Monday 12 September 2011

फिरते रुग्णवाहीकेचे हस्तांतरण आरोग्य सभापतीच्या हस्ते


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक              जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.12 सप्टेंबर 2011
------------------------------------------------------------------------------------------------------
          
      वर्धा,दि.12-राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्य सेवेपासून वंचित व अर्धवंचित क्षेत्रातील लोकांना त्यांच्या गावात आरोग्य सुविधा मिळण्यासाठी राज्य आरोग्य सोसायटी मार्फत नुकतीच  मातृसेवा संघ या संस्थेची निवड करण्यात आली असून, औषध, वैद्यकीय सेवा व प्रयोगशाळा अश्या उपकरणांनी सुसज्ज असे फिरते रुग्णवाहीकेचे हस्तांतरण जि.प.मुख्य कार्यपालन अधिकारी शेखर चन्ने यांच्या प्रमुख उपस्थितीत व जि.प.सभापती मारेश्र्वर खोडके यांच्या हस्ते व मातृसेवा संघाच्या अध्यक्षा पुष्पाताई देशमुख यांच्या उपस्थितीत फिरते रुग्णवाहीकेला हिरवा बावटा दाखवून मार्गस्थ केले.
      याप्रसंगी जिल्हा आरोग्य अधिकारी के.झेड.राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.एस.डी.निमगडे, डॉ. निलम सोमनकर, डॉ. प्रविण धाकटे व मातृसेवा संघाचे अधिकारी देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
      जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवांपासून वंचित व अर्धवंचित लोकांना दर्जेदार प्राथमिक प्रतिबंधात्मक, उपचारात्मक, आरोग्य सेवा तसेच अत्यावश्यक वेळेस संदर्भ सेवा पुरवून राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाचे ध्येय साध्य करण्यात येणार असून, त्यामध्ये बालमृत्यु, मातामृत्यू दरात घट व आर्युमानवृध्दी साध्य करणे हे या प्रकल्पाचे प्रमुख
उद्दिष्ट आहेत. या फिरत्या रुग्णवाहीकेसोबत एक टाटा सुमो हे वाहन सुध्दा राहणार असून, यामध्ये वैद्यकीय पथकाची चमु राहील.या चमूमध्ये वैद्यकीय अधिका-यासोबत एक परिचारीका, एक औषध संयोजक एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ वर्धा जिल्ह्यातील आष्टी कारंजा सेलू व समुद्रपूर या दुर्गम तालुक्यातील 46 गावामध्ये महिण्यातील 20 दिवस फिरणार आहेत. भेटीचा निश्चित दिवसाचा कार्यक्रम राबविणार असून, त्यामध्ये गाव भेट व वेळेचा समावेश असेल.
      हे पथक प्रामुख्याने माता व बालकांच्या आरोग्य विषयी विशेष काळजी घेणार असून, सोबत आरोग्य विषयक इतर तातडीच्या सेवा पुरविणार आहे. ग्रामीण आरोग्य पोषण, पाणी पुरवठा व स्वच्छता समिती, प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्ण कल्याण समिती तसेच आरोग्य विभागातील सर्वच स्तरातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी सातत्याने प्रभावी संवाद साधून लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न या माध्यमातून  प्रसंग करण्यात येणार आहे.
      तत्पूर्वी मान्यवरांनी फिरत्या रुग्ण वाहीकेची पाहणी केली.
      या फिरत्या रुग्णवाहीकेचा लाभ अधिकाधिक ग्रामीण जनतेने घ्यावा, असे आवाहन जि.प.आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
                           00000

No comments:

Post a Comment