Wednesday 18 April 2012

नझुल जमिन बाबत सुधारीत धोरण


      वर्धा,दि.18-नागपूर व अमरावती विभागातील नझूल किंवा शासकीय जमिनीबाबत सूधारीत धोरण शासनाने दि. 28 डिसेंबर 2011 रोजी जाहीर   केले आहे. त्‍यानूसार नझूल जमिनीच्‍या  भाडेपट्टयांचे नूतणीकरण करण्‍यासाठी ज्‍या भाडेपट्टयांची मुदत दि. 1 जानेवारी 2012 पूर्वी संपुष्‍टात आली आहे असे भाडे पट्टे दि. 1 जानेवारी 2012 पासून पुढील 30 वर्ष मुदतीसाठी शासकीय दराने  भूई भाड्याची आकारणी करुन नुतनीकरण करण्‍यात येतील.
      नझूल जमिनीच्‍या भाडेपट्टयांचे वर्ग 2 मध्‍ये रुपांतर करण्‍यासाठी ज्‍या भाडेपट्टा   धारकांना अस्तित्‍वातील भाडे पट्टयाचे रुपांतर कब्‍जे हक्‍काने   वर्ग-2  धारण प्रकारात करावयाचे असल्‍यास शासकीय दराने रक्‍कम खजिना दाखल करुन रुपांतरण करता येईल.
      शर्तभंग नियमानूकूल करण्‍यासाठी भाडेपट्ट्यातील अटी व शर्तीचा भंग करुन अनधिकृत हस्‍तांतरण किंवा वापरात बदल झाले असल्‍यास 25 टक्‍के अनर्जित उत्‍पन्‍नाची रक्‍कम भरुन शर्तभंग नियामनुकुल करता यईल.
     अधिक माहितीसाठी जिल्‍हाधिकारी कार्यालय अथवा उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात संपर्क साधावा.असे उपविभागीय अधिकारी,    नझूल अधिकारी, हिंगणघाट यांनी कळविले आहे.
                              000000

No comments:

Post a Comment