Saturday 19 November 2011

संगणक वेब डिझायनिंग प्रशिक्षणाचे आयोजन


महाराष्ट्र शासन
प्र.प.   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा             दि.19/11/2011
------------------------------------------------------------------
   वर्धा,दि.19- जिल्‍ह्यातील विशेष घटक व सर्वसाधारण प्रवर्गातील बेरोजगार युवक व युवतींसाठी  दि. 25 नोव्‍हेंबर 2011 ते 24 डिसेंबर 2012 पर्यंत सेवाग्राम येथे निःशुल्‍क संगणक वेब डिझायनिंग प्रशिक्षणाचे आयोजन  करण्‍यात आले आहे.सदरहु प्रशिक्षण जिल्‍हा उद्योग केंद्र आणि समाज कल्‍याण कार्यालयाव्‍दारे  प्रायोजित आहे.
   प्रशिक्षणासाठी ऊमेदवाराचे शिक्षण सुरु नसावे,वय 18 ते 40 वर्षाचे  दरम्‍यान असावे, शिक्षण 12 वा वर्ग पास/नापास किंवा संगणकाबद्दल माहिती असणे अनिवार्य आहे. पात्र उमेदवारांनी अधिक माहितीकरीता  नजमा शेख मो.9689252558 प्रोग्राम ऑर्गनायझर, महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केन्‍द्र, वर्धा 07152-244123 यांचेशी संपर्क साधावा.
   अर्जासह स्‍वःता हजर राहावे व सोबत वयाचा दाखल (टि.सी.),शैक्षणिक पात्रता(मार्कशिट),जातीचा दाखला, सेवायेाजन कार्ड व 2 छायाचित्रे आणि प्रमाणपत्राच्‍या मुळ प्रती व झेरॉक्‍स प्रत सोबत आणावे. कागदपत्रे सादर केल्‍यानंतर उमेदवारांनी दि.23 नोव्‍हेंबर रोजी सकाळी 11-30 वाजता कार्यबल समितीपुढे प्रत्‍यक्ष मुलाखतीसाठी महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केंद्र वर्धा व्‍दारा जिल्‍हा  उद्योग केन्‍द्र, वर्धा येथे हजर रहावे. निवड झालेल्‍या  प्रशिक्षणार्थींची यादी दि. 24 नोव्‍हेंबर 2011 रोजी सुचना फलकावर लावण्‍यात येईल. प्रशिक्षण पूर्ण करणा-या प्रशिक्षणार्थींना रु. 1000 विद्यावेतन देण्‍यात येणार आहे.
                 ००००

Friday 18 November 2011

दिवगंत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना भावपूर्ण अभिवादन


                    महाराष्ट्र शासन
प्र.प.   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा दि.19/11/2011
------------------------------------------------------------------
           वर्धा,दि.19- देशाच्‍या दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्‍या जयंती निमित्‍ताने आज जिल्‍हाधिकारी कार्यालयात त्‍यांचे प्रतिमेचे पुजन करुन व पुष्‍पहार घालून अप्‍पर  जिल्‍हाधिकारी संजय भागवत यांनी त्‍यांचे स्‍मृतीला विनम्र अभिवादन केले.
      यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचा-यांनी राष्‍ट्रीय एकात्‍मतेची शपथ घेतली. याप्रंसगी अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.
                                   000000

आचार संहिता कक्ष प्रमुख म्‍हणून जे.बी. संगितराव



                  महाराष्ट्र शासन
प्रसिध्‍दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.18/11/2011
------------------------------------------------------------------
   वर्धा,दि.18- नगर परिघदांचा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषीत केला असून दिनांक 1 नोव्‍हेंबर 2011 पासून संपूर्ण नगर परिषदांचे क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू करण्‍यात आलेली आहे. त्‍या करीता जिल्‍हास्‍तरावर आचार संहिता कक्ष निर्माण करण्‍यता येत असून त्‍याचे कक्षप्रमुख म्‍हणून यापूर्वी निवासी उपजिलहाधिकारी आर.आर.खवले यांनी नियुक्‍ती करण्‍यता आली होती ती रद्द करुन त्‍यांच्‍या जागी उपजिल्‍हाधिकारी जे.बी.संगितराव यांची नियुक्‍ती तात्‍काळ प्रभावासह करण्‍यात आली आहे.
     जिल्‍ह्यात निवडणूकीचे कालावधीमध्‍ये आचारसंहितचे काटेकोरपणे पालन होण्‍याचे दृष्‍टीने योग्‍य ती कार्यवाही करणे, निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडून आचार संहिताबाबत माहिती प्राप्‍त करणे, आचारसंहितेचा भंग होत असेल तर कायदेशिर कारवाई करणे तसेच शासन स्‍तरावरुन वेळोवेळी प्राप्‍त आदेश वेब साईडवरुन प्राप्त   करुन ते जिल्‍हाधिकारी यांना अवगत करुन दणे, निवडणूकीची माहिती वेब साईडवर टाकणे व त्‍याअनुषंगाने इतर अनुषंगीक कार्य करणे इत्‍यादी कामांची जबाबदारी त्‍यांच्‍यावर राहणार आहे असे एका आदेशात जिल्‍हाधिकारी वर्धा कळवितात.
                     00000 

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्‍यस्‍तरीय पुरस्‍काराचे मानकारी समुद्रपूर येथील विद्या विकास कनिष्‍ठ महाविद्यालय


                  महाराष्ट्र शासन
प्रसिध्‍दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.18/11/2011
------------------------------------------------------------------
     वर्धा,दि.18-राज्‍यातील सामाजिक वनीकरणाच्‍या वनेत्‍तर क्षेत्रावरील  वृक्षारोपन व संवर्धन यामध्‍ये उत्‍कृष्‍ठ कामगिरी केल्‍या बाबत सन 2009 या वर्षाचा  छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कार शैक्षणिक संस्‍थे अंतर्गत समुद्रपूर तालुक्‍यातील विद्या विकास कनिष्‍ठ महाविद्यालय यांना मिळाला असल्‍याची माहिती उपसंचालक सामाजिक वनीकरण वर्धा यांनी दिली आहे.
     नागपूर वृत्‍त  स्‍तराअंतर्गत शैक्षणिक संस्‍थामधून प्रथम पुरस्‍काराचे मानकरी समुद्रपूर येथील विद्या विकास कनिष्‍ठ महाविद्यालय ठरलेली असून, व व्दितीय पुरस्‍कार वर्धा तालुक्‍यातील आंजी (मोठी) येथील गर्ल्‍स हायस्‍कुल व कनिष्‍ठ  महाविद्यालय यांना प्राप्‍त झाला आहे.
       राज्‍यस्‍तरावरील प्रथम पुरस्‍काराची रक्‍कम 50 हजार असून विभाग स्‍तरावरील प्रथम  पुरस्‍काराची रक्कम 25 हजार व व्दितीय पुरस्‍काराची रक्‍कम 15 हजार रुपये आहे. सदर पुरस्‍कार शासनाच्‍या वतीने आयोजित करण्‍यात येणा-या समारंभात वितरीत करण्‍यात येईल.
     छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्‍कारासाठी विविध संवर्गामध्‍ये कार्यरत व्‍यक्‍ती, शैक्षणिक संस्‍था, सेवाभावी संस्‍था कडून सन 2009 यावर्षी प्रस्‍ताव सामाजिक वनीकरण विभाग वर्धा यांनी मागविले होते ते शासनाला सादर करण्‍यता आले होते. सादर करण्‍यात आलेल्‍या प्रस्‍तावा पैकी वर्धा जिल्‍ह्याचे नाव लौकीक ठरावे असे शैक्षणिक संस्‍थाने राज्‍य व विभागीय स्‍तरावरील पुरस्‍कार   प्राप्‍त  करुन यशाचे मानकरी ठरले. शैक्षणिक संस्‍थानाने केलेल्‍या उत्‍कृष्‍ट कामगीरीसाठी उपमहासंचालक,नागपूर(वृत्‍त) व उपसंचालक, सामाजिक वनीकरण वर्धा यांनी त्‍यांचे अभिनंदन केले आहे.
                     000000

महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळचा वसुली पंधरवाडा


                  महाराष्ट्र शासन
प्रसिध्‍दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.18/11/2011
------------------------------------------------------------------
              वर्धा, दि.18- महात्‍मा फुले मागावसर्ग विकास महामंडळ (मर्या) वर्धा यांच्‍या दिनांक 14 ते 28 नोव्‍हेंबर 2011 पर्यंतवसुली पंधरवाडा पाळण्‍यात येत आहे. ज्‍या लोकांनी महात्‍मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या) वर्धा मार्फत योजनेत कर्ज घेतलेले आहे. त्‍यांनी थकीत असलेल्‍या  कर्जाची या कालावधीत अधिकाधिक जमा करुन सहकार्य करावे. असे आवाहन जिल्‍हा व्‍यवस्‍थापक, महात्‍मा  फुले मागासवर्ग विकास महामंडळ,वर्धा यांनी केले आहे.
                        0000

Thursday 17 November 2011

नगरपालिका वर्धा प्रभाग रचना

प्रभाग क्रमांक व
प्रभागाचे नांव (असल्यास)
लोकसंख्या 
(
२००१ च्या जनगणनेनुसार)
प्रभागातील प्रमुख स्थळे
सध्याचे आरक्षण
प्रभाग क्र.  1

------
एकूण  : 8519 
अ.जा.  703 
अ.ज.  986
1 साने गूरूजी नगर , गांधी नगर , इसाजी लेआऊट , यशवंत कॉलनी वर्धा , जिल्‍हा मध्‍यवर्ती कारागृह वर्धा 
अ - अनुसूचित जमाती (स्त्री)

ब - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)

क - सर्वसाधारण

ड - सर्वसाधारण


प्रभाग क्र.  2

--------
एकूण  : 9647 
अ.जा.  1414 
अ.ज.  1417
2. स्‍नेहलनगर लक्ष्‍मीनगर , सिव्‍हीललाईन , महादेवपुरा बुरड मोहल्‍ला इतवारा, महिलाश्रम  
अ - अनुसूचित जाती (स्त्री)

ब - अनुसूचित जमाती

क - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

ड - स्त्रियांसाठी


प्रभाग क्र.  3
एकूण  : 9812 
अ.जा.  329 
अ.ज.  476
3. गोंडप्‍लाट , हवालदारपुरा, महादेवपुरा,धंतोली , टिळक भाजी मार्केट 
अ - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

ब - स्त्रियांसाठी

क - स्त्रियांसाठी

ड - सर्वसाधारण


प्रभाग क्र.  4

--------
एकूण  : 9330 
अ.जा.  434 
अ.ज.  639
4. म्‍हाडा कॉलनी, गजानन नगर , साबळे प्‍लॉट , प्रताप नगर ,मुणेत लेआऊट , मानस मंदिर,  
अ - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

ब - स्त्रियांसाठी

क - स्त्रियांसाठी

ड - सर्वसाधारण


प्रभाग क्र.  5

--------
एकूण  : 8203 
अ.जा.  58 
अ.ज.  585
5. देवरनकर लेआऊट संततुकारामवार्ड, शारदानगर, साईनगर ,इंदिरा मार्केट चौक  
अ - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

ब - स्त्रियांसाठी

क - स्त्रियांसाठी

ड - सर्वसाधारण


प्रभाग क्र.  6
एकूण  : 10096 
अ.जा.  994 
अ.ज.  407
6. रामनगर, पेदार बगीचा, मगन संग्रहालय, हिंदनगर, रानडे प्‍लॉट, एसटी डेपो,  
अ - अनुसूचित जाती (स्त्री)

ब - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)

क - सर्वसाधारण

ड - सर्वसाधारण


प्रभाग क्र.  7

------
एकूण  : 9248 
अ.जा.  447 
अ.ज.  434
7. भामटीपुरा, बजाजचौक, कृष्‍णनगर, बिगसी नेमा, शास्‍त्री चौक पोद्यार बगीचा ,  
अ - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)

ब - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

क - स्त्रियांसाठी

ड - सर्वसाधारण


प्रभाग क्र.  8

------
एकूण  : 8608 
अ.जा.  5017 
अ.ज.  435
8. वर्धा बसस्‍थानक, गणेश थियेटर, आनंदनगर, पुल फैल, अशोकनगर, तारु फैल 
अ - अनुसूचित जाती

ब - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)

क - स्त्रियांसाठी

ड - सर्वसाधारण


प्रभाग क्र.  9

--------
एकूण  : 8523 
अ.जा.  2043 
अ.ज.  714
9. शिवनगर, हुनुमान नगर , शिवाजीपेठ, स्‍टेशन फैल, दयालनगरचा काही भाग, रेल्‍वे दवाखाना  
अ - अनुसूचित जाती

ब - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)

क - स्त्रियांसाठी

ड - सर्वसाधारण


प्रभाग क्र.  10

--------
एकूण  : 6581 
अ.जा.  2490 
अ.ज.  263
10. राष्‍ट्रभाषा प्रचार समिती , सानेवाडी, गौरक्षण, रेल्‍वेक्‍वार्टर, दयालनगर, बंडेंवार लेआऊट  
अ - अनुसूचित जाती (स्त्री)

ब - नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)

क - सर्वसाधारण