Friday 24 February 2012

शिक्षण प्रणालीत महात्‍मा गांधीचे तत्‍वे अंतर्भुत करणे गरजेचे - फौजीया खान


           वर्धा, दि.24- मुलांचा योग्‍य प्रकारे विकास करण्‍यासाठी तसेच त्‍यांचे संगोपण करण्‍यासाठी काळजी घेणे प्रत्‍येक पालकांचे कर्तव्‍य ठरते परंतू कुसंगतीमुळे व आरोग्‍य संस्‍कारामुळे मुलं इतर मार्गाचा अवलंब करतात. हे टाळण्‍यासाठी आधुनिक शिक्षण प्रणाली प्रभावीपणे कार्य करीत असून, त्‍यामध्‍ये अधिक बळकटी येण्‍यासाठी राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधीचे तत्‍व अंतर्भूत करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क व महिला व बालकल्‍याण विकास विभागाच्‍या राज्‍यमंत्री फौजीया खान यांनी केले.
     सेवाग्राम येथील शांतीभवनात येथे महाराष्‍ट्र राज्‍य बाल हक्‍क संरक्षण आयोगाच्‍या वतीने नयी तालीम किंवा बुनियादी शिक्षण आणि बाल हक्‍क संरक्षण या विषयावर दोन दिवसीय राष्‍ट्रस्‍तरीय कार्यशाळेची समाप्‍ती झाली  त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. याप्रसंगी मंचावर जर्मनीच्‍या प्रा. गिता धरमपाल, नई तालीम समितीचे सचिव अनिल फरसोले, डॉ. राजेंद्र खिमानी, बाल हक्‍क संरक्षण आयोगाचे सचिव अ.ता. त्रिपाठी व जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा कुरसंगे आदी मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
    स्‍वातंत्र्य पूर्व काळात सेवाग्रामला ऐतीहासीक महत्‍व प्राप्‍त असल्‍याचे सांगून राज्‍यमंत्री फौजीया खान म्‍हणाल्‍या की, या भुमिमध्‍ये कार्यशाळा संपन्‍न होणे ही आनंदाची बाब आहे. शिक्षणाच्‍या ओझ्याखाली मुलांचे बालपण हरविल्‍या  जात असते. परंतू त्‍यांना महात्‍मा गांधीजींच्‍या नई तालीम शिक्षण प्रणाली नुसार शिक्षण दिल्‍यास भविष्‍यात उत्‍तम विद्यार्थी घडू शकतात. शासनाने  बालहक्‍क संरक्षणासाठी अनेक कायदे केलेले आहे. परंतू सामाजिक दारिद्र्य  मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, याकरीता शासन सातत्‍याने प्रयत्‍नशिल आहे. मुलांच्‍या दृष्‍टीने शिक्षण महत्‍वाचे आहे. या शिक्षण पध्‍दतीमध्‍ये महात्‍मा गांधीजीच्‍या तत्‍वाचे महत्‍व अधिक आहे. बालकांचे हक्‍क अबाधित ठेवण्‍यासाठी शासन पुरेपुर प्रयत्‍नशील असून, आयेाजित करण्‍यात आलेली कार्यशाळा मुलांचे भविष्‍य घडविण्‍यासाठी उपयुक्‍त ठरेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.               
     यावेळी प्रा. धरमपाल म्‍हणाल्‍या की, माझ्या  वडिलांनी सेवाग्राम येथे येवून महात्‍मा गांधीजीच्‍या विचाराने प्रभावित झाले. 1937 व्‍या वर्षी नई तालीमच्‍या माध्‍यमातून अनेक बालकांना योग्‍य मार्गदर्शन देवून दिशा देण्‍याचे कार्य केले. नई तालीम किंवा बुनियादी शिक्षण पध्‍दतीने मुलांमध्‍ये उत्साह संचारले जाईल व नवनविन प्रगतीचे मार्ग खुले होतील असेही त्‍या म्‍हणाल्‍या.
     प्रास्‍ताविक करताना त्रिपाठी म्‍हणाले की, बालहक्‍क संरक्षण यावर दोन दिवसापासून विचार मंथन झाले असून, देशांतीच्‍या अनेक राज्‍यामधून अनेक मान्‍यवर येवून त्‍यांनी त्‍यांचे विचार व्‍यक्‍त केले. सेवाग्राम या ऐतीहासीक स्‍थळापासून प्रेरणा घेतलेल्‍या  अनेक मान्‍यवरांचे मार्गदर्शन लाभलेले त्‍यांचे विचार बालहक्‍क संरक्षण आयोगाला मोलाचे ठेवा उपयेागी सिध्‍द होईल असेही ते म्‍हणाले.
     या कार्यक्रमाचे संचलन मिस मेरी यांनी केले तर आभार राजेंद्र खेमानी यांनी मानले. याप्रसंगी देशभरातील अनेक राज्‍यातून आलेले प्रतिनिधी उपस्थित होते.
                              0000 

Thursday 23 February 2012

बाल हक्‍काचे संरक्ष्‍ाण करणे काळाची गरज - न्‍या. धर्माधिकारी


           वर्धा,दि.23-बालकांमध्‍ये अलीकडील काळात नितीमुल्‍याचा –हास होत असल्‍यामुळे भविष्‍यात समाजापुढे संकटे उभे राहण्‍याची शक्‍यता आहे. बालकामध्‍ये उत्‍तम विचार व चांगले गुण व संस्‍कार  देण्‍याची गरज असून, बाल हक्‍काचे संरक्षण  करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन न्‍या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी केले.
       सेवाग्राम येथील शांतीभवन येथे नई तालीम, बुनियादी शिक्षण आणि बालहक्‍क या विषयावर दोन दिवसीय राष्‍ट्रस्‍तरीय कार्यशाळेचे उदघाटन त्‍यांनी केले त्‍याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्‍यक्ष डॉ. सुगन बरंठ  हे होते. प्रमुख पाहूणे म्‍हणून अनिल फरसोले, अ.ना. त्रिापाठी, सुषमा शर्मा व कुसुमबेन शहा , जि.प.मुख्‍यकार्यकारी अधिकारी बि.एम. मोहन व अवर सचिव सतिश सुपे आदि मान्‍यवर मंचावर  उपस्थित होते.
       महात्‍मा गांधी यांनी 1937 साली नयी तालीम किंवा बुनियादी शिक्षण हे प्रायोगिक स्‍तरावर सुरुवात केली असल्‍याचे नमुद करुन न्‍या. धर्माधिकारी म्‍हणाले की अलिकडील काळात सामाजिक विषमतेमुळे बाल हक्‍काविषयी शासन करीत असलेले प्रयत्‍न उत्‍तम असले तरी पण ते दिर्घकाळ टिकले पाहीजे. नैसर्गिक साधन संपत्‍तीचा हक्‍क बालकांना देऊन तसेच समाजात समानता आणून बाल हक्‍काविषयी जटील समस्‍या सेाडविण्‍यासाठी प्रयत्‍न झाले पाहीजे असेही ते म्‍हणाले.
     प्रास्‍ताविक करताना त्रिपाठी म्‍हणाले की, बाल न्‍याय व काळजी संरक्षण अधिनियम 2006 साली कार्यान्वित करण्‍यात  आली. भारतीय घटनेच्‍या भाग 3 व 4 या दोन्‍हीमध्‍ये मुलांचे हक्‍काचे जास्‍तीत जास्‍त संरक्षण मिळावे. घटनेच्‍या कलम 19(अ) खाली सर्व मुलांना मोफत व सक्‍तीचे शिक्षण देण्‍याची तरतूद आहे. 1937 साली सेवाग्राम येथे नई तालीम बुनियादी शिक्षण सुरु झाले. याचे देशभरात 1 लाखापेक्षा अधिक शिक्षण संस्‍था होत्‍या. या नई तालीम बुनियादी शिक्षणाच्‍या माध्‍यमातून आजची शिक्षण प्रणाली अवलंबिल्‍यास सुसंस्‍कृत समाज घडण्‍यास मदत होईल. बालकांचा सर्वांगिण विकास हा शिक्षणाने होत असतो. बालकांना शिक्षणाची अधिक  ओढ निर्माण करण्‍याची गरज असल्‍याचे ते म्‍हणाले.
       कार्यक्रमाचे अध्‍यक्ष बरंठ म्‍हणाले की, आजही नई तालीम किंवा बुनियादी शिक्षणाकडे बालकांना आकृष्‍ट करण्‍याची गरज आहे. या शिक्षण प्रणालीमुळे मुल्‍यवर्धित विचार मुलांमध्‍ये रुजविल्‍यास सशक्‍त समाजाची निर्मिती होऊ शकेल असेही ते म्‍हणाले.
     या कार्यक्रमाचे विधीवत उदघाटन दिप प्रज्‍वलनाने झाले. या कार्यक्रमाचे संचालन प्रा. मोहन गुजरकर व ज्‍योती भगत यांनी केले तर आभार सतीश सुपे यांनी मानले. या कार्यक्रमाला देशभरातून अनेक मान्‍यवर उपस्थित होते.
                            00000

Wednesday 22 February 2012

राज्‍यमंत्री फौजिया खान यांचा दौरा


     वर्धा, दि.22- सामान्‍य प्रशासन विभाग, माहिती व जनसंपर्क, महिला व बालविकास राज्‍यमंत्री फौजीया खान यांचे दिनांक 24 फेब्रुवारी 2012 रोजी सकाळी  9 वाजता शासकीय विश्रामगृह, नागपूर येथून मोटारीने वर्धाकडे प्रयाण. 10.30 वाजता महाराष्‍ट्र राज्‍य बालहक्‍क संरक्षण आयोगाने नई तालीम/ बुनियादी शिक्षण व बाल हक्‍क या विषयावर आयोजित केलेल्‍या कार्यशाळेच्‍या समारोप कार्यक्रमास उपस्थिती. स्‍थळ शांतीभवन, नई तालीम परिसर सेवाग्राम आश्रम वर्धा, दुपारी 12.30 वाजता सेवाग्राम वर्धा येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.
                               0000

सेवाग्राम आश्रम येथे दोन दिवसीय राष्‍ट्रस्‍तरीय कार्यशाळा


             वर्धा,दि.22- महाराष्‍ट्र  राज्‍य  बाल क्‍क  संरक्षण आयोगाचे वतीने 23 आणि 24 फेब्रुवारी 2012 रोजी नयी तालीम केंद्र, सेवाग्राम आश्रम येथे बुनियादी शिक्षण आणि बाल क्‍क या विषयावर राष्‍ट्रस्‍तरीय  कार्यशाळा आयोजित करत आली आहे.
         नयी तालिम किंवा बुनियादी शिक्षण हे स्‍तकला व्‍दारे  शिक्षण प्रदान करणारे मानले जाते, ही अवधारणा महात्‍मा  गांधी यांनी 1937 साली प्रायोगिक तत्वावर  सुरुवात केली. शिक्षणाच्‍या  आवश्‍यकतेची अवधारणा आहे. जी त्‍य  प्रेम किंवा जीवनाची विविध कार्यशैली याशी  निगडीत आहे. सर्वांगिण विकास तसेच मस्तिष्‍कचे सर्वांगिण विकास होईल ही अवधारणा नयी तालिमची आहे. शारिरीक श्रमाव्‍दारे शिक्षण मिळणे हे बालहक्‍काच्‍या विरोधात जाते का ? या सर्व विषयावर प्रकाश टाकण्यासाठी या कार्यक्रमाचा आयोजनाचा हेतू आहे.
         कार्यक्रम सुचिनुसार 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 10.45 वाजता कार्यक्रमाचे उदघाटन, सकाळी 11 ते 11.45 या वेळेत पहिले सत्रात बुनियादी शिक्षणाचे ऐतिहासिक रुपरेखा विकास. दुपारी 12 ते 12.45  व्दितीय सत्रात 21 व्‍या  शतकामधील नयी तालीम बुनियादी शिक्षणाचे महत्‍व .  दुपारी 12.45 ते 1.30 वाजता तीस-या सत्रात बाल अधिकाराच्‍या संदर्भामधील बुनियादी शिक्षण आधुनिक शिक्षण यांचा तुलनात्‍मक  भ्‍यास  तसेच आधुनिक शिक्षण ध्‍दती.  दुपारी 2 ते 2.45 या चौथे सत्रात बुनियादी शिक्षा / नवी तालीम याची अवधारणा अंमलबजावणी. दुपारी 3 ते 3.45 वाजता पाचवे सत्रामध्‍ये विविध अधिनियम नियमाखाली दिलेले बालकांचे क्‍क त्‍याची अंमलबजावणी तसेच ऐतिहासिक अवधारणा. 3.45 ते 4.30 वाजता सहाव्‍या  सत्रामध्‍ये शारिरीक श्रमाचे महत्‍व  तसेच प्राचीन अर्वाचीन शिक्षणाचे संदर्भात (सुत कताई, विणकाम, गोसेवा शेती त्‍यादी संदर्भात.  दुपारी 4.30 ते 5.15 वाजता सातवे सत्रामध्‍ये  आधुनिक जीवन ध्‍दती कुटूंबाचे विघटन, बालकांच्‍या  क्‍काचे संरक्षणाचे संदर्भात कार्यशाळेत मार्गदर्शन होणार आहे. संध्याकाळी दक्षिण ध्‍य सांस्‍कृतीक केन्‍द्राच्‍या  वतीने लोककलेचे कार्यक्रम सादर होतील.
         दिनांक 24 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 ते 10 वाजता आनंद निकेतन अवलोकन भेट, सकाळी 10 ते 10.15 वाजता खुली चर्चा, दुपारी 11.30 ते 1.30 वाजता सामुहिक विचार विनिमय, भविष्‍य  कालीन कार्यक्रम दुपारी 2 ते 2.45 वाजता सादरीकरण होईल.
      या कार्यशाळेत प्रमुख वक्‍त   म्‍हणून न्‍या . चंद्रशेखर धर्माधिकारी, वर्धेचे डॉ. अनिल फरसोल,  सुषमा शर्मा, करुणा फुटाणे, नसीम, पश्चिम बंगालचे प्रसाददास गुप्‍ता , हरिपाद महातो, अहमदाबादचे सुखदेव पटेल, डॉ. राजेंद्र खिमानी, भावनगरचे फाल्‍गून शेठ, नागपूरचे डॉ. निलिनी मिसळ, दिल्‍लीच्‍या  गिता धर्मपाल, तामिळनाडूचे एस.कुलंदयस्‍वामी   डॉ. सी. शेबगवली, पुण्‍याचे सुर्यकांत कुळकर्णी, दिल्‍लीचे .पी. दुबे, डॉ. श्‍वरदयाल सुनिल क्‍का आदि क्‍ते  कार्यशाळेला मार्गदर्शन करतील.
            या कार्यक्रमाला उपस्थित राहण्‍याचे  आवाहन बालहक्‍क संरक्षण आयोगाचे सचिव .ना.त्रिपाठी यांनी केले आहे.
                                                       000000

Tuesday 21 February 2012

वर्धा जिल्‍ह्यात 37 (1) 3 कलम जारी


      वर्धा,दि.21-वर्धा जिल्‍ह्यात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी यासाठी जिल्‍हा दंडाधिकारी जयश्री भोज यांना प्रदान केलेल्‍या अधिकारान्‍वये मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37(1) आणि (3) कलम जारी केले आहे.
     या कलमाचा अंमल दि.2 मार्च 2012 च्‍या रात्री 12 वाजेपर्यंत राहणार असून, या कलमाचा भंग करणा-या व्‍यक्‍ती विरुध्‍द कायदेशिर कारवाई करण्‍यात येईल असे आदेशात नमूद आहे.
                     0000000

पल्‍स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ


     वर्धा,दि.19- पल्‍स पोलिओ लसीकरणाची मोहिम आज संपुर्ण राज्‍यभर राबविण्‍यात येत आहे. या मोहिमेचा नागरी भागातील सुभारंभ नगर पालिकेचे अध्‍यक्ष आकाश शेंडे व ग्रामीण क्षेत्राचा शुभारंभ जि.प.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांच्‍या हस्‍ते पाच वर्षाखालील बालकांना पल्‍स पोलीओचे दोन थेंब पाजून करण्‍यात आले.

     येथील सामान्‍य रुग्‍णालयात झालेल्‍या कार्यक्रमात जिल्‍हा शल्‍यचिकित्‍स डॉ.रत्‍ना रावखंडे , वैद्यकीय अधिकारी डॉ.शर्मा, डॉ.दिक्षीत नगर पालिकेचे मुख्‍याधिकारी विजय खोराटे तर प्राथमिक आरोग्‍य केंद्र आजी येथे झालेल्‍या कार्यक्रमात जि.प.उपमुख्‍यकार्यकारी अधिकारी विवेक बोंदरे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.के.झेड राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्‍मीकांत झोड, डॉ.कल्‍पना सुतनकारी, डॉ.प्रविण धाकटे, अनूराधा  जाधव व प्रणाली चौधरी उपस्थित होते.
     वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगांवत 30 हजार 454 लाभार्थी असून त्‍यासाठी 182 पोलिओ केंद्र कार्यरत राहणार आहेत. त्‍यासाठी 543 कर्मचारी कार्यरत असून, 36 पर्यवेक्षक लक्ष देवून आहेत. पल्‍स पोलिओ लसीकरणाच्‍या कामासाठी 400 शितकरण बॉंक्‍स लागणार असल्‍याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.शर्मा यांनी दिली.
     प्राथमिक आरोग्‍य केंद्र आंजी (मोठी) या क्षेत्रामध्‍ये 28 गांवे असून 16 ग्रामपंचायती आहेत. या गांवामध्‍ये 5 वर्षाखालील 7 हजार 208 लाभार्थी असून पोलिओ  केंद्र 60 राहणार आहे. 360 ऑइस बॉंक्‍स लागणार असून 166 कर्मचारी कार्यरत असतील असे वैद्यकीय अधिकारी झोड यांनी सांगितले.
     पल्‍स पोलिओ लसीकरण मोहिमेतून एकही बालक सुटणार नाही. यांची पालकांनी तसेच ओरोग्‍य कर्मचा-यांनी काळजी घ्‍यावी. बालकांला पोलिओ लस दिल्‍यास भविष्‍यात त्‍यांना अपंगत्‍व येणार नाही, बालक सुदृढ राहील अशी भावना नगराध्‍यक्ष शेंडे व मुख्‍य कार्यकारी अधिकारी मोहन यांनी व्‍यक्‍त केली.
     यावेळी मोठया संख्‍येने अधिकारी व कर्मचारी व बालकांचे पालक उपस्थित होते.
                      ०००००