Monday 27 June 2016

मानव विकास निर्देशांक वाढविण्‍यासाठी
नाविण्‍यपूर्ण योजना राबवाव्‍या
                -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
वर्धा,दि.23-सामान्‍य लोकांचे जगणे उन्‍नत  होण्‍यासाठी  अधिका-यांनी काम करावे तसेच जिल्‍हा नियोजन आराखडा तयार करतांना जिल्‍हाचा मानव विकास निर्देशांकात वाढ होण्‍यासाठी नाविण्‍यपूर्ण योजना राबवाव्‍या अशा सुचना जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्‍या.
जिल्‍हा नियोजन समितीची  आढावा बैठक जिल्‍हाधिकारी यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हाधिकारी कार्यालयातील  सभागृहात घेण्‍यात आली यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. या बैठकीला जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे, नियोजन अधिकारी प्रकाश डायरे तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.
मागील तीन वर्षामध्‍ये राबविण्‍यात आलेल्‍या योजनाची माहिती कामाच्‍या व लाभार्थ्‍यांच्‍या यादया आणि  उपयोगिता प्रमाणपत्र तात्‍काळ सादर करण्‍याच्‍या सुचना त्‍यांनी दिल्‍या. जिल्‍हा नियोजन आराखडयामधून आतापर्यत करण्‍यात आलेल्‍या कामांची माहिती संकलीत  करण्‍यासाठी लवकरच अॅप तयार करण्‍यात येणार असल्‍याची माहिती त्‍यांनी दिली. या अॅपच्‍या माध्‍यमातून तयार झालेल्‍या डेटाबेसमुळे पुढील वर्षाचे नियोजन करणे सोपे होईल तसेच कामाची पुनरावृत्‍ती होणार नाही. यासाठी सर्व विभागांनी त्‍यांच्‍या मार्फत राबविण्‍यात आलेल्‍या योजनाची माहिती तात्‍काळ कामांच्‍या व लाभार्थ्‍यांच्‍या यादीसह सादर करावी.
सन 2016-17 या आर्थिक वर्षात  नियोजन आराखडयात आतापर्यंत केवळ 17 टक्‍के निधी वितरीत करता आला. त्‍यामुळे संबंधित सर्व विभागांनी या महिन्‍याच्‍या अखेर पर्यंत प्रस्‍ताव सादर करावे. त्‍यानंतरच ऑगष्‍ट महिन्‍यात सर्वांना निधी वितरीत करता येईल.
त्‍याचबरोबर 2 जुलै रोजी सर्व विभागांनी कार्यालयात स्‍वच्‍छता मोहिम राब‍वावी आणि कार्यालय स्‍वच्‍छ, सुंदर करावे असे आवाहन यावेळी त्‍यांनी केले.
                                                0000

                गावे जलयुक्‍त झाली का याचे सर्वेक्षण करावे
                                                           -जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल
Ø  प्रत्‍येक गावातील जलस्‍त्रोताचे मॅपींग
वर्धा,दि.23- जलयुक्‍त  शिवार अभियानांत सन 2015-16 मध्‍ये समाविष्‍ट  असलेल्‍या गावांमध्‍ये पाण्‍याच्‍या   ताळेबंदानुसार काम झाले किंवा नाही यासाठी या पावसाळयात सर्वेक्षण करावे. या सर्वेक्षनातुन गावे खरोखरच जलयुक्‍त झालीत की नाहीत याची माहिती घेवून जलयुक्‍त झालेल्‍या गावांची नावे जाहीर करावीत, असे निर्देश जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले.
जलयुक्‍त शिवार अभियानाची आढावा बैठक जिल्‍हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्‍हाधिकारी यांचे अध्‍यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे, जिल्‍हा अधिक्षक कृषी  अधिकारी  ज्ञानेश्‍वर भारती, जलयुक्‍त शिवार अभियानांत समाविष्‍ट  असलेल्‍या विभागाचे प्रमुख अधिकारी यांची उपस्थिती होती.
जलयुक्‍त शिवारमध्‍ये समाविष्‍ट असलेल्‍या गावांतील निरिक्षण विहिरी कोणत्‍या असाव्‍यात याची     शास्‍त्रोक्‍त  माहिती भूजल विकास यंत्रणेने दयावी. त्‍याचबरोबर या पावसाळयामध्‍ये प्रत्‍येक गावात असलेले जलस्‍त्रोताचे नकाशे तयार करावे. त्‍यासाठी प्रत्‍येक गावातील हँडपंप, सिमेंटनाला बांध, गावतलाव, वन तलाव, कोल्‍हापुरी बंधारे यांचे सर्वेक्षण करुन माहिती संकलित करावी. प्रत्‍येक गावातील जलस्‍त्रोताची एकत्रित माहिती असल्‍यास त्‍याची देखभाल दुरुस्‍ती करण्‍यास सोईस्‍कर होईल या कामासाठी तालुकास्‍तरावरील एका अभियंत्‍याची नियुक्‍ती  करावी आणि त्‍यांच्‍याकडे पाच गावाच्‍या सर्वेक्षणाची जबाबदारी दयावी अशाही सुचना त्‍यांनी यावेळी दिल्‍या.
            जलयुक्‍त शिवारमध्‍ये यावर्षी घेण्‍यात आलेल्‍या गावातील सर्व कामांच्‍या प्रशासकीय मान्‍यता ऑगष्‍ट अखेर पर्यंत घ्‍याव्‍यात. सप्‍टेंबर महिन्‍यात निविदा प्रक्रिया पूर्ण करुन पावसाळा संपताच ऑक्‍टोंबर पासुन जलयुक्‍त शिवारमधील कामे सुरु करावी अशा सुचना त्‍यांनी दिल्‍या. त्‍याचबरोबर ज्‍या गावांमध्‍ये गाव तलाव आहेत. त्‍यातील गाळ काढण्‍याची कामे प्राधान्‍याने हाती घ्‍यावीत. यासाठी महात्‍मा फुले जल व भुमी अभियानांतर्गत इंधनासाठी पैसे उपलब्‍ध आहेत. मागील वर्षीची सर्व कामे या महिना अखेर पर्यंत पूर्ण करण्‍याचे निर्देश त्‍यांनी यावेळी सर्व विभागांना दिले.  
                                                          00000


                                                 प्रत्‍येक ग्रामपंचायतीतआठवडयातून
एकदा होणार ग्रामसंवाद दिन
वर्धा,दि.23- गावाचा  विकास करण्‍यामध्‍ये ग्रामस्‍तरावरील प्रशासकीय यंत्रणेचा मोठा सहभाग आहे. मात्र ग्राम स्‍तरावरील ग्रामसेवक, कृषीसहाय्यक, तलाठी व वनसंरक्षक हे महत्‍वाचे कर्मचारी लोकांना विकासाच्‍या प्रक्रियेमध्‍ये मार्गदर्शनासाठी व चर्चेसाठी उपलब्‍ध होत नाही. त्‍यामुळे ग्रामिण विकासाचा सर्वकष आराखडा तयार करावयाचा झाल्‍यास गावातील लोकांना चर्चेसाठी व मार्गदर्शनासाठी उपलब्‍ध व्‍हावे यासाठी प्रत्‍येक ग्रामपंचायतीत आठवडयातून एका विशिष्‍ट  दिवशी ग्रामसंवाद दिनाचे आयोजन करावे अशा सुचना जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्‍या आहेत.
ग्रामसंवाद दिनी ग्रामसेवक, कृषीसहाय्यक, तलाठी, वनपाल हे ग्रामपंचायतीमध्‍ये उपस्थित राहून ग्रामिण लोकप्रतिनिधी आणि जनतेशी संवाद साधतील त्‍याकरिता दर आठवडयातील गुरुवार किंवा शुक्रवार हे दिवस ग्रामसंवादासाठी निश्चित करण्‍यात आले आहेत. ग्रामस्‍तरावरील कर्मचारी जनतेशी संवाद साधतील व ग्रामिण जनतेच्‍या समस्‍या जाणून घेऊन त्‍यांचे निराकरणासाठी संबंधितांना मार्गदर्शन करतील.
सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी तात्‍काळ एक संयुक्‍त सभ तहसिल स्‍तरावर आयोजित करुन ग्रामसंवाद उपक्रम आयेाजनाच्‍या अनुषंगाने ग्रामपंचायत पातळीवरील अधिका-यांना मार्गदर्शन करावे.  या ग्रामसंवाद दिनाची जनतेस माहिती होण्‍याकरीता ग्रामसंवादाची वेळ व उपस्थित राहणा-या ग्रामपातळीवरील अधिका-यांचे पदनाम ग्रामपंचायमध्‍ये प्रसिध्‍द करावे. अशा सुचना जिल्‍हाधिकारी यांनी काढलेल्‍या परिपत्रकामध्‍ये केल्‍या आहेत.
या उपक्रमाची यशस्‍वी अमलबजावणी होण्‍याकरिता उपविभागीय अधिकारी सनियंत्रणाची  जबाबदारी पार पाडतील असेही  जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी कळविले आहे.

                                                              0000
येत्‍या 30 जून पर्यंत सर्व शेतकक-यांना पिककर्ज वाटप करा
-         किशोर तिवारी
Ø  27 हजार शेतक-यांना 291 कोटीचे कर्ज वाटप
Ø  पिक कर्जा बाबत प्रत्‍येक बँकेत फलक लावा
Ø  बँकेत शेतक-यांचा अपमान होणार नाही
Ø  शेवटच्‍या शेतक-यापर्यंत कर्ज वाटप करा
Ø  30 जून पर्यंत 700 कोटीचे कर्ज वाटप करा

वर्धा,दि.16-अडचणीत सापडलेल्‍या शेतक-यांना पिककर्ज वाटप करतांना सर्व बँकानी सकारात्‍मक भूमिका घेऊन जिल्‍हयातील सर्व शेतक-यांना पिक कर्ज उपलब्‍ध करुन देतांनाच बँकेत येणा-या शेतक-यांना अपमानास्‍पद वागणूक मिळणार नाही याची खबरदारी घ्‍या अशा सुचना वसंतराव नाईक शेती स्‍वावलंबन मिशनचे अध्‍यक्ष किशोर तिवारी यांनी केले.
शेतक-यांना खरीप हंगामासाठी पिककर्ज वाटपासंदर्भात राष्‍ट्रीयकृत बँकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व विविध विभाग प्रमुख यांची संयुक्‍त बैठक आयो‍जित करण्‍यात आली होती. त्‍या प्रसंगी मार्गदर्शन करतांना किशोर तिवारी बोलत होते.
यावेळी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, मुख्‍य कार्यपालन अधिकारी नयना गुंडे, जिल्‍हा भाजपा अध्‍यक्ष राजेश बकाने, प्रशांत इंगळे तिगावकर, मिलींद भेंडे तसेच जिल्‍हाअधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती, अग्रणी बँक प्रबंधक  विजय जांगडा, निवासी उपजिल्‍हाधिकारी वैभव नवाडकर आदी उपस्थित होते.
शेतक-यांना खरीप हंगामासाठी पिक कर्ज देतांना खाजगी  सावकाराकडे जाण्‍याची आवश्‍यकता राहणार नाही याची खबरदारी घेण्‍याच्‍या सुचना करतांना किशोर तिवारी म्‍हणाले की, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 80 टक्‍के पेक्षा जास्‍त शेतकरी कृषी कर्जा अंतर्गंत यावे यासाठी अडीच लाख रुपयापर्यंतच्‍या कर्जासाठी मुद्रांक शुल्‍क माफ करण्‍याचा निर्णय घेतला आहे. तसेच कर्ज पुनर्गठणाची सुविधा असल्‍यामुळे अद्याप कर्ज न घेतलेले व ज्‍याना कर्ज हवे आहे अशा सर्व शेतकरी खातेदाराणा कर्ज उपलब्‍ध करुन द्या असे निर्देश बँकेच्‍या सर्व वरिष्‍ठ अधिका-यांना दिले.
पिक कर्ज वाटपाचे उद्ष्टिय ठरवून दिले असले तरी कर्ज मागणीसाठी येणा-या प्रत्‍येक शेतक-यांना कर्ज मिळेपर्यंत अर्ज वाटप सुरू ठेवा यासाठी कमीत कमी वेळात व तात्‍काळ कर्ज मिळेल अशी पध्‍दत लागू करा. जिल्‍हयात कर्ज वाटपामध्‍ये दिरंगाई करणा-या बँकाच्‍या व्‍यवस्‍थापका विरुध्‍द कारवाई करण्‍याचे निर्देशही यावेळी दिलेत.
शासकीय अनुदान कपात करु नका
शेतक-यांना मिळणा-या अनुदानातून कर्ज वसूली केली आहे अशा शेतक-यांना तात्काळ वसूल केलेली रक्‍कम संबंधीत शेतक-यांच्‍या खात्‍यात वळती करा.यापूढे शासकीय अनुदान कर्ज खात्‍यात वळते करू नका अशा स्‍पष्‍ट सूचना यावेळी जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिल्‍यात.
पिक कर्जा संदर्भात आलेल्‍या शेतक-यांच्‍या तक्रारीची दखल घेतांना ते पुढे म्‍हणाले की, प्रत्‍येक बँकानी पिक कर्ज वाटप सुरू आहे. या संदर्भात ठळकपणे दिशेल असे बोंर्ड लावून त्‍यावर शाखा व्‍यवस्‍थापका सर्व प्रमुख दुरध्‍वनी शेतक-यांसाठी उपलब्‍ध करून दयावे असेही त्‍यांनी सांगितले.
            बँकानी कर्ज पुरवठा करतांना शेतकरी कर्जासाठी बँकेत येतील याची वाट न पाहता प्रत्‍येक गावातील शेतकरी सदस्‍याची यादी नूसार प्रथम कर्ज घेणा-या शेतक-यांना बँकेच्‍या कक्षेत आणून त्‍यांना प्राधान्‍याने कर्ज पुरवठा करावा बॅंकानी यापूढे शेतक-यांच्‍या घरापर्यंत जावून पिक कर्ज उपल्‍ब्‍ध करुन देण्‍याची भूमिका घ्‍यावी असे आवाहन किशोर तिवारी यांनी केले.
प्रारंभी जिल्‍हाधिकारी  शैलेश नवाल यांनी स्‍वागत करुन प्रास्‍ताविक भाषणात जिल्‍हयात 4 हजार 377 शेतकरी सदस्‍याचे 45 कोटी रुपयाच्‍या कर्जाचे पुनर्गठन झाले आहे. 27 हजार 277 शेतक-यांना 291 कोटी रुपयाचे कर्ज वाटप पूर्ण झाले असून येत्‍या सात दिवसात 100 कोटीचे कर्ज वाटप पूर्ण होईल. 30 जून पर्यंत सरासरी 700 कोटीचे कर्ज वाटप पूर्ण करून जिल्‍हयात 80 टक्‍के पेक्षा जास्‍त शेतक-यांना पिक कर्ज उपलब्‍ध होईल यासाठी प्रत्‍येक बँकानी सुट्टीच्‍या दिवसीही बँका सुरू ठेवून कर्ज वाटप करावे.
            कर्ज वाटपासाठी आवश्‍यक असलेले सातबारा आठ अ तसेच आवश्‍यक दस्‍ताऐवज उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहे. कर्ज पूरवठा संदर्भात तहसीलदारानी नियमित आढावा घेऊन प्रत्‍येक बँकनिहाय माहिती घ्‍यावी असेही त्‍यांनी सांगितले.
अग्रणी बँक प्रबंधक विजय जांगडा यांनी बँकनिहाय कर्ज वितरणा संदर्भात दिलेले उद्ष्ट्यि व झालेल्‍या कार्यवाही संदर्भात माहिती दिली.
0000
             
 

एक मुल एक वृक्ष ही संकल्‍पना राबवणार
-नयना गुंडे
·         वृक्षलागवड मोहिमेत जिल्हा परिषदेचा  पुढाकार
·         1 लक्ष 60 हजार वृक्ष लावण्‍याचे नियोजन
·         शाळा व महाविद्यालयाचा सहभाग

वर्धा,दि 13- दोनकोटी वृक्षलागवड मोहिमेत जिल्‍हा परिषदेतर्फे एक लक्ष 60 हजार वृक्ष लावण्‍याचे नियोजन पुर्ण करण्‍यात आले आहे. शहरातील व जिल्‍हयातील शाळामध्‍ये एक मुल एक वृक्ष या संकल्‍पणेमध्‍ये सर्व शाळाना सहभागी करुण घेण्‍यात येणार असल्‍याची माहि‍ती जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यपालन अधिकारी श्रीमती नयना गुंडे यांनी दिली.
जिल्‍हयात 1 जुलै रोजी एकाच दिवशी दोनकोटी वृक्ष लागवड मोहिम राबविण्‍यात येत असून जिल्‍हा परिषदेतर्फे वृक्षलागवड  मो‍हिमेसाठी केलेल्‍या नियोजनाबद्दल माहिती देतांना श्रीमती नयना गुंडे बोलत होत्‍या .
            वृक्षलागवड मोहिमेत जिल्‍हा परिषदेतील सर्वच विभाग सहभागी होत असून प्रत्‍येक विभागांना त्‍यांच्‍याकडे उपलब्‍ध असलेल्‍या जागेनुसार वृक्षारोपण करण्‍यासंदर्भात उद्दिष्‍ट्य देण्‍यात आल्‍याचे सांगतांना श्रीमती नयना गुंडे म्‍हणाल्‍या की, ग्रामीण भागात ग्रामपंचायतनिहाय वृक्षारोपण  मोहिम यशस्‍वी करण्‍यासाठी गट विकास अधिकारी यांनी नियोजन केले आहे.409 ग्रामपंचायत क्षेत्रात 1 लक्ष 53 हजार 300 वृक्ष लावण्‍याचे घ्‍येय ठरविण्‍यात आले असून त्‍यापैकी 52 हजार 300 वृक्षखंड्डे तयार झाले आहेत.
जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी यांनी प्राथमिक आरोग्‍य केंद्र, उप केंद्र प‍रिसरात 210 जागाची निवड केली असून 2 हजार 740 वृक्ष लावण्‍याचा संकल्‍प केला आहे. यापैकी 2 हजार वृक्षखंड्डे तयार करण्‍यात आले आहेत. सिंचन विभागातर्फे 4 हजार 400 वृक्ष लागवडीची तयारी पुर्ण झाली आहे.
जिल्‍हा परिषदेच्‍या ग्रामीण भागातील सर्व रस्‍त्‍यांच्‍या दूतर्फा वृक्ष लावुन हरित पट्टा  निर्माण करण्‍याला प्राधान्‍य देण्‍यात आले आहे. त्‍यानूसार वृक्षलागवड मोहिमेची तयारी सुरु असल्‍याचेही श्रीमती नयना गुंडे यांनी सांगितले.
            पंचायत समिती व गावनिहाय वृक्षरोपन मोहिमेमध्‍ये दिनांक 1 जुलै रोजी प्रत्‍यक्ष वृक्षरोपन करण्‍यासाठी दिलेल्‍या उद्दिष्‍ट्याप्रमाणे आर्वी 60 गावे 8 हजार 450 वृक्ष, आष्‍टी 41 गावे 17 हजार 900 वृक्ष, देवळी 63 गावे 16 हजार 200 वृक्ष,हिंगणघाट 31 गावे 10 हजार 700 वृक्ष, कारंजा 38 गावे 7 हजार 500 वृक्ष,समुद्रपूर 69 गावे 24 हजार 50 वृक्ष,सेलु 61 गावे 13 हजार 500 वृक्ष, तर वर्धा तालुक्‍यातील 39 गावात 55 हजार वृक्ष लावण्‍याचे उद्दिष्‍ट्य देण्‍यात आले असून प्रत्‍यक्ष वृक्षारोपन मोहिमेची पूर्ण तयारी सुरू असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.
एक मूल एक वृक्ष
जिल्‍हयातील सर्व प्राथमिक, माध्‍यमिक तसेच हायस्‍कूल स्‍तरावरील शाळांमध्‍ये वृक्षलागवड मोहिमे बद्दल जागृती निर्माण करण्‍यात येत असून मुख्‍याध्‍यापकांनी एक मुल एक वृक्ष ही संकल्‍पना प्रत्‍यक्ष राबवून वृक्षरोपण मोहिम यशस्‍वी करावी अशा सूचना देण्‍यात आल्‍याची माहिती मुख्‍य कार्यपालन अधिकारी श्रीमती नयना गुंडे यांनी दिल्‍या आहेत.
जिल्‍हा परिषदेच्‍या सर्व शाळामध्‍ये ही मोहिम राबवि‍तांनाच सर्व खाजगी शाळांच्‍या मुख्‍याध्‍यापकांनी या मोहिमेत सहभागी होवून प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांनी  एक वृक्ष आपल्‍या घरी लावावे व त्‍याचे संगोपन करून ते जगवावे यासाठी पुढाकार घ्‍यावा शाळाच्‍या परिसरात दिनांक 1 जुलै रोजी सर्व शिक्षक व पदाधिका-यांनी वृक्षलागवड मोहिम राबवून शाळेचा परिसर हिरवा करावा असे आवाहन करण्‍यात आल्‍याचे मुख्‍य कार्यपालन अधिकारी श्रीमती नयना गुंडे यांनी केले आहे.
वृक्षलागवड मोहिमेत विविध शैक्षणिक संस्‍था तसेच पर्यावरण व वृक्ष रोपनक्षेत्रात निसर्ग सेवा समिती सह विविध संस्‍था रोटरी लायन तसेच विविध संघटनांनी पुढाकार करुन ही मोहिम यशस्‍वी करावी असे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यपालन अधिकारी श्रीमती नयना गुंडे यांनी केले आहे.

0000
वर्धा जिल्‍ह्यातील सर्वच शेतक-यांना मिळणार
राजीव गांधी जीवनदायी योजनेचा लाभ
·        शेतकरी आत्‍महत्‍याग्रस्‍त जिल्‍हयाचा समावेश
·        शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांना लाभ
वर्धा,दि 10-राजीव गांधी जीवनदायी आरोग्‍य योजने अंतर्गंत शेतकरी आत्‍महत्‍याग्रस्‍त 14 जिल्‍ह्यातील सर्वच शेतकरी कुटुंबांना लाभ मिळणार आहे. वर्धा जिल्‍ह्याचाही या योजनेत समावेश असून शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटुंबांना त्‍यांच्‍याकडे उपलब्‍ध असलेल्‍या शिधापत्रिका तसेच सातबाराच्‍या उता-यावर योजनेचा लाभ घेता येईल.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्‍य योजने अंतर्गंत औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागातील वर्धा या 14 शेतकरी आत्‍महत्‍याग्रस्‍त जिल्‍ह्यातील शुभ्र शिधाप्रत्रिकाधारक शेतकरी  कुटुंबांना लाभ देण्‍याचा महत्‍वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची अमलबजावणी सुरू झाली असून शेतकरी कुटुंबांनी योजनेचा लाभ घ्‍यावा असे आवाहन जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.
शेतकरी आत्‍महत्‍याग्रस्‍त जिल्‍हृयातील शुभ्र शिधाप्रत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना त्‍याच्‍याकडे उपलब्‍ध असलेल्‍या शिधापत्रिका तसेच सातबाराच्‍या उता-यावर योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्‍या शेतकरी कुटूंबांकडे कोणतीही शिधापत्रिका नाही अशा लाभार्थ्‍यांस फक्‍त त्‍यांच्‍याकडे असलेल्‍या सातबाराच्‍या उता-यावर योजनेचा लाभ घेता येईल. शेतकरी कुटुंबांतील कोणत्‍याही लाभार्थ्‍यांस विमा कंपनीने लाभ नाकारु नये अशा स्‍पष्‍टसूचना शासनातर्फे देण्‍यात आल्‍या आहे.
शेतकरी कुटुंबांतील सदस्‍याचे नाव शिधापत्रिका किंवा सातबाराच्‍या उता-यात समाविष्‍ट नसल्‍यास अशा परिस्थितीत सदर सदस्‍य हा त्‍या कुटुंबांतील असल्‍याचे प्रमाणपत्र संबंधित महसूल अधिका-याचे ग्राह्य धरण्‍यात येईल . लाभार्थी कुंटुंबाचा व्‍यवसाय हा फक्‍त शेती एवढाच असणे आवश्‍यक राहिल. शासकीय अथवा निमशासकीय सेवेत असलेल्‍या शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतक-याला योजनेचा लाभ घेता येणार नाही.

शहिदांचा राज्‍याला व देशाला अभिमान- मुख्‍यमंत्री
Ø काळजी करु नका, सरकार आपल्‍या पाठीशी
Øमुखमंत्रयांचा शहीदांच्‍या कुंटुबियांना दिला धीर
Ø व्हिडिओ कॉन्‍फरसिंगने साधला संवाद
Ø मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून धनादेश वाटप

वर्धा दि.3 – पुलगाव येथील घटना दुखद असून या घटनेत ज्‍या कुंटूबांनी आपला आधार गमावला त्‍या सर्वाच्‍या पाठीशी शासन ठामपणे उभे असून पुलगाव घटनेत शहिद झालेले व्‍यक्‍ती देशासाठी कार्य करतांना शहिद झाले आहेत. शहिदांच्‍या वारसांना  मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून तातडीने  मदत करण्‍यात येत असून ही मदत व्‍यक्‍ती पेक्षा मोठी नसून शहिदांचा राज्‍याला व देशाला अभिमान आहे, अशा शब्‍दात  मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. आज मुख्‍यमंत्री यांनी पुलगाव घटनेतील शहीद व्‍यक्‍तींच्‍या कुंटूबियासोबत व्हिडिओ कॉन्‍फरसिंगव्‍दारे  साधला संवाद साधला.
जिल्‍हाधिकारी कार्यालय येथे मुख्‍यमंत्री सहाय्यत निधीतून धनादेश वाटप कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला होता.  यावेळी खासदार रामदास तडस, आमदार रणजित कांबळे, आमदार  डॉ. पंकज  भोयर, आमदार समीर कुणावार, जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, निवासी उपजिल्‍हाधिकारी शिरीष  पांडे, उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील, केंद्रीय दारुगोळा भांडारच्‍या ज्‍योती गुळवे, तहसिलदार राहूल सारंग  व शहिद व्‍यक्‍तींचे कुंटूंबिय उपस्थित होते.

केंद्रीय दारुगोळा भांडार, पुलगाव येथील घटनेत 19 व्‍यक्‍ती शहिद झाले असून 17 जखमी झाले आहेत. मुख्‍यमंत्री सहायता निधीमधून घोषित केलेली सर्व रक्‍कम जिल्‍हा प्रशासनाला प्राप्‍त झाली असल्‍याचे जिल्‍हाधिकारी यांनी सांगितले. या घटनेत शहिद झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या वारसांना 5 लाख रुपये तर जखमींच्‍या कुंटूबियांना  1 लाख रुपये तातडीची मदत मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून घोषित करण्‍यात आली होती. रण्‍यात ंच्‍या ातेवातेवाईकांना शहिद 19 व्‍यक्‍ती पैकी 13 व्‍यक्‍तीच्‍या वारसांना  तर जखमीपैकी 13 व्‍यक्‍तीच्‍या  कुंटूबियांना  ही मदत आज धनादेशाव्‍दारे वाटप करण्‍यात आली. शहिद सहा व्‍यक्‍तींची ओळख पटली नसून ओळख पटताच तात्‍काळ त्‍यांच्‍या वारसांना मदत देण्‍यात येईल असे जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.
शहिद अमित दांडेकर यांच्‍या पत्‍नी प्राची दांडेकर यांनी मुख्‍यमंत्र्यांशी संवाद साधला. माझे पती शहिद झाले, अमर झाले, त्‍यांचा मला अभिमान आहे, अशा शब्‍दात प्राची दांडेकर यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. सरकार आपल्‍या पाठीशी आहे काळजी करु नका असा धीर  मुख्‍यमंत्र्यांनी यावेळी दिला. आज आणि भविष्‍यात आपल्‍या अडचणी सोडविण्‍यासाठी सरकार आपल्‍या पाठीशी असल्‍याची ग्‍वाही मुख्‍यमंत्री यांनी दिली.
मुबंई येथून व्हिडिओ कॉन्‍फरसिंगव्‍दारे  संवाद साधतांना पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, आजूबाजूच्‍या   पाच गावात आरोग्‍य शिबिर घेण्‍यात आले असून याचा लाभ 114 रुग्‍नांनी  घेतला आहे. पुलगावला तसेच केंद्रीय दारुगोळा भांडाराकडे जाणारे सर्व रस्‍ते उत्‍तम करण्‍यात येतील असेही त्‍यांनी सांगितले. पुलगाव पंचायत समितीला अग्निशमन यंत्र देण्‍यासंदर्भात प्रस्‍ताव पाठविण्‍याचे सांगितले असल्‍याचे पालकमंत्री म्‍हणाले.
      शहिद व्‍यक्‍तींच्‍या कुंटूबातील व्‍यक्‍तीला प्राधान्‍याने नौकरी देण्‍या संदर्भात केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्‍याचे पालकमंत्री यांनी सांगितले. त्‍याचप्रमाणे शहिद व जखमी व्‍यक्‍तींच्‍या कुंटूबियांच्‍या सर्व समस्‍या लिहून घ्‍या अशा सुचना जिल्‍हाधिकारी यांना दिल्‍या. या समस्‍या तातडिने सोडविण्‍यासाठी आपण प्रयत्‍न करणार असल्‍याचे ना. मुनगंटीवार यांनी सांगितले. 
      पुलगाव घटनेत शहिद झालेल्‍यामध्‍ये  के.मनोज कुमार, नवज्‍योत सिंग, धर्मेद्र के. यादव, अमित महादेव दांडेकर, प्रमोद महादेवराव मेश्राम, बालु पांडुरंग पाखरे, धनराज प्रभाकर मेश्राम, रनसिंग मिरसिंग, रामचंद्र, सत्‍यप्रकाश सिंग, अमित पुनिया सिंग, क्रिष्‍ण कुमार, शेखर गंगाधर बालसकर, कुलदिप सिंग, आर.एस. पवार, अरविंद कुमार सिंग, सतिश उमराव सिंग , लिलाधर बापुराव चोपडे यांचा समावेश आहे.
 जखमीमध्‍ये नेत्रपाल सिंग, लोकेश श्रीकृष्‍ण , राजेंद्र महाजन, स्‍वप्‍नील रमेश खुरगे, बच्‍चन सिंग , ललित कुमार, दिपक अर्जुन शिंदे, प्रदिप कुमार मुन्‍शीराम, संतोष पाटील, एस. त्रिपाठी, शरद यादव, जगदिश चंद्र, राम नामदेवराव वनकर , सतिश शालीकरामजी गवारकर, किशोर मोतीलाल साहू, धनेंद्र सिंग, सयाज कुमार यांचा समावेश आहे.

                                                       00000
आमचं गाव, आमचा विकास अभियान
प्रभाविपणे राबवा  -नयना गुंडे
वर्धा दि.7, 14व्‍या वित्‍त आयोगाचा निधी मिळविण्‍यासाठी प्रत्‍येक ग्रामपंचायतीनी आपला विकास आराखडा तयार  करुन  शासनाच्‍या मार्गदर्शक सचनेनुसार आमचं गाव, आमचा विकास या उपक्रमातंर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करुन त्‍याची प्रभावीपणे अमलबजावणी करावी अशा सुचना  जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी जिल्‍हा परिषदेच्‍या सभागृहात आयोजित सर्व जिल्‍हा स्‍तरीय विभाग  प्रमुखाच्‍या बैठकीत दिल्‍या.
            4 जुन रोजी जिल्‍हा परिषेदेच्‍या सभागृहात जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हयातील सर्व विभाग प्रमुखाची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी उप मुखयकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार , श्री इलमे , जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती यांची प्रमुख उपस्थितीत होती.
            गावातील विकासाबाबत अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्‍यात येऊन  . गावातील प्रश्‍न गावातच सोडविण्‍यात यावे. यासाठी आमचं गाव आमचा विकास उपक्रम  राबविण्‍यात येत आहे.  या उपक्रमातंर्गत जिल्‍हा, तालुका व ग्रामपंचायत  स्‍तरावर समिती तयार करुन प्रत्‍येक ग्रामपंयातींनी गावपातळीवर विकासाचे नियोजन करुन खर्चाचे नियोजन करावे, मानव विकास निर्देशांक विक‍सित करण्‍यावर ग्रामपंचायत स्‍तरावर प्राधान्‍य क्रम ठरविण्‍याचे व कौशल्‍य विकसित करण्‍यासाठी  तयार करण्‍यात येणार असून ग्रामपंचयात स्‍तरावर तयार करण्‍यात आलेला आराखडा तालुका स्‍तरावर व तालुका स्‍तरावरील आराखडा जिल्‍हा स्‍तरीय समिती मध्‍ये सादर करण्‍याच्‍या सूचना बैठकित नयना गुंडे यांनी दिल्‍या.
         राज्‍यातील सर्व ग्रामपंचायतींमध्‍ये ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्‍याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सदर विकास आराखडा तयार करतांना सदर उपक्रमाचे नाव आमंच गाव आमचा विकास असे राहील. विकास आराखडा 14 व्‍या आयोगाच्‍या कालावधीसाठी म्‍हणजे आर्थिक वर्ष 2015-16 ते 2019-20 करीता तयार करावयाचा आहे. ग्रामपंचायत विकास आराखडा हा उपक्रमाच्‍या प्रारंभास पंचवार्षिक बृहत विकास आराखडा व दरवर्षी वार्षिक कृती आराखडा असा दोन प्रकारे करण्‍यात यावा. सदर विकास आराखडा तयार करतांना  ग्रामपंचायतींने खालील प्रमाणे निधी विचारात घेणे गरजेचे आहे.
         ग्रामपंचायतींना विविध करांच्‍या माध्‍यमातून प्राप्‍त होणारा निधी ( मालमत्‍ता कर, पाणी कर व ग्राम निधी इत्‍यादी) . राज्‍य शासनाकडून प्राप्‍त होणारा महसूली हिस्सा ( उदा. जमिन महसूल उपकर, मुद्रांक शुल्‍क अनुदान इत्‍यादी), महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय  ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विकास कामांसाठी प्राप्‍त होणारा निधी, 14 व्‍या वित्‍त आयोगाचा निधी , स्‍वच्‍छ भारत अभियान अंतर्गत ग्रामपंचायती स्‍तरावर प्राप्‍त होणारा निधी, बक्षिसे व पारितोषिके यांच्‍या माध्‍यमातून ग्रामपंचायतींना मिळणारा निधी, लोकसहभागातून मिळणारा निधी, जिल्‍हा नियोजन मंडळाकडून प्राप्‍त होणारा निधी इत्‍यादी .
        पंचवार्षिक विकास आराखडा तयार करतांना ग्रामपंचायतीने अपेक्षित स्‍वःनिधीच्‍या दुप्‍पट कामे पुढील पाच वर्षात घेण्‍यासाठी प्रस्‍तावित करावयाची आहे. आराखड्यात कामे प्रस्‍तावित करतांना स्‍वानिधीसाठी शासनाने निकष तसेच महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी अनुषंगिक सूचना लागू राहतील. वार्षिक विकास आराखडयामध्‍ये अपेक्षित स्‍वःनिधीच्‍या दीड पट कामे प्रस्‍तावित करावयाची आहे. असेही नयना गुंडे यांनी यावेळी सांगितले..
                            00000

वर्धा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेत ठेवी सुरक्षित
Ø ठेवी परतीचे आवश्‍यक धोरण
वर्धा, दि.7- वर्धा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेवर रिर्जव बँकेनी लावलेले निर्बंध मागे घेऊन  2 मे रोजी बॅकींग परवाना परत केल्‍यामुळे  बँक पुढील व्‍यवसाय सुरु करण्‍यास पात्र झालेली आहे.  बँकेच्‍या  प्राधिकृत समिती सभेने बँकेच्‍या आर्थिक स्थितीचा 1 जुन रोजी आढावा घेऊन बॅकींग व्‍यवहार सुरु करण्‍यासाठी धोरण ठरविण्‍यात आले आहे.
वर्धा जिल्‍हा मध्‍यवर्ती बँकेत ठेवीदाराच्‍या ठेवी सुरक्षित असून ठेवी परत करण्‍यासंदर्भात आवश्‍यक धोरण ठरविण्‍यात आले आहे. सर्व ठेविदारांना त्‍यांच्‍या ठेवीवर व्‍याज आकारणी करण्‍यात येत आहे.
बँकेचे व्‍यवहार मागील 2 वर्षापासून पूर्ण बंद असल्‍यामुळे ज्‍या बहुतांश मुदती ठेवीची डयू डेट संपलेली आहे तसेच त्‍यांचे नुतणीकरण करता आले नाही. अशा ठेवीचे डयू डेटच्‍या तारखेपासुन आज पर्यतचे  कालावधीकरिता निर्धारित व्‍याजदराने किंवा ठेवीचे डयू डेट झाल्‍यापासुन जो कालावधी झाला असेल त्‍या कालावधीसाठी असलेला मुदती ठेवीचा व्‍याजदर यात जो कमी असेल त्‍या व्‍याजदराने नुतणीकरण करण्‍यात येणार आहे व यापुढे सुधारीत व्‍याजदराने त्‍याचे नुतणीकरण करण्‍यात येईल. त्‍यामुळे ठेवीदाराचे हित सुरक्षित राहिल व त्‍यांचे ठेवीवरील व्‍याजाचे नुकसान होणार नाही.
ठेवीदारांकडे कोणत्‍याही प्रकारचे तसेच विविध कार्यकारी सहकारी संस्‍थेचे थकीत कर्ज असल्‍यास ठेवीची रक्‍कम त्‍याचे कर्जात वळती करण्‍यात येईल. किंवा त्‍यांच्‍या कुंटूबांतील व्‍यक्‍ती यांचे कडे असलेल्‍या बँक कर्जाचे वसुलीपोटी ठेवीदारांचे संमतीने बॅकेत असलेल्‍या ठेवीची रक्‍कम वळती करुन नोडयू प्रमाणपत्र प्राप्‍त करुन घेता येइल. इतरांच्‍या कर्ज खात्‍यावर ठेवीची रक्‍कम वळविता येणार नाही.
मुदती ठेवी, चालू खाते व बचत खात्‍याबाबत कोणत्‍याही ठेवीदाराला त्‍यांच्‍या मुदती ठेवीची रक्‍कम मुदतपुर्व , मुदतीनंतर सद्यस्थितीत किमान एक वर्ष परत करता येणार नाही. फक्‍त वैयक्तिक खातेदारांना बचत ठेवीवर मिळणा-या व्‍याजाची उचल 50 टक्‍के प्रमाणे तिमाही अदा करण्‍यात येईल. चालू खात्‍यावर तथा बचत खात्‍यावर जून्‍या बाकीतून रक्‍कम काढता येणार नाही. ही कारवाई 1 जुलै पासुन सुरु करण्‍यात येणार आहे. नागरी बँक व सोसायटीचे मुदती ठेवीचे डयू डेटपर्यंतचे व्‍याजाची रक्‍कम त्‍याचे बचत ठेव, चालू ठेव खात्‍यात जम करण्‍यात येईल. परंतु व्‍याजाची रक्‍कम उचल करता येणार नसल्‍याचे धोरण ठरविण्‍यात आले आहे.
बँकेचे व्‍यवहार बंद असल्‍यामुळे मंजुर कर्ज मर्यादेवर व्‍यवहार होऊ न शकल्‍याने कर्ज थकित झालेले आहे. अशा कर्जदारांकडून घेणे असलेल्‍या रक्‍कमेसह डयू झालेल्‍या व्‍याजाचा भरणा करुन त्‍यांचे कर्ज खाते नुतनीकरण करण्‍यात येणार असल्‍याचे व्‍यवस्‍थापक , वर्धा जिल्‍हा मध्‍यवर्ती सहकारी बॅक मर्या. वर्धा यांनी कळविले आहे.

                                    0000