Monday 14 November 2011

गर्भजल चिकित्‍सा रोखण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय दक्षता पथक


महाराष्ट्र शासन
प्रसिध्‍दी पत्रक      जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.14/11/2011
--------------------------------------------------------------------
          गर्भजल चिकित्‍सा रोखण्‍यासाठी
            जिल्‍हास्‍तरीय दक्षता पथक
     वर्धा,दि.14-स्‍त्रीभ्रुण हत्‍या रोखण्‍यासाठी असलेल्‍या गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा 2003 ची कडक अंमलबजावणी व्‍हावी यासाठी वर्धा येथे जिल्‍हास्‍तरीय दक्षता पथक स्‍थापन करण्‍यास शासनाने मंजूरी प्रदान केली आहे.
     जिल्‍हास्‍तरावरील दक्षता पथकाची रचना खालीलप्रमाणे आहे.
     या जिल्‍हाधिकारी अध्‍यक्ष असून, आयुक्‍त, महानगरपालिका (जिल्‍ह्यात महापालिका असल्‍यास) सह अध्‍यक्ष, मुख्‍य कार्यकारी अधिकारी आणि  पोलीस अधीक्षक सदस्‍य आहेत. जिल्‍हा शल्‍य चिकित्‍सक सदस्‍य सचिव म्‍हणून असणार आहे. सदस्‍यांमध्‍ये वैद्यकीय आरोग्‍य अधिकारी, मनपा, सर्व समुचित प्राधिकारी, जिल्‍हा शासकीय अभिभोक्‍ता, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी, जिल्‍हा माहिती अधिकारी, शिक्षण अधिकारी (माध्‍यमिक किंवा प्राथमिक), उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी (बालकल्‍याण), समाज     कल्याण अधिकारी, पत्रकार संघ प्रतिनिधी, स्‍त्री भ्रुण हत्‍येविरोधात काम करणा-या स्‍वयंसेवी संस्‍थाचे प्रतिनिधी, जिल्‍हाधिका-यांना योग्‍य वाटतील असे इतर सदस्‍यांचा समावेश राहणार आहे.
     दक्षता पथकाच्‍या कार्यकक्षेमध्‍ये  जिल्‍ह्यातील सर्व समुचित प्राधिकारी यांनी केलेल्‍या कामाचा आढावा घेणे, जिल्‍हा  व तालुका सल्‍लागार समितीच्‍या कामाचा आढावा घेणे, F फॉर्म ऑनलाईन कामाचा आढावा घेणे, टोल फ्री नंबर, आमची मुलगी डॉट कॉम वेबसाईट व इतर       माध्‍यमातून प्राप्‍त  झालेल्‍या  तक्रारीवर करण्‍यात आलेल्‍या कार्यवाहीचा आढावा घेणे. स्‍त्री भ्रुण हत्‍या टाळण्‍याच्‍या अनुषंगाने सामाजिक संस्‍थाच्‍या सहभागाने प्रबोधनात्‍मक जनजागृती कार्यक्रम राबविणे. जिल्‍ह्यातील व तालुक्‍यातील सोनोग्राफी केंद्र, एमटीपी केंद्र यांची नोंदणी व नुतनीकरण याबाबत आढावा घेणे.
     गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याचा प्रसार, प्रचार व प्रभावी अंमलबजावणी करुन स्‍त्री भ्रुण हत्‍या रोखण्‍यासाठी राबविण्‍यात येणा-या विविध उपाय योजनेचा भाग म्‍हणून जिल्‍हाधिकारी यांच्‍या नेतृत्‍वाखाली जिल्‍हास्‍तरीय दक्षता पथक कार्यरत राहील. त्‍याची बेठक दर महिन्‍याचा 5 तारखेस (सुट्टी असल्‍यास लगतच्‍या कामकाजाच्‍या दिवशी) घेण्‍यात येईल व त्‍याचा कार्यवृत्‍तात दरमहा अतिरिक्‍त संचालक, कुटुंब कल्‍याण , पुणे यांना सादर करण्‍यात येईल. असे आदेश नमूद करण्‍यात आले आहे.
                   000000

No comments:

Post a Comment