Saturday 19 November 2011

संगणक वेब डिझायनिंग प्रशिक्षणाचे आयोजन


महाराष्ट्र शासन
प्र.प.   जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा             दि.19/11/2011
------------------------------------------------------------------
   वर्धा,दि.19- जिल्‍ह्यातील विशेष घटक व सर्वसाधारण प्रवर्गातील बेरोजगार युवक व युवतींसाठी  दि. 25 नोव्‍हेंबर 2011 ते 24 डिसेंबर 2012 पर्यंत सेवाग्राम येथे निःशुल्‍क संगणक वेब डिझायनिंग प्रशिक्षणाचे आयोजन  करण्‍यात आले आहे.सदरहु प्रशिक्षण जिल्‍हा उद्योग केंद्र आणि समाज कल्‍याण कार्यालयाव्‍दारे  प्रायोजित आहे.
   प्रशिक्षणासाठी ऊमेदवाराचे शिक्षण सुरु नसावे,वय 18 ते 40 वर्षाचे  दरम्‍यान असावे, शिक्षण 12 वा वर्ग पास/नापास किंवा संगणकाबद्दल माहिती असणे अनिवार्य आहे. पात्र उमेदवारांनी अधिक माहितीकरीता  नजमा शेख मो.9689252558 प्रोग्राम ऑर्गनायझर, महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केन्‍द्र, वर्धा 07152-244123 यांचेशी संपर्क साधावा.
   अर्जासह स्‍वःता हजर राहावे व सोबत वयाचा दाखल (टि.सी.),शैक्षणिक पात्रता(मार्कशिट),जातीचा दाखला, सेवायेाजन कार्ड व 2 छायाचित्रे आणि प्रमाणपत्राच्‍या मुळ प्रती व झेरॉक्‍स प्रत सोबत आणावे. कागदपत्रे सादर केल्‍यानंतर उमेदवारांनी दि.23 नोव्‍हेंबर रोजी सकाळी 11-30 वाजता कार्यबल समितीपुढे प्रत्‍यक्ष मुलाखतीसाठी महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केंद्र वर्धा व्‍दारा जिल्‍हा  उद्योग केन्‍द्र, वर्धा येथे हजर रहावे. निवड झालेल्‍या  प्रशिक्षणार्थींची यादी दि. 24 नोव्‍हेंबर 2011 रोजी सुचना फलकावर लावण्‍यात येईल. प्रशिक्षण पूर्ण करणा-या प्रशिक्षणार्थींना रु. 1000 विद्यावेतन देण्‍यात येणार आहे.
                 ००००

No comments:

Post a Comment