Monday 14 November 2011

जिल्हास्तरीय महसूल क्रिडा स्‍पर्धा: विविध समितीचे गठण


                      महाराष्ट्र शासन
प्र.प.क्र.616  जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.14/11/2011
--------------------------------------------------------------------
   जिल्हास्तरीय महसूल क्रिडा स्‍पर्धा: विविध समितीचे गठण
 वर्धा,दि.14- वर्धा जिल्हासतरीय महसूल क्रिडा समितीचे गठण करण्यात आले असून विविध समित्यांचे समिती प्रमुख आणि त्यांची कार्ये पुढील प्रमाणे आहे.  
समितीमधे जिल्हाधिकारी जयश्री भोज समिती प्रमुख असून  यामधे संजय भागवत, अप्पर जिल्हाधिकारी, राजेश खवले निवासी जिल्हाधिकारी, संजय दैने, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, आर.एन.अनभोरे जिल्हा पुरवठा  अधिकारी, रमन जैन उपजिल्हाधिकारी वि.भु.अ., आर.बी.खजांजी उपजिल्‍हाधिकारी वि.भु.अ., शैलेंद्र मेश्राम उपजिल्हाधिकारी वि.भु.अ.सामान्य व प्रभारी निवडणूक अधिकारी, जे.बी. संगीतराव उपजिल्‍हाधिकारी वि.भु.अ. लसिका, पी.एस.डायरे, जिल्हा नियेाजन अधिकारी, ए.के.आझाद, उपजिल्हाधिकारी, रोहोयो. यांनी सर्व समितीच्या कामात समन्वय व आवश्यक निर्णय घेणे, वित्तीय व्यवस्थापन करणे, क्रीडा स्पर्धा संबधी आढावा घेणे, क्रिडा स्पर्धा इतर कामे व मार्गदर्शन करणे. आदी कामे या समित्‍यांना देण्‍यात आली आहेत.
स्वागत समारोह समितीप्रमुख राजेश खवले असून यामधे निवासी उपजिल्हाधिकारी, प्रदिप अग्निहोत्री जिल्हा नाझीर, खातदेवे अ.का, राजेंद्र अनफाट अ.का, ए.आर.गुप्ता अ.का. यांचे साठी स्वागत व समारोप कार्यक्रमाची व्यवस्था करणे, प्रमुख अतिथी ठरविणे, निमंत्रण पत्रिका पाठविणे, प्रमाणपत्र छपाई करणे.
 क्रिडा आयोजन व साहित्य व्यवस्था समिती प्रमुख धार्मिक उपविभागीय अधिकारी आर्वी हे असून यामधे जिल्हा क्रिडा अधिकारी, श्रीमती निघडे अधिक्षक, राहुल सारंग, नायब तहसिलदार, अनफाट अ.का. यांनी क्रिडा साहित्याची व्यवस्था करणे, क्रिडांगणाची आखणी व व्यवस्था करणे व लॉट्स टाकणे, खेळासाठी ग्राऊंड उपलब्ध करुन देणे, खेळाडूंना चहा, पाणी, औषधी आदीची व्यवस्था करणे, अंतिम निकाल पत्रक तयार करुन निवडलेल्या खेळाडूंची यादी तयार करणे. जिल्ह्यातील पात्र खेळाडूंची निवड यादी तयार करणे,इत्यादी कामे सोपविण्यात आली आहेत.
भोजन समिती प्रमुख मधे आर.एन.अनभोर जिल्हा पुरवठा अधिकारी असून यामधे रविंद्र फुलझेले, सहाय्यक जि. पुरवठा अधिकारी, नारायण ठाकरे नायब तहसिलदार यांचेकडे सर्व प्रमुख अतिथी, खेळाडू, पाहूणे, विविध अधिकारी यांचेसाठी चहापाणी, नास्ता , भोजन इत्यादी व्यवस्था करणे.
संपर्क व माहिती समिती प्रमुख पी.एस.डायरे जिल्हा नियेाजन अधिकारी, प्रशांत दैठणकर जिल्हा माहिती अधिकारी यांचेकडे क्रिडा स्पर्धा बाबत समितीशी संपर्क ठेवून माहिती ठेवणे व आवश्यकतानुसार माहिती उपलब्ध करुन देणे इत्यादी कामे सोपविण्यात आली आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रम समिती प्रमुख असून आर.बी.खजांजी उपजिल्हाधिकारी  अजय धर्माधिकारी, संजय नेवारे, गणेश कुळकर्णी यांचेकडे सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी करणे, वेळापत्रक ठरविणे त्यानुसार कार्यक्रम सुरु करणे, लाईट, डेकोरेशन, माईक, स्टेज ची व्यवस्था करणे इत्यादी कामे सोपविण्यात आली आहेत.
          जिल्हास्तरीय सल्लागार समितीचे पुनर्गठण
     वर्धा,दि.14- शासनाचे निर्णयान्वये जिल्ह्यातील केबल व व्हिडीओ पायरसिला आळा घालणे, केबल ऑपरेटर्स व केबल ग्राहकांच्या समस्या व इतर अनुषंगिक बाबींचा विचार करण्याकरीता जिल्हास्तरीय सल्लागार समिती स्थापन करण्यात आली समितीचे अध्यक्ष व सदस्य पुढील प्रमाणे आहेत.
     जिल्हाधिकारी वर्धा समितीचे अध्यक्ष असून, शासकीय सदस्य जिलहा पोलीस अधिक्षक, सदस्य सचिव निवासी उपजिल्हाधिकारी, अशासकिय सदस्यामधे (चित्रपटगृह मालकांचा प्रतिनिधी) प्रदिप रविंद्रकुमार बजाज, गणेश टॉकीज, वर्धा, केबल ऑपरेटर्सचा प्रतीनिधी तथा पालक मंत्री महोदयांव्दारे नामनिर्देशित) ओम बाळकृष्णजी ठाकरे केबल ऑपरेटर्स , (व्हिडीओ थिएटर्स मालकाचाप्रतीनिधी) म्हणून त्रिवेणीप्रसाद विश्वकर्मा सुनिल व्हिडीओ सेंटर, (ब्रॉडकास्टर्सचा प्रतिनिधी) मनोहर जग्याशी , (मल्टिसिस्टम ऑपरेटर्सचा प्रतीनिधी) रोशन अली असगर अली मल्टिसिस्टम आूपरेटर्स, (ग्राहक मंचाचा प्रतिनिधी) सौ. सुषमा प्रदीप जोशी जिल्हा ग्राहक मंच, पालक मंत्री महोदयाव्दारे नामनिर्देशित  संजय रामदासजी देखमुख  आणि संदिप शास्त्रकार  यांचा समावेश करण्यात आला आहे.
     जिल्हास्तरीय समितीच्‍या  कार्यकक्षे अंतर्गत जिल्हयातील केबल पायरसिला आळा घालण्या संबंधीच्या उपाय योजनांचा आढावा घेवून  त्यातील त्रूटी दूर करण्यासाठी शिफारशी करणे, जिल्ह्यातील व्हिडीओ पायरसिला आळा घालण्यासंबधी उपाय योजनांचा आढावा घेवून त्यातील त्रूटी  दूर करण्यासाठी शिफारशी करणे, केबल व व्हिडीओ पायरसी संबंधीच्या तक्रारीचे तात्काळ निराकरणकरण्याच्यादृष्टीने जरुर ती उपाययोजना सुचविणे, केंद्र शासनाच्या केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (रेग्यूलेशन )अॅक्ट 1995 च्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवणे व मुंबई करमणूक शुल्क अधिनियम 1923 मधील केबल दुरचित्रवाणीवरील करमणूक शुल्‍क  वसूली संबंधीच्या तरतूदींच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे.
     जिल्हास्तरीय समितीवरील अशासकिय सदस्य मानद तत्वावर नियूक्त करण्यात येत असून या सदस्यांना कोणतेही भत्ते अनुज्ञेय नसतील. जिल्हास्तरीय समितीची बैठक दर तीन महिन्यातून किमान एकदा घेण्यात येईल. असे जिल्हाधिकारी जयश्री भोज यांनी एका आदेशाव्दारे कळविले आहे.
                      000000

No comments:

Post a Comment