Thursday 29 March 2012

राष्‍ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजच्‍या प्रवेशासाठी सूचना


         वर्धा, दि.29-  डेहराडून (उत्‍तरांचल) येथील  परीक्षा प्रवेशासाठी 1 व 2 जुन 2012 रोजी शिवाजी पिप्रपेरेटरी मिलिटरी स्‍कूल, शिवाजीनगर, पुणे -411005 येथे घेण्‍यात येणार आहे. ही परीक्षा फक्‍त मुलांसाठीच आहे.
         या परीक्षेसाठी ज्‍या विद्यार्थ्‍यांचे वय 1 जानेवारी 2013 रेाजी   11  1/2  (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी 13 वर्षापेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी सदर परीक्षेस पात्र समजण्‍यात येतील. म्‍हणजेच जन्‍म  दि. 2 जानेवारी 2000 पूर्वी व 1 जुलै 2001 नंतरचा नसावा. विद्यार्थी कोणत्‍याही मान्‍यताप्राप्‍त शाळेमध्‍ये इयत्‍ता 7 वी या वर्गात शिकत असावा किंवा 1 जानेवारी 2013 ला 7 वी पास असावा.
          परीक्षेसाठी राष्‍ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांचे विहीत नमुन्‍यातील आवेदनपत्रेच घ्‍यावयाची आहेत. आवेदनपत्र विद्यार्थ्‍यास 7 फेब्रुवारी 2012 पासून उपलब्‍ध होऊ शकतील. तरी विद्यार्थ्‍यांनी 350 रुपयाचा फक्‍त स्‍टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचाच डिमांड ड्राफ्ट कमांडंट, आर.आय.एम.सी. डेहराडून, पेअबल अॅट डेहराडून (तेलभवन बँक  कोड नं. 0157 6 )  काढून आवेदनपत्र, माहितीपत्र व 5 वर्षाचा प्रश्‍नपत्रिका संच या कार्यालयाकडून (आयुक्‍त, महाराष्‍ट्र राज्‍य परीक्षा परिषद, 17  डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे  यांचेकडून प्राप्‍त  करुन घ्‍यावे. परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे 31 मार्च 2012 पर्यंत आयुक्‍त, महाराष्‍ट्र राज्‍य परीक्षा परिषद, 17 डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे 411001 यांचेकडे स्विकारण्‍यात येतील. त्‍यानंतर आवेदनपत्रे कोणत्‍याही  परिस्थितीत स्‍वीकारण्‍यात येणार नाहीत. आवेदनपत्रासोबत जन्‍मतारखेच्‍या व जातीच्‍या दाखल्‍याची (अनुसूचित जाती  जमातीसाठी) छायांकित प्रती व शाळेच्‍या बोनाफाईड सर्टिफिकेट व्दिप्रतीत जोडणे आवश्‍यक आहे. तसेच कमांडंट, आर.आय.एम.सी. डेहराडून यांचे नांवे रु. 50 चा स्‍टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचा डिमांड ड्राफ्ट ( परीक्षा फी ) (अनुसूचित जाती व जमातीसाठी रु. 5 चा डिमांड ड्राफ्ट) जोडावा.
      परीक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्‍यज्ञान या तीन विषयाचे लेखी पेपर असतील. परीक्षार्थींना गणिताचा व सामान्‍य ज्ञानाचा पेपर इंग्रजी अथवा हिंदीमध्‍ये लिहिता येईल. गणित व सामान्‍यज्ञान विषयाच्‍या प्रश्‍नपत्रिका इंग्रजी  किंवा  हिंदी या  भाषेत उपलब्‍ध होतील. लेखी परीक्षेत उत्‍तीर्ण होणा-या विद्यार्थ्‍यांच्‍या मुलाखती 5 ऑक्‍टोंबर 2012 रोजी घेण्‍यात येतील.असे आयुक्‍त, महाराष्‍ट्र राज्‍य परीक्षा परिषद, पुणे-1 यांनी कळविले आहे.   
                                                                 0000000     

महिला आर्थिक विकास महामंडळ प्रदर्शनी सुरु


           वर्धा, दि. 29- महाराष्‍ट्र शासनाच्‍या  तेजस्विनी महाराष्‍ट्र ग्रामीण महिला सक्षमीकरण कार्यक्रमातंर्गत महिला आर्थिक विकास महामंडळ व राष्‍ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने बचत गट उद्योजकांकरीता तेजस्विनी  प्रदर्शनी व विक्रीची सुरुवात दि.28 मार्च पासून झाली आहे. ही प्रदर्शनी बच्‍छराज धर्मशाळा,मेन रेल्‍वे स्‍टेशनच्‍या बाजूला, शास्‍त्री चौक, वर्धा येथे आहे. ही प्रदर्शनी  दि. 31 मार्च 2012 पर्यंत सुरु राहणार आहे.
         या प्रदर्शनीमध्‍ये महिला उद्योजक व महिला बचत गटांनी तयार केलेले उत्‍पादित वस्‍तू  व खाद्य पदार्थाचे  स्‍टॉल, व्‍यावसायिक स्‍टॉल यांच्‍या व्‍दारे घरगूती सामान, मसाले पापड, लोणची, शेवळ्या, सुरभी बॅग वैगेरे  वस्‍तू विक्रीसाठी उपलब्‍ध  आहेत .
      जनतेने  या प्रदर्शनीला भेट देऊन स्‍टॉलधारकांना प्रोत्‍साहीत करावे, असे आवाहन महिला आर्थिक विकास महामंडळाच्‍या वरिष्‍ठ जिल्‍हा समन्‍वय अधिकारी ललिता दारोकर यांनी केले आहे.
                                                          000000

Wednesday 28 March 2012

क्षयरोग होऊच नये यासाठी प्रयत्न करा डॉ. रत्ना रावखंडे


         वर्धा, दि.28- क्षयरोगाच्‍या जंतूचा शोध  डॉ. रॉबर्ट कॉक यांनी  लावल्‍यामुळे क्षयरोगाचा उपचार करणे  शक्‍य होऊन मानव जातीवर ज्‍यांचे अनंत उपकार आहेत त्‍यांचा हा जंतू शोध दिवस संपूर्ण देशभरात जागतिक क्षयरोग दिन म्‍हणून साजरा करण्‍यात येतो. या धर्तीवर जिल्‍हा क्षयरोग केंद्रात नुकताच जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्‍यात आला.
जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सव डॉ. रत्‍ना रावखंडे माहिती देतांना 
          जिल्‍हा क्षयरोग अधिकारी  डॉ. नीलम सोमलकर व सहसंचालक गांधी मेमोरियल लेप्रसी फाऊंडेशन चे पी.व्‍ही.बाहूलेकर यांनी हिरवी झोंडी दाखवून प्रभात फेरीची सुरुवात केली. गांधी मेमोरीअल लेप्रसी फाऊंडेशन येथून प्रभात फेरी प्रारंभ करुन जिल्‍हा क्षयरोग केंद्राचे प्रांगणात समारोप करण्‍यात आला.
            यावेळी  जिल्‍हा शल्‍य किकित्‍सक डॉ. रत्‍ना रावखंडे, हृदयरोग तज्ञ डॉ. अरुण पावडे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड, एस.के.भिसे, डॉ. आकरे,उपस्थित होते.
        याप्रसंगी डॉ. रावखंडे यांनी  क्षयरोग होऊच नये यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी, डॉट्स प्रोव्‍हायडर यांनी तळमळीने कार्य करुन क्षयरोग्‍यांना क्षयमुक्‍त केले पाहिजे असेही ते म्हणाले. क्षयरोगाचे लक्षणे आढळताच त्‍वरीत तपासणी करावी. रोगाचे निदान  निश्चित झाल्‍यावर नियमित 6-8 महिन्‍यासाठी पूर्ण कालावधी करीता औषधोपचार घ्‍यावा असे सांगण्‍यात आले. कारण क्षयरोग रुग्‍णाने नियमित औषधे घेतली नाही तर रुग्‍ण  डिफॉल्‍ट होऊन औषधीचा परिणाम होत नाही. पर्यायाने रुग्‍ण औषधीला रेझीस्‍टंट होतो. अशा एम डी आर रुग्‍णांना 24 महिने औषधोपचार घ्‍यावा लागतो. यासाठी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्‍यांनी क्षय रुग्‍णांना प्रथमत: च नियमित औषधोपचार घेण्‍यास प्रवृत्‍त करावे.
        कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी जिल्‍हा क्षयरोग केंद्र, गांधी मेमोरिअल लेप्रसी फाऊंडेशन व परिचारिका प्रशिक्षण केंद्र , शालोम नर्सिंग स्‍कुल, कस्‍तुरबा नर्सिग स्‍कुल, परिचारिका प्रशिक्षणार्थी व कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.
         कार्यक्रमाचे संचालन संजीव शेळके यांनी तर  आभार प्रदर्शन डॉ. सीमा मानकर  यांनी केले. 
                                                00000000

यशवंतराव चव्हाण लोकराज्‍य विशेषांक विक्रीस उपलब्‍ध



       वर्धा, दि.28-  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाव्‍दारे प्रकाशित मार्च 2012 चा विशेषांक यशवंत–किर्तिवंत  किंमत 10 रुपये जिल्‍हा माहिती कार्यालय, प्रशासकीय भवन 2 रा मजला , वर्धा येथे विक्रीसाठी उपलब्‍ध आहे.
            माहिती व जनसंपर्क विभागातर्फे प्रकाशित लोकराज्यचा मार्चचा विशेषांक यशवंतराव चव्‍हाणविशेषांक म्हणून प्रकाशित केला आहे. या अंकामधे यशवंतराव चव्‍हाणांचे दुर्मिळ छायाचित्रांचा संग्रह प्रकाशित करण्‍यात आले आहे.
                                                00000

Tuesday 27 March 2012

महिला आर्थिक विकास महामंडळाच्‍या प्रदर्शनीचे उदघाटन


       वर्धा,दि.27 - महिला आर्थिक विकास महामंडळ तर्फे महिला बचत गटाव्‍दारे निर्मीत व संपादित केलेल्‍या वस्‍तुच्‍या प्रदर्शनीचे उदघाटन   जिल्‍हाधिकारी  जयश्री  भोज  यांचे हस्‍ते बुधवार दिनांक 28  मार्च 2012 रोजी सायंकाळी 6 वाजता बच्‍छराज धर्मशाळा, वर्धा येथे  संपन्‍न होणार आहे.
      या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्‍हणून जिल्‍हा अग्रणी बँक ऑफ इंडियाचे व्‍यवस्‍थापक एम.बी मशानकर, दि. वर्धा जिल्‍हा मध्‍यवर्ती   सहकारी बँकेचे  मुख्‍य कार्यकारी अधिकारी ए.जी.मुद्देश्‍वर  आणि माविमचे विभागीय सनियंत्रण अधिकारी  नितीन जयस्‍वाल उपस्थित राहणार आहेत.
      यावेळी जनतेनी उपस्थित राहून प्रदर्शनीला भेट द्यावी असे आवाहन माविमच्‍या वरिष्‍ठ जिल्‍हा समन्‍वय अधिकारी ललीता दारोकर आणि नाबार्डचे सहाय्यक  महाव्‍यवस्‍थापक  डॉ. स्‍नेहल बनसोडे यांनी केले आहे.
                                                     0000000

ई-स्‍कॉलरशीपचे प्रस्‍ताव


        वर्धा, दि. 27- जिल्‍ह्यातील ज्‍या महाविद्यालयानी  ई-स्‍कॉलरशिप व्‍दारे ऑनलाईन शिष्‍यवृत्‍तीचे प्रस्‍ताव सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण कार्यालयाकडे सादर केलेले नाही त्‍या महाविद्यालयांनी शिष्‍यवृत्‍तीचे  ऑनलाईन प्रस्‍ताव तात्‍काळ सादर करावे. 
        अन्‍यथा मागासवर्गीय विद्यार्थी शिष्‍यवृत्‍तीपासून वंचित राहिल्‍यास त्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी महाविद्यालयाची राहील. असे आवाहन सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण,  यांनी केले आहे.
                                                            000000

सुवर्ण जयंती राजस्‍व अभियाना अंतर्गत जिल्‍ह्यात मेगा कॅम्‍प सफल


     वर्धा, दि. 27- राज्‍याच्‍या सुवर्ण महोत्‍सवी वर्षानिमित्‍य महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्‍याकरीता महत्‍वाकांक्षी योजना म्‍हणून `सुवर्ण जयंती राजस्‍व अभियान `  हा नाविण्‍यपूर्ण उपक्रम  महसूल प्रशासनाने राबविला आहे.  
           या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्‍यात येत आहे. जिल्‍हा महसूल प्रशासनाने नुकतेच  जिल्‍ह्यातील सर्व तालुक्‍यात महाशिबिराचे आयोजन केले होते. यावेळी नागरिकांना वर्धा- 8268, देवळी – 2714, सेलु – 2379, आर्वी – 911, आष्‍टी– 433, कारंजा -1170, हिंगणघाट -1804, समुद्रपूर-3419 असे  एकूण 21118 प्रमाणपत्राचे वाटप करण्‍यात आले.
      वाटप करण्‍यात आलेल्‍या प्रमाणपत्रामध्‍ये बाब निहाय तलाठी दप्‍तर अद्यावतीकरण 68, प्रलंबित फेरफाराच्‍या नोंदी 2778, सात बारा वाटप करणे 5302, महसुल अभिलेखाच्‍या नकला देणे 1262, विविध प्रमाणपत्राचे वितरण 5474, जमिन मोजणी प्रकरणे 204, इंदिरा आवास योजने अंतर्गत भुखंड वाटप 48, शिधा पत्रिका 1226, राज्‍य व केंद्र शासनाच्‍या सहाय्यक योजनेचे लाभ 940, राज्‍य व केंद्र शासनाच्‍या सहाय्य योजनेचे अपात्र लाभार्थी 252, आम आदमी योजना 2666, गावठाण विस्‍तार योजने अंतर्गत भुखंड वाटप 110, कृषी विषयक योजनेचे लाभ 181, नवीन वीज जोडणे 294 तसेच इतर 313 असे एकूण 21118 प्रमाणपत्राचे वाटप    करण्‍यात आले.
                                                           00000

मुलाखतीची सूचना


         वर्धा, दि. 27- आय.टी.आयमधून फिटर, इलेक्‍ट्रीशियन, वेल्‍डर, मेकॅ.मोटार व्‍हेईकल या व्‍यवसायामधे उत्‍तीर्ण उमेदवारासाठी फेब्रुवारी 2012 मध्‍ये शिकाऊ उमेदवार भरती परिसर मुलाखतीचा कार्यक्रम दिनांक 31 मार्च 2012 रोजी आय.टी.आय. वर्धा येथे आयोजित करण्‍यात आलेला आहे.
          मुलाखती करीता लॉयड्स स्टिल इंडस्‍ट्रीज लिमिटेड, भुगाव, आर.एस.आर.मोहोता मिल्‍स लिमिटेड, हिंगणघाट, गिमा टेक्‍स इंडस्टि्ज लिमिटेड, हिंगणघाट इत्‍यादी आस्‍थापना हजर राहून, उमेदवारांची निवड करणार आहेत.
          इच्‍छुक उमेदवारांनी आपले मुळ प्रमाणपत्रासह दि. 31 मार्च 2012 रोजी सकाळी 10.30 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था, वर्धा येथे स्‍वःखर्चाने हजर रहावे.
असे अंशकालीन प्राचार्य, मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र व्‍दारा औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था  यांनी कळविले आहे.
                                                                 00000

लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे पुरस्‍कारासाठी अर्ज आमंत्रित


       वर्धा, दि.27- सामाजिक न्‍याय विभागामार्फत मातंग समाजातील कलावंत व समाज सेवक यांना लोकशाहीर अण्‍णाभाऊ साठे पुरस्‍कार देण्‍यात येतो. हा पुरस्‍कार व्‍यक्‍ती व संस्‍था अशा दोन गटात देण्‍यात येतो.
         पुरस्‍काराचे स्‍वरुप व्‍यक्तिगत पुरस्‍कार 15,000 रुपये रोख व सन्‍मानपत्र व स्‍मृतिचिन्‍ह तसेच संस्‍थात्‍मक पुरस्‍कार 25,000 रुपये रोख व सन्‍मानपत्र व स्‍मृतिचिन्‍ह देण्‍यात येतो.
           व्‍यक्तिगत पुरस्‍कारासाठी अर्जदार व्‍यक्‍तीने मातंग समाजाकरीता समाज कल्‍याण कलात्‍मक व साहित्यिक क्षेत्रात किमान 10 वर्ष कार्य केलेले असावे. अर्जदार पुरुषाचे वय किमान 50 वर्षे व स्त्रियांचे किमान 40 वर्षे इतके असावे. पुरस्‍कारासाठी मातंग समाजातील व्‍यक्‍तीचाच विचार करण्‍यात येईल.
      संस्‍थात्‍मक पुरस्‍कारासाठी संस्‍था नोंदणीकृत असावी. स्‍वयंसेवी संस्‍थेने समाज कल्‍याण क्षेत्रात मातंग समाजाच्‍या उन्‍नतीसाठी अन्‍याय निर्मूलन, अंधश्रध्‍दा निर्मूलन इत्‍यादी क्षेत्रात किमान 10 वर्षे काम केलेले असावे. स्‍वयंसेवी संस्‍था राजकारणापासून अलिप्‍त  असावी.
     अटी व शर्ती पूर्ण करणा-या व्‍यक्‍ती व संस्‍थानी विहीत नमून्‍यातील अर्ज तीन प्रतीत दिनांक 15 एप्रिल 2012 पूर्वी  कार्यालय सहाय्यक आयुक्‍त, समाज कल्‍याण सेवाग्राम रेल्‍वे स्‍टेशन रोड, हिम्‍मतसिंगका विद्यालय जवळ वर्धा येथे अर्ज नमुना व अधिक माहितीसाठी  कार्यालयात प्रत्‍यक्ष संपर्क साधावा.
                                                        000000

Monday 26 March 2012

मायक्रो फायनान्‍सवर मार्गदर्शन


         वर्धा, दि.26- महाराष्‍ट्र राज्‍य विधी सेवा प्राधिकरण, व जिल्‍हा विधी सेवा प्राधिकरण, तसेच बँक ऑफ महाराष्‍ट्र शाखा, जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बँक, देवळी व बँक ऑफ इंडिया शाखा यांचे संयुक्‍त विद्यमाने Micro Finance Scheme या विषयावर  सर्वसामान्‍य व शेतमजूर लोकांमध्‍ये जन-जागृती निर्माण करण्‍यासाठी नुकतेच जिल्‍ह्यातील बोरगांव (नांदोरा) व देवळी अशा दोन ठिकाणी शिबीर आयोजित करण्‍यात आले  होते.
          या शिबीरामधे  उपस्थित लोकांना  Micro Finance Scheme  या विषयावर  प्रमुख वक्‍त्‍यांनी मार्गदर्शन केले.  
                                                00000000

कोरडवाहू शाश्वत शेतीविकास कार्यक्रमाअंतर्गत शेतक-यांना प्रशिक्षण


         वर्धा, दि. 26- देवळी तालुक्यातील मौजा तळणी भागवत येथे आत्‍मा अंतर्गत कोरडवाहू शाश्‍वत शेती विकास कार्यक्रमांतर्गत  गावातील लाभार्थी शेतक-यांचे दुधाचे मुल्‍यवर्धन या विषयावर प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आले होते.
मार्गदर्शन करताना जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी 
    यावेळी  जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब ब-हाटे, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, कृषि विकास अधिकारी आर.के.गायकवाड, देवळीचे पशुसंवर्धन विकास अधिकारी गायधने, तालुका कृषि अधिकारी एस.डब्‍लु . निगोट आदि उपस्थित होते.
    कोरडवाहू शाश्वत शेती विकास कार्यक्रमांतर्गत राबविण्‍यात येणा-या विविध उपक्रमाअंतर्गत गाई,म्‍हशी खरेदी, आत्‍मा अंतर्गत शेतकरी  अभ्‍यास दौरे, शासनाच्‍या विविध योजनांचा समन्‍वय इत्‍यादी बाबींवर मार्गदर्शन करण्‍यात आले.   
                                                000000

सुवर्ण जयंती राजस्‍व अभियान 1200 शेतकरी उपस्थित


       वर्धा,दि.26 – राज्‍यात महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्‍याकरीता महत्‍वाकांक्षी योजना म्‍हणून राज्‍याच्‍या सुवर्ण महोत्‍सवी वर्षा निमित्‍त 1 मे 2011 पासून सुवर्ण जयंती राजस्‍व अभियान राबविण्‍याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्‍या अनुषंगाने हिंगणघाट तालुक्‍यात नुकतेच (दि. 24 मार्च2012) रोजी मेगा कँपचे आयोजन तहसिल कार्यालयात करण्‍यता आले.
          शिबिराचे उदघाटन जिल्‍हा परिषद  अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे  यांचे हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाला जिल्‍हा परिषद सदस्‍य व पंचायत समिती सदस्‍य तसेच तालुका स्‍तरावरील विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जि.प.अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे प्रमाणपत्राचे वितरण करताना 
या शिबीरात तालुक्‍यातील जवळजवळ 1200 शेतकरी, विद्यार्थी  तसेच   लाभार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्‍यांच्‍या व लाभार्थ्‍यांच्‍या तक्रारीचे निराकरण करुन सोडविण्‍यात आले. तालुक्‍यात 33 तलाठ्यांची दप्‍तरे अद्ययावत करण्‍यात आली आहे. 173 फेरफार मंजूर करण्‍यात आले. तसेच संबंधितांना 514 सातबा-यांचे वाटप करण्‍यात आले.
मोजणी प्रकरणामध्‍ये 60 लाभार्थ्‍यांना  क प्रतिचे वाटप करण्‍यात आले. राष्‍ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत एकूण 7 लाभार्थ्‍यांना  प्रत्‍येकी 10000 रु. चे  धनादेशाचे वितरण करण्‍यात आले. याव्‍यतिरीक्‍त  312 प्रमाणपत्राचे वाटप करण्‍यात आले. तालुक्‍यातील एकूण 150 लाभार्थ्‍यांचे आम आदमी विमा योजने अंतर्गत अर्ज घेण्‍यात आले असून अर्जावर लवकरच कार्यवाही करण्‍यात येईल असे उपविभागीय अधिकारी श्री. काळे यांनी सांगितले.
तालुक्‍यात एकूण 304 लाभार्थ्‍यांना शिधापत्रीचे वाटप करण्‍यात आले. या कार्यक्रमामध्‍ये एकूण 1602 प्रकरणे प्राप्‍त झालेली होती त्‍यापेकी मेगाकॅम्‍प मध्‍ये 1568 प्रकरणांचे निराकरण करण्‍यात आले असून उर्वरीत 34 प्रकरणे लवकरच निकाली काढण्‍यात येईल   असे सांगितले.
     कार्यक्रमामधे तहसिलदार जी.टी.पुरके, नायब तहसिलदार सुरेन्‍द्र दांडेकर, तालुक्‍यातील मंडळ अधिकारी, तलाठी तसेच कार्यालयीन कर्मचारी प्रामुख्‍याने उपस्थित होते.

                                                00000000