Tuesday 21 February 2012

पल्‍स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ


     वर्धा,दि.19- पल्‍स पोलिओ लसीकरणाची मोहिम आज संपुर्ण राज्‍यभर राबविण्‍यात येत आहे. या मोहिमेचा नागरी भागातील सुभारंभ नगर पालिकेचे अध्‍यक्ष आकाश शेंडे व ग्रामीण क्षेत्राचा शुभारंभ जि.प.चे मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांच्‍या हस्‍ते पाच वर्षाखालील बालकांना पल्‍स पोलीओचे दोन थेंब पाजून करण्‍यात आले.

     येथील सामान्‍य रुग्‍णालयात झालेल्‍या कार्यक्रमात जिल्‍हा शल्‍यचिकित्‍स डॉ.रत्‍ना रावखंडे , वैद्यकीय अधिकारी डॉ.शर्मा, डॉ.दिक्षीत नगर पालिकेचे मुख्‍याधिकारी विजय खोराटे तर प्राथमिक आरोग्‍य केंद्र आजी येथे झालेल्‍या कार्यक्रमात जि.प.उपमुख्‍यकार्यकारी अधिकारी विवेक बोंदरे, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी डॉ.के.झेड राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ.लक्ष्‍मीकांत झोड, डॉ.कल्‍पना सुतनकारी, डॉ.प्रविण धाकटे, अनूराधा  जाधव व प्रणाली चौधरी उपस्थित होते.
     वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगांवत 30 हजार 454 लाभार्थी असून त्‍यासाठी 182 पोलिओ केंद्र कार्यरत राहणार आहेत. त्‍यासाठी 543 कर्मचारी कार्यरत असून, 36 पर्यवेक्षक लक्ष देवून आहेत. पल्‍स पोलिओ लसीकरणाच्‍या कामासाठी 400 शितकरण बॉंक्‍स लागणार असल्‍याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.शर्मा यांनी दिली.
     प्राथमिक आरोग्‍य केंद्र आंजी (मोठी) या क्षेत्रामध्‍ये 28 गांवे असून 16 ग्रामपंचायती आहेत. या गांवामध्‍ये 5 वर्षाखालील 7 हजार 208 लाभार्थी असून पोलिओ  केंद्र 60 राहणार आहे. 360 ऑइस बॉंक्‍स लागणार असून 166 कर्मचारी कार्यरत असतील असे वैद्यकीय अधिकारी झोड यांनी सांगितले.
     पल्‍स पोलिओ लसीकरण मोहिमेतून एकही बालक सुटणार नाही. यांची पालकांनी तसेच ओरोग्‍य कर्मचा-यांनी काळजी घ्‍यावी. बालकांला पोलिओ लस दिल्‍यास भविष्‍यात त्‍यांना अपंगत्‍व येणार नाही, बालक सुदृढ राहील अशी भावना नगराध्‍यक्ष शेंडे व मुख्‍य कार्यकारी अधिकारी मोहन यांनी व्‍यक्‍त केली.
     यावेळी मोठया संख्‍येने अधिकारी व कर्मचारी व बालकांचे पालक उपस्थित होते.
                      ०००००

No comments:

Post a Comment