Monday 12 September 2011

15 सप्टेंबर पासून वाहन चालविण्याचा व स्मार्ट कार्ड परवाना आता घरपोच मिळणार


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक        जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.12 सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
   
      वर्धा,12-गृह विभाग, मंत्रालय, मुंबई अधिसुचना दि.8 ऑक्टोंबर 2010 अन्वये महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 13 व नियम 51 मध्ये सुधारणा केली असून दि. 15 सप्टेंबर 2011 पासून प्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा कार्यालयाकडून पक्के ड्रायव्हिंग लायसन्स व वाहन नोंदणी प्रमाणपत्र (स्मार्ट कार्ड) हे वाहन चालकांच्या किंवा वाहन धारकांच्या त्यांनी अर्जात विनिर्दिष्ट केलेल्या पत्यावर पोच देय नोंदणी डाकेने पाठविण्यात येणार आहे.
     त्याकरिता अर्जदाराकडून पोचवणी आकार म्हणून रु. 50 प्रती लायसन्स  किंवा नोंदणी प्रमाणपत्र दि. 15 सप्टेंबर 2011 पासून आगाऊ घेण्यात येणार आहे. याची नोंद अर्जदाराने घ्यावी. सदर योजनेअंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र किंवा अनुज्ञप्तीचा बटवडा व्यवस्थीत होणेकरिता शिकाऊ लायसन्स , पक्के लायसन्स, नविन नोंदणी व हस्तांतरण वगैरे सर्व कामासाठी अर्ज सादर करताना सविस्तर पत्ता देणे आवश्यक आहे.
     अर्जदाराने यापुढे अर्जामध्ये संपुर्ण नांव, पूर्ण पत्ता (सव्हें नंबर, घर क्रमांक, बिल्डींगचे नांव, मजला, फ्लॅट नंबर, गल्ली क्रमांक, रस्त्याचे नांव, घराजवळील महत्वाची खुण) व पत्त्यामध्ये अचुकता येण्यासाठी पिन कोड नंबर व मोबाईल नंबर देखील नमुद करणे गरजेचे आहे. अर्धवट अर्ज स्विकारले जाणार नाही व अपु-या पत्यामुळे बटवडा न झाल्यास अथवा बटवडयास विलंब झाल्यास कार्यालय जबाबदार राहणार नाही.याची अर्जदाराचे नोंद घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत अर्जदारास अनुज्ञपती (लायसन्स), नोंदणी प्रमाणपत्र दि. 15 सप्टेंबर 2011 पासून प्रत्यक्ष/हस्ते देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी. असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा कळवितात.
                              000000

No comments:

Post a Comment