Tuesday 13 September 2011

मागासवर्गियांच्या उत्थानासाठी शासन कटिबध्द - सचिन अहीर


महाराष्ट्र शासन
प्रसिध्दी पत्रक      जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा   दि.13सप्टेंबर 2011
-------------------------------------------------------------------------------
     
     वर्धा,13- मागासवर्गिय समाजासाठी शासनाने अनेक योजना कार्यान्वित केलेल्या असून, त्याचा लाभ ग्रामीण व शहरी भागातील लोकांना होत आहे. अनेक कल्याणकारी योजनामध्ये आर्थिक सुधारणा करण्यात येत असून, त्या माध्यमातून  मागासवर्गियांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत होत आहे. मागासवर्गियांच्या प्रगतीसाठी शासन सर्वतोपरी शासन प्रयत्नशिल असून, त्यांच्या उत्थानासाठी शासन कटिबध्द आहे असे प्रतिपादन सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री सचिन अहीर यांनी केले.
          आज सिंदी (मेघे) येथे 13 लक्ष रुपये किमतीच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत तीन रस्ते बांधकामाचे भुमिपूजन व तया परिसरात वृक्षारोपन करण्यात आले त्यानंतर रमाबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
     यावेळी आमदार सुरेश देशमुख, जि.प.चे उपाध्यक्ष सुनिल राऊत, बांधकाम सभापती महानामा रामटेके, माजी आमदार राजू तिमांडे, पंचायत समिती उपसभापती संदिप किटे, समिर देशमुख, चंद्रकांत पाटील, शारदाताई झांबरे, भारत मुन, सुधिर पांगुळ, धर्मपाल तांकसांडे व रामभाऊ सातव आदी मान्यवर उपस्थित होते.
       शासनाने मागासवर्गिय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ केली असल्याचे सांगून राज्यमंत्री अहीर म्हणाले की, ग्रामीण भागातील व शहरी भागातील दलित वस्त्याचा सुधारणेसाठी शासनाने अनुदानात वाढ केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा. या तत्वानुसार समाजाची प्रगती होत असून, विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाप्रती ध्येय बाळगले पाहीजे. चंद्रकांत पाटील यांचे गुणगौरव करण्यात येऊन सामाजिक न्यायाच्या योजना मागासवर्गीय लोकांनी स्विकारुन प्रगती साधावी. जिल्ह्याच्या उद्योग क्षेत्रामध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याबाबत प्रयत्न केला जाईल असेही ते म्हणाले.
याप्रसंगी आमदार देशमुख म्हणाले की येत्या तीन वर्षामध्ये सिंदी मेघेचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. चंद्रकांत पाटील यांनी निवडणूक काळात बरेच परिश्रम घेतले त्यामुळे माझ्या विजयाचा मार्ग सुकर झाला असे सांगुन या निर्वाचन क्षेत्राच्या विकासाला तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या विकास कामाला प्रथम प्राधान्य देण्यात येईल असेही ते म्हणाले.
     प्रास्ताविक करताना चंद्रकांत पाटील यांनी सिंध्दी मेधे येथील समस्या मांडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानांच्या विकास  कार्याची मागणी केली.
     यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले तसेच बुध्द विहारात जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान गौतम बुध्द यांच्या प्रतीमेचे दर्शन घेवून त्यांनी अभिवादन केले.
     कार्यक्रमाचे आभार रवि पाटील यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने अधिकारी, पदाधिकारी व सर्वसामान्य नागरिक उपस्थित होते.
                           0000
    

No comments:

Post a Comment