Wednesday 28 March 2012

क्षयरोग होऊच नये यासाठी प्रयत्न करा डॉ. रत्ना रावखंडे


         वर्धा, दि.28- क्षयरोगाच्‍या जंतूचा शोध  डॉ. रॉबर्ट कॉक यांनी  लावल्‍यामुळे क्षयरोगाचा उपचार करणे  शक्‍य होऊन मानव जातीवर ज्‍यांचे अनंत उपकार आहेत त्‍यांचा हा जंतू शोध दिवस संपूर्ण देशभरात जागतिक क्षयरोग दिन म्‍हणून साजरा करण्‍यात येतो. या धर्तीवर जिल्‍हा क्षयरोग केंद्रात नुकताच जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्‍यात आला.
जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सव डॉ. रत्‍ना रावखंडे माहिती देतांना 
          जिल्‍हा क्षयरोग अधिकारी  डॉ. नीलम सोमलकर व सहसंचालक गांधी मेमोरियल लेप्रसी फाऊंडेशन चे पी.व्‍ही.बाहूलेकर यांनी हिरवी झोंडी दाखवून प्रभात फेरीची सुरुवात केली. गांधी मेमोरीअल लेप्रसी फाऊंडेशन येथून प्रभात फेरी प्रारंभ करुन जिल्‍हा क्षयरोग केंद्राचे प्रांगणात समारोप करण्‍यात आला.
            यावेळी  जिल्‍हा शल्‍य किकित्‍सक डॉ. रत्‍ना रावखंडे, हृदयरोग तज्ञ डॉ. अरुण पावडे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड, एस.के.भिसे, डॉ. आकरे,उपस्थित होते.
        याप्रसंगी डॉ. रावखंडे यांनी  क्षयरोग होऊच नये यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.वैद्यकिय अधिकारी, कर्मचारी, डॉट्स प्रोव्‍हायडर यांनी तळमळीने कार्य करुन क्षयरोग्‍यांना क्षयमुक्‍त केले पाहिजे असेही ते म्हणाले. क्षयरोगाचे लक्षणे आढळताच त्‍वरीत तपासणी करावी. रोगाचे निदान  निश्चित झाल्‍यावर नियमित 6-8 महिन्‍यासाठी पूर्ण कालावधी करीता औषधोपचार घ्‍यावा असे सांगण्‍यात आले. कारण क्षयरोग रुग्‍णाने नियमित औषधे घेतली नाही तर रुग्‍ण  डिफॉल्‍ट होऊन औषधीचा परिणाम होत नाही. पर्यायाने रुग्‍ण औषधीला रेझीस्‍टंट होतो. अशा एम डी आर रुग्‍णांना 24 महिने औषधोपचार घ्‍यावा लागतो. यासाठी कर्मचारी व सामाजिक कार्यकर्त्‍यांनी क्षय रुग्‍णांना प्रथमत: च नियमित औषधोपचार घेण्‍यास प्रवृत्‍त करावे.
        कार्यक्रम यशस्‍वी करण्‍यासाठी जिल्‍हा क्षयरोग केंद्र, गांधी मेमोरिअल लेप्रसी फाऊंडेशन व परिचारिका प्रशिक्षण केंद्र , शालोम नर्सिंग स्‍कुल, कस्‍तुरबा नर्सिग स्‍कुल, परिचारिका प्रशिक्षणार्थी व कर्मचा-यांनी अथक परिश्रम घेतले.
         कार्यक्रमाचे संचालन संजीव शेळके यांनी तर  आभार प्रदर्शन डॉ. सीमा मानकर  यांनी केले. 
                                                00000000

No comments:

Post a Comment