऊन या मत्स्य व्यवसाय क्षेत्रातील पुढचे शिक्षण घ्यावयाचे असल्यास यशस्वी विद्यार्थ्यी/ विद्यार्थीनी बॅचलर ऑफ फिशरीज सायन्स (बी.एफ.एस.स्सी.) या पदवी अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेनुसार थेट व्दितीय वर्षात मर्यादीत प्रवेश मिळवू शकेल. तसेच मासेमारी नौका बांधणी व मरीन इंजिन, मासेमारी तंत्रज्ञान मत्स्य प्रक्रिया आणि शितकीकरण यंत्रसामुग्री, मत्स्य संवर्धन अभियांत्रिकी या क्षेत्रात स्वत:चा व्यवसाय अथवा काम करण्याची उपलब्ध होईल.
संपर्क: प्रकल्प अधिकारी आणि सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी
दुरध्वनी: 02352-232678, 232125, फॅक्स: 02352-232987
                                     प्रशांत दैठणकर                                         
0000000


No comments:

Post a Comment