Wednesday 18 April 2012

उष्‍माघातापासून बचाव असा करा


       वर्धा,दि.18- उन्‍हाळ्यामध्‍ये शेतावर अथवा इतर मजूरीची कामे फार वेळा    करणा-या कारखान्‍याच्‍या बॉयलर रुममध्‍ये तसेच जास्‍त तापमानाच्‍या खोलीमध्‍ये काम करणे, घट्ट कपड्यांचा वापर भर उन्‍हात करणे, अनवाणी फिरणे अशा प्रत्‍यक्ष उष्‍णतेशी अथवा तापमानातील वाढत्‍या परिस्थितीशी सतत संबंध येण्‍याने उष्‍माघात होतो. उष्‍माघातात थकवा येणे, ताप येणे, त्‍वचार कोरणी पडणे, भूक न लागणे, चक्‍कर येणे, निरुत्‍साही होणे, डोके दुखणे, रक्‍तदाब वाढणे, बेशुध्‍दावस्‍था ही उष्‍माघाताची लक्षणे आहेत.
    यावर प्रतिबंधक उपाय म्‍हणून वाढत्‍या तापमानातील फार वेळे कष्‍टाची कामे करणे टाळावीत. कष्‍टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्‍याकाळी कमी तापमान असताना करावीत. उष्‍णता शोषूण घेणारे कपडे काळ्या किंवा भडक रंगाचे वापरु नयेत. सैल, पांढ-या रंगाचे कपडे वापरावेत. ओ.आर.एस. द्रावणाचा वापर करावा. पाणी भरपूर प्‍यावे. अधूनमधून उनहामध्‍ये काम करणे टाळावे व सावलीत विश्रांती घ्‍यावी. उनहात बाहेर जातांना गॉगल्‍स, डोक्‍यावर टोपी, टॉवेल, फेटा याचा वापर करावा. उष्‍माघात उपचार रुग्‍णास हवेशीर खोलीत ठेवावे. खोलीत पंखे , कुलर ठेवावेत. वातानुकूलीत खोलीत ठेवावे. रुग्‍णांचे तापमान खाली आणन्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न करावेत. रुग्‍णास बर्फाच्‍या पाण्‍याने आंघोळ घालावी. रुग्‍णाच्‍या कपाळावर थंड पाण्‍याच्‍या पट्टया ठेवाव्‍यात, आईसपॅक लावावेत.
     बाटली बंद पेये मग ते कोणतेही असो, ते कृत्रीम असेल तर त्‍याच्‍यात पोषणमुल्‍य कमी असुन आर्थिक दृष्‍ट्याही परवडणारे नसतात. तरीपण गेल्‍या काही वर्षात शहरात तसेच प्रत्‍येक खेड्यापाड्यात सुध्‍दा ज्‍या ठिकाणी पिण्‍याचे पाणी मिळत नाही अशा वस्‍तीतही ही थंड पेये पोहोचली आहेत. या थंड पेयात नेमके काय असते ते या बाटल्‍यांच्‍या लेबलवर कधीच लिहीलेले नसते. परंतु अनेक प्रयोग शाळेतील विश्‍लेषणा अंती या कोल्‍डींक मध्‍ये विरघळलेला कार्बनडॉय ऑक्‍साईड, कॅफीन, सायट्रीक अॅसिड, फॉस्‍फरीक अॅसीड, प्राणीजन्‍य ग्‍लीसरीन आदि शरीरास अपाय करणारे घटक मोठ्या प्रमाणात असतात. म्‍हणून प्रत्‍येकाने आकर्षक, मोहक व कल्‍पक अशा जाहीरातींना बळी न पडता व शरीराला पोषक असणारे घरी उपलब्‍ध असणारे पारंपारिक पेयाचा उपयोग करावा. कोल्‍डींकला उत्‍तम पर्याय म्‍हणून ताजे ताक, कैरीचे पन्‍हे, उसाचा रस, लिंबू सरबत, शहाळ्याचे पाणी, कोणत्‍याही फळाचा रस यासारखी नैसर्गीक पेये वापरल्‍यास शरीरामध्‍ये चैतन्‍य निर्माण होऊन मन उत्‍साहीत होऊन शरीराची पोषण द्रव्‍याची कमतरता भरुन निघते व शरीराला निरोगी ठेवून उष्‍माघातापासुन संरक्षणही होते.
                               0000000

नझुल जमिन बाबत सुधारीत धोरण


      वर्धा,दि.18-नागपूर व अमरावती विभागातील नझूल किंवा शासकीय जमिनीबाबत सूधारीत धोरण शासनाने दि. 28 डिसेंबर 2011 रोजी जाहीर   केले आहे. त्‍यानूसार नझूल जमिनीच्‍या  भाडेपट्टयांचे नूतणीकरण करण्‍यासाठी ज्‍या भाडेपट्टयांची मुदत दि. 1 जानेवारी 2012 पूर्वी संपुष्‍टात आली आहे असे भाडे पट्टे दि. 1 जानेवारी 2012 पासून पुढील 30 वर्ष मुदतीसाठी शासकीय दराने  भूई भाड्याची आकारणी करुन नुतनीकरण करण्‍यात येतील.
      नझूल जमिनीच्‍या भाडेपट्टयांचे वर्ग 2 मध्‍ये रुपांतर करण्‍यासाठी ज्‍या भाडेपट्टा   धारकांना अस्तित्‍वातील भाडे पट्टयाचे रुपांतर कब्‍जे हक्‍काने   वर्ग-2  धारण प्रकारात करावयाचे असल्‍यास शासकीय दराने रक्‍कम खजिना दाखल करुन रुपांतरण करता येईल.
      शर्तभंग नियमानूकूल करण्‍यासाठी भाडेपट्ट्यातील अटी व शर्तीचा भंग करुन अनधिकृत हस्‍तांतरण किंवा वापरात बदल झाले असल्‍यास 25 टक्‍के अनर्जित उत्‍पन्‍नाची रक्‍कम भरुन शर्तभंग नियामनुकुल करता यईल.
     अधिक माहितीसाठी जिल्‍हाधिकारी कार्यालय अथवा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात संपर्क साधावा.असे उपविभागीय अधिकारी,    नझूल अधिकारी, हिंगणघाट यांनी कळविले आहे.
                              000000