Wednesday 29 June 2011

कितना मायलेज देती है.. !

     तो शास्त्रज्ञ माहिती देतोय की हे अवकाशयान खूप गतिमान आहे आणि गुरु ग्रहापर्यंत केवळ एका वर्षात नेण्याची क्षमता आहे. त्यावेळी बघणा-या लोकांमधून एका चेह-यावर कॅमेरा स्थिरावतो. तो विचारतो कितना देती है अर्थात भारतीय सामान्य माणूस.. कायम मुल्य काय याची चिंता बाळगणारा मध्यमवर्ग तो उच्च मध्यमवर्गी असू दे की साधा दारिद्रय रेषेखालील व्यक्ती हा सामान्य भारतीयच ना.
एका बाजूला किंमती वाढत आहेत त्या पार्श्वभूमीवर चिंता वाढत आहेत इूस-या बाजूला कमाईची साधन कमी होत आहेत असा काहीसा प्रवास 90 टक्के भारतीयांचा चालू आहे. इंधनांच्याकिंमतीवर असणारं पूर्ण नियंत्रण सरकारने काढलय तरी मर्यादीत नियंत्रण जारी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत असणा-या इंधनांच्या किंमती दररोज कमी-अधिक होत असतात.
     आपण अमेरिकेत अथवा इत रयुरोपिय देशात जाता तेंव्हा तुम्हाला दररोज बदलणा-या किंमती दिसतील आपल्याकडे असं चित्र नाही परंतु मर्यादीत काळासाठी नुकसान स्वीकारण्याची तयारी तेल वितरण कंपन्यांची असते. परंतु सतत होणारं नुकसान या कंपन्यांचा हिशेब बिघडवेल त्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजाराप्रमाणे चालणं त्यांना देखील अपरिहार्य झालं आहे याची जाणीव सर्वांनी ठेवायला हवं.
इंधनाच्या किंमती वाढल्यावर आपणही विचार करुन आता सार्वजनिक परिवहन साधनांच्या वापरावर भर द्यायला हवा रेल्वे, बस आदींसारख्या सार्वजनिक साधानांचा वापर जितका वाढेल तितकी खर्चात बचत होणार आहे. आठवडयातून एक दिवस आपण वाहनापासून दूर राहिलं तर महिन्यात किमान चार दिवस आणि वर्षात 52 दिवस आपण इंधनावरील खर्च वाचवू शकतो हा दिवस आपण पायी चालणे किंवा सायकलचा वापर करणे यासाठी राखून ठेवला तर आपलं आरोग्य सुधारेल सोबतच वातावरणात होणारं प्रदूषण घटण्यासही मदत होईल.
     मुंबईसारखं शहर सर्वाधीक सार्वजनिक वाहनांचा वापर करणारं शहर आहे. सायश्कलीचे शहर पुणे होतं. त्याची ती ओळखं वाहनांचा वापर वाढताच संपली. आज या ठिकाणी वायू आणि ध्वनी प्रदूषण मर्यादेपलिकडे वाढलय आणि वाहनांवरची निर्भरता वाढल्यानेच इंधनाचे दर वाढल्यावर कितना देती है असं विचारायची वेळ येते.
     आपण आपल्या दररोजच्या आयुष्यात व्यसनांवर जितका खर्च करतो त्यात आपण बचत निश्चितपणाने करु शकतो. ज्याला व्यसन लागलय अशी व्यक्तीदिवसाला साधारण 25 रुपये म्हटलं तरी साडेसातशे पर्यंत त्यावर खर्च करते हा पैसा वाचविल्यास आरोग्य देखील मिळणार आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवावी.
     आपल्या वाहनाच्या तन्दूरुस्तीवरदेखील मिळणारे मायलेज अवलंबून असते. वेळोवेळी वाहनाची देखभाल दुरुस्ती करण्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवणे आवश्यक असते त्याचप्रमाणे गरज असते ती वेळोवेळी चाकात असणारी हवा तपासण्याची आणि शॉकअप व्यवस्थित असण्याची या देखभालीमुळे इंधनाची खपत योग्यरित्या होते अन्यथा इंधन किफायतशीररित्या वापरले जात नाही.
     कायम स्वरुपी लक्षात ठेवावे की बचत हा सोपा मार्ग आहे आणि त्या माध्यमातून आपण या इंधन दरवाढीचा मुकाबला करु शकतो.
                                     प्रशांत दैठणकर                                         

No comments:

Post a Comment