Friday 18 November 2011

छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्‍यस्‍तरीय पुरस्‍काराचे मानकारी समुद्रपूर येथील विद्या विकास कनिष्‍ठ महाविद्यालय


                  महाराष्ट्र शासन
प्रसिध्‍दी पत्रक    जिल्हा माहिती कार्यालय,वर्धा    दि.18/11/2011
------------------------------------------------------------------
     वर्धा,दि.18-राज्‍यातील सामाजिक वनीकरणाच्‍या वनेत्‍तर क्षेत्रावरील  वृक्षारोपन व संवर्धन यामध्‍ये उत्‍कृष्‍ठ कामगिरी केल्‍या बाबत सन 2009 या वर्षाचा  छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्‍यस्‍तरीय पुरस्‍कार शैक्षणिक संस्‍थे अंतर्गत समुद्रपूर तालुक्‍यातील विद्या विकास कनिष्‍ठ महाविद्यालय यांना मिळाला असल्‍याची माहिती उपसंचालक सामाजिक वनीकरण वर्धा यांनी दिली आहे.
     नागपूर वृत्‍त  स्‍तराअंतर्गत शैक्षणिक संस्‍थामधून प्रथम पुरस्‍काराचे मानकरी समुद्रपूर येथील विद्या विकास कनिष्‍ठ महाविद्यालय ठरलेली असून, व व्दितीय पुरस्‍कार वर्धा तालुक्‍यातील आंजी (मोठी) येथील गर्ल्‍स हायस्‍कुल व कनिष्‍ठ  महाविद्यालय यांना प्राप्‍त झाला आहे.
       राज्‍यस्‍तरावरील प्रथम पुरस्‍काराची रक्‍कम 50 हजार असून विभाग स्‍तरावरील प्रथम  पुरस्‍काराची रक्कम 25 हजार व व्दितीय पुरस्‍काराची रक्‍कम 15 हजार रुपये आहे. सदर पुरस्‍कार शासनाच्‍या वतीने आयोजित करण्‍यात येणा-या समारंभात वितरीत करण्‍यात येईल.
     छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्‍कारासाठी विविध संवर्गामध्‍ये कार्यरत व्‍यक्‍ती, शैक्षणिक संस्‍था, सेवाभावी संस्‍था कडून सन 2009 यावर्षी प्रस्‍ताव सामाजिक वनीकरण विभाग वर्धा यांनी मागविले होते ते शासनाला सादर करण्‍यता आले होते. सादर करण्‍यात आलेल्‍या प्रस्‍तावा पैकी वर्धा जिल्‍ह्याचे नाव लौकीक ठरावे असे शैक्षणिक संस्‍थाने राज्‍य व विभागीय स्‍तरावरील पुरस्‍कार   प्राप्‍त  करुन यशाचे मानकरी ठरले. शैक्षणिक संस्‍थानाने केलेल्‍या उत्‍कृष्‍ट कामगीरीसाठी उपमहासंचालक,नागपूर(वृत्‍त) व उपसंचालक, सामाजिक वनीकरण वर्धा यांनी त्‍यांचे अभिनंदन केले आहे.
                     000000

No comments:

Post a Comment