Tuesday 3 April 2012

परीक्षा केन्‍द्रावर 144 कलम लागू


      वर्धा, दि.3-  लिपीक नि टंकलेखक  आणि शिपाई पदाची  परीक्षा रविवार, दि. 8 एप्रिल 2012  रोजी   अग्रगामी हायस्‍कुल ,आर्वी नाक्याजवळ,आर्वी रोड, वर्धा,  जे.बी. सायन्‍स कॉलेज, सिव्‍हील लाईन, वर्धा,  सुशिल हिंमत सिंघका विद्यालय, महिला आश्रम,सेवाग्राम रोड वर्धा, रत्‍नाबाई विद्यालय,महादेवपुरा वर्धा, केसरीमल गर्ल्‍स  हायस्‍कुल, शिवाजी चौक,वर्धा, भारत ज्ञान मंदीरम कॉन्‍व्‍हेंट, शिवाजी चौक, वर्धा या  केंद्रावर घेण्‍यात येणार आहे.
      परीक्षा सुरळीतपणे पार पडाव्‍या साठी जिल्‍हा दंडाधिकारी  जयश्री  भोज, यांनी  केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू केले आहे. यानुसार 8 एप्रिल 2012 रोजी सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्‍या 100 मिटर   परिसरात दोन किंवा त्‍यापेक्षा अधिक व्‍यक्‍तींनी एकत्रित येण्‍यावर प्रतिबंध करण्‍यात आले आहे. तसेच झेरॉक्‍स, फॅक्‍स, मोबाईल फोन, ई-मेल व इंटरनेट आदी सेवेवर प्रतिबंध घालण्‍यात आले आहे.
                                                     00000000 

नझुल जमिनीबाबत सुधारीत धोरण


       वर्धा, दि.3 : तत्‍कालीन मध्‍यप्रदेश शासन किंवा सी.पी. ॲन्‍ड बेरार जमीन महसूल अधिनियमान्‍वये शासनाने निवासी वाणिज्यिक आणि औद्योगिक प्रयोजनासाठी भाडेपट्टयाने दिलेल्‍या नझुल किंवा शासकीय जमिनीसंदर्भात सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या  आदेशांमध्‍ये सुसूत्रता आणणे,जमिनीच्‍या भाडेपट्टयाचे नुतणीकरण करणे, शर्तभंग नियमित करणे व अन्‍य बाबींच्‍या अनुषंगाने   महाराष्‍ट्र शासनाने नागपूर व अमरावती विभागातील नझुल किंवा शासकिय जमिनीबाबात सुधारीत धोरण  जाहीर केले आहे. ही भाडे पट्टयांची मुदत 1 जानेवारी 2012 पूर्वी संपुष्‍टात आली आहे असे भाडेपट्टे 1 जानेवारी 2012 पासून पुढील 30 वर्ष मुदतीसाठी शासकीय दराने भूई भाड्याची आकारणी करुन नुतनीकरण करण्‍यात येतील.
      नझुल जमिनीच्‍या भाडेपट्टयांचे वर्ग 2 मध्‍ये रुपांतर करता येईल. भाडेपट्टे धारकांना अस्‍तीत्‍वातील भाडे पट्टयाचे रुपांतर कब्‍जे हक्‍काने वर्ग 2 धारण प्रकारात करावयाचे असल्‍यास शासकीय दराने रक्‍कम  जमा करुन  रुपांतरण करता येईल.
     शर्तभंग प्रकरणे नियमानुकुल करता येईल. यामध्‍ये भाडेपट्टयातील अटी व शर्तीचा भंग करुन अनधिकृत हस्‍तांतरण किंवा वापरात बदल झाले असल्‍यास 25 टक्‍के अनर्जित
उत्‍पन्‍नाची  रक्‍कम भरुन शर्तभंग नियमानुकुल करता येईल.
      अधिक माहितीसाठी जिल्‍हाधिकारी कार्यालय अथवा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात संपर्क साधावा. सदर शासन निर्णय शासनाच्‍या संकेतस्‍थळावर www.maharashtra.gov.in  उपलब्‍ध करण्‍यात आला असून, त्‍याचा संकेतांक 201112291036511251001 आहे.
                                                00000000

अंतरीम सेवा जेष्‍ठता यादी प्रसिध्‍द


       वर्धा, दि.3- वर्धा जिल्‍हा परिषदेअंतर्गत प्राथमिक शिक्षकांना सेवेच्‍या 24 वर्षानंतर निवडश्रेणीचा  लाभ देण्‍याकरीता जे कर्मचारी  1 जानेवारी 1986 ला  कार्यरत होते. अश्‍या सर्व   शिक्षकांची सेवा जेष्‍ठता यादी प्रसिध्‍द करण्‍यात आली. यादी  पाहण्‍याकरीता व आक्षेप नोंदविण्‍याकरीता शिक्षणाधिकारी (प्राथ.) व गट शिक्षणाधिकारी  यांच्या कार्यालयात उपलब्‍ध आहे.
        सेवा जेष्‍ठता यादीवर 10 एप्रिल 2012 पर्यंत संबंधीत गटशिक्षणाधिकारी कार्यालयात लेखी आक्षेप नोंदवावे.  असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथ.) जिल्‍हा परिषद, वर्धा  यांनी केले आहे
                                                       000000