Friday 1 July 2011

                 महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.300       जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.1 जुलै 2011 
---------------------------------------------------------------------------------------------------------
        कोतवाल पुस्तकाचे स्केनींग करण्यासाठी निविदा आमंत्रित
वर्धा,दि.1- वर्धा जिल्ह्यातील कोतवाल बुकाची माहिती संगणीकरण (स्कॅनिंग) करावयाची आहे. या कामाकरिता एक खाजगी एजंसीची नेमणूक करावयाची आहे. संबंधित एजंसीने वर्धा जिल्ह्यातील असलेले सर्व कोतवाल बुकाची स्कॅनिंग (संगणीकृत) स्वत:चे खर्चाने करावयाची आहे. संपूर्ण स्कॅनिंग झाल्यानंतर संबंधित एजंसी कडूनच अर्जदाराला कोतवाल बुकाची झेरॉक्स पुरविण्यात येईल. कोतवाल बुकाची प्रती कॉपी 20 रु. दर निश्चित करण्यात आलेला आहे. ज्या निविदा धारकाचे दरामध्ये जि.से.सो.चा वाटा जास्त राहील त्या निविदा धारकाचा निविदा मंजूर करण्यात येइल.
को-या निविदेची किंमत रु. 100/- असून निविदेच्या अटी व शर्तीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेत कार्यालयीन दिवशी व कार्यालयीन वेळेत दि. 15 जूलै 2011 पर्यंत मिळतील.
निविदा स्वीकारण्याची अंतीम मुदत दि. 16 जूलै 2011 रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत असून प्राप्त निविदा त्याच दिवशी दु. 4 वाजता उपस्थित निविदा धारका समक्ष निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कक्षात उघडण्यात येईल. कोणतीही निविदा कोणतेही कारन न देता पूर्णत: किंवा अंशत: नामंजूर करण्याचा अधिकार तसेच संपूर्ण निविदा प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी वर्धा यांचेकडे राखून ठेवलेला आहे. याची नोंद घ्यावी. निविदा http//wardha.nic.in या वेब साईटवर उपलब्ध आहे. असे जिल्हाधिकारी, वर्धा कळवितात.
                    00000










                     महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.301      जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा     दि.1 जुलै 2011 
---------------------------------------------------------------------------
         पंचायत युवा क्रीडा व खेल अभियान अंतर्गत
      निवडप्राप्त ग्रामपंचायतींना क्रीडा साहित्याचे पुरवठा
वर्धा,दि.1- क्रीडा व युवक सेवा संचालनालय तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वर्धा यांचे तर्फे सन 2008-09 या सत्रामध्ये निवड करण्यात आलेल्या वर्धा जिल्ह्यातील एकुण 52 ग्रामपंचायतींमध्ये क्रीडा विकासाची कामे सुरु आहेत. याकरीता शासनाकडून प्रत्येक ग्रामपंचायतींना 1 (एक)लक्ष रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे. प्रथम टप्यात प्रत्येक ग्रामपंचायतींना प्रथम हप्ता म्हणून 48948 रुपयांचे बिज भांडवल प्राप्त झालेले आहे. प्रथम टप्प्यातील निधी क्रीडांगण विकासावर खर्च केल्या नंतर उर्वरीत निधी शासनाकडून प्राप्त होणार आहे.
त्याच प्रमाणे सन 2008-09 मधील निवडण्यात आलेल्या ग्रामपंचायतींना क्रीडा साहीत्य (जसे व्हालीबॉल,फूटबॉल,गोळा, थाळी,भाला,नेट इ.) ची स्पोर्टस कीट संचालनालयाकडून प्राप्त झालेली आहे. हे साहीत्य संबंधीत ग्रामपंचायतींना वाटप करावयाचे आहे. तरी सन 2008-09 मधील निवडप्राप्त ग्रामपंचायतींनी आपले ग्रामपंचायतींचे साहीत्य जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,वर्धा यांचे कार्यालयातून प्राप्त करुन घ्यावे तसेच या करीता कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. असे जिल्हा क्रीडा अधकारी,वर्धा यांनी कळविले आहे.
                    000000
















महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.302          जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.1 जुलै 2011 
---------------------------------------------------------------------------
          वाहतूक करताना गौण खनिज परवाना आवश्यक
वर्धा, दि. 1- वर्धा जिल्ह्यातील सर्व खानपट्टे धारकांनी धारकास उत्खननानुसार रॉयल्टी रक्कमेचा नियमीतपणे भरणा केल्यास गौण खनिज वाहतूकीच्या वेळीच तपासणी अधिका-याकडून गौण खनिज वाहतूक परवाना उपलब्ध करुन घ्यावा. तो वाहतूकीच्या वेळेला दाखविण्यात यावा.
     तसेच नुतणीकरण न केलेल्या खानपट्टा धारकांनी           1(एक) महिन्याच्या आत नुतणीकरणाकरीता आवश्यक अभिलेख/अहवाल सादर करुन खानपट्टयाचे नुतणीकरण करुन घ्यावे. अन्यथा खानपट्टे रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. शासनाव्दारे जिल्ह्याला गौण खनिजचे प्राप्त झालेले उद्दिष्ट पुर्ततेसाठी खानपट्टे धारकांनी जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी केलेले आहे.
                        000

No comments:

Post a Comment