Thursday 29 March 2012

राष्‍ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेजच्‍या प्रवेशासाठी सूचना


         वर्धा, दि.29-  डेहराडून (उत्‍तरांचल) येथील  परीक्षा प्रवेशासाठी 1 व 2 जुन 2012 रोजी शिवाजी पिप्रपेरेटरी मिलिटरी स्‍कूल, शिवाजीनगर, पुणे -411005 येथे घेण्‍यात येणार आहे. ही परीक्षा फक्‍त मुलांसाठीच आहे.
         या परीक्षेसाठी ज्‍या विद्यार्थ्‍यांचे वय 1 जानेवारी 2013 रेाजी   11  1/2  (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी 13 वर्षापेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी सदर परीक्षेस पात्र समजण्‍यात येतील. म्‍हणजेच जन्‍म  दि. 2 जानेवारी 2000 पूर्वी व 1 जुलै 2001 नंतरचा नसावा. विद्यार्थी कोणत्‍याही मान्‍यताप्राप्‍त शाळेमध्‍ये इयत्‍ता 7 वी या वर्गात शिकत असावा किंवा 1 जानेवारी 2013 ला 7 वी पास असावा.
          परीक्षेसाठी राष्‍ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांचे विहीत नमुन्‍यातील आवेदनपत्रेच घ्‍यावयाची आहेत. आवेदनपत्र विद्यार्थ्‍यास 7 फेब्रुवारी 2012 पासून उपलब्‍ध होऊ शकतील. तरी विद्यार्थ्‍यांनी 350 रुपयाचा फक्‍त स्‍टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचाच डिमांड ड्राफ्ट कमांडंट, आर.आय.एम.सी. डेहराडून, पेअबल अॅट डेहराडून (तेलभवन बँक  कोड नं. 0157 6 )  काढून आवेदनपत्र, माहितीपत्र व 5 वर्षाचा प्रश्‍नपत्रिका संच या कार्यालयाकडून (आयुक्‍त, महाराष्‍ट्र राज्‍य परीक्षा परिषद, 17  डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे  यांचेकडून प्राप्‍त  करुन घ्‍यावे. परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे 31 मार्च 2012 पर्यंत आयुक्‍त, महाराष्‍ट्र राज्‍य परीक्षा परिषद, 17 डॉ. आंबेडकर मार्ग, पुणे 411001 यांचेकडे स्विकारण्‍यात येतील. त्‍यानंतर आवेदनपत्रे कोणत्‍याही  परिस्थितीत स्‍वीकारण्‍यात येणार नाहीत. आवेदनपत्रासोबत जन्‍मतारखेच्‍या व जातीच्‍या दाखल्‍याची (अनुसूचित जाती  जमातीसाठी) छायांकित प्रती व शाळेच्‍या बोनाफाईड सर्टिफिकेट व्दिप्रतीत जोडणे आवश्‍यक आहे. तसेच कमांडंट, आर.आय.एम.सी. डेहराडून यांचे नांवे रु. 50 चा स्‍टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचा डिमांड ड्राफ्ट ( परीक्षा फी ) (अनुसूचित जाती व जमातीसाठी रु. 5 चा डिमांड ड्राफ्ट) जोडावा.
      परीक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्‍यज्ञान या तीन विषयाचे लेखी पेपर असतील. परीक्षार्थींना गणिताचा व सामान्‍य ज्ञानाचा पेपर इंग्रजी अथवा हिंदीमध्‍ये लिहिता येईल. गणित व सामान्‍यज्ञान विषयाच्‍या प्रश्‍नपत्रिका इंग्रजी  किंवा  हिंदी या  भाषेत उपलब्‍ध होतील. लेखी परीक्षेत उत्‍तीर्ण होणा-या विद्यार्थ्‍यांच्‍या मुलाखती 5 ऑक्‍टोंबर 2012 रोजी घेण्‍यात येतील.असे आयुक्‍त, महाराष्‍ट्र राज्‍य परीक्षा परिषद, पुणे-1 यांनी कळविले आहे.   
                                                                 0000000     

No comments:

Post a Comment