Monday 27 June 2016

आमचं गाव, आमचा विकास अभियान
प्रभाविपणे राबवा  -नयना गुंडे
वर्धा दि.7, 14व्‍या वित्‍त आयोगाचा निधी मिळविण्‍यासाठी प्रत्‍येक ग्रामपंचायतीनी आपला विकास आराखडा तयार  करुन  शासनाच्‍या मार्गदर्शक सचनेनुसार आमचं गाव, आमचा विकास या उपक्रमातंर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करुन त्‍याची प्रभावीपणे अमलबजावणी करावी अशा सुचना  जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी जिल्‍हा परिषदेच्‍या सभागृहात आयोजित सर्व जिल्‍हा स्‍तरीय विभाग  प्रमुखाच्‍या बैठकीत दिल्‍या.
            4 जुन रोजी जिल्‍हा परिषेदेच्‍या सभागृहात जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍यकार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली जिल्‍हयातील सर्व विभाग प्रमुखाची बैठक आयोजित करण्‍यात आली होती. यावेळी उप मुखयकार्यकारी अधिकारी प्रमोद पवार , श्री इलमे , जिल्‍हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर भारती यांची प्रमुख उपस्थितीत होती.
            गावातील विकासाबाबत अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्‍यात येऊन  . गावातील प्रश्‍न गावातच सोडविण्‍यात यावे. यासाठी आमचं गाव आमचा विकास उपक्रम  राबविण्‍यात येत आहे.  या उपक्रमातंर्गत जिल्‍हा, तालुका व ग्रामपंचायत  स्‍तरावर समिती तयार करुन प्रत्‍येक ग्रामपंयातींनी गावपातळीवर विकासाचे नियोजन करुन खर्चाचे नियोजन करावे, मानव विकास निर्देशांक विक‍सित करण्‍यावर ग्रामपंचायत स्‍तरावर प्राधान्‍य क्रम ठरविण्‍याचे व कौशल्‍य विकसित करण्‍यासाठी  तयार करण्‍यात येणार असून ग्रामपंचयात स्‍तरावर तयार करण्‍यात आलेला आराखडा तालुका स्‍तरावर व तालुका स्‍तरावरील आराखडा जिल्‍हा स्‍तरीय समिती मध्‍ये सादर करण्‍याच्‍या सूचना बैठकित नयना गुंडे यांनी दिल्‍या.
         राज्‍यातील सर्व ग्रामपंचायतींमध्‍ये ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्‍याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सदर विकास आराखडा तयार करतांना सदर उपक्रमाचे नाव आमंच गाव आमचा विकास असे राहील. विकास आराखडा 14 व्‍या आयोगाच्‍या कालावधीसाठी म्‍हणजे आर्थिक वर्ष 2015-16 ते 2019-20 करीता तयार करावयाचा आहे. ग्रामपंचायत विकास आराखडा हा उपक्रमाच्‍या प्रारंभास पंचवार्षिक बृहत विकास आराखडा व दरवर्षी वार्षिक कृती आराखडा असा दोन प्रकारे करण्‍यात यावा. सदर विकास आराखडा तयार करतांना  ग्रामपंचायतींने खालील प्रमाणे निधी विचारात घेणे गरजेचे आहे.
         ग्रामपंचायतींना विविध करांच्‍या माध्‍यमातून प्राप्‍त होणारा निधी ( मालमत्‍ता कर, पाणी कर व ग्राम निधी इत्‍यादी) . राज्‍य शासनाकडून प्राप्‍त होणारा महसूली हिस्सा ( उदा. जमिन महसूल उपकर, मुद्रांक शुल्‍क अनुदान इत्‍यादी), महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय  ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत विकास कामांसाठी प्राप्‍त होणारा निधी, 14 व्‍या वित्‍त आयोगाचा निधी , स्‍वच्‍छ भारत अभियान अंतर्गत ग्रामपंचायती स्‍तरावर प्राप्‍त होणारा निधी, बक्षिसे व पारितोषिके यांच्‍या माध्‍यमातून ग्रामपंचायतींना मिळणारा निधी, लोकसहभागातून मिळणारा निधी, जिल्‍हा नियोजन मंडळाकडून प्राप्‍त होणारा निधी इत्‍यादी .
        पंचवार्षिक विकास आराखडा तयार करतांना ग्रामपंचायतीने अपेक्षित स्‍वःनिधीच्‍या दुप्‍पट कामे पुढील पाच वर्षात घेण्‍यासाठी प्रस्‍तावित करावयाची आहे. आराखड्यात कामे प्रस्‍तावित करतांना स्‍वानिधीसाठी शासनाने निकष तसेच महात्‍मा गांधी राष्‍ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी अनुषंगिक सूचना लागू राहतील. वार्षिक विकास आराखडयामध्‍ये अपेक्षित स्‍वःनिधीच्‍या दीड पट कामे प्रस्‍तावित करावयाची आहे. असेही नयना गुंडे यांनी यावेळी सांगितले..
                            00000

No comments:

Post a Comment