Monday 26 March 2012

सुवर्ण जयंती राजस्‍व अभियान 1200 शेतकरी उपस्थित


       वर्धा,दि.26 – राज्‍यात महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करण्‍याकरीता महत्‍वाकांक्षी योजना म्‍हणून राज्‍याच्‍या सुवर्ण महोत्‍सवी वर्षा निमित्‍त 1 मे 2011 पासून सुवर्ण जयंती राजस्‍व अभियान राबविण्‍याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्‍या अनुषंगाने हिंगणघाट तालुक्‍यात नुकतेच (दि. 24 मार्च2012) रोजी मेगा कँपचे आयोजन तहसिल कार्यालयात करण्‍यता आले.
          शिबिराचे उदघाटन जिल्‍हा परिषद  अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे  यांचे हस्‍ते करण्‍यात आले. कार्यक्रमाला जिल्‍हा परिषद सदस्‍य व पंचायत समिती सदस्‍य तसेच तालुका स्‍तरावरील विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
जि.प.अध्‍यक्ष ज्ञानेश्‍वर ढगे प्रमाणपत्राचे वितरण करताना 
या शिबीरात तालुक्‍यातील जवळजवळ 1200 शेतकरी, विद्यार्थी  तसेच   लाभार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्‍यांच्‍या व लाभार्थ्‍यांच्‍या तक्रारीचे निराकरण करुन सोडविण्‍यात आले. तालुक्‍यात 33 तलाठ्यांची दप्‍तरे अद्ययावत करण्‍यात आली आहे. 173 फेरफार मंजूर करण्‍यात आले. तसेच संबंधितांना 514 सातबा-यांचे वाटप करण्‍यात आले.
मोजणी प्रकरणामध्‍ये 60 लाभार्थ्‍यांना  क प्रतिचे वाटप करण्‍यात आले. राष्‍ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत एकूण 7 लाभार्थ्‍यांना  प्रत्‍येकी 10000 रु. चे  धनादेशाचे वितरण करण्‍यात आले. याव्‍यतिरीक्‍त  312 प्रमाणपत्राचे वाटप करण्‍यात आले. तालुक्‍यातील एकूण 150 लाभार्थ्‍यांचे आम आदमी विमा योजने अंतर्गत अर्ज घेण्‍यात आले असून अर्जावर लवकरच कार्यवाही करण्‍यात येईल असे उपविभागीय अधिकारी श्री. काळे यांनी सांगितले.
तालुक्‍यात एकूण 304 लाभार्थ्‍यांना शिधापत्रीचे वाटप करण्‍यात आले. या कार्यक्रमामध्‍ये एकूण 1602 प्रकरणे प्राप्‍त झालेली होती त्‍यापेकी मेगाकॅम्‍प मध्‍ये 1568 प्रकरणांचे निराकरण करण्‍यात आले असून उर्वरीत 34 प्रकरणे लवकरच निकाली काढण्‍यात येईल   असे सांगितले.
     कार्यक्रमामधे तहसिलदार जी.टी.पुरके, नायब तहसिलदार सुरेन्‍द्र दांडेकर, तालुक्‍यातील मंडळ अधिकारी, तलाठी तसेच कार्यालयीन कर्मचारी प्रामुख्‍याने उपस्थित होते.

                                                00000000                                               

No comments:

Post a Comment