Friday 24 February 2012

शिक्षण प्रणालीत महात्‍मा गांधीचे तत्‍वे अंतर्भुत करणे गरजेचे - फौजीया खान


           वर्धा, दि.24- मुलांचा योग्‍य प्रकारे विकास करण्‍यासाठी तसेच त्‍यांचे संगोपण करण्‍यासाठी काळजी घेणे प्रत्‍येक पालकांचे कर्तव्‍य ठरते परंतू कुसंगतीमुळे व आरोग्‍य संस्‍कारामुळे मुलं इतर मार्गाचा अवलंब करतात. हे टाळण्‍यासाठी आधुनिक शिक्षण प्रणाली प्रभावीपणे कार्य करीत असून, त्‍यामध्‍ये अधिक बळकटी येण्‍यासाठी राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधीचे तत्‍व अंतर्भूत करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क व महिला व बालकल्‍याण विकास विभागाच्‍या राज्‍यमंत्री फौजीया खान यांनी केले.
     सेवाग्राम येथील शांतीभवनात येथे महाराष्‍ट्र राज्‍य बाल हक्‍क संरक्षण आयोगाच्‍या वतीने नयी तालीम किंवा बुनियादी शिक्षण आणि बाल हक्‍क संरक्षण या विषयावर दोन दिवसीय राष्‍ट्रस्‍तरीय कार्यशाळेची समाप्‍ती झाली  त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. याप्रसंगी मंचावर जर्मनीच्‍या प्रा. गिता धरमपाल, नई तालीम समितीचे सचिव अनिल फरसोले, डॉ. राजेंद्र खिमानी, बाल हक्‍क संरक्षण आयोगाचे सचिव अ.ता. त्रिपाठी व जिल्‍हा महिला व बाल विकास अधिकारी मनिषा कुरसंगे आदी मान्‍यवर मंचावर उपस्थित होते.
    स्‍वातंत्र्य पूर्व काळात सेवाग्रामला ऐतीहासीक महत्‍व प्राप्‍त असल्‍याचे सांगून राज्‍यमंत्री फौजीया खान म्‍हणाल्‍या की, या भुमिमध्‍ये कार्यशाळा संपन्‍न होणे ही आनंदाची बाब आहे. शिक्षणाच्‍या ओझ्याखाली मुलांचे बालपण हरविल्‍या  जात असते. परंतू त्‍यांना महात्‍मा गांधीजींच्‍या नई तालीम शिक्षण प्रणाली नुसार शिक्षण दिल्‍यास भविष्‍यात उत्‍तम विद्यार्थी घडू शकतात. शासनाने  बालहक्‍क संरक्षणासाठी अनेक कायदे केलेले आहे. परंतू सामाजिक दारिद्र्य  मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये, याकरीता शासन सातत्‍याने प्रयत्‍नशिल आहे. मुलांच्‍या दृष्‍टीने शिक्षण महत्‍वाचे आहे. या शिक्षण पध्‍दतीमध्‍ये महात्‍मा गांधीजीच्‍या तत्‍वाचे महत्‍व अधिक आहे. बालकांचे हक्‍क अबाधित ठेवण्‍यासाठी शासन पुरेपुर प्रयत्‍नशील असून, आयेाजित करण्‍यात आलेली कार्यशाळा मुलांचे भविष्‍य घडविण्‍यासाठी उपयुक्‍त ठरेल असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.               
     यावेळी प्रा. धरमपाल म्‍हणाल्‍या की, माझ्या  वडिलांनी सेवाग्राम येथे येवून महात्‍मा गांधीजीच्‍या विचाराने प्रभावित झाले. 1937 व्‍या वर्षी नई तालीमच्‍या माध्‍यमातून अनेक बालकांना योग्‍य मार्गदर्शन देवून दिशा देण्‍याचे कार्य केले. नई तालीम किंवा बुनियादी शिक्षण पध्‍दतीने मुलांमध्‍ये उत्साह संचारले जाईल व नवनविन प्रगतीचे मार्ग खुले होतील असेही त्‍या म्‍हणाल्‍या.
     प्रास्‍ताविक करताना त्रिपाठी म्‍हणाले की, बालहक्‍क संरक्षण यावर दोन दिवसापासून विचार मंथन झाले असून, देशांतीच्‍या अनेक राज्‍यामधून अनेक मान्‍यवर येवून त्‍यांनी त्‍यांचे विचार व्‍यक्‍त केले. सेवाग्राम या ऐतीहासीक स्‍थळापासून प्रेरणा घेतलेल्‍या  अनेक मान्‍यवरांचे मार्गदर्शन लाभलेले त्‍यांचे विचार बालहक्‍क संरक्षण आयोगाला मोलाचे ठेवा उपयेागी सिध्‍द होईल असेही ते म्‍हणाले.
     या कार्यक्रमाचे संचलन मिस मेरी यांनी केले तर आभार राजेंद्र खेमानी यांनी मानले. याप्रसंगी देशभरातील अनेक राज्‍यातून आलेले प्रतिनिधी उपस्थित होते.
                              0000 

No comments:

Post a Comment