Saturday 17 September 2011

शिष्यवृत्तीचा ऑनलाईन प्रक्रियेचे मार्गदर्शन 19 सप्टेंबर रोजी


           महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक            जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.17 सप्टेंबर 2011
------------------------------------------------------------------------------
        
वर्धा,दि.17-महाविद्यालयात शिकणा-या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार शिष्यवृत्तीचा पुर्ण लाभ मिळावा याकरीता ऑनलाईन प्रक्रियेव्दारे अर्ज भरण्याची कार्यवाही संपूर्ण महाराष्ट्रात सुरु करण्यात आली आहे.विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, वर्धा यांचे कार्यालयाचे सभागृहात दि. 19 सप्टेंबर 2011 रोजी सकाळी 11.30 वाजता मॅस्टेक कंपनीचे प्रतिनिधि आणि विभागीय समाज कल्याण अधिकारी, नागपूर सदर योजनेबाबत मार्गदर्शन करणार आहेत.
दि.19 सप्टेंबर 2011 रोजी होणा-या शिबीरात वर्धा जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयातील संबंधीत प्राचार्य तसेच त्यांचे प्रतिनिधी यांनी       ई-स्कॉलरशिप ऑन लाईन अर्ज भरण्यासाठी विहित पध्दतीबद्दल       शंका-समाधान करुन घ्यावे.
भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज विद्यार्थ्यांनी ऑनलाईन भरल्याशिवाय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देय राहणार नाही. त्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची व महाविद्यालयाची राहील. अर्ज भरण्याची कार्यवाही दि. 15 ऑक्टोंबर 2011 पावेतो पूर्ण करण्यात यावी. असे आवाहन विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी, वर्धा यांनी केले आहे.
                     000000

Friday 16 September 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती, शनिवार दि.17/9/2011



क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
957.41 मि.मी.
2.77 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
सुरू आहे
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान (सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा - 940.75(0.6)मि.मी.
2)सेलू - 999(निरंक) मि.मी.
3)देवळी -980(2.6) मि.मी.
4)हिंगणघाट-854.3(7) मि.मी.
5)आर्वी -1085(निरंक) मि.मी.
6)आष्टी -782.8(8) मि.मी.
7)समुद्रपूर -1109.6(2) मि.मी
8)कारंजा-910.10 (5) मि.मी.

आठ तालुक्यातील 1 हजार 111 गावे टंचाईग्रस्त जाहीर


           महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.493            जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.16 सप्टेंबर 2011
----------------------------------------------------------------------------------
     वर्धा, दि. 16- शासन निर्णय दिनांक 5 जूलै 2011 अन्वये सन 2010-2011 च्या खरीप पिकांची पैसेवारी 50 पैसे वा त्यापेक्षा कमी जाहीर करण्यात आली आहे, जिल्ह्यातील आठ तालुक्यांची 1 हजार 111  गावामध्ये टंचाई परिस्थिती जाहीर करण्यात आली. अशा गावातील खातेदारांना टंचाई संदर्भात शासनाच्या प्रचलित धोरणानुसार अनुज्ञेय सवलती देण्या संबंधी निर्देशित करण्यांत आले आहे.
     तसेच, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 78 आणि महाराष्ट्र जमीन महसूल (कमी करणे, तहकूब करणे व सूट देणे) नियम 1970 चे नियम 5 मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान करण्यांत आलेल्या अधिकाराचा वापर करुन जिल्हयातील ज्या 1 हजार 111 गावामध्ये टंचाई परिस्थिती जाहीर करण्यांत आली आहे, तेथील खातेदारांना जमीन महसूलात सूट देण्यांत येत असते असे निर्गमीत करण्यात आलेल्या आदेशात नमूद आहे.

Thursday 15 September 2011

वर्धा जिल्हयातील पावसाची व नैसर्गिक आपत्तीची माहिती, शुक्रवार दि.16/9/2011



क्र.
                      बाब
नैसर्गिक आपत्तीचा तपशील
1
अतिवृष्टीमुळे झालेले एकूण नुकसान
निरंक
2
अ) या  र्षी  आतापर्यंत एकूण सरासरी पर्जन्यमान
ब) गेल्या चोवीस तासातील सरासरी पाऊस
954.64 मि.मी.
10.12 मि.मी.
3
शासनाचे मदत कार्य
सुरू आहे
4
मृत्तांची संख्या, विज पडून, पुरात वाहून
निरंक
5
बाधीत   गावे
निरंक
6
बाधीत  शहरे
निरंक
7
नुकसान झालेल्या घरांची संख्या
निरंक
8
नुकसान झालेल्या गोठ्यांची संख्या
निरंक
9
मृत झालेली जनावरे
निरंक
10
व्यापारी  नुकसान
निरंक
11
आपदग्रस्त कुटूंबे व्यक्ती
निरंक
12
पूल रस्त्यांचे नुकसान (सार्वजनिक मालमत्ता)
निरंक
13
जनजीवन
सुरळीत
14
इतर
निरंक
15
तालुकानिहाय एकूण पर्जन्यमान मि.मी.मध्ये (गेल्या 24 तासात पडलेला पाऊस कंसात दर्शविले आहे)
1)वर्धा - 940.69(निरंक)मि.मी.
2)सेलू - 999(30) मि.मी.
3)देवळी -977.4(28.4) मि.मी.
4)हिंगणघाट-847.3(10) मि.मी.
5)आर्वी -1085(निरंक) मि.मी.
6)आष्टी -777.8(1.6) मि.मी.
7)समुद्रपूर -1107.8(11) मि.मी
8)कारंजा-905.10 (निरंक) मि.मी.